📙 #पेसमेकर_म्हणजे_काय ? 📙
आपल्या हृदयाचे स्नायू विशिष्ट प्रकारचे असतात. या स्नायूंच्या विशेष गुणधर्मामुळेच
हृदयाचे आकुंचन प्रसरण सतत चालू असते.
माणूस जन्माला यायच्याही आधीपासून
शेवटच्या क्षणापर्यंत हृदय कार्यरत असते.
हृदयाचे हे कार्य स्वयंचलित यंत्राप्रमाणेच असते.हृदयाला चार कप्पे असतात. यापैकी
उजव्या कर्णिकेच्या वरच्या आणि बाहेरच्या
भागातील स्नायू अतिविशिष्ट प्रकारचे असतात.
३ मिमी रुंद, १५ मिमी लांब आणि
१ मिमी जाड असलेल्या या स्नायूंच्या लंबगोला कार पट्ट्यामुळे हृदय सतत आकुंचन प्रसरण
पावते. या क्रियेसाठी अर्थात विद्युत रासायनिक
प्रक्रियाच मूलतः कारणीभूत असतात. या लंब
गोलाकार भागाला सायनोएट्रियल नोड असे
म्हणतात.
मानवी हृदयाच्या गतीसाठी आवश्यक असलेला
हा नैसर्गिक पेसमेकर होय. याचे कार्य बंद
झाल्यास कर्णिका व जवनिका यांच्यातील जोडात असलेल्या अँट्रीओव्हेन्ट्रीक्युलर नोड
हा दुसरा नैसर्गिक पेसमेकर स्वतंत्रपणे त्याचे कार्य करू लागतो.
परंतु अशा प्रकारे हृदयाचे कार्य नीट होत नाही.इतर काही रोगांमध्ये हृदयाची गती
खूप मंद होते किंवा पूर्णपणे थांबते मेंदूला
५ मिनिटे रक्त पुरवठा झाला नाही तर
मृत्यू ओढवतो. त्यामुळे नैसर्गिक पेसमेकरला
पर्याय शोधण्याचे प्रयत्न झाले. याचेच फळ
म्हणून कृत्रिम पेसमेकर अस्तित्वात आला.
कृत्रिम पेसमेकर त्वचेखाली बसवला जातो व
तो बॅटरीवर कार्य करतो. या पेसमेकरचा एक
इलेक्ट्रोड उजव्या जवनिकेला जोडतात आकुं
चन साठीची प्रेरणा या पेसमेकर मधून पुरवली
जाते त्यामुळे हृदयाचे कार्य पूर्ववत सुरू होते.
५ वर्षांनंतर या पेसमेकरची बॅटरी बदलावी लागते.कृत्रिम पेसमेकर म्हणजे
हृदयाच्या आरोग्यासाठी वरदानच ठरले आहे.
#अशी_घ्या_पेसमेकर_बसवलेल्या_रुग्णांनी
#काळजी👍
हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ज्या रूग्णांमध्ये
हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा
कमी असते त्यां च्यासाठी या उपकरणाचा वापर
केला जातो. पेसमेकर हे एक लहान आकाराचे
आणि साधारणपणे
२५ ते ३५ ग्रॅम वजनाचे उपकरण आहे.
योग्य काळजी घेतल्यास पेसमेकर
बसवलेले रुग्णही सर्वसामान्यांपणे जगू
शकतात अशा रूग्णांच्या हृदयातील
स्नायूंकडे इलेक्ट्रिकल इम्पल्स पाठवून त्
यायोगे हृदयाचे ठोके कृत्रिम पडावेत अशी व्यवस्था या उपकरणाच्या मदतीने केली
जाते. साधारणपणे कोण त्याही
निरोगी व्यक्ती मध्ये हृदयाचे ठोके पडण्याचे
प्रमाण दर मिनिटास ६० ते १०० इतके असते.
मात्र हेच प्रमाण मिनि टास ४० पेक्षाही कमी मंदावले तर अशा व्यक्तीस चक्कर येणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे किंवा काही वेळ शुद्ध
हरपणे यासारख्या घटनाही घडु शकतात.अशा प्रकारची लक्षणे दिसत असल्यास
त्या रूग्णास पेसमेकर बसवुन घेणे आवश्यक आहें हृदयातील स्नायुंची क्षमता वाढविण्या
बरोबरच हृदयातील ठोके सामान्य आहेत की नाहीत ओळखण्याची क्षमता देखील पेसमेकर
या उपकरणामध्ये असते. साहजिकच जर
हृदयाची गती सामान्य असेल तर
पेसमेकर कृत्रिमरित्या स्नायुंना प्रेरित करून हृदयाचे ठोके
वाढविण्याचा प्रयत्न करीत नाही.गळ्याजवळच्या डाव्या
किंवा उजव्या हाडाच्या खालील बाजुस त्वचा चरबीच्या
खाली पेसमेकर बसविण्यात येतो. एका रक्तवाहिनीच्या
मदतीने उपकरणा तील प्रेरक घटक प्रवाहित केले जातात
रक्तवाहिनीच्या एका बाजूस हृदयाचे स्नायु आणि दुसऱ्या
बाजुस पेसमेकर अशा पद्धतीने हे उपकऱण बसविले जाते.
पेसमेकरमधील मापदंड (पॅरामीटर्स) आवश्यकतेनुसार
बदलण्यासारखे असतात आणि बाहेरूनदेखील त्यांमध्ये
बदल करता येऊ शकतात. सर्वसाधारणपणे पेसमेकर या
उपकरणाचे आयुर्मान १० ते १२ वर्षे इतके असते. संबंधित रूग्णाच्या हृदयाची गती सामान्य ठेवण्यासाठी पेसमेकरक
डून किती प्रमाणात प्रवाहाचा उपयोग केला गेला त्यावर या उपकरणाचे एकूण आयुर्मान ठरते.
ज्या रूग्णांमध्ये
पेसमेकर बसविलेला आहे रूग्णांना शक्यतो त्यांच्या
दैनंदिनीमध्ये फारसे काही बदल करावे लागत नाहीत.
#पेसमेकर_बसवलेल्या_रुग्णांनी_घ्यावयाची_काळजी
💝 सेलफोन वापरताना विरूद्ध बाजुच्या कानाचा वापर
💝करावा. म्हणजेच असे की, जर पेसमेकर गळ्या
💝 खालील डावीकडच्या हाडाजवळ बसविलेला असेल
💝 तर सेलफोन वर बोलताना उजव्या कानावर फोन
💝 ठेवून बोलावे.उच्च क्षमतेच्या विद्युततारांजवळ जाऊ
💝 नये. पेसमेकर बसविलेले रूग्ण घरगुती वापराच्या
💝 सर्व इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर कोणत्याही
💝 अडचणीशिवाय करू शकतात. मात्र,अशी उपकरणे
💝 योग्य पद्धतीने स्थापित केलेली असावीत.
💝 इलेक्ट्रिक उपकरणाची कळ चालु किंवा बंद,
💝 करणे टीव्ही पाहणे, संगणकावर काम करणे,
💝 मायक्रोवेव्ह हाताळणे यासारखी कामे करण्यास
💝 काहीच हरकत नसते. मेटल डिटेक्टरजवळुन जाताना
💝 अशा रूग्णांनी जलद गतीने जावे आणि संबंधित
💝 सुरक्षा कर्मचाऱ्यास आपल्या शरीरातील या
💝 उपकरणाविषयी माहिती द्यावी. त्यामुळे
💝 सदर सुरक्षा कर्मचारी मेटल डिटेक्टरच्या ऐवजी
💝 हाताने सदर व्यक्तीची तपासणी करेल.
💝 पेसमेकर बसविलेल्या रूग्णांनी मॉल्स किंवा
💝 अन्य ठिकाणी बसविण्यात आलेले मेटल
💝 डिटेक्टर्स किंवा थेफ्ट डिटेक्टर्सच्या अधिक
💝 जवळ जाऊ नये. अल्ट्रा साऊंड, एकोकार्डिओग्रॅम,
💝 एक्स-रे, सीटी स्कॅन यासारखी विविध वैद्यकीय
💝 परिक्षणे या रूग्णांमध्ये सहजपणे, कोणत्याही
💝 समस्येशिवाय करता येऊ शकतात. मात्र मॅग्नेटिक
💝रिसोनन्स इमेजिंग MRI एमआरआय) ही चाचणी
💝 अशा रूग्णांवर करू नये, कारण त्यामुळे पेसमेकर
💝 सर्किटचे नुकसान होऊ शकते. रेडिएशन थेरपी ही
💝उपचार पद्धती अनेकदा कर्करोगाने आजारी अस
💝 लेल्या रूग्णांसाठी आवश्यक ठरते. मात्र असे
💝 उपचार करताना पेसमेकर थेटपणे रेडिएशनच्या
💝 मार्गात आल्यास त्यामुळे पेसमेकरचे नुकसान होऊ
💝 शकते. त्यामुळे रेडिएशनच्या किरणांचा थेट परिणाम
💝 पेसमेकर होणार नाही काळजी घेणे आवश्यक असते.
लेखासाठी विशेष #सौजन्य :-
#डॉ_मनोज_चोपडा_साहेब
अतिनिष्णांत हृदय रोग तज्ज्ञ
मँग्नम हार्ट इन्स्टिट्युट ,नाशिक
#श्री_संतोष_बिभीषण_रावकाळे ®

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with श्री संतोष बिभीषण रावकाळे ®

श्री संतोष बिभीषण रावकाळे ® Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rusantusht

14 Jul
📱मोबाईल नंबर Block-unblock
का करता ..??थोडासा विचार करा व
त्याच्याशी संवाद ठेवा बर वाटेल मन
हलक झाल्याचे वाटेल नक्कीच 🤔
📱सध्या माणसांना एकमेकांचा राग
आला कि ,एकमेकांचे फोन नंबर ते
ब्लॉक करतात..., नंबर ब्लॉक होतो
पण प्रेम ब्लॉक होत का ? आठवणी
ब्लॉक होतात का ..?? तर नाही ज्या
आठवणी कायमच्या हृदयात ब्लॉक
असतात अशा नंबर ब्लॉक केल्याने
त्या ख़रच मिटतात का हो ?
Read 11 tweets
12 Jul
हे लोक ख़ुप असा कचरा आपल्या
डोक्यात घेऊन फिरत असतात ज्या
गोष्टींची आयुष्यात काही गरज नाही
त्या गोष्टी जोडत राहतात आपण असे
केले तर आपणसुद्धा कचऱ्याचा एक
ट्रक आणि बनू स्वतःसोबत जवळपास
असलेल्या लोकांवरही कचरा फेकत
राहू.मला असे वाटते की, आयुष्य खूप
सुंदर आहे. यामुळे जे लोक आपल्याशी
चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा
जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या
मनाने माफ करा #rusantusht
Read 7 tweets
11 Jul
#झणझणीत_मिसळ #नाशिक
#मिसळ_नाशिक #मिसळपाव

पूर्वी आमचं नाशिक धार्मिक पर्यटन
स्थळ म्हणून प्रसिद्ध होतं. पंचवटी,
राम मंदिर, सितागुंफा ई. बघण्यात
लोकांना रस होता काळ बदलला,
जमाना बदलला आता नाशिक
मिसळ वाईन यासाठी जास्त फेमस
व्हायला लागलंय ! असो, वाईनशी
आपला काही संबंध नसला तरी
मिसळ मात्र आपल्याला नक्कीच
प्रिय आहे! आमच्या नाशिकला
वाईन कॅपिटल ऑफ इंडिया
ऐवजी मिसळ कॅपिटल ऑफ द
वर्ल्ड घोषित करावे अशी सरकार
कडे मागणी आहे ,आणि नाशिक
करांना वाईन पेक्षा मिसळ जास्त
भारी बनवता येते यावर माझा ठाम
विश्वास आहे.महाराष्ट्रातल्या अनेक
शहरात मिसळ बनते पण त्यानी
मिसळ कशी बनवावी हे नाशिकला
येउन शिकून घ्यायला हवे पुण्यात
मला एकदा मिसळ मध्ये बेदाणा
लागला होता कडेलोटाची शिक्षा
असती तर मी हॉटेल मालकाला
Read 19 tweets
11 Jul
आज #नाशिक_सिटी_बस 🚌 ने प्रवास केलानिमाणी बस डेपो चौकशी केली
गंगापुर रोड किंवा कॉलेज रोड मार्गे बस
आहें का तर त्यानी सांगीतले की white
Dress वाले बाहेर साहेब उभे आहेत ते
माहिति सांगतिल त्यांच्याकड़े चौकशी
केली असता त्या मार्गे बस नाही असे
सांगीतले
बोरगड सिंबोयसीस शिवाजी नगर मार्गे जानारी बस लागली होती सीबीएस वर
सोडेल असे सांगीतले बस मध्ये बसल्या
वर आत मध्ये सावळा गोंधळ होता बस नक्की कधी कोणत्या मार्गे आणि कंडक्टर कोण जानार या बाबत चर्चा चाललेली
कोणत्या तरी साहेब सोबत बोलणे झाले
बस बोरगड ला जानार नाही हे ठरले दहा मिनिट पासुन बसलेली एक लेडीज प्रवासी
वैतागुन ऊँतरुन गेली आणि तब्बल १५ min नंतर बस मार्गस्थ झाली
Read 8 tweets
11 Jul
रस्त्यावरच्या प्रवासात म्युझिक आणि
जीवनाच्या प्रवासात जर कर्म चांगली
असली की प्रवासाचा क्षीण येत नाही.
वाईट कर्म करताना माणूस विचार
करतो की तो जे करतोय ते त्याच्या
माणसांसाठीच, तो काही स्वार्थ नव्हे.
पण त्यामुळेच त्याच्या कर्माची शिक्षा
त्याच्या जवळच्या माणसांना भोगायला
लागते, त्याला नाही.म्हणूनच आपल्या
प्रियजनांचं भविष्य सुखी व्हावे वाटत
असेल तर आपली कर्म चांगली ठेवा.
कर्म आणि मोक्ष गोष्टी अशा आहेत
की त्या दुसऱ्यांना वाटता येत नाहीत
किंवा दुसऱ्यांकडून घेताही येत नाहीत
चांगली कर्म करता आली पाहिजेत.
माणसाने माणसाशी माणसासारखे
वागले पाहिजे.वेळ माणसाला प्रत्येक
गोष्टी शिकवते...आणि जे शिकवते
त्याचा माणसाने बोध घ्यायचा असतो
भूतकाळात झालेल्या चुका वर्तमानात
केल्या तर त्याचा प्रभाव हा भविष्यावर
होत असतो; तर निर्णय घेताना जरा
विचार करा,जेणे करून आपल्याच
पुढे त्रास होणार नाही.आणि कसं
Read 5 tweets
9 Jul
#हर्षस्थान_सहस्राणि_भयस्थान
#शतानिच_दिवसे_दिवसे_मूढं
#आविशन्ति_न_पंडितम्
मुर्ख मनुष्याकड़े प्रतिदिनी आनंदाची
सहस्र कारणे असतात तर दु:खाची
शंभर कारणे, तथापि शहाण्या
माणसाच्या मनाचे संतुलन छोट्या
मोठ्या कारणांमुळे ढळत नाही
मनाचे आरोग्य शारीरिक आरोग्या
इतकेच महत्त्वाचे आहे आताच्या
या कसोटीच्या काळात मानसिक
संतुलन बिघडणार नाही काळजी
घ्यायला हवी सुदृढ निरोगी मान
सिक आरोग्यासाठी छंद जोपासा
खळखळून हसा आपल्या जीवल
गांशी संवाद साधा तणावमुक्त
राहण्याचा संकल्प करा संकट
संधी घेऊन येत असतात आपण
त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा
फक्त समोर दिसतोय त्या प्रश्ना
पलि कडे पहायला शिकायचे,
सर्वात महत्वाचे ते स्वत:वरचा
विश्वास आणि मनाचे संतुलन
कायम ठेवायचे. सर्वात समर्पक
उत्तर अगदी सहज सापडते.
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(