सरस्वतीचे पुत्र म्हणावे असे गीतरामायणकार
"गदिमा " यांचा आज जन्मदिवस 🙏
स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती..
हे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या 56 पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला। +
 #गदिमा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशी मानवी जन्माची विवशता सांगणाऱ्या गदिमांनी शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा, चंदाराणी का ग दिसतेस , नाच रे मोरा, झुकझुक झुकझुक अगिनगाडी, बालसाहित्य ही सजवले
फिरत्या चाकावरती देसी, कानडा राजा पंढरीचा, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी अशी +
भक्‍तीगीतं लिहिणारे माडगुळकर बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला सारखी, नखरेल लावण्या ही लिहल्या , मला प्रथम गदिमा कळले ते बाबांनमुळे, माझ्या गाणं शिकण्याची सुरवात बाबांनी गीतरामायण ने केली होती,
मला त्यावेळी वाटायचं हे खरचं वाल्मिकी
असावेत, +
नंतर कळलं की आधुनिक वाल्मिकी त्यांना म्हणतात, माझ्या सारखीने गदिमा च्या वर लिहनं म्हणजे ज्योती नं तेजाची महंती सांगितल्या सारखे आहे, गदिमा चा अभिनय हाही वेगळा लेखनाचा विषय होऊ शकेल, पेडगावचे शहाणे हा मी आजीच्या हट्टा खातर पाहिला होता, +
गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रिमूर्तीनं उत्तमोत्तम मराठी चित्रपट दिले. कथा पटकथा, कांदबरी सुध्दा., म्हणजे त्यांची लेखणी केवळ काव्य पद्य यापूरती मर्यादित नव्हती
ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील शेटफळे या ठिकाणी गदिमांचा जन्म झाला. आटपाडी, कुंडल आणि औंध इथे शिक्षण +
लहानपणापासूनच लिहिण्याची, नकला करण्याची आवड असलेल्या गदिमांनी घरच्या बिकट परिस्थितीमुळे चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी त्यांनी चित्रपटांच्या कथा, संवाद, गीतलेखनाचे काम केले. 1938 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ या +
गाजलेल्या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका करून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात केली.गदिमांचे हस्ताक्षर खूप छान होते, वि. स. खांडेकरांच्या कडे लेखनिक म्हणून सुद्धा त्यांनी काम केले, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे, बाई मी विकत घेतला शाम यासारख्या +
मधून जीवनातील तत्त्वज्ञान सांगितले, 1942 च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवाड्यांची निर्मिती करत लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. त्यांच्या गद्य लेखनाची म्हणावी तितकी दखल का घेतली गेली नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. +
जन्मताच मृत घोषित करण्यात आलेल्या या अर्भकानं मराठी साहित्यात एक नवा इतिहास रचला. संपूर्ण विसावं शतक आपल्या अभिजात काव्यानं व्यापून टाकलं, गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले. अगदी हिंदी कथा
तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, +
त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली आहे ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच . लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’ हे , +
त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी लिहिले आहे, शेटफळ या गावी त्यावेळी सांगली आजच्या सातारा, जिल्ह्यातल्या १ ऑक्टोबर १९१९ र जन्म झालेल्या पण जन्मतः मृत घोषित त्या छोट्या मृत जीवाला पुरण्यासाठी खड्डा सुद्धा खणला गेला होता .+
मात्र त्या सुईणीला काय वाटलं कोण जाणे आणि तिने शेगडीतला निखारा त्या बाळाच्या बेंबीजवळ लावला आणि त्या धगीने चटका बसून बाळ एकदम रडू लागलं. मराठी रसिक त्या सुईणीच्या कायम ऋणांत राहतील. गदिमा ना खरं तर खूप शिकायचं होतं पण परिस्थिती मुळे ते शिकू शकले नाहीत, +
तत्कालीन औंध संस्थानचे राजे श्रीमंत भगवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांनी या दरम्यान गदिमांच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. गदिमांनी राजांना एकदा त्यांचीच उत्तम नक्कल करून दाखवली आणि राजे म्हणाले की “हा मुलगा औंध संस्थानचे नाव उज्ज्वल करील! बाळ तू टाकीत जा, शिकला नाहीस तरी चालेल +
त्यांनी गदिमा ना चिट्ठी देऊन आचार्य अत्रे न कडे पाठवले होतं आणि अत्रेंनी मास्टर विनायक कडे गदिमा ना पाठवलं, अशा हे "गजानन दिगंबर माडगूळकर ".
रामायण तील वाल्मिकी नी रामायण २८ हजार श्लोकात लिहलं जे अतिशय सुंदर पध्दतीने ५६ गाण्यांमधून बसवलं. सलग ५२ आठवडे आकाशवाणी वरून हे +
प्रसारित झाले होते, गदिमा मात्र सांगत की " एक अदृष्य अगुंली लिहते".
व्यर्थ जन्म रे विद्येवाचून, ज्ञान जगातील घेई वेचून
कीर्ती आण तू पायी खेचून, यशवंत हो, जयवंत हो,
हे देखील सांगणारे गदिमाचं यांना साथ देणारे सुधीर फडके आमच्या कोल्हापूरात २५ जुलै १९१९ झाला याचा अभिमान आहे +
अगदी ताजी घटना सांगायचे म्हणाले तर, माझ्या वडिलांचे मित्र चितांमणी यांनी केवळ गदिमांची लांबची का असेना,पुतणी आहे म्हणून मुलीला होकार देऊन लग्न केलं होतं😃
"कुमार दोघें एक वयाचे सजीव पुतळें रघुरायाचें
पुत्र सांगतीं चरित पित्याचे, ज्योतीनें तेजाचीं आरती
कुश-लव रामायण गातीं"+
गदिमांच्या लेखणीला,

प्रतिभेला आणि सृजनशीलतेला

विनम्र वंदन..🙏🌺

गदिमांच्या स्मृतिस अभिवादन! करून लिखाण अटोपत घेत आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Amruta🎸आजीची मूलुखमैदान तोफ 💥🔭

Amruta🎸आजीची मूलुखमैदान तोफ 💥🔭 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Amruta_sv

29 Sep
जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळाली (१९९९). जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (१९९७-९९) आंतोनियो लुना (Antonio Bayes de Luna) यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला. +
#WorldHeartDay Image
उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार २४ सप्टेंबर २००० रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. सन २०११ पासून २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.+ Image
फारसं लेक्चर नाही देणार, थोडक्यात सांगते,
होमोसिस्टीन एक अमिनो अँसिड आहे, जो प्रथिनांच्या पचनानंतरही शिल्लक राहतो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून हृदयरोगाचा धोका वाढवतो. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी ६, फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन सी घ्या. महिन्याला तेल बदलत राहा. +
Read 6 tweets
8 Sep
🌺रामनाम 🌺
महादेवजींना विनाकारण कोणासमोर वाकताना पाहून पार्वतीजींनी विचारले की तुम्ही कोणाकडे नतमस्तक होत आहात?

शिवजी पार्वती जीना सांगतात की हे देवी! एकदा " राम "म्हणणाऱ्या व्यक्तीला मी तीन वेळा नमन करतो.+
#रामनाम
पार्वतीजींनी एकदा शिवजींना विचारले की तुम्ही स्मशानात का जाता आणि तुम्ही चित्तेची राख शरीरावर का लावता..

त्याच वेळी शिव पार्वतीला स्मशानभूमीत घेऊन गेला. तेथे अंत्यसंस्कारांसाठी एक मृतदेह आणण्यात आला. लोक " राम नाम सत्य है" असे म्हणत मृतदेह आणत होते.+
शिव म्हणाले की पहा पार्वती! जेव्हा लोक या स्मशानभूमीच्या दिशेने येतात तेव्हा ते राम नावाचे स्मरण करून येतात. आणि या मृतदेहाच्या प्रयोजनासाठी, माझे खूप प्रिय दिव्य नाव राम अनेक लोकांच्या मुखातून बाहेर पडते, मी हे ऐकण्यासाठी स्मशानभूमीत येतो, आणि मी या मृतदेहाचे नाव मिळविण्यासाठी +
Read 9 tweets
21 Apr
राम नवमी निमित्त..रामरक्षेचं महत्तव सांगणारा लेख👇

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।
श्रीराम राम रघुनन्दन राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम।।+
मणिपूर चक्र आणि रामरक्षा--- एक अभ्यास

लेख---चंद्रकांत कुरे. बडोदे🙏

हे चक्र नाभिस्थानाजवळ असते.
ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे.
२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात "गुरुत्वमध्य" ह्याच चक्रात असतो. +
३) ह्या चक्रावर "धारणा"केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.
४) धारणा म्हणजे काय ?चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा...
धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर धारणा म्हणजे concentration... किंवा "एकाग्रता"+
Read 17 tweets
19 Apr
Appreciation tweet
#positiveenergy
गेले 8दिवस भयंकर टेन्शन मध्ये आहे, खूप लोकांनी काँल करून धीर दिला.ट्विटरवासियांनी ही मोलाचा धीर दिला.
काल 3 मरणं पाहिल्यावर ,रात्रभर जागल्यावर मन अस्थिर होतं...पण dr. Sukrut @sukrutkuchekar .+
यांनी स्वत:कोविड हाँस्पिटलची धुरा सांभाळत असताना ही ..मला धीर दिला ..त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्याच शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.👇
"जनपदविध्वसं व्याधी." त्यात आचार्य सुश्रुताचार्य सांगतात,.- जेव्हा अशा व्याधी येतात. त्यावेळी सामान्य जनता ही समजूदारपणा +
सोडून देते.आयुर्वेदामध्ये एक टर्म आहे..it's called " धन्वंतरी अधिकारम्"..ते सांगतात की , अशावेऴी डाँ ने स्थितप्रज्ञ असावं .कोणतिही परिस्थिती तयार झाली तरी त्याचा बुध्दीने सामना करावा.आणि सर्वात महत्तवाचं मेडीकल सायन्स वर विश्वास ठेवावा.
वेद हे देवाचंच एक रूप आहे .+
Read 12 tweets
18 Apr
विनंती 🙏
धागा लिहण्याची ना मनस्थिती आहे ना शारिरीक बळ.
पण हे लिहणं गरजेचं वाटलं.
1 ) एक आजोबा वय वर्षे 62
2) एक दादा वय वर्षे -37
दोघे ही वेगवेगळ्या घरातले पैकी दादा साँफ्टवेअर इंजिनिअर
1)आजोबा आले तेव्हा त्याचं आँक्सिजन लेवल 79 होतं अक्षरक्षा थर थरत होते +
2)दादा आँक्सिजन लेवल 85 .श्वास अडखळत चालला होता.
या दोघांनी लक्षणे दिसल्यावर स्वत:च उपचार चालू केले ,हल्ली कोरोना किट मध्ये कुठल्या टँबलेटस् असतात हे सगळ्यांना तोंडपाठ आहेत.मेडीकल मधून आणून घेत बसले.आणि हल्ली सोशल मिडीयावर जे 'कापूर' चा वापर करून आँक्सिजन लेवल वाढते +
हे पाहून ते हुँगत घरी बसले...जेव्हा अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली हाँस्पिटल ला आले.पैकी आजोबा आज नाहीत .पहाटे 5 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दादा अजून झुंज देत आहे.
कोरोना हा ' फ्लू ' आहे का उगीच अवडंबर माजवता हे ते..बाबांनो माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे 🙏🙏 +
Read 11 tweets
11 Mar
वीरांगणांच्या माळेतील पाचवं पुष्प घेऊन मी
तुमच्या समोर उपस्थित होत आहे.
राणी लक्ष्मीबाईंना तर आपण सगळेच ओऴखतो.पण त्यांच्यासोबतचं या भारतभूमीची आणखी एक वीर कन्या जिने ,आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
ती म्हणजे "राणी झलकारी बाई "+
या तर मग जाणून घेऊ या भारतभूमीच्या या वीरकन्येबाबत.झलकारी बाई भारताच्या त्या महान सैनिक महिलांमध्ये येतात ,ज्यांनी 1857 च्या उठावात महत्तवपूर्ण भूमिका निभावली.
झलकारी बाईंचा जन्म "भोजला" गावात 22 नौव्हेंबर 1830 ला एका कोळी परिवारात झाला+
त्यांचे वडीलांचे नाव सदोवा कोळी (ऊर्फे मूलचंद ),आणि आईचे नाव, जमुनाबाई (ऊर्फे धनिया ).झलकारी बाई लहानपणापासूनचं साहसी आणि निश्चयी होत्या. घरातल्या कामाबरोबरचं लहानपणापासून ,घरच्या गुरांना फिरवणे पाणी देणे .आणि इंधनासाठी जंगलातील लाकडे गोळा करणे या त्या करत.+
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(