शॉर्ट #Thread

जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे लखीमपुर-खीरी की मावळ येथील गोळीबार व गोवारी हत्याकांड?

मागील पंधरवड्यात लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर गाडी चढवली आणि त्यातून चार शेतकरी (?) मृत्युमुखी पडले आणि ते मृत्युमुखी पडल्यानंतर

#Lakhimpur
तेथे उपस्थित असलेल्या जमावाने चार निर्दोष लोकांची ठेचून हत्या केली. (ज्याबद्दल कोणीही बोलत नाही.) जितका दोष गाडी चढवून त्या शेतकऱ्यांना मारणाऱ्याचा आहे तितकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त दोष हा जाणीवपूर्वक चार निर्दोष लोकांच्या हत्येचा सुद्धा आहे.

#मावळ
ती बाब मी सध्या वेगळी ठेवतो. मी हे लिहितोय कारण, 'भावींनी' वक्तव्य केले की, 'लखीमपुर-खीरी येथे घडलेली घटना ही जालियनवाला बाग हत्याकांड आहे', अशी तुलना त्यांनी केली. पण मला असं वाटतं की, एकतर त्या वक्तव्य केलेल्या 'भावीने' इतिहासाचा अभ्यास केला नसावा

#गोवारी_हत्याकांड
किंवा मोदीद्वेष इतका भरलेला आहे की बाकी काहीही त्यांना दिसत नाही.

आधी हे समजून घ्या की, लखिमपुर येथे जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे पोलिसांनी गोळ्या झाडून निर्दोष लोकांची हत्या केली होती तशी केल्या गेलेली नाही. इतकंच कशाला त्यामध्ये सरकारचा किंवा योगींचा कोणता हात ही नाही.
पण 2011 मध्ये आपल्या राज्यात मावळ येथे पवना नदीच्या पाण्याला वळवण्यासाठी, जेव्हा मावळ येथील शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता आणि त्यातून कित्येक निर्दोष शेतकरी मारले गेले होते, त्यावेळी ज्यांनी आता वक्तव्य केले त्यांचाच पुतण्या संविधानिक पदावर बसलेला होता. मावळ मध्ये
निर्दोष शेतकरी मारल्या गेले होते, तो खरा जालियनवाला बाग हत्याकांड होता. कारण ज्याप्रमाणे भारतीयांना जालियनवाला बाग हत्याकांडावेळी नेम धरून गोळ्या मारल्या गेल्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मावळमध्ये मारल्या गेल्या होत्या.

त्याच्यापेक्षा थोडसं आणखी आपण मागे गेलो तर आपल्याला दिसेल
की, आमच्या नागपूर येथे ज्याठिकाणी आज शहीद गोवारी उड्डाणपूल आहे. त्याचठिकाणी गोवारी बांधवांना लाठीचार्ज करून पांगविण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते? दुसरे तिसरे कोणी नाही

#नौटंकी
तर आता ज्यांनी हे वक्तव्य केले तेच व्यक्ती होते. मग एक सामान्य माणूस म्हणून मला हा प्रश्न पडतो की, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना शासनपुरस्कृत व पोलिसांमार्फत करवली गेली होती, परंतु लखीमपुर येथील घटना अशी नाही. त्याऐवजी मावळ व गोवारी हत्याकांड या दोन्ही घटना नक्कीच शासनपुरस्कृत
व पोलिसांमार्फत घडविल्या गेलेल्या होत्या.

तर मग त्या घटनांना जालियनवाला बाग हत्याकांड का म्हणू नये?

एकदा जनतेने या गोष्टीचा विचार करावा आणि नेमके जालियनवाला बाग हत्याकांड कोणते होते? हे ठरवावे.

जाता जाता, शेवटी सरकार पुरस्कृत (उत्स्फूर्त) बंद पुकारल्या गेला. सरकारचा नव्हता तर
तीन पक्षाचा होता, अशी मखलाशी सुद्धा केली गेली.

पण सरकारमध्ये तेच 3 पक्ष आहेत, हे कसं विसरले?

त्याऐवजी राज्यातील किती शेतकऱ्यांना मदत केली गेली ? हे का नाही बघितल्या गेले.

आपलं झाकून ठेवण्यासाठी मुद्दाम नसलेले मुद्दे बनवून आपले अपयश झाकण्यासाठी केलेला हा

#Farmers
हा निष्फळ प्रयत्न होता का?

याचा ज्याने त्याने विचार करावा!

धन्यवाद!

पवन✍️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पवन🇮🇳

पवन🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Yours_Pawan

12 Oct
शॉर्ट #Thread

पेट्रोलियम पदार्थावरील केंद्राने गोळा केलेल्या कराचा हिशोब देतोय :👇

1⃣ रस्ता कर - ₹ 18/लि.
₹ 50000 कोटी - जल जीवन मिशन
₹ 79000 कोटी - रस्ते बांधकाम
उरलेले - पायाभूत सुविधा

2⃣ शेती पायाभूत सुविधा कर - ₹ 4/लि.
₹ 30000 कोटी - APMC, स्टोअरेज सुविधा व फूड
प्रोसेसिंग पार्क.

3⃣एक्साईज ड्युटी (अबकारी कर) - ₹ 12.40/ लि.
त्यातील 41% राज्याला जातो.

पेट्रोल-डिझेल वरील केंद्रीय कर हे 32-34 रु. प्र.लि. फिक्स आहेत.
त्यातील काही भाग हा राज्य सरकारांना सरळ सरळ दिला जातो आणि उरलेला राज्यांमध्ये रोडनिर्मिती करिता वापरला जातो.

#PetrolPrice
VAT सारखे राज्यांचे कर हे टक्केवारीमध्ये असतात.

म्हणजेच क्रूड तेलाचे भाव जितके जास्त असतील, तितका जास्त कररूपी पैसा हा राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होत असतो.

पेट्रोलियम पदार्थांच्या माध्यमातून जवळपास 20% कररूपी पैशाचे संकलन हे राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होते.

#PetrolPriceHike
Read 9 tweets
11 Oct
#Thread
'न्यूटेला' ची गोष्ट!!

इटलीची सर्वात श्रीमंत व्यक्ती जिओव्हानी फेरेरो आहे. आणि त्याच्या श्रीमंतीचे कारण हे त्यांच्या आजोबांनी दुसर्‍या जागतिक महायुद्धादरम्यान असलेल्या चॉकलेटच्या कमतरतेमुळे निर्माण केलेल्या 'न्युटेला' या 'हेझलनट ट्रीट' मध्ये आहे.

#Nutella Image
तेव्हापासून आपल्याला आवडणार्‍या विविध गोड पदार्थांचा शोध लावून फेरेरो कुटुंबाने जवळपास 35 बिलियन डॉलरचे साम्राज्य निर्माण केलेले आहे. या थ्रेडच्या माध्यमातून त्यांची कथा आपण बघणार आहोत.

अधिकृतपणे यांना 'फेरेरो समूह' म्हणून ओळखले जाते. या खाजगी इटालियन फर्ममध्ये 34 हजार पेक्षा Image
जास्त कर्मचारी काम करतात आणि जगात 30 पेक्षा जास्त प्लांट आहेत.

ही कंपनी एका वर्षात जवळपास चौदा बिलियनचा व्यवसाय करते त्यात 1/5 (3 बिलियन) वाटा हा एकट्या न्युटेलाचा आहे.

त्यांच्या या कन्फेक्शनरीच्या साम्राज्यात आपल्या घरातील सर्व लहान मुलांना आवडणार किंडर जॉय,
Read 28 tweets
8 Oct
खूप मोठा #Thread

आर्यन खानला जमानत का नाकारण्यात आली!!

शाळेतून घरी आल्या-आल्या ट्विटर उघडले, अपडेट मिळाली की, आर्यन खान याची जमानत याचिका कोर्टाने दाखल करून घेतलेली नाही, मनाला आनंद झाला. कारण कालपासून येणार्‍या अपडेट बघता असंच वाटत होतं की, आज तो जामिनावर सुटणार.

#AryanKhan
कोर्टात काय काय आर्ग्युमेंट झाले, हे जेव्हा पूर्णपणे वाचले तेव्हा असं वाटलं की, मराठी मीडिया नेहमीप्रमाणे हे सगळे दाखवणार नाही. त्यामुळे जनतेपर्यंत हे पोहोचणे महत्त्वाचे आहे आणि आर्यन खानवर वेळ घालवणे हे निरर्थक आहे. तरीही लोकांना त्यातली सत्यता कळावी म्हणून त्याच्यावर वेळ
वाया घालवून हे मराठीत लिहीत आहे.

अतिरिक्त महानगर न्याय दंडाधिकारी श्री आर एम नीलेकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

एएसजी अनिल सिंग आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्यातर्फे काम बघितलं तर मानेशिंदे यांनी आर्यन खान याचा पक्ष मांडला.

#NCB
Read 29 tweets
7 Oct
शॉर्ट #Thread

सुरक्षित उत्तर प्रदेश गुंतवणूकदारांचा आवडता उत्तर प्रदेश!

एकेकाळी खंडणी मागणारे गुंड आणि टोळी युद्धामुळे उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांचे मालक धजावत नव्हते. परंतु आता योगी जींच्या राज्यात गुंतवणूकदार धावून येत आहेत. Image
अशाच प्रकारची गुंतवणूक ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे सुरू केलेली आहे.

पाकीट बंद पदार्थ निर्मिती करणाऱ्या ब्रिटानिया कंपनीने शुक्रवारी सांगितले की, ग्रीन फिल्ड उत्पादन सुविधेवर त्यांनी याठिकाणी काम सुरू केलेले आहे.

#industry Image
330 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 30 एकरामध्ये हा प्लांट उभा करणार आहे आणि त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ही 1.25 लाख टन असणार आहे.

याठिकाणी कंपनी ही मारीगोल्ड, फिफ्टी-फिफ्टी, गुड डे, मिल्क बीकीज, टायगर ग्लुकोज आणि रस्क यासोबतच त्यांच्या ब्रांडचे असलेले इतरही पदार्थ

#UttarPradesh
Read 12 tweets
4 Oct
#Thread

मोदींचा अमेरिका दौरा!

मागील पंधरवाड्यात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्‍यावर जाऊन आलेत. परंतु किती लोकांच्या हे लक्षात आले की, हा अमेरिका दौरा एक अनर्थ सुद्धा ठरू शकला असता, पण मोदींनी तो मोठ्या कौशल्याने टाळला.

या संबंधित माहिती देणारा हा एक थ्रेड आहे.
आता या दौर्‍याबद्दलची चर्चा थांबलेली आहे. सोबतच पंतप्रधान मोदी आणि देश हा वेगळ्या मुद्द्याकडे वळलेला आहे. त्यावेळी मी तुमच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेच्या दौर्‍याचे सर्वात मोठे यश मांडणार आहे. कदाचित हे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल.

#modiinamerica
पण जर तुम्ही प्रत्येक मुद्दा बारीकपणे लक्षात घेतला तर तुम्हाला सर्व गोष्टी पटतील.

नरेंद्रजी मोदी यांच्याऐवजी जर दुसरा कोणी पंतप्रधान असता तर हा अमेरिका दौरा एक भयानक स्वप्न ठरला असता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींची विश्वासार्हता, करिष्मा आणि जागतिक स्तरावरील भारताची मजबूत
Read 18 tweets
4 Oct
Short #Thread

योगीजींच्या राज्यात विकासाचा भगवा🚩🚩

उत्तरप्रदेशला कायमच सर्वांनी 'मागासलेला प्रदेश' म्हणून हिणवले आहे पण एक चांगला मुख्यमंत्री मिळाला तर त्या राज्याचे नशीब पलटायला वेळ लागत नाही, असेच आज म्हणावे लागेल.

योगीजी त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि

#Infra
राज्याचा कायापालट होण्यास सुरुवात झाली या थ्रेडच्या माध्यमातून आपण मागील चार वर्षात उत्तर प्रदेशात पूर्ण झालेल्या हायवे आणि एक्सप्रेस वे यांचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत.

@theupindex
दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे :
🔸82 किमी, बांधकाम किंमत 8346 कोटी रुपये.
🔸 14 पदरी, भारतातील सर्वात रुंद एक्स्प्रेस वे.
🔸 दिल्ली ते मेरठ जायला आधी 3 तास लागायचे आता फक्त 45 मिनिटे लागतात.
🔸 अनेक दशकांपासून असलेली जनतेची मागणी 2021 मध्ये पूर्ण झाली.
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(