लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी तिच्या इच्छे विरुध्द शरीरसंबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली, त्यावेळी तिचा गर्भपात व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बळजबरीने गोळ्या खाऊ घातल्या. गोळ्या खाल्ल्यावर तरुणीची प्रकृती खालावत जावून तिचा मृत्यू झाल्याची घटना नगर शहरातील माळीवाडा
परिसरात घडली. या प्रकरणी सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या बाबतची माहिती अशी की वडिलांसह माळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय हिंदू तरुणीला आरोपी सईद ताहेर बेग ( वय.३३, रा.
संजयनगर, काटवन खंडोबा ) याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसबंध ठेऊन तिच्या इच्छे विरुध्द तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्या तरुणीने सईदकडे लग्न करण्याबद्दल विचारणा केली.असता त्याने तिला उडवाउडवीचे उत्तर दिले. सईद याचे या पुर्वी दोन लग्न झाले होते. असे असताना त्याने अविवाहित असल्याचे
सांगितले अन गोड बोलून तिच्याशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. तीला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व शारीरिक छळ केला.त्यातुन ती तरुणी गर्भवती झाली.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh