कुऱ्हाडीनं फाटी फोडून, अंगणात घाम पुसत माझा आजा म्हनला,
घे ती,पाटी-पेन्सिल आनं पुस्तक,
मी म्हनलो,काय रं आज्या? सारखा खेकसतोस?
तू केला व्हता का आब्यास? गेला हुता का शाळंला?
आजा गालातल्या गालात हसून म्हनला,
आरं लेकरा,
पान्हा आटलेल्या मायची छाती चोखत,रक्ताची चव चाखली,{1}
आम्ही वाढत होतो उकिरड्यावर,जशी वाढतात डुकरं....
शाळंला गेलो,शाळच्या पटावर चुकून नाव पडलं,
सगळ्या जिभा वळवळल्या,
झाला एकच गोंधळ.."मास्तर शाळा बाटवली"
मास्तरांनी नाव ईचारलं,
मी म्हनलो,"गज्यानन म्हाडीक"
इतक्यात एक आवाज आला,
हा "गेण्या महाराचा" पोरगा "गज्या महार"{2}
आणि मग,शाळेनं मोठ्या उदारतेनं एक कोपरा मला बहाल केला.
त्या दिवशीच बाभळीचा काटा नरड्यात रुतून बसला होता बघ लेकरा...
मला जवळ घेत आजा म्हनला, लिव पाटीवर..
मी म्हनलो,"ग" गणपतीचा लिवू का?
माझ्या डोक्यावरून हात फिरवत आजा म्हनला,
शिक्षनाची सुरुवात "बा" म्हंजी "बाबासाहेबापासनं" कर..{3}
मी आज्याच्या गालावर हात फिरवत ईचारलं,
मघाशी तू बाभळीच्या काट्याचं काय म्हनलास?निघाला का त्यो काटा?
आजा आभाळाकडं बघत, डोळे बंद करून आसवं ढाळत पुटपुटत होता.
१४ ऑक्टोबर १९५६ सालीच, माह्या बापानं काटा काढून जखम कायमची बरी केली,"माझी जिंदगीच बाबासाहेब........."{4}

#बाप

©️....jay

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with आयुष्याची डायरी

आयुष्याची डायरी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @prash7021

14 May
व्हाट्सअप वर दर 1-2 महिन्यांनी पोरांचे स्टेटस बघतो ज्यात ते एका accident मध्ये मेलेल्या दानिश जेहेन चे फोटो स्टेटस ला टाकून रडत असतात.

बर ते फक्त रडतच नाहीत तर त्याला तू प्लिज परत ये अशा request करत असतात.

हे असले स्टेट्स टाकणारे सगळे लेकरं 16-18 वर्षांची आहेत.
यांची दुनियाची वेगळी असते.बारक्या भावाचा वाढदिवस असेल तर 'bruhh jaan' बहिणीचा असेल तर ,siso jaan, sista.

आईबाप, मामा, मामी, चुलता असेल तर कॅप्शन ला 'Support system 😎' ठरलेलं असत. मोठा भाऊ असेल तर ' कुठं पण राडा करायचं लायसन"अशा टाईप चे कॅप्शन असतात
लोकडाउन मुळे शाळा, कॉलेज बंद असल्या कारणाने या पिढी कडे करण्यासारखं काहीच नसल्याने हे पोर, पोरी सकाळी उठून अंघोळ करून मस्त फ्रेश होऊन एखाद्या बिल्डिंग जवळ जातात आणि इन्स्टाग्राम वर रिल्स बनवत बसतात.

मोठ्या बिल्डिंग चा शॉट, नंतर या पोराचा छपरी डायलॉग,
Read 11 tweets
12 May
संविधानिक अधिकार, संविधान बचाव रॅलीचे ढोंग करून भ्रष्टाचार,जातीयवाद करीत वाढलेल्या पोटावर करदोड्याने पुरोगामीत्वाची चड्डी घालणारे सरकार जेव्हा मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करते तेव्हा यांच्या त्या फाटक्या चड्डीतून उघडी पडलेली द्वेषयुक्त गांड दिसून येते,
त्यावेळी यांचे बेगडी संविधान प्रेम कुठे चरायला गेलेलं असतं? शिष्यवृत्ती थांबवली जाते, समाज कल्याणाचा निधी मागच्या दाराने लुबाडला जातो, तेव्हा यांची बोलती बंद असते.

यांचा हागलेला गु उचलण्यात इकडचेही काही कमी नाहीत, आपला वापर फक्त फोडणी सारखा होतोय हे ह्यांना कळत नाही,
एखादा जयभिम, संविधान वगैरे शब्द म्हणाला की हे चालले मम्मम करीत त्यांच्या छातीचे दूध चोखायला. उद्या मन्या भिडे ने तुम्हाला जयभिम घातला की जा त्याच्या मागे मेंढरासारखे, आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरू नका. तुमच्या प्रश्नावर हे कधी येतात का पुढे? मांडतात का तुमचे प्रश्न?
Read 6 tweets
12 Jun 20
नागराज मंजुळे यांच्या ' फॅन्ड्री' सिनेमाचा शेवटच्या भागात मेलेले डुकरं बांधून जब्या घेऊन जात असतो. तेव्हा शाळेच्या भिंतीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा दिसतात. सामाजिक दरी मिटावी यासाठी आयुष्य वाचणाऱ्या या महापुरुषांच्या प्रतिमा जणू
हताश होऊन जब्याकडे आहेत असेच वाटते आणि सिनेमा संपताना जब्या केमेऱ्या समोर दगड फिरकवताना दिसतो. खरं तर हा दगड या बेगडी समाज व्यवस्थेला मारलेला असतो. त्याच प्रमाणे नागराजचा 'सैराट' चा शेवट सुन्न करणारा होता. आई - वडिलांच्या रक्ताचे ठसे त्या बाळाच्या
पायावर उमटतात आणि रक्ताने माखलेली ती चिमुकली पावले जणू आपल्या मनावरचा जातीवाद ओरखडून काढतात असे वाटतात. सांगायचा मुद्दा हाच की *' जात नाही ती जात'* ही गोष्ट 100 टक्के खरी आहे हे प्रत्येक वेळी सिद्ध झालय. अमेरिकेतील जॉर्जच्या मृत्यू बद्दल तिथल्या वर्ण वादावर आग ओकणारे तसेच
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(