॥श्री स्वामी समर्थ॥

शुभ सकाळ मित्रांनो, मी काहीकाळ ट्विटरपासून लांब राहायचा विचार केला होता पण काल एका मित्रांने सांगितलेला स्वानुभव तुमच्यासमोर मांडायला हवा म्हणुन हा लेख

माझा मित्र सागर, आयटी सेक्टर मध्ये एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर कामाला होता आणि कंपनीतर्फे विदेशवारी
कित्येकवेळा झाली आहे. घरची आर्थिक परिस्थिती पण चांगली होती. वडिल होंडा शोरुम मध्ये सेल्स मॅनेजर होते. पत्नी देखील एका खाजगी कंपनीत काम करत होती आणि घरी आई, वडिल, पत्नी आणि तो असे चौरंगी कुटूंब मात्र गेल्या ७-८ महिन्यात चित्रच पालटले. वडिलांचा कोरोनाने मृत्यु झाला आणि आई
अर्धांगवायूने ग्रासली. कोरोनाकाळात बदललेल्या परिस्थितीमुळे सागरची नोकरी गेली आणि आता घराची जवाबदारी त्याचा पत्नीवर येऊन पडली. सागरने स्वताकडील जी काही सेव्हिंग होती त्याची गुंतवणुक एक ॲप बनविण्यात खर्च केली आणि त्यातून त्याला हवे तसे यश नाही मिळाले कारण कोणतीच कंपनी ते ॲप खरेदी
करायला तयार नव्हती. सागरला मी लहानपणापासून ओळखतो, मुळातच तो निस्सिम स्वामीभक्त. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तो अक्कलकोटला स्वामीदर्शनासाठी न चुकता जायचा. गेल्या ४-५ महिन्यात त्याच्याबरोबर फोन वर बोलणे व्हायचे तेव्हा तो नेहमी बोलायचा, “स्वामी सगळे पाहातायेत, तेच निभावून
नेतील”

आता गोष्ट मागच्या आठवड्यातील त्रिपुरारी पौर्णिमेची. सागर थोडा व्यथित होता कारण हातात नोकरी नाही, घराचे/गाडीचे हप्ते थकीत होते, आईंची तब्येत खालावत होती आणि त्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. काहीही न सांगता तो घरातून बाहेर पडला, अगदी मोबाईल घरी ठेवूनच. सारसबागेजवळील श्री
स्वामी समर्थ मठातील मंदिरात जाऊन बसला. पुढील भवितव्य अंधारात होते आणि काहीच मार्ग त्याला दिसत नव्हता. अचानक मंदिरातच त्याच्याजवळ एक श्वान आले आणि ते भुकेने व्याकूळ झाले होते. सागरला त्याला काहीतरी खाऊ घालायची इच्छा होती पण त्याच्याकडे पैसे नाहीत हे त्याला माहिती होते पण अचानक
सागरने खिशात हात घातला तर त्याला दहा रुपयाचे नाणे मिळाले. काहीही विचार न करता तो सरळ जवळच्या दुकानात गेला आणि बिस्कीटाचा पुडा आणुन त्या श्वानाला खाऊ घातला. तृप्त होऊन ते श्वान त्या मंदिरातून निघून गेले. सागर काही वेळ मंदिरातच बसून होता. काहीच मार्ग नाही दिसला तर कायमचे घर सोडायचे
हा विचार त्याच्या मनांत येत होता. शेवटी मन खंबीर करुन येईल त्या परिस्थितीला सामोरे जायचे असा विचार करुन तो स्वामींचे दर्शन घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याचा पत्नीने त्याला सांगितले कि तुम्हाला सारखे कोणाचेतरी फोन येत आहेत. त्याला वाटले कोणीतरी देणेकरी किंवा कलेक्शनचे कॅाल
असतील म्हणुन त्याने त्याकडे दुर्लक्ष केले पण ५ मिनिटानंतर त्याला पुन्हा फोन आला. कर्नाटकचा कोड असलेला नंबर होता म्हणुन सागरने तो फोन उचलला तर समोरुन बॅंगलूरु मधल्या एका सॅाफ्टवेअर कंपनीचा सेल्स मॅनेजर बोलत होता. सागरने ३ महिन्यापूर्वी एका सेमिनारमध्ये त्याच्या ॲपचे प्रेझेन्टेशन
दिले होते त्यासंदर्भात त्याने फोन केला होता. ती कंपनी त्यांचे ॲप खरेदी करण्यास उत्सुक होती आणि त्यासाठी त्याला बॅंगलूरुला बोलावले होते. सोमवारी त्याची मिटींग झाली आणि त्या कंपनीने सागरचा ॲप ५० लाखाला विकत घेऊन त्याला ८% रॅायल्टीपण ॲाफर केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या
महिन्यात सागरने एका कंपनीत अप्लाय केले होते तेथे तिथून त्याला एक चांगली ॲाफरपण मिळाली. सागरला त्याच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता पण या सगळ्यात त्याला अचानक त्या स्वामी मंदिरात जे घडले होते त्याची आठवण झाली म्हणुन तो परत त्या मठात गेला पण ते श्वान त्याला दिसले नाही. सहज चौकशी
करावी म्हणुन त्याने तिथल्या सुरक्षारक्षकाला विचारले, तो बोलला कि या मठात श्वान येणे शक्य नाही कारण गेट नेहमी बंद असते आणि कायम सुरक्षारक्षक तिथं असतात. सागरला प्रत्यक्ष स्वामी त्या श्वानरुपात येऊन भेटून गेले असे वाटत आहे. तो योगायोग असेल किंवा दैवी चमत्कार पण स्वामी सदैव
त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात हे नक्की. संकंटकाळी स्वामी कोणत्या रुपात त्यांच्या भक्ताच्या मदतीला धावून येतील हे खुद्द स्वामींनाच ठाऊक! स्वामींवरील निस्वार्थ श्रद्धा नेहमी बळ प्रदान करते.
।गया नहीं, जिंदा है स्वामी।
॥स्वामी अंतर्यामी॥

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अमोल कडू-देशमुख

अमोल कडू-देशमुख Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KaduAmol

25 Nov
जी भाबडी पोरं काल स्पेसवर छातीठोकपणे बोलत होती कि लव-जिहाद नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही त्यांनी एकदा २०१७-१८ ची सर्वोच्च न्यायालयातील ‘हादिया केस’ चा अभ्यास करावा. अखिला अशोकन या हिंदु मुलीला लग्नानंतर धर्म बदलायला लावला आणि आतंकवादी संघटनेत सामील केले.
फक्त हि केस लढण्यासाठी पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेने वकिलांना ९२ लाख फी दिली होती. शाफिन जहान या मुस्लिम तरुणाने अखिला या हिंदु मुलीला फसवून तिचे धर्मपरिवर्तन केले. लग्नानंतर त्या मुलीला कळाले कि शाफिनचे संबंध ISIS या आतंकवादी संघटनेशी आहेत आणि तिला
प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याला PFI आणि ISIS कडून पैसे मिळाले होते. केरळ मध्ये घडलेली हि घटना एवढी भयानक होती कि NIA या सरकारी तपास यंत्रणेला या केस मध्ये काम करावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन हे लग्न रद्दबातल ठरवले होते. या प्रकरणाच्या तपासात NIA ला काही गोष्टी
Read 10 tweets
24 Nov
रामरक्षेबाबत सत्यकथा

मला आता नेमकं आठवत नाही की मी ही कथा/घटना कुठे वाचली ते, पण लहानपणी शाळेत असताना कल्याण किंवा तत्सम कुणा मासिकात ही कथा वाचलेली मला व्यवस्थित आठवते आहे.

१९८२ ते १९८५ या काळात भारतातील एक मुलगी कामानिमित्ताने काही काळ अमेरिकेत रहात होती, बहुदा ब्रुकलिन
भागात तिला रहावे लागत होते. एकदा अशीच उशीराने विद्यापीठातील काम आटोपून ती घरी परतत होती. दुर्दैवाने तिला टॅक्सी मिळाली नाही, उशीर झाला होता तेव्हा आपण चालत गेलेलं उत्तम असं वाटून तिने चालायला सुरुवात केली. तिला ज्या भागातून घरी जायचे होते तो भाग ब्रुकलीनमधला अतिशय असुरक्षित होता
व तिथे गुन्हेगारी वृत्तीची माणसे, ब्लॅक्स, गुंड, रेपिस्ट यांचा राबता होता. रात्री नाक्यानाक्यावर उभं राहून टवाळक्या करणं, लुटमार करणं, बलात्कार करणे हा त्यांचा उद्योग होता, हिला जाणं भाग होतंच. जवळपास दीडेक किलोमीटर चालावे लागणार होते, तिला या कसोशीच्या प्रसंगी सुदैवाने रामरक्षा
Read 10 tweets
31 Oct
छत्रपती शिवराय आणि दिवाळीतील किल्ले याचा एक संदर्भ मिळाला आहे. स्वराज्याच्या सुरवातीस काही मराठा किल्लेदार आदिलशाही, निजामशाही किंवा मुघलांकडे चाकरीस असायचे पण राजमाता जिजाऊ आणि शिवबांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वराज्यात सामील झाले पण काही काळ ते त्यांच्या मुळ मालकांकडेच काम करत
राहिले. त्यावेळी बहुतांशी मराठा सरदारांचा मुळ व्यवसाय शेती असायचा मग ते सुगीच्या समाप्तीला म्हणजे दिवाळीच्या काळात घरी परतायचे. त्यावेळी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्ले सर करताना मदत मिळावी म्हणुन ते किल्लेदार प्रत्येक किल्ल्यांची बारकाईने तपासणी करत शक्यतो हुबेहुब
मातीचा किल्ला बनवून शिवरायांना दाखवत असत. त्यात किल्ल्यांच्या बालेकिल्ल्यापासून अवघड आणि सोपी चढाईची बाजू त्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींमधुन महाराजांना कळायची. यात बहिर्जीकाकांच्या हेरखात्याचा खुप मोठा वाटा होता. बहिर्जी नाईकांवर एक बखर लिहिली गेली होती त्यात हा संदर्भ सापडला
Read 4 tweets
4 Oct 20
#भुतांच्या_गोष्टी

पुणे शहरात घडलेली १९७० ची एक गोष्ट. सतीश आणि कविता हे जोडपे सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहत होते. सतीश पोलीस खात्यात हवालदार पदावर काम करत होता. त्यांच्या लग्नाला २-३ वर्षे झाली होती आणि काही दिवसांपुर्वीच त्यांना गोड बातमी कळाली. दोघेही खुप आनंदात
होते. एक साधारण मध्यमवर्गीय कुटूंबात जे जे काही हवे ते सर्व यांनी जमविले होते. पोलिस खात्यातील नोकरी म्हटलं कि सतत होणारी बदली हि आलीच. एक दिवस अचानक सतीश ला बदलीची ॲार्डर आली. त्याला पुण्यात जावे लागणार होते पण कविता तेव्हा ५-६ महिन्याची गर्भवती होती आणि तिला या अवस्थेत प्रवास
करता येणार नाही म्हणुन सतीश ने त्याची बदली रद्द व्हावी यासाठी वरिष्टांकडे बोलणे केले पण त्याची पद्दोन्नती जवळ असल्याने जर बदली रद्द केली तर त्याचे नुकसान होईल या भितीने त्याने पुण्यात येणे स्वीकारले. त्यांची राहायची व्यवस्था स्वारगेटजवळील पोलिस लाईन मधील चाळीत केला गेला होता.
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(