रामरक्षेबाबत सत्यकथा

मला आता नेमकं आठवत नाही की मी ही कथा/घटना कुठे वाचली ते, पण लहानपणी शाळेत असताना कल्याण किंवा तत्सम कुणा मासिकात ही कथा वाचलेली मला व्यवस्थित आठवते आहे.

१९८२ ते १९८५ या काळात भारतातील एक मुलगी कामानिमित्ताने काही काळ अमेरिकेत रहात होती, बहुदा ब्रुकलिन
भागात तिला रहावे लागत होते. एकदा अशीच उशीराने विद्यापीठातील काम आटोपून ती घरी परतत होती. दुर्दैवाने तिला टॅक्सी मिळाली नाही, उशीर झाला होता तेव्हा आपण चालत गेलेलं उत्तम असं वाटून तिने चालायला सुरुवात केली. तिला ज्या भागातून घरी जायचे होते तो भाग ब्रुकलीनमधला अतिशय असुरक्षित होता
व तिथे गुन्हेगारी वृत्तीची माणसे, ब्लॅक्स, गुंड, रेपिस्ट यांचा राबता होता. रात्री नाक्यानाक्यावर उभं राहून टवाळक्या करणं, लुटमार करणं, बलात्कार करणे हा त्यांचा उद्योग होता, हिला जाणं भाग होतंच. जवळपास दीडेक किलोमीटर चालावे लागणार होते, तिला या कसोशीच्या प्रसंगी सुदैवाने रामरक्षा
आठवली व तिने मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली.
रामरक्षा मनन सुरु असतानाच ती त्यातल्या एका ओळीपाशी अडली, थांबली. ती ओळ म्हणजे

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम॥

अर्थ: सज्ज धनुष्ये धारण करणारे बाणांना हस्तस्पर्श करणारे,
व अक्षय बाणांचे भाते बाळगणारे राम-लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत

Rama and Lakshman, their bows pulled and ready, their hands on the arrows (packed) in ever full quivers (carried on their backs), may they always escort me in my path, for my protection.
तीला या ओळीचा अर्थ माहिती होता. आणि आत्ता याक्षणी ही ओळच महत्वाची होती. तिने अत्यंत हुशारीने पुढील स्तोत्र म्हणण्याऎवजी, एखादा मंत्र म्हणावा तसा या ऋचेचाच जप सुरु केला. घाईघाईने चालत होती. आसपास टवाळ पोरांचे आचकट विचकट बोलणार ग्रुप होते, गंमत म्हणजे ही जवळ आली की प्रत्येक ग्रुप
गप्प बसायचा, पुढे येऊन हिची चेष्टा मस्करी करण्याऐवजी पोरं निघून जायची किंवा गप्प बसायची. सरतेशेवटी ही पदयात्रा संपत आली. एका ग्रुपमध्ये तिला तिच्या ओळखीचा त्याच भागात रहाणारा एक ब्लॅक मुलगा दिसला, तो ओळखीचं हसला. ही पुढे घरी निघून आली. उरलेली रामरक्षा पूर्ण केली. देवाला हात जोडले
प्रार्थना केली व आभारही मानले.

दुसरे दिवशी सकाळी बाहेर गेलेली असताना तोच कालचा मुलगा तिला भेटला, त्याने मुद्दामहून हिला थांबवलं आणि विचारलं “काल काय प्रॉब्लेम झाला होता? अगदी दोन दोन पोलिस ऑफिसर्सच्या एस्कॉर्टमध्ये चालली होतीस घरी?” त्यावर ती म्हणाली, “कोणते दोन पोलिस ऑफिसर्स?”
तो म्हणाला, “अगं असं काय करतेस. तुझ्या पुढे दोन मजबूत शरीरयष्टीचे, रिव्हॉल्व्हर घेतलेले गोरे पोलिस ऑफिसर्स चाललेले मी स्वत: बघितले. म्हणूनच कोणत्याही ग्रुपने चेष्टामस्करी करण्याची हिम्मत केली नाही”
ही नि:शब्द झाली!

आजही प्रभू श्रीराम आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात, आणि
जगाच्या पाठीवर कुठेही त्यांचं रक्षण करतात हे मात्र नक्की आहे, यावर माझा नितांत विश्वास आहे...

॥श्रीरामलक्ष्मणाय नम:॥

मुळलेखक: सचिन मधुकर परांजपे (पालघर)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अमोल कडू-देशमुख

अमोल कडू-देशमुख Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KaduAmol

25 Nov
जी भाबडी पोरं काल स्पेसवर छातीठोकपणे बोलत होती कि लव-जिहाद नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही त्यांनी एकदा २०१७-१८ ची सर्वोच्च न्यायालयातील ‘हादिया केस’ चा अभ्यास करावा. अखिला अशोकन या हिंदु मुलीला लग्नानंतर धर्म बदलायला लावला आणि आतंकवादी संघटनेत सामील केले.
फक्त हि केस लढण्यासाठी पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेने वकिलांना ९२ लाख फी दिली होती. शाफिन जहान या मुस्लिम तरुणाने अखिला या हिंदु मुलीला फसवून तिचे धर्मपरिवर्तन केले. लग्नानंतर त्या मुलीला कळाले कि शाफिनचे संबंध ISIS या आतंकवादी संघटनेशी आहेत आणि तिला
प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याला PFI आणि ISIS कडून पैसे मिळाले होते. केरळ मध्ये घडलेली हि घटना एवढी भयानक होती कि NIA या सरकारी तपास यंत्रणेला या केस मध्ये काम करावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन हे लग्न रद्दबातल ठरवले होते. या प्रकरणाच्या तपासात NIA ला काही गोष्टी
Read 10 tweets
24 Nov
॥श्री स्वामी समर्थ॥

शुभ सकाळ मित्रांनो, मी काहीकाळ ट्विटरपासून लांब राहायचा विचार केला होता पण काल एका मित्रांने सांगितलेला स्वानुभव तुमच्यासमोर मांडायला हवा म्हणुन हा लेख

माझा मित्र सागर, आयटी सेक्टर मध्ये एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर कामाला होता आणि कंपनीतर्फे विदेशवारी
कित्येकवेळा झाली आहे. घरची आर्थिक परिस्थिती पण चांगली होती. वडिल होंडा शोरुम मध्ये सेल्स मॅनेजर होते. पत्नी देखील एका खाजगी कंपनीत काम करत होती आणि घरी आई, वडिल, पत्नी आणि तो असे चौरंगी कुटूंब मात्र गेल्या ७-८ महिन्यात चित्रच पालटले. वडिलांचा कोरोनाने मृत्यु झाला आणि आई
अर्धांगवायूने ग्रासली. कोरोनाकाळात बदललेल्या परिस्थितीमुळे सागरची नोकरी गेली आणि आता घराची जवाबदारी त्याचा पत्नीवर येऊन पडली. सागरने स्वताकडील जी काही सेव्हिंग होती त्याची गुंतवणुक एक ॲप बनविण्यात खर्च केली आणि त्यातून त्याला हवे तसे यश नाही मिळाले कारण कोणतीच कंपनी ते ॲप खरेदी
Read 13 tweets
31 Oct
छत्रपती शिवराय आणि दिवाळीतील किल्ले याचा एक संदर्भ मिळाला आहे. स्वराज्याच्या सुरवातीस काही मराठा किल्लेदार आदिलशाही, निजामशाही किंवा मुघलांकडे चाकरीस असायचे पण राजमाता जिजाऊ आणि शिवबांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वराज्यात सामील झाले पण काही काळ ते त्यांच्या मुळ मालकांकडेच काम करत
राहिले. त्यावेळी बहुतांशी मराठा सरदारांचा मुळ व्यवसाय शेती असायचा मग ते सुगीच्या समाप्तीला म्हणजे दिवाळीच्या काळात घरी परतायचे. त्यावेळी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्ले सर करताना मदत मिळावी म्हणुन ते किल्लेदार प्रत्येक किल्ल्यांची बारकाईने तपासणी करत शक्यतो हुबेहुब
मातीचा किल्ला बनवून शिवरायांना दाखवत असत. त्यात किल्ल्यांच्या बालेकिल्ल्यापासून अवघड आणि सोपी चढाईची बाजू त्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींमधुन महाराजांना कळायची. यात बहिर्जीकाकांच्या हेरखात्याचा खुप मोठा वाटा होता. बहिर्जी नाईकांवर एक बखर लिहिली गेली होती त्यात हा संदर्भ सापडला
Read 4 tweets
4 Oct 20
#भुतांच्या_गोष्टी

पुणे शहरात घडलेली १९७० ची एक गोष्ट. सतीश आणि कविता हे जोडपे सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहत होते. सतीश पोलीस खात्यात हवालदार पदावर काम करत होता. त्यांच्या लग्नाला २-३ वर्षे झाली होती आणि काही दिवसांपुर्वीच त्यांना गोड बातमी कळाली. दोघेही खुप आनंदात
होते. एक साधारण मध्यमवर्गीय कुटूंबात जे जे काही हवे ते सर्व यांनी जमविले होते. पोलिस खात्यातील नोकरी म्हटलं कि सतत होणारी बदली हि आलीच. एक दिवस अचानक सतीश ला बदलीची ॲार्डर आली. त्याला पुण्यात जावे लागणार होते पण कविता तेव्हा ५-६ महिन्याची गर्भवती होती आणि तिला या अवस्थेत प्रवास
करता येणार नाही म्हणुन सतीश ने त्याची बदली रद्द व्हावी यासाठी वरिष्टांकडे बोलणे केले पण त्याची पद्दोन्नती जवळ असल्याने जर बदली रद्द केली तर त्याचे नुकसान होईल या भितीने त्याने पुण्यात येणे स्वीकारले. त्यांची राहायची व्यवस्था स्वारगेटजवळील पोलिस लाईन मधील चाळीत केला गेला होता.
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(