*सर्वांचे* *"Status"* *बघून सिंधुताई यांचे एक वाक्य आठवलं*
*"महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं" **
सिंधुताई (माई) सपकाळ या गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होत्या,त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या तरी कोणत्याही मराठी माध्यमात बातमी दिसली नव्हती की सिंधुताई
+
अजारी आहेत त्यांना प्रार्थनेची गरज आहे.
बॉलीवूडच्या नटांना कोरोना होतो तेव्हा आपल्या येथे दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून दाखवतात,
ड्रग्स केस मध्ये आर्यन खान जेल मध्ये होता तेव्हा त्याला जेलमध्ये कोणतं जेवण भेटतय,तो टॉयलेटला जातोय की नाही याची बातमी सुद्धा
+
मराठी माध्यमे दाखवत होती.
२०२० मध्ये अनेक बॉलीवूडच्या नटांना कोरोना वगैरा चे आजार झाले होते,तेव्हा ते रूग्णालयात आहेत,त्यांचे कुटूंबिय कुठे आहेत,नश्त्याला काय खातायत,
अशी रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केली होती.
+
पण सिंधुताईंचा मृत्यू होई पर्यंत मराठी माध्यमांना लक्ष द्यावसं वाटलं नाही.