#Thread
शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध, 15 राज्यांमध्ये विस्तार अन् लाखोंची कमाई!🧵

स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध वाक्य आहे की, "जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास करीत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही."

#InnovationForEveryone
आणि आज एका नवयुवकाने हीच गोष्ट खरी करून दाखविली आहे. चला वाचूया, योगेश गावंडे यांच्या हिमतीची गोष्ट.

आजच्या या स्पर्धेच्या युगात कोणत्याही गोष्टीची गरज निर्माण झाली की, ती उपलब्धही होते. मात्र, त्यासाठी आवश्यकता आहे जिद्द अन् परीश्रमाची. काळाच्या ओघात कृषी क्षेत्रामध्ये
यांत्रिकिकरण वाढलेले आहे आणि हे आणखी सुलभ व्हावे याकरिता राज्य आणि केंद्र सरकार कोट्यावधींची गुंतवणूक सुद्धा करीत आहे, यात दुमत नाही.

पण याच गोष्टीचा फायदा घेऊन आणि इतर शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा व्हावा या भावनेतून मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील
योगेश गावंडे या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध लावला असून गेल्या 4 वर्षामध्ये त्याने 400 हून अधिक मशीन बनवल्या असून 15 राज्यांमध्ये त्या पाठलेल्या आहेत.

त्याने 'निओ स्प्रे पंप' हे सुरवातीला महाविद्यालयातील एका
प्रोजेक्टसाठी बनविले होते. आता त्याची मागणी वाढत आहे. वेळेची बचत आणि विषबाधेचा धोका नाही, हे या यंत्राचे फायदे आहेत.

अशी झाली सुरवात!

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणाचे ध़डे घेत असताना योगेश गावंडे यांनी एका कॉलेजच्या एका प्रोजेक्टमध्ये हे यंत्र साकारले होते.
यासाठी त्यांना केवळ 3 हजार 800 रुपये खर्च आला होता. स्वयंचलित फवारणी यंत्राचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी या प्रायोगिकतत्वार केलेल्या प्रकल्पाला उद्योगाचे स्वरुप देण्याचे ठरवले. त्यांनी चिखलठाण्यातच शेड उभारुन कॉलेजच्या 4 वर्षात 400 स्वयंचलित फवारणी यंत्र बनवले व यामधून
तब्बल 20 लाखांची उलाढाल केली होती. एवढ्यावरच न थांबता योगेश यांनी एका कंपनीमध्ये मार्केटींगचे धडे घेतले आहेत. त्यामुळे आता यंत्राची निर्मिती आणि आता बाजारपेठ या दोन्ही बाबी त्यांना अवगत झाल्या आहेत.

स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून अशी होते फवारणी!!

वाहनांमधील आय़सी इंजिनमध्ये
पिस्टन रेसिप्रोकेट होते. वाहनाला चेन असल्यामुलळे दोन्ही चाके ही फिरतात. यामध्ये उलटी प्रक्रिया आहे. चाक असणाऱ्या एका लोखंडी स्टॅंडवर खताची पिशवी लटकवता येते. यंत्र सुरु झाले की यंत्रावरील दांडा खाली-वर करण्याची प्रक्रिया सुरु होते. आणि नोझलमधून खत फवारणी केली जाते.
#farming
या फवारणी यंत्राला 'निओ स्प्रे पंप' असे नावही त्यांनी दिले आहे. यामधून 5 जणांना रोजगार मिळाला असल्याचे योगेश गावंडे सांगतात.

यावरून आपल्याला हेच लक्षात येते की, जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर जगात काहीही अशक्य नाही आणि आपल्या कृषीप्रधान देशात तर शेतीवर आधारित अनेक
#startup
स्टार्ट-अप आपण सुरु करून देशाच्या प्रगतीत हातभार लावू शकतो व सोबतच स्वताचा सर्वांगीण विकास करताना रोजगार निर्मिती सुद्धा करू शकतो.

'टीम सत्यार्थ' कडून योगेश गावंडे यांच्या जिद्दीला, नवकल्पकतेला व आणि मेहनतीला सलाम!

#SatyaArth_Farming

#SartyaArth_Innovation

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SatyaArth

SatyaArth Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SatyaArth_

14 Jan
#Thread
नारीशक्ती सलाम तुझ्या धैर्याला!🧵

पतीच्या आत्महत्येनंतर मालविका हेगडे यांनी ‘कॅफे कॉफी डे’ला दिली नवीसंजीवनी, 7000 कोटींच्या कर्जातून कंपनीला बाहेर काढले.

बरेचदा घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर आपण बघतो की, घर अडचणीत आलेले आहे पण याठिकाणी मालविका हेगडे
#cafecoffeeday Image
यांनी पतीच्या निधनानंतर न डगमगता आपल्या पतीच्या ‘कॅफे कॉफी डे’ या ब्रँडला सोनेरी दिवस आणले आहे.

कर्नाटकमधील व्ही. जी. सिद्धार्थ यांनी 1996 मध्ये देशभरात कॉफी शॉपची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. सर्वांसाठी गप्पांचा फड रंगवायला एक निवांत हक्काची जागा असावी अशी संकल्पना होती. Image
कंपनीने घौडदौड सुरु केली. देशभरातील छोट्या-मोठ्या शहरात कॅफे कॉपी डेच्या पाट्या झळकू लागल्या. सर्व काही चांगले सुरु असतानाच कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हीजी सिद्धार्थ यांच्या आत्महत्येची वाईट बातमी जुलै 2019 ला आली आणि विशेष म्हणजे

#Inspiration Image
Read 8 tweets
12 Jan
811 पर्यंतचे पाढे येणारी, दोन्ही हातांनी लिहिणारी पाड्यावरची पोरं!

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्राचे पुरते हाल बघायला मिळत आहेत. ऑनलाइन अध्ययनाला मर्यादा असल्‍याने शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी पछाडले जात आहेत. पण टॉवरची रेंजही नसलेल्‍या हिवाळी (ता. त्र्यंबकेश्‍वर) या Image
आदिवासी पाड्यातील जिल्‍हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मात्र हा काळ गुणवत्तावाढीची संधी ठरली आहे.

गेल्‍या वर्षभराच्‍या कालावधीत येथील सुमारे साठ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दोन्‍ही हातांनी लिखाणाचे कौशल्‍य आत्‍मसात केलेले आहे. दोन दिवसांत एक पाढा यापर्यंत या Image
विद्यार्थ्यांनी तब्‍बल ८११ पर्यंतचे पाढे आत्तापर्यंत पाठ केलेले आहेत, हीदेखील कुतूहल निर्माण करणारीच गोष्ट आहे.

पाड्यासह नजीकच्‍या भागातून विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येत असतात. वयाच्‍या तिसऱ्या वर्षापासून विद्यार्थी शाळेत येण्यास सुरवात करतात. म्‍हणतात ८११ पर्यंतचे पाढे! Image
Read 7 tweets
11 Jan
अब उच्च शिक्षण संस्थानों में भी लागू होगी 'विद्यांजलि' योजना!

स्कूलों की जरूरतों की पूर्ति व उनसे लोगों का जुड़ाव बढ़ाने के लिए शुरू की गई विद्यांजलि योजना को अब उच्च शिक्षण संस्थानों में भी लागू करने की तैयारी है।

शिक्षा मंत्रालय की इस योजना के तहत सेवानिवृत्त या सेवारत
प्रोफेसर, अधिकारी, पेशेवर व पीएचडी या स्नातकोत्तर डिग्रीधारी आसपास के उच्च शिक्षण संस्थानों में स्वैच्छिक रूप से पढ़ा सकेंगे। कौशल विशेषज्ञों को भी अपना हुनर बांटने का मौका मिलेगा।
उच्च शिक्षण संस्थानों में स्वैच्छिक रूप से पढ़ाने के इच्छुक पात्रों को पहले पंजीकरण करना होगा।
उन्हें यह भी बताना होगा कि उनकी रुचि ऐसे किस विषय में है जो छात्रों के लिए उपयोगी होगा। पंजीकरण कराने वालों को संस्थान जरूरत के अनुरूप आमंत्रित करेंगे।

विद्यांजलि योजना की वेबसाइट पर संस्थानों के बुनियादी ढांचे और पठन-पाठन की जरूरतों को भी प्रदर्शित किया जाएगा। इसके अनुरूप कोई
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(