साधारणतः कोणत्याही गावात एसटी स्थानकासमोर निळ्या कोटात असणारा ज्यांचा पुतळा कायम हातात पुस्तकं घेतल्यामुळे लक्षात येतो ते #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर नक्की कोण? मग यांना राजकारणी, समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, कामगार कैवारी, कायदेपंडित की लेखक.. काय म्हणून बघावं आपण ?
गांधी विरुद्द आंबेडकर वाद असेल किंवा आंबेडकर जिन्ना राजकीय मैत्री. या सगळ्यात मुरलेला राजकारणी आहे. फक्त समाजसेवक म्हणून छोट्या साच्यात बसवणं शक्य नाही आणि फक्त दलीत नेता म्हणावा तर इतर क्षेत्रात सर्व भारतीयांसाठी केलेलं प्रचंड काम दुर्लक्षित करता येणार नाही.
हिंदू धर्माची चिकिस्ता ते रुपयाचं मूल्य इतक्या वेगवेगळ्या विषयांवर केलेलं अप्रतिम लिखाण हे डॉ आंबेडकरांची पुढच्या पिढीला दिलेली परिवर्तनाची शिदोरी आहे. जमेल तितकी घ्यावी. आंबेडकरांच्या तसबिरीपेक्षा त्यांची पुस्तकं वाटावी इतकी त्यात वैचारिक धगधग आहे.
कायद्याच्या प्रकांड ज्ञानातून जगभरातल्या लोकशाही अभ्यास करत देशाला "जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य" राखण्यासाठी संविधान दिलं. संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात संविधानाला असलेल्या धोक्याचा गर्भित इशारा हा आंबेडकरांनी भारतीय मानसिकतेचंं केलेलं अचूक आकलन होतं.
बाबासाहेब म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याची इच्छा निर्माण करणारा एक विचार आहे.
त्यांची शिक्षणाची जिद्द, अफाट बुद्धिमत्ता यातली थोडी तरी क्षमता आपल्यात असावी ही इच्छा निर्माण झाली तरी महापुरुषांचा विजय झाला असं म्हणता येईल.
ज्यांना पं. नेहरूंनी #मिर_ए_कांरवां म्हणून संबोधलं आणि गांधींनी त्यांना प्लुटो,अरिस्टोटल आणि पायथागोरस या तिघांच्या योग्यतेचा माणूस म्हणलं असे जे स्वतंत्र भारताचे #पहिले_शिक्षण_मंत्री #MaulanaAbulKalamAzad यांची आज पुण्यतिथी.
१८५७ च्या बंडामध्ये यश न मिळालेल्यामुळे मौलाना अबुल कलाम यांचे वडील सौदी अरेबिया मध्ये जाऊन स्थायिक झाल्यानंतर तिथेच अबुल कलाम यांचा जन्म झाला. पुढे हे कुटुंब कलकत्त्यात येऊन स्थायिक झाले आणि अबुल कलम यांचं शिक्षण पारंपरिक धार्मिक पद्धतीने सुरू झालं.
लहान असताना स्वतःची लायब्ररी चालवणारे आझाद, आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुलांची शिकवणी घेत. लहानपणीच मुलांची डिबेटिंग सोसायटी स्थापन करून वेगवेगळ्या विषयातल्या आणि वेगळ्या विचारांचा प्रभाव पडल्याने त्यांचा ओढा हा भारतीय स्वातंत्र्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्याकडे होता.
"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,
‘‘काय उत्तर आहे तुमच्याकडे?’’ मी म्हणालो, ‘‘याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच कसं आहे, हे तुम्हाला समजावून सांगणं.’’ मग तर त्यांना काही कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय!’’.
#भक्तीसाठी_बळी
सध्या सगळ्यांना देशभक्ती मध्ये तोलून ठरवलं जातं की कोण देशभक्त आणि कोणाला पाकिस्तानचा विसा द्यायचा. अशी ही देशभक्ती म्हणजे सरकारवरच एकतर्फी प्रेम ज्याच्यात तरुण पोरं स्वत:ला हीरो समजून एक पाय घासत #श्रीवल्ली म्हणल्यासारखं घसा ताणून #श्रीराम म्हणत आहेत.
मुलांना लहानपणीच ट्युशन लावणारे, अभ्यासासाठी वेगळी रूम बांधणारे, कॉम्प्युटर्स घेऊन देणारे, पैसे भरून मुलांना चांगल्या कॉलेजला पाठवणारे, नौकरीसाठी सोनं मोडून पैसे देणारे, खोटी प्रमाणपत्र तयार करणारे, सरकारी नौकरीवाला जावई शोधणारे लोकं नौकऱ्या नाही तरी पण ढिम्म?
घरी पार्किंगपेक्षा जास्त गाड्या घेऊन घरातल्या प्रत्येकाची सोय होईल हे पाहणारे पेट्रोल डिझेलचे दर वाढले तरी बोलायला तयार का नाही ? कुटुंबासोबत फिरायला जाणं कमी झालं आहे, वाढदिवसाच्या पार्ट्या आता कमी लोकांत होतात, करोनामुळे लग्न खर्च तरी कमी झाला त्याचंच काय समाधान आहे.
#भारतीय_राष्ट्रीय_कांग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात भारतात लोकशाही किती टिकेल याबाबत डॉ आंबेडकर साशंक होते. अर्थात ही साशंकता ही त्यांनीच तयार केलेल्या संविधनावर नव्हती तर इथल्या समाजव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास सांगत होता. धार्मिक,जातीय आधारावर विखुरलेला समाज हा हजारो वर्षांच्या
गुलामीच्या जोखडाला बांधलेला होता.आपले काही अधिकार आहेत हे समजण्यासाठी पुरेसं शिक्षण बहुतेकांना नव्हतं. भाषा, प्रांतात विखुरलेल्या ह्या भारत देशात मागच्या ६० वर्षात लोकशाही फक्त टिकली नाहीच तर जगाला संविधानाच्या आधारावर यशस्वी ठरलेल्या लोकशाहीचा परिपाठ घालून दिला ते काँग्रेस या
देशात होती म्हणून.स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम लीग आणि जनसंघ यांचे धर्माधिष्ठित उद्योग बघून त्यांच्या हातात सत्ता न देणं हेच योग्य हे जनतेने समजलं होतं. पण समाजाला विज्ञानासोबताच इतिहास योग्य प्रकारे शिकवण्यात तत्कालीन सरकार मागे पडली शेवटी कट्टर सनातनी जनसंघ हळूहळू विषारी