श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५ साली झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ही स्थापना केली गेली. त्यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल, दुरुस्ती व जीर्णोद्धार (contd)
आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे. सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा अस्त झाला आणि किल्ले रायगडही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी सर्वच किल्ल्यांवर जायला बंदी आणली.
या काळात रायगड पूर्णतः दुर्लक्षित होता. महाराजांच्या समाधीची दुरावस्था झाली होती. सन १८८३ साली जेम्स डग्लस नावाचा इंग्रज गृहस्थ शिवचरित्र वाचून महाराजांच्या जिज्ञासेपोटी गडावर गेला. रायगडच्या व महाराजांच्या समाधीच्या दुरावस्थेविषयी त्याने लिहून ठेवले.
डग्लसचे हे वर्णन वाचून त्यावेळच्या भारतीय समाजात अस्वस्थता पसरली. सन १८८५ मध्ये रावबहाद्दूर जोशी, लोकमान्य टिळक, न्या. तेलंग, न्या. रानडे, न्या. कुंटे इ. समाजधुरीणांनी पुण्याला एका सभेचे आयोजन केले आणि त्यात समाधी जीर्णोद्धाराच्या कार्याचे सूतोवाच करण्यात आले.
३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा जंगी सभेचे आयोजन केले. या सभेत रायगडावरील महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले.
श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सेनापती दाभाडे, लोकमान्य टिळक, बापूसाहेब कुरुंदवाडकर , सरदार पोतनीस, अनेक संस्थानिक, सरदार व पुण्यातील नामवंत व्यक्ती या सभेला उपस्थित होत्या. शिवस्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी फंड उभा करण्याचे आवाहन या सभेला केले गेले.
त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ.' टिळकांनी केसरीतून फंड उभारणीचे आवाहन केले. ज्युनिअर कुरुंदवाडाचे प्रमुख श्रीमंत बापूसाहेब पटवर्धन यांनी समाधीवर छत्री बांधण्याचा, नित्य पूजा करण्याचा व प्रतिवर्षी रायगडावर उत्सव करण्याचा ठराव मांडला.
श्री. दाजी आबाजी खरे यांची अध्यक्ष म्हणून व लोकमान्य टिळकांची कोषाध्यक्ष, चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. २४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
रायगडचा ताबा ब्रिटीश सरकारकडे असल्याने मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागण्यात आली. पण ती ब्रिटीश सरकारने नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष दाजी आबाजी खरे यांनी १९०६ साली ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड यांचेकडे एक अर्ज दाखल केला
व सुनावले की शिवाजीराजांच्या प्रती आम्हां सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल अशी स्मारकाची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे.
पुढे तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर रायगड स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले व ६ फेब्रुवारी १९२५ ला ब्रिटीश सरकारने रु. १९,०४३/- च्या खर्चास मान्यता दिली. यापैकी मंडळाने उभा देलेला रु. १२,००० /- चा फंड...
ब्रिटीश सरकारचे रु. ५,०००/- व पुरातत्व खाते वेस्टर्न सर्कलच्या सुपरीटेंडने रु. २,४०३/- चा निधी देण्याचे ठरवले. रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने आराखडा तयार करून कामाला सुरुवात झाली.
आणि पुढील वर्षी सन १९२६ साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी राहिली. यासबंधीचा ब्रिटिशकालीन कागदोपत्री पुरावा आजही श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे उपलब्ध आहे. 🙏🙏 #RajThackeray
त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ.' टिळकांनी केसरीतून फंड उभारणीचे आवाहन केले. ज्युनिअर कुरुंदवाडाचे प्रमुख श्रीमंत बापूसाहेब पटवर्धन यांनी समाधीवर छत्री बांधण्याचा, नित्य पूजा करण्याचा व प्रतिवर्षी रायगडावर उत्सव करण्याचा ठराव मांडला.
श्री. दाजी आबाजी खरे यांची अध्यक्ष म्हणून व लोकमान्य टिळकांची कोषाध्यक्ष, चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. २४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
रायगडचा ताबा ब्रिटीश सरकारकडे असल्याने मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागण्यात आली. पण ती ब्रिटीश सरकारने नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष दाजी आबाजी खरे यांनी १९०६ साली ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड यांचेकडे एक अर्ज दाखल केला व सुनावले
की शिवाजीराजांच्या प्रती आम्हां सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल अशी स्मारकाची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे.
पुढे तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर रायगड स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले व ६ फेब्रुवारी १९२५ ला ब्रिटीश सरकारने रु. १९,०४३/- च्या खर्चास मान्यता दिली. यापैकी मंडळाने उभा देलेला रु. १२,००० /- चा फंड ब्रिटीश सरकारचे रु. ५,०००/-....
व पुरातत्व खाते वेस्टर्न सर्कलच्या सुपरीटेंडने रु. २,४०३/- चा निधी देण्याचे ठरवले. रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने आराखडा तयार करून कामाला सुरुवात झाली.
आणि पुढील वर्षी सन १९२६ साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी राहिली. यासबंधीचा ब्रिटिशकालीन कागदोपत्री पुरावा आजही श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे उपलब्ध आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Please read and retweet this thread on James Laine's book Shivaji: Hindu King in Islamic India. After Jitendra Awhad's comments defaming Babasaheb Purandare, I thought of doing some research and fetched his book from the @UTKLibraries
Awhad claimed Babasaheb Purandare's name is mentioned among 12 names mentioned in the introduction of James Laine's book. However, this is not true.
In fact Babasaheb Purandare is not even among James Laine's primary sources of the book.