एम. एफ. हुसैन यांची आज 11वी पुण्यतिथी. हिंदूंच्या सहिष्णूतेचा ‘गैरफायदा’ घेऊन हुसैन यांनी जाणीवपूर्वक देवी देवतांची ‘आक्षेपार्ह’ चित्रं काढली, असा आरोप (शिवसेनेसह) हिंदुत्ववादी ‘फ्रिंज’ने केला. 1/18 #DeathAnniversary #MFHusain #MusingOfAMuslim
त्यांची चित्रप्रदर्शने उधळण्यात आली, त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्नही झाले. शेकडो खटले भरण्यात आले. शेवटी 2006 मध्ये या पंढरपूरकराला निरुपायाने कतरवासी व्हावे लागले. 2/18
2008 मध्ये हुसैन यांनी तहलकाला दिलेली मुलाखत वाचण्याजोगी आहे. त्यात शोमा चौधरीने विचारलेला एक प्रश्न आणि त्या प्रश्नाला हुसैन यांनी दिलेले हे उत्तर... 3/18
शोमा - हिंदू चित्रकला आणि संस्कृती यांच्याशी तुमचा परिचय केव्हा झाला? त्यावर प्रेम कधी जडले?
हुसैन - लहानपणी पंढरपूरमध्ये आणि पुढे इंदोरमध्ये होणारी रामलीला मला फार आकर्षित करायची. मी आणि माझा मित्र मनकेश्वर कायम रामलीलेचा खेळ खेळायचो. 4/18
डॉ. सी. राजगोपालाचारी यांनी नमूद केल्याप्रमाणे रामायण ही अतिशय समृद्ध आणि प्रभावशाली कथा आहे, त्यामुळे हे मिथक जणू यथार्थच बनून गेले आहे. खरं तर मी धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली ती वयाच्या 19 व्या वर्षी. 5/18
लहानपणी मला बरच भोगावं लागलं. आई जगातून निघून गेल्यामुळे (सावरण्यासाठी) मला घरापासून दूर ठेवण्यात आले. 14 15 वर्षांचा असल्यापासून मला भयानक स्वप्नं पडायची. वयाच्या 19 वर्षी ती बंद झाली. 6/18
मोहम्मद इसहाक नावाचे माझे गुरु होते. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. मनकेश्वर तोवर साधू बनला होता. त्याच्यासोबत मी गीता, उपनिषदे आणि पुराण हे सुद्धा वाचलं होतं, त्यावर चर्चाही केल्या. 7/18
मनकेश्वर हिमालयात गेला, मी मात्र या ग्रंथांचा अभ्यास सुरूच ठेवला. त्यामुळे माझे चित्त एकदम स्थिर झाले. त्यानंतर दु:स्वप्नांचे चक्र थांबले. 8/18
पुढे 1968 मध्ये हैदराबाद येथे असताना डॉ. राममनोहर लोहिया यांनी सुचवलं की मी रामायणातील घटनांवर चित्रं काढावीत. त्यावेळी मी अगदी कंगाल होतो. पण, पुढच्या आठ वर्षांत मी 150 कॅनव्हास रंगवले. 9/18
वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी लिहिलेली रामायणं मी वाचली. (वाल्मिकींचे रामायण मला अधिक sensory / संवेदी वाटले) रामायणाचे विविध पैलू उलगडता यावेत, त्यातील अर्थध्वनी समजून घेता यावी यासाठी मी बनारसहून (वाराणसीहून) पुजारी बोलावले. 10/18
माझे हे काम सुरु असताना काही सनातनी मुसलमान मला म्हणाले, ‘तू इस्लामी विषयांवर चित्र का काढत नाहीस?’ मी उत्तरलो, ‘इस्लाममध्ये इतक्या सहिष्णूतेला वाव आहे का? सुलेखनात (किताबत) थोडीशी फारकत झाली तरी ते माझा पूर्ण कॅनव्हास फाडून टाकतील.'
11/18
मी आतापर्यंत गणपतीची शेकडो चित्रं रेखाटली आहेत. त्याचं रुपडंच किती गोड आहे. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात मी गणेशाचे चित्र रेखाटून करतो. शिवाचे रूपही मला फार आवडते. 12/18
नटराज हे जगातील सर्वांत क्लिष्ट रूपांपैकी एक रूप आहे. ते विकसित व्हायला हजारो वर्षांचा कालावधी लागला आहे. ते जवळपास आईनस्टाईनच्या समीकरणासारखेच आहे. ब्रह्मांड व भौतिक अस्तीत्वाचे स्वरूप यांच्याविषयी गहिरे तत्वज्ञान आणि गणितीय गनणांचे फळ आहे. 13/18
माझ्या मुलीचं- रईसाचं- लग्न होणार होतं. तिला कोणताही समारोह नको होता. तिच्या लग्नाची खबर देणारे एक कार्ड मी बनवले व जगभरातील माझ्या नातेवाईकांना तेच कार्ड पाठवले. त्या कार्डावर मी शिवाच्या जांघेवर बसलेली पार्वती चितारली होती. शिवाचा हात पार्वतीच्या वक्षांना स्पर्श करत होता. 14/18
हा ब्रह्मांडातील पहिला विवाह! हिंदू संस्कृतीत वैराग्य पवित्र मानलं गेलं आहे. माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असणाऱ्या या विचाराचा, संस्कृतीचा मी अपमान कसा काय करू शकेन? 15/18
मी सुलमाना समुदायातून येतो. हा शियांचा उपपंथ आहे. हिंदुमध्ये आणि आमच्या पंथात बरेचचे साधर्म्य आहे. पुनर्जन्मावर विश्वास हे त्यापैकीच एक. संस्कृतीचा विचार करता यहुदी (ज्यू) आणि ख्रिस्ती संस्कृती भावनात्मकदृष्ट्या एकदूसऱ्यापासून यापेक्षा अधिक दूरच्या असतील. 16/18
मात्र, माझा विरोध करणाऱ्यांशी या सगळ्या विषयांवर बोलणं अशक्य आहे. त्यांना खजुराहोविषयी विचारून पाहा. ‘ही शिल्पं तर लोकसंख्यावाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बनवण्यात आली होती, आता त्यांची गरज संपली आहे’ असं म्हणायलाही ते मागे पुढे पाहणार नाही. 17/18
गावाकडचे लोक हिंदू देव-देवतांच्या ऐंगिक, जिवंत आणि विकासमान स्वरूपाला अधिक चांगल्याप्रकारे ओळखतात. त्यामुळेच ते कोणत्याही दगडाला शेंदूर फासून हनुमान बनवू (आणि त्यावर श्रद्धा ठेवू) शकतात.
मजिद माजीदीचा मुहम्मद सिनेमा आणि त्यावर येवू घातलेली बंदी
2015 मध्ये रिलीज झालेला मजीद माजिदीचा मुहम्मद हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येतोय, तर त्यावर बंदी घालावी अशी मागणी रझा अकॅडमीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली. 1/n
आणि मग गृहमंत्र्यांनीही केंद्र सरकारला तातडीने पत्र लिहीत या सिनेमाच्या ऑनलाईन प्रदर्शनावावर बंदी घालावी अशी विनंती केली आहे. 2018 मध्ये हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार होता, तेव्हा दोन गोष्टी झाल्या. 2/n
एक म्हणजे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या सिनेमाला पार्श्वसंगीत दिले म्हणून रझा अकॅडमीने रहमान विरुद्ध फतवा काढला. (रहमानने त्याविरुद्ध जे पत्र प्रसिद्ध केले ते वाचण्यासारखे आहे.) 3/n
महाराष्ट्रातील काही मशिदींमध्ये (एका हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या का असेनात) सामूहिक नमाज अदा करण्यात आल्याचा बातम्या येत आहेत. राज्य सरकारच्या गृह विभागाकडे प्रत्येक राज्यातील मशिदींची माहिती असेल, नसेल तर ती महापालिका किंवा तत्सम संस्थांकडूनही मिळू शकेल. 1/n
मशिदीत नमाजचे नेतृत्व करणारे इमाम मंडळींची कुठली संघटना आहे का ते बघावे, नसेल तर देवबंदी आणि बरेलवी असे दोन भाग असतात, त्यांच्या सर्वोच्च संस्थांच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना या इमामांना सामूहिक नमाज पठण थांबविण्याचे पत्रक आदेश काढण्यास सांगावे. शासनानेही तसे आदेश काढावेत 2/n
सोबतच मोहल्ला कमिटीसारखी प्रत्येक परिसरातील काही सुज्ञ मुस्लिमांची (व्हर्च्युअल का होईना) टीम बनवावी (स्थानिक पोलिसांना अशा मुस्लिम सहकाऱ्यांची कल्पना असते) परिसरातील मशिदीत लोक जमा झाले की त्याची माहिती पोलिसांना देण्याचे त्यांना आवाहन करावे, ते आनंदाने करतील. 3/n