आदरणीय @mieknathshinde साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र! 🚩
आपण हिंदूत्वाच्या मुद्यावर तसेच घराणेशाहीच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावलेत त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. आपल्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
गेल्या काही वर्षात शिवसेना नेतृत्वाने हिंदूंचे आणि हिंदुत्वाचे केलेले खच्चीकरण व इतर धर्मियांचे लांगूलचालन हे पाहता शिवसेने विरोधात अनेकांच्या मनात खदखद होतीच, ही खदखद आपण योग्य वेळी बाहेर काढलीत. आपल्या या भूमिकेत राजकारण असेलही किंबहूना असायलाच हवे पण
हिंदूत्वासाठी व हिंदू रक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या निश्चितपणे केल्याच पाहीजेत. आपण तर प्रस्थापितांना हादरा दिला आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा मोठा राजकीय भूकंप कधीच झाला नव्हता. याआधी अल्पमतात येऊन अनेक सरकारे पडलीत,
परंतु इथे मात्र ‘सारे काही सत्तेसाठी’ असे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. सततच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शिवसेना नेतृत्वाला सर्व काही गमावून बसण्याची वेळ आली आहे. हीच खरी वेळ आहे, बिगर ठाकरे व्यक्ती शिवसेना प्रमुख होऊ शकतो हे दाखवून देण्याची व घराणेशाही हद्दपार करण्याची.
आपण आमच्या पंचक्रोशीतील आहात म्हणून आपल्याबद्दल आदर व प्रेम निश्चितच आहे पण त्याचबरोबर आपण हे सर्व हिंदूत्वासाठी करत आहात या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नका. एका नव्या पर्वाची सुरुवात करीत आहात, आई वरदायिनी तुम्हाला उत्तरोत्तर यश देवो हीच प्रार्थना! 🙏🏻
खरंतर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि देवेंद्र फडणवीस किंवा दुसरी कुणीही व्यक्ती मुख्यमंत्री झाली तरी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात काहीही फरक पडत नाही, तरीसुद्धा मवीआ आघाडीचं सरकार पडायच्या बेतात आहे ह्याचा मला इतका आनंद का होतोय?
कारण माझ्या डोळ्यासमोर सतत उभा राहतोय हा निरागस चेहरा,रक्ताळलेला,तरीही एका लहान मुलासारखं निर्व्याज हसणारा.ह्या हिंदू साधूला पालघर मध्ये जमावाने दगडांनी ठेचून मारलं होतं,तेसुद्धा पोलिसांच्या उपस्थितीत. सतत उठता बसता हिंदुत्वाच्या नावाने गळे काढणाऱ्या ह्या सरकार ने काही केलं नाही.
मुख्यमंत्र्यांनी साधी दखलही घेतली नाही. जेव्हा पोलिसांनी आपलं काम करायला हवं होतं तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस महीना १०० कोटीची खंडणी गोळा करत होते आणि अंबानीच्या घरासमोर स्फोटके ठेवीत होते.