४८ वर्षापूर्वीच्या अविस्मरणीय आठवणी !
त्रिशतसांवत्सारिक महोत्सव श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या प्रतिभेनी शिवाजी पार्क दादर-मुंबई. येथे महाराष्ट्र दिन १ मे १९७४ ते ६ जून १९७४ श्रीशिवराज्याभिषेक दिन या काळावधीत अतिभव्य "शिवसृष्टी" उभी केली होती.+
त्यावेळी देशविदेशातील तसेच देशातील विविध प्रांतातील मान्यवर व शिवभक्तांनी ही शिवसृष्टी बघायला यायचे. दि. १६ मे १९७४ या दिवशी श्री.शरदराव पवार आपल्या सहकाऱ्यांसह आले.योगायोग असा की, त्यावेळी सातार्याहून छत्रपती शिवाजी महाराज यांची श्रीभवानी तलवारीचे आगमन झाले.+
श्री.शरदराव पवार श्रीभवानी तलवारीचे स्वागत करण्याचा मान घेतला आणि तलवारीचे पूजन करून, दोन्ही हातात घेऊन शिवसृष्टीत भव्य राजेशाही मिरवणूक काढण्यात आली. सर्व शिवसृष्टी पाहून झाल्यावर श्री. शरद पवार यांनी स्वत: लिहीलेला अभिप्राय स्वाक्षरीसह... #SharadPawar#babasahebpurandare
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अनीता बोस (फाफ).. ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकुलती एक कन्या. ती अवघी चार आठवड्यांची असताना, नेताजींनी तिला व आपली पत्नी एमिली हिला युरोपमधे सोडून दक्षिण आशियाच्या दिशेनं कूच केलं.... जपानच्या सहाय्यानं ब्रिटिशांचा पराभव करुन 1/9
भारत स्वतंत्र करण्यासाठी. पुढे, दोन-अडीच वर्षांच्या धामधुमीनंतर नेताजींचा दुर्दैवी व गूढ मृत्यु झाला. त्यामुळे आपल्या मुलीला ते पुन्हा भेटू अथवा पाहू शकले नाहीत.
अनीताला अर्थातच तिच्या आईनं.. एमिलीनं वाढवलं. मुलीचा व स्वतःच्या आई-वडीलांचा 2/9
सांभाळ करण्यासाठी, नेताजींची पत्नी- एमिली 'ट्रंक (कॉल) अॉफीसमधे' विविध शिफ्टमधे काम करत असे. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ब्रिटिशांच्या अटी झुगारुन तत्कालीन सरकारनं नेताजींच्या पत्नीला सन्मानानं भारतात बोलवायला हवं होतं व तिच्या चरितार्थाची व्यवस्था करायला हवी होती. 3/9