२००२ गुजरात दंगलीत #बिल्कीस_बानो सामूहिक बलात्कार आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ११ आरोपी काल गुजरात सरकारने तुरुंगातून मुक्त केले.
विशेष म्हणजे त्याच दिवशी जेंव्हा प्रधानमंत्री मोदीने नारी (खरं तर स्त्री, महिला म्हणायला हवं) सन्मान करावा असं सार्वजनिक आवाहन केलं.
२००२ गोध्रा रेल्वे जाळपोळीनंतर
उसळलेल्या हिंसाचारात गर्भवती असणाऱ्या बिल्कीस बानोवर सामूहिक बxत्कार झाला आणि तिच्या ३ वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून तर इतर नातेवाईकांना जमावाने जीवे मारलं होतं.
गुजरातमध्ये राहून या केस मध्ये न्याय मिळू शकेल या साशंकतेतून पुढे ही केस
मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली. ओळख पटू नये म्हणून पोलिसांनी सर्व मृतदेह हे डोकं वेगळं करून पुरले असे ताशेरे ही ओढले गेले.
या केसचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या जस्टिस तहीलरामाणी यांच्या नावाची खूप चर्चा झाली होती. याच जस्टिस तहीलरमाणी पुढे मद्रास उच्च न्यायालयाच्या
मुख्य न्यायाधीश झाल्या. नंतर केंद्रात सत्तांतर झालं. सर्व्योच्य न्यायालयाच्या कलोजियम मध्ये असणाऱ्या सर्वोच्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती तहीलरामाणी यांची त्यांच्या योग्यता आणि अनुभवापेक्षा कनिष्ठ अशा मेघालय उच्च न्यायालयात त्यांची बदली केली.
पण अत्यंत सन्मानपूर्वक न्यायमूर्ती तहीलरामाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अशा या केसमध्ये हिम्मत्त, जिद्द दाखवणारी बिल्कीस बानो आणि कर्तव्यनिष्ठ राहून न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणाऱ्या चीफ जस्टीस तहीलरामाणी यांची कालच्या गुजरात सरकारच्या निर्णयाने चेष्टा तर झाली नाही?
प्रधानमंत्री मोदीने देशाला उद्देशून स्त्री शक्तीचा सन्मान करावा म्हणून केलेलं आवाहन हे इतक्या मोठ्या खटल्यात आरोपी असणाऱ्या सर्वांना मोकळं सोडून दिल्याने कसं पूर्ण होतं हे हा संवेदनशील समाजाचं समजू शकेल.
बाकी देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनेक सदिच्छा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शरद पवारांनी एक कविता का सांगितली भावे पासून ते चितळेपर्यंत सगळे शेनातले शेंगदाणे खवखवू लागले. ब्राम्हणी प्रवृत्तीला पोटशूळ उठावा असाच मर्मभेदी अर्थ आहे कवितेचा. यालाच विद्रोह म्हणतात. कंपू महासंघाला जातीवाद संपवायचा असेल तर ढसाळांच्या कवितांना चौकात फ्लेक्स वर लावलं पाहिजे.
महात्मा फुलेंची पुस्तकं वाचाल तर लक्षात येईल की परिस्थिती मध्ये गेल्या १०० वर्षात सुद्धा फार फरक नाही. बहुजनांनी शिकावं म्हणून फुलेंना केलेलं काम या मंडळींना इतकं त्रासदायक वाटलं होतं की फुलेंना मारायला लोकं पाठवली. ते जमलं नाही म्हणून त्यांची ख्रिस्त धार्जिणे म्हणून बदनामी केली.
छ्त्रपती राजर्षी शाहू महाराजांनी याच वर्चस्वाला कायदेशीर आणि सामाजिक हादरे दिले. तत्कालीन मीडिया हाताशी असणाऱ्या "शेणाचा गोळा खाऊन पवित्र झालेले ब्रम्हमान्य व्यक्तीने अत्यंत हिणकस टीका केली होती. आजही मुद्दाम त्यांचा उल्लेख हा "कार्यकर्ता" म्हणून करतांना तीच मळमळ दिसते.
साधारणतः घराघरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी ही पूजा. नवीन कार्याची सुरुवात, गृहप्रवेश, चांगला दिवस काहीही कारण असो ही पूजा अनेक जण करतात.
पण का ? तर तसं शास्त्रात सांगितलं आहे. कोणी सांगितलं? अनेकांनी.
त्यांना कोणी सांगितलं ? भटजीने.
नारदाने पृथ्वीवरच्या लोकांच्या त्रासातून मुक्ती कशी मिळावी या प्रश्नावर विष्णूने हे व्रत सागितले असं स्कंद पुराणात ही लिहिल्याचं भटजी सांगतात.
मग आपण शांत कारण पुराणात लिहिलयं म्हणलं की आपण ते शोधत नाही हे भटजीला माहीत असतं.
त्यात एका साधुवाण्याची कथा सांगितली जाते, कोण हा वाणी?
साधू वाणी या कथेतलं पात्र आहे जो आणि त्याची पत्नी, मुलगी आणि जावई हे सर्व सुखी असतात.
देवपूजा दुर्लक्षिल्याने त्यांची संपत्ती चोरी होऊन त्यांना अटकही होते.
पण नंतर एका ब्राम्हणाच्या घरी ही पूजा बघून पुन्हा ती सुरू केल्याने त्यांचे सर्व दुखः दूर होतात.
साधारणतः कोणत्याही गावात एसटी स्थानकासमोर निळ्या कोटात असणारा ज्यांचा पुतळा कायम हातात पुस्तकं घेतल्यामुळे लक्षात येतो ते #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर नक्की कोण? मग यांना राजकारणी, समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, कामगार कैवारी, कायदेपंडित की लेखक.. काय म्हणून बघावं आपण ?
गांधी विरुद्द आंबेडकर वाद असेल किंवा आंबेडकर जिन्ना राजकीय मैत्री. या सगळ्यात मुरलेला राजकारणी आहे. फक्त समाजसेवक म्हणून छोट्या साच्यात बसवणं शक्य नाही आणि फक्त दलीत नेता म्हणावा तर इतर क्षेत्रात सर्व भारतीयांसाठी केलेलं प्रचंड काम दुर्लक्षित करता येणार नाही.
हिंदू धर्माची चिकिस्ता ते रुपयाचं मूल्य इतक्या वेगवेगळ्या विषयांवर केलेलं अप्रतिम लिखाण हे डॉ आंबेडकरांची पुढच्या पिढीला दिलेली परिवर्तनाची शिदोरी आहे. जमेल तितकी घ्यावी. आंबेडकरांच्या तसबिरीपेक्षा त्यांची पुस्तकं वाटावी इतकी त्यात वैचारिक धगधग आहे.
ज्यांना पं. नेहरूंनी #मिर_ए_कांरवां म्हणून संबोधलं आणि गांधींनी त्यांना प्लुटो,अरिस्टोटल आणि पायथागोरस या तिघांच्या योग्यतेचा माणूस म्हणलं असे जे स्वतंत्र भारताचे #पहिले_शिक्षण_मंत्री #MaulanaAbulKalamAzad यांची आज पुण्यतिथी.
१८५७ च्या बंडामध्ये यश न मिळालेल्यामुळे मौलाना अबुल कलाम यांचे वडील सौदी अरेबिया मध्ये जाऊन स्थायिक झाल्यानंतर तिथेच अबुल कलाम यांचा जन्म झाला. पुढे हे कुटुंब कलकत्त्यात येऊन स्थायिक झाले आणि अबुल कलम यांचं शिक्षण पारंपरिक धार्मिक पद्धतीने सुरू झालं.
लहान असताना स्वतःची लायब्ररी चालवणारे आझाद, आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुलांची शिकवणी घेत. लहानपणीच मुलांची डिबेटिंग सोसायटी स्थापन करून वेगवेगळ्या विषयातल्या आणि वेगळ्या विचारांचा प्रभाव पडल्याने त्यांचा ओढा हा भारतीय स्वातंत्र्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्याकडे होता.
"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,
‘‘काय उत्तर आहे तुमच्याकडे?’’ मी म्हणालो, ‘‘याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच कसं आहे, हे तुम्हाला समजावून सांगणं.’’ मग तर त्यांना काही कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय!’’.
#भक्तीसाठी_बळी
सध्या सगळ्यांना देशभक्ती मध्ये तोलून ठरवलं जातं की कोण देशभक्त आणि कोणाला पाकिस्तानचा विसा द्यायचा. अशी ही देशभक्ती म्हणजे सरकारवरच एकतर्फी प्रेम ज्याच्यात तरुण पोरं स्वत:ला हीरो समजून एक पाय घासत #श्रीवल्ली म्हणल्यासारखं घसा ताणून #श्रीराम म्हणत आहेत.
मुलांना लहानपणीच ट्युशन लावणारे, अभ्यासासाठी वेगळी रूम बांधणारे, कॉम्प्युटर्स घेऊन देणारे, पैसे भरून मुलांना चांगल्या कॉलेजला पाठवणारे, नौकरीसाठी सोनं मोडून पैसे देणारे, खोटी प्रमाणपत्र तयार करणारे, सरकारी नौकरीवाला जावई शोधणारे लोकं नौकऱ्या नाही तरी पण ढिम्म?
घरी पार्किंगपेक्षा जास्त गाड्या घेऊन घरातल्या प्रत्येकाची सोय होईल हे पाहणारे पेट्रोल डिझेलचे दर वाढले तरी बोलायला तयार का नाही ? कुटुंबासोबत फिरायला जाणं कमी झालं आहे, वाढदिवसाच्या पार्ट्या आता कमी लोकांत होतात, करोनामुळे लग्न खर्च तरी कमी झाला त्याचंच काय समाधान आहे.