एक साधुबुवा मरणशय्येला खिळले होते. त्यांची अंतिम घटिका जवळ आली तसं शिष्यांनी विचारलं, गुरुदेव, आमच्यासाठी काही अखेरचा संदेश?
गुरुजी सगळे प्राण एकवटून मोठ्या कष्टाने म्हणाले, वाट्टेल ते झालं तरी मांजर पाळू नका.
एवढं बोलून त्यांनी प्राणच सोडला.
शिष्य चक्रावले. हा काय संदेश झाला?
असं कसं होईल? मरताना त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता की काय?
पण, आपले गुरू असंच काही बोलणार नाहीत, असंही त्यांना वाटत होतं. त्यांनी अनेकांना विचारलं की गुरुदेव बोलले, त्याचा कूटार्थ काय? कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं, पण, ते त्यांना पटण्यासारखं नव्हतं. शेवटी
एकाने सांगितलं, तुमच्या गुरूंचे एक समवयस्क गुरुबंधू अमुक एका गावात राहतात. त्यांना भेटा. ते अर्थ उलगडून सांगतील.
शिष्य त्या गावी गेले. त्यांनी गुरुंच्या गुरूबंधुंची भेट घेतली. त्यांना आपल्या गुरूंचे अंतिम उद्गार सांगितले आणि म्हणाले, याला काही अर्थ आहे का?
सुस्कारा सोडून ते
गुरुदेव म्हणाले, आहे ना, खूप अर्थ आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरूची जीवनगाथा समजून घ्यावी लागेल. तुमचा हा जो गुरू होता, त्याने ऐन तारुण्यातच संन्यासदीक्षा घेतली होती. कडक सर्वसंगपरित्याग केला होता. गावाबाहेर त्याचं एक खोपटं होतं, भिक्षा मागून जगत होता. त्याने फक्त दोन लंगोट
जवळ बाळगले होते. त्याला तेव्हा लंगोटीवाले बाबाच म्हणत लोक. तो एक लंगोट धुवून सुकवायचा. दुसरा परिधान करायचा. झालं काय की उंदरांना त्याच्या खोपटात काहीच मिळेना. ते त्याचा सुकत घातलेला लंगोट कुरतडू लागले. त्याची मोठी पंचाईत झाली. गावकऱ्यांना विचारलं, तर ते म्हणाले, यावर एकच उपाय आहे
तुम्ही मांजर पाळा. मांजर उंदरांना खाईल. मात्र, पाळलेली मांजर घरात टिकेना.
त्याने परत गावकऱ्यांना विचारलं, गावकरी म्हणाले, महाराज, मांजरीला नुसते उंदीर खाऊन जमत नाही. तिला दूधही लागतं. काही दिवस गावकऱ्यांनी महाराजांच्या मांजरीसाठी दुधाचीही व्यवस्था केली. पण, एक दिवस त्यांन
त्यांना सांगितलं, इथे आमच्या लहान बाळांना दूध मिळता मिळता मारामार आहे. तुमच्या मांजरीला रोज दूध कोण देणार? आम्ही सगळे मिळून एक गाय देतो तुम्हाला. दुधाची व्यवस्था होऊन जाईल.गाय आली. काही दिवस गावकऱ्यांनी चाराही दिला. नंतर म्हणाले, तुमच्या खोपटापाशी जमीन आहे.
तुम्ही गायीचा चाराही पिकवा. आमच्यावर किती अवलंबून राहाल. खटलं वाढलं. हरिभजनाचा सगळा वेळ गाय, मांजर यांच्या झंझटींमध्ये जायला लागला.गावकरी म्हणाले, गावात एक विधवा स्त्री आहे. विनापाश आहे. तिला घरात आणा. ती घराची देखभाल करील. तुमचीही काळजी वाहील.
तिला दोन भाकऱ्या आणि डोक्यावर छत मिळालं की झालं. ती स्त्री आली, लंगोटावर धोतर आलं. उघड्या अंगात सदरा आला.
तिने मन:पूर्वक सेवा केली, जवळीक वाढली. लोक म्हणाले, बिचारीला इतकं दिलंत, आता कुंकवाचा मानही द्या. आपल्यात असं चालत नाही. मग लग्न झालं, मुलं झाली.
१७व्या वर्षी हरिभजनासाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या महाराजांना परत हरिभजनाकडे वळायला सत्तरीतच फुरसत मिळाली.
गुरुबंधूंनी गोष्ट संपवली, तेव्हा म्याँव आवाज आला. खिडकीतून मांजरीने आत उडी मारली. गुरुबंधू हातात फुंकणी घेऊन जिवाच्या आकांताने तिला हुसकावायला धावले…
चीनची प्रॉपर्टी मार्केट आता मंदीच्या धोकात आहे. चीनच्या संपूर्ण GDP च्या प्रॉपर्टी उद्योगाचा वाटा जवळपास 30% आहे.त्यामध्ये चीन मधील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी Evergrand कंपनी जवळपास बुडाली आहे.
1979 मध्ये डेंग ने आर्थिक सुधारणा लागू केल्या . त्यामुळे उत्पादन क्षेत्रात चीन ने फार मोठी उडी मारली. शेतीप्रधान पासून औद्योगिक क्षेत्रात चीन जगात अव्वल झाला. 1995 मध्ये चीन मधील 29%लोकं शहरात राहत होते मात्र आता 63%लोक शहरात राहतात. 1995 पासून अनेक खेड्यातून शहरात लोकसंख्येचा
ओघ चालू झाला.
जशी भारतात सोन्याच्या गुंतवणूक ही उत्तम मानली जाते तशी चीन मध्ये स्थावर मालमत्ता उत्तम मानतात .एखाद्याचे स्वतःचे घर नसेल तर त्याचे लग्न होत ही नाही.त्यामुळे वाढती आर्थिक संपदा मुळे चीन मध्ये घरांचा तुटवडा पडू लागला. घराची मागणी वाढू लागली.अनेक नवीन विकासक पुढे येऊ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुटुंब नंतर
प्रताप राव गुजर यांच्या कुटुंबाने सर्वात जास्त नुकसान झेलले आहे. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश असताना युद्धात मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला सह्याद्री मध्ये घाईला
आणले. मग बेहलोल खानाला सोडून दिल्यावर, " तेंव्हा राजांनी प्रतापरावाना खडसावले " सला काय निमित्य केला " बेहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. २४फेब्रुवारी १६७४ हाच तो दिवस. जिथे प्रतापराव आणि सहा वीर नेसरीच्या
बेहलोल खानाच्या छावणी् वर चालून गेले आणि जीव गमावला.
प्रतापराव गुजर यांना चार अपत्य
पहिलं अपत्य जानकीबाई जी प्रतापरावांच्या शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस अगोदर राजाराम महाराज बरोबर लग्न लावले.
1689 मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि रायगडला इतिहादखान उर्फ झुल्फिकारखान चा वेढा पडला .झुल्फिकारखान च्या वेढ्यातून
आपला देश आज पण लोकशाही म्हणून मिरवत आहे तर कोणत्या पक्षांमुळे नाही तर खालील असलेल्या चांगल्या लोकां मुळे.RTI activist हाय कोर्टात वकील एरिस रॉड्रिग्ज यांनी माहिती द्वारा स्मृती इरणीची मुलगी 18 वर्षाची झोहिष इराणी हिने अवैध रित्या रेस्टॉरंट बार काढला.
ईराणी ची मुलीने जुने 2021 मध्ये रेस्टॉरंट चे license renew केले अँथनी नावाची आहे घेऊन पण अँथनी cha मृत्यू मे 2021 मध्ये झाला होता.
हे प्रकरण गेले excuse कमिशनर नारायण या कडे. कोणत्या ही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता नारायण यांनी इरानीची मुलीला नोटीस पाठवली.
e-Toro नावाचा सोशल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यात तुम्ही तुमचे ट्रेडिंग अकाउंट लिंक करू शकता. तिथेसुद्धा फेसबुक सारखी वॉल असते. तुम्ही ट्रेड घेतल्या घेतल्या फेसबुक सारखा तुमच्या वॉल वर प्रसिद्ध होतो. तसेच तुमच्या आवडत्या ट्रेडर ला तुम्ही फॉलो किंवा कॉपी करू शकता.
म्हणजे त्याने ट्रेड घेतल्याक्षणी तुम्हाला अलर्ट येतो, मग तुम्ही सेम ट्रेड घेऊ शकता.
स्टार ट्रेडर्स ची यादी असते. तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना फॉलो करू शकता. तसेच तुम्ही चांगले ट्रेडर असाल तर लोक तुम्हाला तुमच्या ट्रेडसाठी कॉपी करू शकतात. त्यासाठी अत्यल्प फी सुद्धा
तुम्हाला मिळते.(किंवा तुम्ही ज्याला फॉलो करता त्याला द्यावी लागते)
याशिवाय, तुमचे अकाउंट ट्विटर, फेसबुक वगैरेंना जोडून त्यावर तुमच्या यशाची हवा करू शकता.
आपल्या इतिहास पुस्तकात पिढ्या नी पिढ्या काहीच गोष्टी शिकवल्या गेल्या.उदाहरण आता ऑलिम्पिक मध्ये आपल्या हॉकी टीम ने चांगली कामगिरी केली,पण त्याचे श्रेय नवीन पटनाईक कडे जाते. नवीन पटनाईक ओडिशा चे मुख्यमंत्री , बिजु जनता दल चे सर्विसर्वा. त्यांच्या वडील विजू पटनाईक विषयी आपल्या
फार कमी माहिती आहे. त्यांची कामगिरी तर डोळे थक्क होईल अशी आहे. पण आपल्याला कधीच हा इतिहास शिकवला गेला नाही. पण शेजारच्या देशात म्हणजे इंडोनेशिया मध्ये सर्वांना बीजू पटनाईक नाव माहिती आहे. बिजू यांचा जन्म 1916 ला झाला. 1997 मध्ये त्यांचा मृत्यू झाला पण हे भारतातील एकमेव व्यक्ती
आहेत ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव तीन देशांच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले होते. भारत, रशिया आणि इंडोनेशिया.बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्रीही होते बिजू पटनायक हे वैमानिक होते आणि दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियन अडचणीत असताना त्यांनी डकोटा हे लढाऊ विमान उडवून
इंग्रजीनंतर गेल्या काही वर्षांपासून हिंदीचेही आक्रमण चालू आहे. गर्व, तत्त्व, दर्शक, स्वस्थ, व्यस्त, प्रस्तुत, गठन, असे अनेक शब्द जे हिंदीमध्ये वेगळ्या अर्थाने वापरले जातात ते जसेच्या तसे मराठीत वापरले जाऊ लागले आहेत.
यातील बरेच शब्द मूळ मराठीतही असले तरी त्यांचा मराठीतील अर्थ पूर्ण वेगळा आहे. व्याकरणाचीही अशीच मोडतोड चालली आहे. उदा. मराठी मालिकांमध्ये बऱ्याचदा ऐकायला मिळणारे वाक्य म्हणजे, ‘तू माझ्यावर का हसतोस?’, हे ‘तुम मुझपे क्यू हस रहे हो?’ या हिंदी वाक्याचे सरधोपट भाषांतर आहे.
अशी वाक्ये मराठी मालिकांमधून सतत कानावर आदळतात. कोणतीही मराठी वृत्तवाहिनी लावा.निवेदक एका बाजूला ठळकपणे दाखवले जाणारे मुद्दे वाचतो तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, विसर्ग, यांची यथेच्छ मोडतोड केली जाते.