पत्र क्रमांक १
राज ठाकरेंनी पत्र लिहले आणि अंधेरीत भाजपने माघार घेतली, काय जरब आणि वकूब आहे साहेबांचा.
पत्र क्रमांक २
ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून राज ठाकरे यांच्या पत्राचा दहावा झाला तरी साधा प्रतिसाद ही नाही.
किस्सा...
दिवाळीच्या अगोदर राज ठाकरे यांची एक मुलाखत भावेंनी घेतली, त्यातला 'सु सुबोध' काय होता, सुबोध भावे म्हटले डबिंगसाठी दिलेला आवाज ऐकून लोक खुश होतील आणि म्हणतील टायमिंग बादशहा राज ठाकरे म्हटले हेच करत रहा दोघेही निखळ हसताना ते सत्य स्वीकारत होते, सत्य हे कि राज ठाकरे
यांना राजकारण जमत नाही, हे कोण म्हटले स्वत राज ठाकरे. चला विषय समजून घेऊ...
राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांच्या करारी आवाजाचा वारस, साहेबांची वाणी आणि ब्रश घेऊन मार्मिक टोमणे मारायला सराईत झालेला हा पुतण्या, गेली दीड दशकापासून जगाला हेवा वाटावा असा घडवायला महाराष्ट्र मागत आहेत
महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात दोन लाखाची सभा घेण्याची ऐपत असलेले राज ठाकरे अजूनही सत्तेचे आर्जवे करताना दिसतात, मुळात सत्तेचे गमक आणि गणित न कळलेले राज ठाकरे, सत्तेच्या रम्मित वापरला जाणारा तो विदुषकी पत्ता ठरत आहेत का याचे चिंतन झाले पाहिजे.
राज ठाकरे यांनी दिल्लीश्वर फाडून खाल्ला, अगदी मोदींच्या आवाजात भाजपला ओरखडे ओढले. मात्र इडीच्या नोटीसीचे निमित्त झाले आणि चक्क बाळासाहेबांच्या पुतण्याने रिव्हर्स नाही यु टर्न मारला, मनसे सेनेला रिप्लेस करेल यावर बहुचे एकमत होऊ लागले, दोन्ही कडच्या वरबापांनी सपत्नीक सुपारी फोडली,
झेंड्यातले इतर रंगांना पुसून गळ्यात आणि झेंड्यावर भाजपचा अजेंडा रिचवत राज ठाकरे भाजप चालीसा गुणगुणू लागले, वेगळे राजकारण पारदर्शक भूमिका, परखड पुतण्या, करारी बाना वैगेरे सर्व एका क्षणात निष्प्रभ झाले, राजकारणात भूमिका डळमळीत होणे वेगळे आणि बदलणे वेगळे
पत्रकाराला देखील ये ये करून गप गार करणाऱ्या राज ठाकरे यांना शब्दाने उत्तर देता येणार नाहीत असे पायलीभर प्रश्न सुमार पत्रकाराकडे आहेत. राज ठाकरे भाजपचे हस्तक झालेत यावर बहु विश्लेषकांचे एकमत आहे, राज ठाकरे यांचे सर्व पत्र भाजपने प्रस्तावित स्क्रिप्ट असतेच असे नाही
ओला दुष्काळ आणि अंधेरी असे दोन लखः दोन टोक त्यात आहेत. लागेल तेवढाच ठेचा वापरला जाण्याची आमच्या जेवणाची रीत आहे, फडणविसांनी ठाकरेंच्या वंशजांची जी पंचाईत केलीय तो त्यांचा भले मुत्सद्दीपणा असेल देखील मात्र राज ठाकरेंच्या मुत्सद्दीपणाची वाताहत कुणी मान्य करायची.
शहरी बेल्ट सोडला तर राज ठाकरे यांच्याकडे ग्रामीण महाराष्ट्रासाठी सिंगल मुद्दा नाही अन त्यांना महाराष्ट्र हवा आहे. दानवे आठवले सत्तार मंत्री आहेत मात्र त्यांना सत्तेचे सूत्र कळले आहेत, केवळ भाषणे करून सत्ता मिळाली असती तर १० हजारात वक्ते दोन तास गळा फोडत बसले नसते.
राज ठाकरे सुपारी घेऊन वाजवतात हा फडणविसांचा आरोप, त्याच देवेन्द्रांना कुर्निसात घालण्याची राजकीय नामुष्की राज ठाकरे वर येणार असेल तर अशोक तावरे वैभव काकडे सारख्या कडवट परखड आणि लढवय्या कार्यकत्यांनी कुठला स्वाभिमान बाळगायचा, मागे अमित ठाकरे मराठवाड्यात येऊन गेले, त्यांची
अलिशान महागडी गाडी पहायला चांगली असती मात्र युवराजांनी भूमिका म्हणून युवकांना काय सांगितले काहीच नाही. मुळात राज ठाकरे सगळीकडून लटकले आहेत, भाजप मनसे युती शक्यता असताना फडणवीसांनी शिंदे काकाला नाही तर थेट डोक्यावर घेतले आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्यात भविष्य शोधणाऱ्या
कार्यकर्त्यांची काळजी केली पाहिजे, कधी काळी ते म्हणत असायचे कि आई बापाला कौतुक वाटेल कि आपल पोरग राज ठाकरे सोबत काम करतंय, साहेब आता पोरग घरात सांगतच नाही ते राज ठाकरे सोबत आहे, कारण त्याला केव्हाही बदलायचे आहे जसे आपण बदलता... आता मनसेच्या भूमिकेत पत्रात कुठलेही राज दडलेले नसते.
गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
Preview.
रविवारी प्रकरण दाखल करून ठाकरेंना दोन दिवसात फ्लोवर टेस्ट बद्दल दम देणारे कोर्ट शिंदेना मात्र तारखावर तारखा बहाल का करते, यावर फारशी कुणाला तक्रार नाही, कारण सबब सर्वांनाच ठाऊक आहे. वरती मोदी नसते तर खाली फडणवीस परत आले नसते.
गेल्या पाच वर्षात सत्तातरांचे असे नमुने समोर आलेले आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. उध्दव ठाकरेंसाठी मोठा झटका आहे. ज्याला कोणाला पक्षांतर करायचं असेल त्याने सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावे.
मग ती एक व्यक्ती असो वा अनेक. शिवसेनेच निवडणुक चिन्ह उद्या निवडणुक आयोगाने गोठवल तरी त्याने काय फरक पडतो? काँग्रेस फुटली तेव्हा गाय वासरु निशाणी जाऊन इंदिराजींना हात ही निशाणी मिळाली आणि पक्षाच मुळ नाव पण गेल. पण त्याने काय फरक पडला ? १९८० च्या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने
संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏
'वारी' स्वरूप आणि परंपरा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सवात डॉ. देखणे आपले विचार मांडतात.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात आणि लोकाचारामध्ये पांडुरंगाचे स्थान मोठे आहे. पांडुरग हा येथील लोकजीवनाचा मोठा आधारस्तंभ असून तो लोकदेव असल्याचे डॉ. देखणे सांगतात साने गुरुजींनी ‘महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुका अध्यक्ष’ असे पांडुरंगाचे वर्णन केल्याचा संदर्भही त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे ज्ञानपीठ तर संत तुकाराम हे योगपीठ आहेत असे ते सांगतात.
परी ते मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धीच्या डोळा देखावे ॥
हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥
जे विचार मनाच्या कानाने ऐकले जातात, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले जातात, चित्ताने साठवले जातात