शेत विकून शिकलोय,
कर्ज काढून फीस भरलोय,
दोन चार पगारीने कर्ज तरी फिटू दे
घाई कशाला करते,
घेईन की ग घर!
२५ वर्ष कुटुंब सोडलोय,
जेमतेमीतून वर आलोय,
स्टेशन वरती रात्र काढलोय,
तू फ्लॅट आहे का विचारतेस?
थोडं दमान घे,
तुला शोभेल अस सुंदर, मी घेईल की घर! #म#लगीन#मराठी#हुंडा १/६
बेरोजगारीच्या काळात,
लेऑफ च्या ट्ट्रेण्ड मधे,
टिकलोय माझ्या नोकरीमध्ये,
थोड मला मोठ होऊ दे,
मी घेईल की राव घर.
तू शिकलेली आहेस,
तू समजुतदार आहेस,
तुलाबी तेवडाच पगार,
मलाबी तेवडाच,
मग तू घेतलंय का ग घर?
तरीबी मला घराची अट घालतेस,
तू नसेल घेतल तर असुदे, मी घेईल की घर! #म#मराठी २
माझे बाबा शेतकरी,
तुझे आहेत न ग नोकरदार
तरी भाड्याने राहता म्हणे,
विचार ना ग बाबाला,
२५ विशीत कसे घेतात ग घर?
तुला बी नौकरी,
मलाबी नौकरी,
तुज्याकडे आयफोन,
माझ्याकडे अँड्रॉइड,
मला सेविंग विचारतेस,
सांग न? तू किती रुपय जमवलेस?
दोघे मिळून घेऊ की घर, #म#मराठी ३
शेत हलके म्हणून परततेस,
पाणी नाही म्हणून नकार देतेस,
मी मारेल ४-५ बोर, करेल रान काळेभोर,
जॉब सोडून शेतीच करतेस का दिवसभर?
तू घर सोडतेस,
आई बाबा सोडून माझ्याकडे येतेस,
खूप मोठा त्याग आहे,
मायेच्या माणसाची ही ताटातूट आहे,
बघ की, #म#मराठी ४
माझेही आयुष्य तसेच ना?
गावी ८ दिवस दिवाळीचे अन् २ दिवस दसऱ्याचे
पण बाकी आयुष्य मात्र पुण्या मुंबईतल्या नोकरीचे.
हुंड्याची तुला चीड येते,
मला तुझी ही गोष्ट खूप आवडते,
समानतेच्या गोष्टी करतेस,
नारी शक्तीला प्रोत्साहन देतेस,
येवढी मॉडर्न असून…..
६ आकडी पगार हवा
३ बीएचके फ्लॅट हवा
४ चाकी गाडी हवी,
बँकेत माझी सेविंग हवी
बापाची प्रॉपर्टी हवी
शेतात पाणी अन् ३० एकर जमिन हवी,
राणी अस नाही वाटत तुला?
सेक्युर्ड फ्यूचर च्या नावाखाली,
तूही आजकाल मला उलटा हुंडा मागतेयस?? #म#मराठी ६/६
जे अनुभवल आणि माझ्या मनाला वाटल.
ते शब्दात व्यक्त केल.
आवडलं तर नक्की लाइक आणि रिटविट करा.
🙏🏼
माझा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो,
तुम्ही सगळे या परिस्थितीकडे कसे पाहता नक्की कमेंट करा.