सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत 'Right to Disconnect Bill' मांडले आहे.
वरकरणी हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूचा वाटतो, पण याच्या Fine Print मध्ये आणि अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत.
हे बिल नक्की काय आहे आणि ते भारतात लागू करणे का अवघड आहे? चला पाहुयात.
Thread 🧵
A) The Core Provision (What the Bill actually says)
कायद्यातील मुख्य तरतुदी :
१. कामाच्या वेळेनंतर कॉल/ईमेलला उत्तर न देण्याचा कर्मचाऱ्याला अधिकार.
२. उत्तर दिले नाही म्हणून कंपनी शिस्तभंगाची कारवाई करू शकत नाही.
३. जर कंपनीने या नियमाचे उल्लंघन केले, किंवा कर्मचाऱ्यावर दबाव टाकला, तर कंपनीला दंड होऊ शकतो.
महत्त्वाचा मुद्दा: दंड कॉल न उचलल्याबद्दल नाही, तर कॉल न उचलल्यामुळे त्रास दिल्याबद्दल आहे. फरक समजून घ्या.
B) The Emergency Loophole: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट: "Emergency Exception"
जगातील प्रत्येक Right to Disconnect'कायद्यात (फ्रान्स असो वा ऑस्ट्रेलिया), आणीबाणीच्या काळात संपर्क करण्याची मुभा असते.
आजकाल आपल्याला कोणताही प्रश्न पडला, किंवा एखादी माहिती हवी असली की आपण लगेच ChatGPT सारख्या जनरेटिव्ह AI कडे धाव घेतो.
या तंत्रज्ञानाने आपले आयुष्य सोपे आणि अधिक कार्यक्षम बनवले आहे, यात शंका नाही.
पण या सोपेपणाची आपण एक मोठी किंमत तर चुकवत नाही ना?
Thread 🧵#Repost
एका नव्या संशोधनाने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारे आहेत.
एका नव्या अभ्यासानुसार, या साधनांवर जास्त अवलंबून राहिल्याने आपली Critical Thinking आणि Problem-Solving Skills कमी होण्याची चिन्हं दिसत आहेत.
हे केवळ एक मत नसून, प्रतिष्ठित विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातून समोर आलेले एक 'निदान' आहे.
जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्टसारख्या संस्थांच्या संशोधकांनी GenAI वापरकर्त्यांच्या सवयींचा अभ्यास केला आणि त्यांना काही चिंताजनक लक्षणे आढळली:
लक्षण १: खोटा आत्मविश्वास:
GenAI वापरकर्त्यांना असे वाटते की त्यांची कार्यक्षमता वाढली आहे आणि ते अधिक सक्षम झाले आहेत. पण हा आत्मविश्वास पोकळ असतो.
प्रत्यक्षात, ते स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी करत असल्यामुळे त्यांची मूळ बौद्धिक क्षमता कमी होत असते.
आजच्या २०२५ च्या धावपळीच्या जगात, प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की मुलाने परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत आणि एक चांगली पदवी घ्यावी.
पण क्षणभर विचार करा, ज्या जगात नोकरीची बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि सामाजिक संबंध रोज बदलत आहेत, तिथे फक्त पुस्तकी ज्ञान आणि मार्कांची टक्केवारी पुरेशी आहे का?
Thread 🧵
याचे उत्तर आहे, 'नाही'.
आजच्या विद्यार्थ्यांना केवळ यशस्वी व्यावसायिकच नाही, तर एक स्वतंत्र, सामर्थ्यवान आणि आनंदी व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्यांची गरज आहे.
ही कौशल्ये म्हणजे त्यांच्या यशस्वी आयुष्याचा पाया आहेत.
चला, जाणून घेऊया ही कौशल्ये कोणती आहेत.
1) Critical Thinking and Problem-Solving
केवळ माहिती लक्षात ठेवण्याऐवजी, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, त्यावर प्रश्न विचारणे आणि तर्कसंगत निर्णय घेणे गरजेचे आहे.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, मग ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक, आपल्याला लहान-मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
ही कौशल्ये आपल्याला योग्य आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात.