कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे : रेवस ते तेरेखोल या जवळपास ७०० किमी लांब किनारपट्टीवर शंभर सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यापैकी अनेक किनारे पर्यटकांच्या यादीत हक्काचं स्थान कमावलेले आहेत तर काही थोडे आडबाजूला दुर्लक्षित आहेत.कोणता किनारा जास्त चांगला हे ठरवणं खरंच खूप कठीण आहे.
आणि प्रत्येक समुद्र रसिकाला विचारलं तर प्रत्येकाचं मतही वेगळं असणारच. त्यामुळे कोणतेही रँकिंग करणं म्हणजे वादाला आमंत्रण देणं. तरीही कोकण प्रवासात चुकवू नयेत असे सगळ्यात भारी 50 किनारे कोणते..?? तर चला दाखवतो..
आवास बीच - मुंबईपासून फार दूर नसलेल्या या गावातील समुद्रावर फेरफटका मारण्याचा अनुभव निराळाच. इथं जवळच सासवणेला करमरकर शिल्प संग्रहालयही पाहता येते. Image
किहीम - पक्षी अभ्यासक सलीम अली यांचे गाव आणि कोकणातील बेने इस्राईल समाजाचे आश्रयस्थान. जेव्हा पर्यटकांची गर्दी इथं नसते तेव्हा इथली निवांतता अद्भुत भासते. Image
वरसोली - अलिबागच्या अगदी जवळ पण गोंगाट नसलेला एक स्वच्छ, शुभ्र वाळूचा किनारा. कुलाबा किल्ल्याचे दृश्य आपण इथून पाहू शकतो. Image
अलिबाग – मुंबईच्या पर्यटकांचे अगदी लाडके ठिकाण आणि कुलाबा किल्ल्याच्या रूपाने एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळही. अलिबाग हे कान्होजी आंग्रेंच्या आरमाराचे मुख्य ठिकाण होते. Image
रेवदंडा – पोर्तुगीज बांधणीचा किल्ला इथं ओहोटीच्या वेळेला येऊन आवर्जून पाहायलाच हवा. Image
कोर्लईच्या दुर्गाला लागून असलेला छोटासाच पण रम्य किनारा. या गावात एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा बोलली जाते बरं का..! Image
मुरुड – छत्रपती शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग आणि त्याच्या बरोबर अस्ताला जाणारा सूर्यनारायण हे अनुभवायला मुरुड-जंजिरा गाठावे लागते. Image
आदगाव – दिवेआगरला जाताना लागणारे एक छोटेसे गाव आणि तिथला रस्त्याला लागूनच असलेला हा आदगाव चा किनारा. Image
कोंडविल – बाईक किंवा गाडीने हिंडताना रस्ता कधी समुद्राशी गप्पा मारायला लागतो हे समजतच नाही. श्रीवर्धनजवळचा एक अप्रतिम समुद्रकिनारा. Image
दिवेआगर – दिवेआगर हे एक प्राचीन आखीव-रेखीव गाव. लांबलचक पुळणीवर उभे राहून सांजवेळी निवांतपणे दिवसाला निरोप द्यायचा. Image
हरिहरेश्वर – दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले हरिहरेश्वर हे भगवान श्री शंकराचे स्थान. आणि तिथं असलेला विस्तीर्ण सागरतट. Image
वेळास – वेळास खरंतर कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे पण इथल्या किनाऱ्यावर थंड हवा, तांबूस वाळू आणि सागराच्या लाटांचा ताल अनुभवायला सुद्धा यायला हवं. Image
केळशी – या छोट्या टुमदार गावातला समुद्रकिनारा म्हणजे बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण करून देणारा अनुभव. Image
सावणे – पर्यटन नकाशावर परिचित नसलेला परंतु टेकडीवरून सागराचे आणि सुवर्णदुर्गाचे दर्शन देणारा सावणेचा किनारा हर्णेकडे जाताना खुणावत असतो. Image
आंजर्ले – कड्यावरील गणपतीचा आशीर्वाद घेऊन आंजर्ले किनाऱ्यावर फेरफटका मारायला यायचे. सोबत आंब्याची पेटी असेल तर बहारच. इथेही आता ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन सुरु झाले आहे. Image
कोळथरे – दाभोळ जवळचे एक छोटेसे गाव. कोळेश्वराचे देवालय आणि पंचनदी नदीच्या मुखाच्या उत्तरेला असणारा छोटासा सागरतीर. Image
गुहागर – विस्तीर्ण अथांग सागर. सुंदर स्वच्छ पुळण आणि किनाऱ्याला लागून असलेल्या नारळ-पोफळीच्या बागा ही गुहागरची खासियत. Image
बुधल – सागरी महामार्गापासून पाच-सहा किलोमीटर आत आडवाटेवर असलेलं हे गाव. एरवी अगदी शांत. पण भरतीला इथं सागराच्या लाटा खडकांवर आदळून गर्जना करू लागतात. Image
कुणबीवाडी – जयगड दीपगृहाजवळच असलेला सफेद वाळूचा हा किनारा. जांभा दगडाच्या नक्षीने नटलेला. Image
अंबुवाडी – जयगड गावाजवळ असलेला एक अप्रतिम किनारा. Image
रीळ – जयगड ते गणपतीपुळे प्रवासात रीळ-उंडीची लांबलचक किनारपट्टी आपलं लक्ष वेधून घेते. Image
मालगुंड – कविवर्य केशवसुत यांचे हे गाव. गणपतीपुळ्यापासून जवळच आहे आणि लांबलचक सुंदर अस्पर्श किनारा या गावाला लाभला आहे. Image
भांडारपुळे – पर्यटकांची गर्दी जरी गणपतीपुळेला असली तरी काही अंतरावरील या सुंदर समुद्रकिनाऱ्याला आवर्जून भेट द्यायला हवी. Image
गणेशगुळे – गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी आख्यायिका या भागात सांगितली जाते. रत्नागिरीजवळच असलेला हा रम्य सागरकिनारा Image
वेत्ये – अडिवरेच्या महाकालीचा आशीर्वाद घ्यायचा आणि तिचं माहेर समजलं जाणारं वेत्ये गाव गाठायचं. नितळ पाणी, शुभ्र वाळू आणि निरभ्र आकाश असा योग इथं नेहमीच जुळून येतो. Image
गोडीवणे – आंबोळगडचा शेजारी असलेला हा समुद्रकिनारा. पर्यटकांची गर्दी आणि गोंगाट यापासून अजूनतरी अलिप्त असलेला. सकाळी लवकर इथं येऊन ३-४ किलोमीटरची समुद्र फेरी करायला इथं यायला हवं. Image
माडबन – विजयदुर्गाचा सखा असलेला हा किनारा. वाघोटण नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं समोरच घेरिया किल्ल्याचे म्हणजेच विजयदुर्गाचे दृश्य आपल्याला दिसते. Image
बाकाळे – या किनाऱ्यावर जायला गाडी रस्ता नाही. पण बाकाळे गावात चौकशी करून सड्यावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने दोन अडीच किलोमीटर पश्चिमेला जायचे. सड्यावर गाडी पार्क करून पायवाटेने हा रमणीय किनारा गाठायचा. Image
देवगड – देवगडचे हापूस प्रसिद्ध आहेतच आणि तिथला किल्लाही. पण पवनचक्क्या आणि समुद्रकिनाराही तितकाच सुंदर. Image
मीठमुंबरी – देवगडहून कुणकेश्वरला जाणाऱ्या नवीन रस्त्याने सागराची अथांग निळाई अनुभवायला मिठमुंबरीला जाता येते. Image
कुणकेश्वर – कोकणातील एका महत्त्वाच्या शिवमंदिराला लागून असलेल्या या किनाऱ्यावर कोळी बांधवांची लगबग पाहताना भटकंती करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. Image
मुणगे – आचऱ्याच्या उत्तरेला थोडा आडबाजूला असलेला हा किनारा. गर्दी नाही, गडबड नाही, कसलीही घाई नाही. फक्त तुम्ही आणि व्हिटॅमिन सी. Image
तोंडवळी – समुद्र किनाऱ्याजवळ जंगल आणि वाघोबाचा वावर.. तोंडवळीच्या किनाऱ्याची बातच न्यारी. Image
तळाशील - गड नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं या संगमाचे दृश्य पाहणे एक स्वप्नवत अनुभव असतो. तळाशील ची दांडी मालवणपासून फार दूर नाही. सर्जेकोट बंदरातूनही ही झलक पाहता येते. Image
देवबाग संगम – कर्ली नदीच्या मुखाशी असलेला देवबागचा संगम म्हणजे जणू निसर्गाने काढलेलं चित्रच Image
भोगवे – भोगवेचा हा किनारा लवकरच ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचा मानकरी ठरणार आहे.हा कोकणातील सगळ्यात लाडका किनारा. Image
निवती – क्वार्टझाइट खडकांच्या सोबतीला एक छोटंसं गाव आणि टेकडीवरील किल्ला. ही आहे निवतीची कहाणी. Image
दांडेश्वर-श्रीरामवाडी – दांडेश्वर श्रीरामवाडीच्या किनाऱ्यावर भरतीच्या लाटा जांभा खडकांना आदळून एक वेगळाच ताल धरतात. Image
केळूस-मोबार – केळूस किनाऱ्याला खाडीचे उथळ पाणी एक वेगळी शोभा आणते. सोबतीला नारळाची झाडे आणि आकाशात ढगांचे पुंजकेही असतात. Image
फळयेफोंडवाडी – हमरस्त्यापासून दूर आतवर गेल्यावर काही अंतर चालून आपण फळयेफोंडवाडीच्या किनाऱ्यावर पोहोचतो. इथलं सागर सौंदर्य कितीही वेळ पाहत बसलं तरीही मन तृप्त होत नाही. Image
कोंडुरा – खानोलकरांच्या कादंबरीत आणि शाम बेनेगलांच्या सिनेमात झळकलेला हा अगदी छोटासा पण अद्वितीय किनारा. Image
दाभोळी – वेंगुर्ल्याजवळ असलेलं दाभोळी-वायंगणी गाव आणि तिथला हा रम्य सागरतीर. इथं समुद्राला हिरवळीची सोबत आहे. Image
मोचेमाड – मोचेमाडच्या छोट्याशा किनाऱ्यावर वाळूच्या ओंजळीत समुद्राचे स्वच्छ पाणी स्थिरावते. त्याचं नितळ सौंदर्य अनुभवताना मुग्ध व्हायला होतं. Image
कडोबा – आरवली-सागरतीर्थ किनाऱ्याच्या उत्तर टोकाला कडोबा किनारा असे म्हणतात. मोचेमाड नदीच्या मुखाशी सागराचे अनोखे रूप अनुभवण्याची आपल्याला इथं संधी मिळते. Image
रेडी – रेडीचा यशवंतगड हा मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुर्ग. इथलं गणेश मंदिरही भाविकांच्या गर्दीने गजबजलेलं असतं. आणि गोव्याच्या गर्दीपासून सुटका करून निवांत भटकंती करण्यासाठी इथं अनेक विदेशी पर्यटक येतात. Image
तारकर्ली – महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान असलेला तारकर्ली किनारा.. रिसॉर्ट, वाटरस्पोर्ट आणि बरंच काही. अर्थातच मुख्य आकर्षण इथला स्वच्छ, मखमली वाळू असलेला समुद्रकिनारा. Image
पडवणे-पाल्ये – वाडा गावाकडून विजयदुर्गाच्या दिशेने जाताना डावीकडे एक फाटा खुणावतो. काही किलोमीटर वाट वाकडी करून जायलाच हवं असं हे ठिकाण. पडवणे-पाल्ये गावाला साथ देणारा सागरतीर. Image
तारामुंबरी – देवगडचा शेजारी असलेला हा छोटासा समुद्रकिनारा. देवगडच्या पवनचक्क्यांचं दृश्य आपल्याला इथं टेकडीमागे दिसतं. Image
नेवरे-काजिरभाटी – गणपतीपुळे ते रत्नागिरी प्रवास आता आरे वारे मार्गे समुद्राच्या सोबतीने होतो. या मार्गावर नेवरे गावापाशी असलेला हा रम्य सागरकिनारा. Image
वेळणेश्वर - समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेलं शंकराचं रूप म्हणजे श्री वेळणेश्वर. अनेक कुटुंबांचे कुलदैवत असणारे हे मंदिर. समुद्र वेड्या पर्यटकांचेही लाडके ठिकाण. #कोकण #म
लेख आणि फोटो साभार - दर्या फिरस्ती Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ओमकार भोसले ✨

ओमकार भोसले ✨ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @omyaa_24

Nov 28
केळशीचा याकूब बाबा दर्गा - कोकणातील एक महत्त्वाचे मुस्लिम पीराचे स्थान म्हणजे केळशीच्या जवळ उटंबर टेकडीवर असलेला याकूतबाबा दर्गा. सिंध मधील हैदराबादहून हे बाबा १६१८ साली बाणकोट बंदराशी बोटीने येऊन पोहोचले असं सांगितलं जाते.
त्यांच्याबरोबरच सोबत सोलीस खान नावाचा एक युवकही आला होता. स्थानिक होडीवाल्याने नदी पार करायला बाबांना नकार दिला तेव्हा दुसऱ्या एका माणसाने बाबांचे होडीभाडे भरले आणि पुढे त्याचा प्रचंड उत्कर्ष झाला अशी आख्यायिका सांगितली जाते.
हा ३८६ वर्षे जुना दर्गा हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्लाह दर्गा या नावाने ओळखला जातो. दरवर्षी ६ डिसेंबरच्या दिवशी इथं उरूस भरतो ज्याला मुस्लिमांबरोबरच हिंदू व इतर धर्मांचे भाविकही येत असतात.
Read 6 tweets
Nov 28
राजवाडीचा सोमेश्वर - कोकणात असंख्य शिवालये आहेत. रामेश्वर, सोमेश्वर, सप्तेश्वर या नावाची शिवमंदिरे अनेक ठिकाणी आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे, आसमंत वेगळा, स्थापत्याचे बारकावे वेगळे. वैशिष्ट्य वेगळे. मुंबई गोवा महामार्गावर आरवली जवळ आपण शास्त्री नदी पार करतो.
तिथं गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथून संगमेश्वराच्या दिशेने निघाले की काही अंतरावर अजून एक ठिकाणी एक प्राचीन भग्न शिवमंदिर आणि गरम पाण्याचे कुंड आहे. तिथून पुढं राजवाडीजवळ डावीकडे वळून सोमेश्वराच्या दिशेने गाडीरस्ता जवळजवळ पाव किलोमीटर आत जातो.
तिथं पायऱ्या उतरून अजून पाव किलोमीटर पुढं गेले की पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेले आणि लाकडी कोरीवकामाने सजलेले सोमेश्वर शिवमंदिर आपल्याला दिसते. वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही.
Read 15 tweets
Nov 27
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वैभव :
सागर किनारे - आचरा , कुणकेश्वर , केळूस , खवणे , गिर्ये , चिवला , तारकर्ली , तोंडवली , देवबाग , निवती , पडवणे , पुरळकोठार , भोगवे , मिठमुंबरी , मुणगे , मोचेमोड , रेडी , वायरीबांध , विजयदुर्ग , वेळागर , शिरोडा , सागरतीर्थ , सागरेश्वर. Image
ऐतिहासिक गड किल्ले - किनारीकोट – निवती , यशवंतगड , राजकोट , सर्जेकोट.

गिरिदुर्ग – पारगड , भगवंतगट , भरतगड , भैरवगड , मनोहरगड व मनसंतोषगड (शिवापूर ), रांगणागड (नारुर), रामगड , वेताळगड , शिवगड., सदानंदगड , सोनगड ,सिद्धगड , हनुमंतगड.
जलदुर्ग – देवगड , पद्मगड , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग (मालवण)

भुईकोट – आवरकिल्ला उर्फ आवडकोट , कुडाळकोट , कोटकामते , बलिपत्तन उर्फ खारेपाटण , नांदोशी गढीकोट , बांदाकोट , वेंगुर्लाकोट (डच वखार), सावंतवाडीकोट.

वनदुर्ग – नारायणगड , महादेवगड.
Read 16 tweets
Jul 14
तवसाळचा विजयगड : शास्त्री नदीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला तर बहुसंख्य कोकणप्रेमींना माहिती आहेच. पण याचा जोड किल्ला सुद्धा आहे. तवसाळ येथे असलेला विजयगड. शास्त्री नदीच्या मुखाच्या उत्तरेला तवसाळ किनाऱ्यावर खडा पहारा देणारा हा दुर्ग.
आज मात्र आपण या किल्ल्याचे अवशेषच पाहू शकतो. हे अवशेष सागरी महामार्गावरच आहेत पण पटकन दिसत नाहीत. जयगड ते तवसाळ फेरी पकडून आपण गुहागरच्या दिशेने सहज जाऊ शकतो. तवसाळ जेट्टीहून निघाले की डाव्या बाजूला तवसाळचा समुद्र किनारा आहे.
हा टप्पा पार झाला की चढण येते आणि ही नागमोडी चढण संपताना रस्ता जिथं उजवीकडे वळतो त्याच ठिकाणी डाव्या बाजूला झाडीत आपल्याला चिरेबंदी बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. हाच विजयगड.या ठिकाणी घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा काही तपशील उपलब्ध नाही.
Read 6 tweets
Jul 2
शिस्टूरा हिरण्यकेशी ( देवाचा मासा )

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये "शिस्टुरा हिरण्यकेशी" (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
यासंबंधीची अधिसूचना महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली.शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे सुपुत्र तेजस ठाकरे व शंकर बालसुब्रमण्यम यांनी लावला आहे. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे ,
अशी मागणी होती.यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता आबोली येथील शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली ,
Read 8 tweets
Jul 1
जय गणेश मंदिर , मेढा , मालवण : कालनिर्णय दिनदर्शिकेचे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी शास्त्रोक्त पद्घतीने बांधलेले हे मंदिर. अतिशय स्वच्छ, सुंदर निसर्गमय व मन प्रसन्न करणारा परिसर व त्यात आपले लाडके बाप्पा.शुद्ध सोन्याची गणेश मुर्ती सुवर्ण चौरंगावर विराजमान आहे.
गणेशाच्या दोन्ही बाजूस ऋद्धि-सिध्दी आणि मूषक असे हे दर्शन घेतल्यावर "जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ती" चा अनुभव येतो. सभामंडपाच्या गाभाऱ्यात घुमटावर आतल्या बाजूने गणेशाच्या आठ मुर्ती कोरलेल्या आहेत.
मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. सिद्धी च्या हातात ढोल व तलवार आहे आणि ऋद्धि च्या पेन व पेपर.मकर संक्रांतीवेळी सूर्याची कोवळी किरणे थेट गणेशाच्या मूर्तीवर पडतात ,
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(