वैदिक काळापासूनच भगवान विष्णूंना संपूर्ण विश्वाची सर्वोच्च शक्ती मानले जात आले आहे. सृष्टीचे पालनहार भगवान विष्णू चतुर्हस्त असून एका हातामध्ये पद्म, म्हणजे कमल, एका हातामध्ये कौमोदकी (गदा), एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलेले असते.
भगवान विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले, याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते. कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता, माणिकर्णिका घाटावर स्नान करून भगवान शिवाला एक हजार सुवर्णकमले अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला.
अभिषेक झाल्यानंतर जेव्हा विष्णूंनी पूजेला आरंभ केला, तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी शिवांनी हजार कमलपुष्पांपैकी एक पुष्प कमी केले. विष्णुंना एक कमलपुष्प पमी पडत असल्याचे लक्षात आले, पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा होता..
त्या एका कमलाच्या ऐवजी भगवान विष्णू आपला डोळा त्यागण्यासाठी तयार झाले. विष्णूंचे डोळे कमलाप्रमाणे असून, त्यासाठीच त्यांना पुंडरीकाक्ष, कमलनयन म्हटले जाते. त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमळाच्या ऐवजी आपला कमलरूपी डोळा देण्यास विष्णू तयार झाले.
या भक्तीने प्रसन्न होऊन शिव विष्णूंच्या समोर अवतरले आणि भगवान विष्णूंनी ही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरून, ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळ्खला जाईल असा आशिर्वाद दिला. या दिवशी जो कोणी भक्तिभावाने शिवाचे पूजन करेल, त्याला मोक्ष प्राप्ती होईल असा ही आशिर्वाद शिवांनी दिला
विष्णुंची अपार भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवांनी त्यांना सुदर्शन चक्र दिले, आणि जगातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची ताकद या चक्रामध्ये असेल असा आशिर्वादही दिला. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी ही कथा आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आपल्या पुराणांमध्ये अश्वत्थामा, दैत्यराज बलि, वेद व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कण्डेय ऋषि ह्यांना चिरंजीव मानले गेले आहे.
कौरव पांडवांचे गुरु असणाऱ्या ऋषी द्रोणाचार्य ह्यांचा पुत्र अश्वत्थामा ह्याला चिरंजीवत्व म्हणजे वर नसून शाप मिळाला आहे.
द्वापार युगात कुरुक्षेत्रावर झालेल्या महाभारत युद्धानंतर कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा हा अजूनही जिवंत आहे असे म्हणतात. हे सिद्ध करायला कुठलाही पुरावा नाही.आपल्या गाठीशी तेवढे पुण्य असेल तर तो आपल्याला दिसतो अशी लोकांची श्रद्धा आहे.
बुरहानपुरच्या शिवमंदिरात आजही रोज ताजी फुले देवाला वाहिलेली सापडतात.
मध्यप्रदेशातील बुरहानपुरच्या जवळ असीरगढ येथे एक किल्ला आहे. त्या किल्ल्यात एक शिवचे मंदिर आहे. त्या मंदिरात जाणे अतिशय कठीण आहे तरीही तिथे रोज ताजी फुले वाहिलेली असतात असे म्हणतात.
@MeNarayanRane
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
विरोधक वेदांताबद्दल बोलतात पण,
आमचे आशिष शेलार कवी आहेत. बोलता बोलता ते म्हणाले, चाफा बोलेना, चाफा उगवेना. पण असाही चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि वास येत नाही.
असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे. बाकी कुठं नाही. त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली. महाराष्ट्र कसा सहन करत होता, मला कळतं नाही, असा टोला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मला त्यांनी उत्तर द्यावं. अडीच वर्षात कोणती योजना राबविली. गरिबांचं दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी काय केलं.
मुंबईत निरक्षरतेचं प्रमाण 18 टक्के आहे. दारिद्रे रेषेखालचं प्रमाण 31 टक्के आहे. दरडोई उत्पन्न दोन लाख 84 आहे. गोव्याचं दरडोई उत्पन्न पाच लाखांच्या जवळ आहे. उत्तरेकडच्या एका राज्याचं साडेचार लाख आहे. काही राज्यांचं साडेतीन लाख आहे. आपलं दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी यांनी काय केलं,
काळीमिरीची मसाल्याच्या पिकांचा राजा म्हणून ओळखलं आहे. भारतीय मसाल्यांची चव जगभर प्रसिद्ध आहे. अनेक औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या मसाल्यांमध्ये आपण रोज काळीमिरी वापरतो. यामुळे जेवणाची चव तर दुप्पट होतेच, पण त्यात असलेले अद्भुत गुणधर्मही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात
काळीमिरीची लागवड झुडूपच्या स्वरूपात विकसित केली जाते. काळीमिरीच्या लागवडीची खास गोष्ट म्हणजे, कोणतेही कष्ट न करता तिचे उत्पादन खूप चांगले मिळते. योग्य पद्धतीने लागवड केल्यास काळी मिरीचे उत्पादन खूप चांगले मिळते. नुकसानीचे मार्जिन नगण्य राहते.
जेव्हा काळी मिरी फोडली जाते तेव्हा त्यात 65 ते 70 टक्के पाणी असते. आणि कोरडे झाल्यानंतर ते 10 टक्के राहते. वाळवताना फेनोलेस एन्झाइम्सचा वापर केल्याने काळी मिरी वातावरणातील ऑक्सिजनद्वारे एन्झाइम्स आणि फेनोलिक संयुगे यांच्या ऑक्सिडेशनमुळे काळी पडते. सूर्यप्रकाशात वाळवले जात होते.
देशात काळाच्या ओघात शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधव पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी बांधव आता मागणी मध्ये असलेल्या नगदी पिकांची लागवड करण्याकडे जास्त लक्ष देत आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांना अल्प कालावधीत अधिक नफा देखील मिळत आहे. असे अनेक झाडे आहेत ज्याची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न पदरात घेऊ शकता. या झाडांपैकी एक आहे साग याची लागवड करून शेतकरी बांधव अल्पकालावधीत करोडपती बनू शकता...
सागवान लागवड केल्यानंतर लगेच नफा प्राप्त होऊ शकत नाही, म्हणजे सागाचे झाड पूर्ण विकसित होण्यासाठी थोडा कालावधी लागतो. साग पासून लाकूड प्राप्त करण्यासाठी सुमारे 12 वर्षाचा कालावधी लागतो.लागवड केल्यानंतर नफा मिळणार नाही मात्र बारा वर्षानंतर बारा वर्षांची कसर भरून निघेल एवढ नक्की
बांबू लागवडीतून एटीएम कार्ड तयार करा
1)बांबू लागवड करून बसून गावाकडे पेन्शन तयार करा.
2)बांबू लागवड या पुढे शेती म्हणून उपक्रम राबवा .सह्याद्री कडची जमीन बांबू लागवडीसाठी पोषक आहे.
3 ) दरवर्षी 50,100,असे एकूण 1000 ते 1500 ते तीन ते चार हजार बांबू पाच ते दहा वर्षात वर्षात लागवड करायचे टार्गेट ठेवा.
4 )शक्यतो एक वर्ष झालेल्या बांबू,लावा.हा चिवा भरीव असतो.त्याच्या बेटीला 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य आहे.पिढयानपिढया उत्पन्न देतो..
5)एकदा बांबू लावून जिवंत राहिला की ,नंतर लक्ष दिले नाही तरी त्याची पाच वर्षात बेट तयार होते.आणि जर का मशागत केली तर जास्त उत्पन्न मिळते.
6 )एकदा बेट तयार झाली की स्वतः तुम्ही त्या माध्यमातून तुमचे एटीएम कार्ड तयार होईल.आणि कधीही पैसे घेऊ शकता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान, वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील “नराचा नारायण” म्हणजेच माणसाचा देव श्री देव जैतिर मंदीर..
श्रीदेव जैतिराच्या समाधीवेळेपासून सध्याची ही आठवी पिढी सुरू आहे. जवळपास १५व्या शतकापासून हे देवस्थान अस्तित्वात आलं असल्याचा अंदाज आहे.
वेंगुर्ले तालुक्यातल्या तुळस या गावी होणारा जैतिरचा उत्सव हा अनोख्या प्रथांनी भरलेला.. काही पिढय़ांपूर्वी तुळस येथील जैते-परब या पराक्रमी वीराची नारूरपासून काही अंतरावर असणा-या रांगणागडाच्या वाटेवर भिल्लांबरोबर लढाई झाली. यात ते प्रचंड जखमी झाले.
नारूर येथे त्यांनी प्राण सोडला. ज्यांच्या निवासस्थानी त्यांनी प्राण सोडला, त्या सुद्रीक नामक परिवाराच्या घरात हा उत्सव रंगतो. या वीराचं पार्थिव तुळस या गावी आणण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्या नावानं तब्बल ११ दिवस तुळसमध्ये जैतिर उत्सव सुरू असतो..