मित्रांनो काल रात्री वाचनात आलेला एक वेड्या माणसावरचा उत्कट लेख शेअर केल्यावाचून राहवले नाही म्हणून पोस्ट करत आहे
"मनोहर गोपालकृष्ण प्रभुपर्रीकर ठार वेडा माणूस"
मनोहर गोपालकृष्ण प्रभुपर्रीकर,स्वतःला "निष्ठावान संघ स्वयंसेवक" म्हणवून घेण्यातच त्यांना गौरव वाटायचा..!
आजच्या काळातील राजकारणी असून सुद्धा आणि तीन-चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा स्वतःच्या दोन्ही मुलांसाठी साधा एक मतदारसंघ बांधू शकला नाही.
ना मुलाला किंवा सुनेला आमदार-खासदार पद तर सोडाच पण साधं नगरसेवक पदही देऊ शकलेला नाहीये हा मनुष्य.
आज भारतातील युवराज,जाणते राजे,निम्म्याअधिक गोवऱ्या मसणात गेलेले नेते,बोलता येत नाहीये की नीट चालता येत नाहीये पण मुलांसाठी,नातवांसाठी,पुतण्यासाठी,पुतण्याच्या मुलांसाठी मतदारसंघात फिर फिर फिरत आहेत..
स्वतःची जागा देऊ करतं असताना
पर्रिकरांचा निस्वार्थीपणा गटात न बसणारा शब्द वाटतो.
आजकालचा शेम्बडा अपक्ष नगरसेवक सुद्धा स्कॉर्पिओ पेक्षा खालच्या दर्जाच्या गाडीवर बुड टेकवण हा आपल्या घराण्याचा अपमान समजतो तिथे पर्रीकरभाऊ मासे घ्यायला फडतूस scooty वर गोवा फिरायचे..शी...कसं दिसतं ते..!!
म्हणे आयआयटीत शिकला...पण काय उपयोग त्याचा..?
केजरीवाल किंवा जयराम रमेश यांच्यासारखं स्वार्थीपणे सत्तेचा उपभोग घेणं जमलं का त्यांना
रात्री officeमध्ये काम पूर्ण करे पर्यंत खुप उशीर झाला म्हणून Secretaryला "उद्या जरा उशिरा आलास तरी चालेल"असं म्हणून सकाळी६:३०वाजता बोलावणं आणि त्याच्या आधी स्वतः सकाळी ५:३० वाजता ऑफिसला पोहोचणं
हे एकविसाव्या शतकातील मुख्यमंत्र्याला शोभत का...?
आता गोव्यासारख्या ठिकाणी Foreign Delegates ना alcohol serve करताना येणारा खर्च , " *दारूचा खर्च सरकारवर नको*" म्हणून protocol असताना सुद्धा सरकारी तिजोरीतून न देता स्वतःच्या खिशातून देणं म्हणजे जरा अतीच झालं.
इथे भ्रष्टाचाराच्या आरोपात कोर्टाने पोलीस कोठडी दिली म्हणून लगेच "कसतरी होतंय" म्हणून लीलावती, जसलोक मध्ये ठिय्या मांडणारे भुजबळ आणि लालू यादव सारखे #चोर आजूबाजूला असताना cancer होऊनही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विधानसभेत येणारे, पुलाच्या कामाची पाहणी करणारे तुम्ही
"अखंड भारतातील पहिलेच राजकारणी आहात".
आणि काय पर्रीकर साहेब तुम्ही असं आम्हाला मध्येच सोडून गेलात...प्रॉपर्टी, बंगले, बँक-बॅलन्स, साखर कारखाना, सूत गिरणी, दूध डेअरी, पुतळे, स्मारके असे मागे काहीचं ठेवलं नाही.
तुमच्या मुलाने किंवा नातवंडांनी आता काय करायाचं...??
तुमच्या या अशा निष्ठेने वागण्याबद्दल तुमचा जाहीर निषेध..!!!
सवय नव्हती अहो आम्हाला एवढ्या प्रमाणिकपणाची. कारण राजकारणात राहून सुद्धा "लालबहादूर शास्त्री" होऊ शकतो हे फक्त पुस्तकात वाचलं होतं.तुमच्याबद्दल कळायला लागलं तेंव्हा वाटलं सगळेच बरबटलेले असताना असं एकट्या-दुकट्याच स्वच्छ
आणि स्वयं'सेवक' म्हणून वागणं किती दिवस टिकणार आहे.
पण तुमची निष्ठा एवढी तगडी होती की साधा हाफ शर्ट आणि चप्पल घालून तुम्ही मॉडर्न गोवा ते सर्जिकल स्ट्राईक सारं काही घडवून आणलं. आणि तेंव्हा आमची खरं तर प्रभु मजि गमला अशीच भावना होती.
पण खरं तर तुमच्यासारखी काही माणसं आपल्या देशात आहेत आणि त्यांच्याच जीवावर हा देश चालतो आहे हे अंमळ उशीराच कळलं.
बहुतेक तुमच्या सारखी माणसं देवाला त्याच्या दरबारात "जग चालवण्यासाठी" हवी असावीत म्हणूनच cancer सारखं कारणं देऊन त्याने तुम्हाला बोलावुन घेतलं.
सर,एक आदर्श म्हणून तुमची कमी नेहमीच जाणवेल आणि म्हणूनचं तुमच्या सारखा "मूल्यांवरती जगण्याचा" प्रयत्नही नक्कीचं करू.
साधेपणाने राहून प्रामाणिकपणे आयुष्यात खुप काही करता येतं हे शिकवल्याबद्दल आम्ही आपले आजन्म कृतज्ञ राहू.
जयहिंद
राष्ट्रहितसर्वोपरि
(हर्षद देसाई यांची फेसबुक पोस्ट)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
श्री.सुरेश रोकडे,मुंबई यांच्या
व्हाट्सएप पोस्ट वरुन साभार !
सहलीसाठी लडाखला गेलेल्या कुटुंबाबरोबर एक स्थानिक ड्रायव्हर जिग्मेट नावाचा २८ वर्षांचा तरुण होता.
जिग्मेटच्या कुटुंबात त्याचे पालक,पत्नी
आणि दोन लहान मुली आहेत.
जिग्मेटने त्यांच्या हिमालयीन प्रांताच्या खोल प्रवासादरम्यान पुढील संभाषण प्रवाश्या बरोबर केले!
प्रवाशी -: या आठवड्याच्या शेवटी लडाखमधील पर्यटन हंगाम संपेल. हॉटेल्समधील नेपाळी कामगार ज्याप्रकारे गोव्याला जातात त्याप्रमाणे तू देखील जाण्याचा विचार करीत आहेस काय?*
जिग्मेट -: नाही, मी स्थानिक लडाखी आहे,म्हणून हिवाळ्यात मी कुठेही जात नाही!
प्रवाशी -: हिवाळ्यात तुम्ही काय काम कराल?
जिग्मेट -: काहीही नाही, घरी शांतपणे बसणार नाही
प्रवाशी -: पुढच्या एप्रिल पर्यंत सहा महिन्यांसाठी?
"गीता आणि ज्ञानेश्वरी"
एक सुंदर संवाद
"गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?"
सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.
"विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल."
सखीने उदार मनाने मला सवलत दिली.
मी म्हणाले, "गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे.
निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने,
अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात
आणि मनाला अधिक तृप्तता येते.
ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. "
सखी: "उदाहरण दे."
हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून,
मनात ठेवून मी म्हटले," भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?"
सखी: "कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो."
मी: "बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे
"डॉ रघुनाथ माशेलकर आधुनिक विज्ञान ऋषी"
अमिताभ बच्चन ८० वर्षांचा झाला तरी काम करतो म्हणून बातमी होते
मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात.
रेखाच्या उतारवयात उम्फ फॅक्टर जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.
आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलिकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात
हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डाॅ रघुनाथ माशेलकर.
१ जानेवारी २०२३ रोजी ते ८१ वर्षाचे झाले.
शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीला संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे आले, तर बारावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून
के.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर!'
पंतप्रधान मोदी एखाद्या नेत्याला आलिंगन देताना तुम्ही पाहिले आहे काय?.. क्वचित कधीतरीच असं दृश्य बघायला मिळतं.. मोदी अशी जवळीक कुणाशी साधत नाहीत वा कुणाला साधू देत नाहीत.. मात्र याला एका नावाचा अपवाद आहे.. 'के. अण्णामलाई!'
हा माणूस जेव्हा जेव्हा मोदींच्या समोर येतो तेव्हा ते त्याचं स्वागत आलिंगन देऊन करतात..काय कारण असेल याचं?
मुळात हा 'अण्णा'आहे तरी कोण?
के.अण्णामलाई..वय 38.भाजप तामिळनाडूचा अध्यक्ष!पण ही ओळख पुरेशी नाही किंबहुना इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अधिक महत्वाचा आणि रोमहर्षक आहे..
'अण्णा'चा जन्म 'करूर' या अती छोट्या खेड्यातला.आई-वडील गरीब शेतकरी. मुलानं 'कॉलेजचं शिक्षण' घ्यावं ही त्यांची मनीषा!अण्णा हा,'कॉलेज'मध्ये जाणारा करूरचा पहिलावहिला मुलगा!त्यानं कोईमतूरला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.पण 'मोठं पॅकेज' मिळवण्यासाठी आणखी शिकणं आवश्यक होतं.
रामराव इहलोक सोडून गेले . त्यांच्या जाण्याला एक दोन महिने होत नाहीत तोच घरात वाद सुरु झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मिळकत कशी वाटून घ्यायची?या भावांच्या वाटणीत त्यांच्या बहिणीने उडी घेत सध्या असलेल्या कायद्याची जाणीव करून दिली.
१/७
म्हणाली माझाही हक्क हवा,२भावांपैकी कोणीही हेका सोडेना,झालं भांडणे विकोपाला गेली.
या सर्व प्रकारावर त्यांच्या गावातील जेष्ठ मंडळींनी तोडगा काढत हे प्रकरण तेथील एक वयोवृद्ध दत्तभक्त विष्णुबुवा यांचेकडे नेले विष्णुबुवा आले
त्यांनी सर्वाना समक्ष बसवत सर्व मालमत्तेचे अवलोकन
२/७
केले.म्हणाले,तुम्ही२भाऊ आणि१बहीण,बरोबर ? सर्वानी होकारार्थी माना डोलावल्या.विष्णुबुवा पुढे म्हणाले,हे पहा,रामराव फार मोठे दत्तभक्त होते तेव्हा त्यांच्यापासून चालत आलेल्या परंपरा व दत्तभक्ती या गोष्टी देखील या मालमत्तेबरोबर पुढे आल्या पाहिजेत,व या परंपरा मालमत्तेप्रमाणे
३/७