आजचा भाऊंचा व्हिडिओ ऐकल्यावर भाऊंनी सांगितलेली २०१६ ची गोष्ट आठवली. गिरीश कुबेरांनी "असंतांचे संत" लोकसत्तेत अग्रलेख लिहिला होता. त्यात मदर टेरेसा यांच्याविषयी परखड मत लिहिलं होतं. मदर टेरेसा या हिंचेंसला मुलाखत देताना म्हणतात, या वेदना किती सुंदर आहेत आणि त्यातून जग बरेच काही
शिकवते. त्यांना वेदनांच्या प्रदर्शनाचे आकर्षण होते. वेदनांनी तळमळणा-या चेहऱ्यावरून आपण मायेचा हात कसा फिरवतो हे दाखवण्यात टेरेसा आनंद मानत. कुबेर असेही फटकारे मारतात, त्यांनी गंभीर आजार बरे करण्याचे चमत्कार दाखवले म्हणून रोमने त्यांना संतपद बहाल केले या बातांत काही अर्थ नाही.
फक्त गोरी बाई आपल्यात मिसळते, धर्माचा प्रसार करते, चमत्कार करते आणि पश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करणारे काँग्रेस भारतरत्न बहाल करते. असं लिहिणारे कुबेर दुसऱ्या दिवशी हा लेख कोणतही स्पष्टीकरण न देता मागे घेतात. कोणाचा दबाव येतो? कोण मागे घ्यायला लावतो?
अशा वेळी अंधश्रद्धा निर्मुलन वाले झोपलेले असतात का? मग संशयाची सुई ही फोर्ड फाऊंडेशनकडे वळते. हा एवढा प्रचंड पैसा तिस्ता सेतलवाड सारखे खोटे रिपोर्ट बनवणारे रिपोर्टर, एका छोट्या राज्याचा मुख्यमंत्री, अंधश्रध्दा निर्मुलन समितीला पैसे पुरवणे हे सगळे धंदे करायला भाग पाडते का?
अंधश्रद्धा नसावी. जे कोणी बाबा आहेत त्यांना समर्थन मुळीच नाही पण ठराविकरित्या फक्त आणि फक्त हिंदू धर्म हाच आपला नंबर एकचा शत्रू असल्यासारखे अंधश्रद्धा निर्मुलनवाले वागत असतात. गावागावात मिशनरी इतक्या खालच्या पद्धतीने धर्मांतरे करत फिरत आहेत तेव्हा हे लोकं डोळ्यावर झापड लाऊन बसतात
श्याम मानवानी ९० च्या दशकात जी पुस्तक प्रकाशित केली ती सगळी हिंदू धर्माच्या प्रकांडावर आहेत. ज्योतिषशास्त्रपण ते थोतांड मानतात. हेच ज्योतिषशास्त्र पंचांग सांगत, एकदम अचूकरित्या ग्रहण केव्हा आहे सांगत तेव्हा हे मूग गिळून गप्प का बसतात? आमची श्रद्धा आहे आमच्या देवतांवर, आमच्या
धर्मावर त्याला भाबडी म्हणा नाहीतर आणखी काही! तुम्हाला ती अंधश्रद्धा ठरवायचां अधिकार कोणीही दिला नाही. श्याम मानवांनी बाकीच्या धर्मावर आपला अभ्यास जरूर वाढवावा आणि आव्हाने देत फिरावे. अगदी रोमला आव्हान दिलं तरी आमची काही हरकत नाही. #Team_Saffron 🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh