!! स्वराज्याची शिवकालीन जकात वसुली पद्धत व जकातीचे दर तसेच जकात जकात व अर्थव्यवस्था. !!
शिवकाळातील स्वराज्याच्या अर्थ व्यवस्थेचा अभ्यास करताना प्रामुख्याने जकात वसुली, कर वसुली, पेठेचा कारभार, गावचा कारभार यांचा अभ्यास करावा लागतो. स्वराज्यात जास्त करुन माल तयार होत नसे.
तो माल आयात होत असे बंदरावरांवरुन. त्या मुळे बंदरे ताब्यात असणे गरजेचे असायचे. जकात हि दोन प्रकारे वसुल केली जायची. एक बंदरावरील कर वेगळा तो कर हा प्रत्येक व्यापाऱ्यास द्यावा लागे. त्या नंतर माल वाहतूक करत असताना घाट उतरल्यावर जकात वसुल केली जायची. शिवकाळामध्ये कारवार, गोबे,
बेंगुर्ले, मालवण, राजापूर, जैतापूर, खारेपाटण, रत्नागिरी, चिपळूण, हर्णे, दाभोळ, महाड, दंडा-राजपुरी, नागाव, नागोठाणे, चेऊल, पेण, पनवेल, अष्टमी, कारंजा, मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे इत्यादी लहान मोठी बंदरे प्रसिद्ध होती. यातील बहुतांशी बंदरे स्वराज्यात होती तर गोवे, मुंबई, करंजा
, वसई, ठाणे आदी बंदरे, इंग्रज, पोर्तुगीज,डच, यांच्याकडे होती. देशोदेशीचा माल व प्रवासी या सर्व बंदरावरांवर उतरत. स्वाभाविकच ही बंदरे विलक्षण गजबजलेली असायची. व्यापारी, सावकार, सराफ, अडत्ये, तांबोळी, विणकर, तेली, वैद्य, हकीम, जकातवसुलीचे अधिकारी, खलाशी, तारवे बांधणारे व दुरुस्ती
करणारे कामगार, विक्रेते, हमाल, सैनिक, लमाणांचे तांडे, हत्ती, घोडे, उंट, बैल, खेचरे आदींची रेलचेल हि बंदरावर सुरुच असत. या बंदरावरांवर जकात वसुल केली जात हि बंदर जकात असे. व जेव्हा व्यापारी माल घेऊन बैल, उंट, खेचरे, यांच्यावर लादुन घाटामार्गे माल देशावर जात तेव्हा घाट उतरल्यावर
तेथे जकात आकारली जात. तसेच देशातील माल जो निर्यात केला जात तो हि माल याच घाट मार्गे कोकणात बंदरात जात असे तेव्हा ही घाट चढताना जकात आकारली जात असे. जकात हा स्वतंत्र महाल असे त्यावर 'सभासद' नामक अधिकारी असे. एका घोड्यामागे निमा, गाढवामागे तिजाई, खांदडी, मोटलेकरी यांस चौथाई जकात
रखवाली म्हणुन द्यावी लागे.
घाटात देवता असतं त्याला जकात द्यावी लागत असे,जेव्हा महाराजांकडे पश्चिम किनारपट्टी आली तेव्हा महाराजांना व्यापारी ऊत्पन्न मिळु लागले,महाराजांची व्यापारी जहाजे मस्कत,ईराण या प्रदेशात व्यापारासाठी जाऊ लागली,व्यापार व ऊद्योगधंद्यासाठी लहानमोठ्या गावांत पेठा
वसवल्या जात,गावात बारा बलुतेदारांची वस्ती असे तशी अठरा खुम(पगड) लोकांची वस्ती असे.
गावाचे दोन भाग असतं मुंजोरी व मोहतर्फा,मुजोरी म्हणजे शेतकरी,बलुतेदारी वस्ती व मोहतर्फ म्हणजे वाणी आणि व्यापारी लोकांची वस्ती.
गावचा कारभार पाटिल,महाजन,चौगुला हे वतनदार बघत,तर पेठ वसवणारा तो शेट्या
त्याचे काम बाजारभाव ठरवणे व मापं बरोबर आहे की नाही ते तपासणे,त्याचे लेखी काम करणारा तो महाजन,यांना पेठेच्या घडामोडीची माहिती देणारा तो चौधरी,पेठेतील जकातवसुलीची जबाबदारी शेटे-महाजन यांच्यावर असे,जकातीचे दर जास्त नसत,यातील जावळी खोर्यातील जकातीचे दर हे दर बैली भुसाचे व मीठाचे
गोणीस ६ रुके,तर तंबाखु,गडीद यास ६ रुके हि जकात घाटात वसुल केली जाई,घाटातील जकात नाक्यावर जकात वसुली अधिकर्यास घाटपांडे म्हणत,त्याच्या हाताखाली डांगे व पतकी अधिकारी व यांच्यासह मोढवे ,पदकदार,पानसरे असे तीन अधिकारी असतं,स्वराज्यात जरी जास्त माल तयार होत नसला तरी राजापुरी,पंचा व
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती"
करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून
जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...! 6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या
छत्रपती शिवरायांबद्दल अनेकांना माहिती नसलेल्या गोष्टी :
१)जगभरात शिवाजी महाराज जयंती
केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी
रोजी सुमारे ११४ पेक्षा जास्त विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
२)शिवाजी महाराजांचे 'ते' सात घोडे
शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर
नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्र्याहून सुटका अशा मोहिमा मासल्यादाखल देता येतील.
तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..
बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज
वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन
टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.
व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर
काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी
स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या
जीर्ण दगडी वाडे काही झुकले
असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील
संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून
पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल