काही लोक टाटा समूहाच्या कर्जाची तुलना अदानीसमूहा सोबत करुन. टाटा वर कोण का बोलत नाही असा उलट प्रश्न करत आहेत. त्यांच्यासाठी—
टाटा vs अदानी
टाटा - 26 पब्लिक लिस्टेड कंपन्या
स्टील, आयटी, एफएमसीजी, सौर ऊर्जा, ऑटो, पॉवर, प्रवास आणि पर्यटन, दूरसंचार, दागिने इ. #tata#adani
अदानी-७ पब्लिक लिस्टेड कंपन्या
ऊर्जा, अक्षय ऊर्जा, तेल आणि वायू, शेती, विमानतळ, रस्ते. पाणी व्यवस्थापन, संरक्षण आणि एरोस्पेस, सिमेंट, लोह खनिज आणि कोळसा खाण
महसूल-
टाटा-४.५ ट्रिलियन आणि कर भरुन राहिलेले उत्पन्न 819.8 बिलियन रुपये
अदानी-१.३ ट्रिलियन आणि कर भरुन राहिलेले उत्पन्न ५९.३ बिलियन रुपये
अडाणीच्या सगळ्या कंपन्याचा एकत्र महसूल हा टाटाच्या एकट्या टीसीएस च्या ६१% आहे.😂 #tata#adani
टाटा चे ऊद्योग हळू हळू वाढतात पण हमखास वाढतात ही ओळख आहे.
अदानीच्या कंपन्या जितक्या जलद गतीने वाढल्या तेवढा गुंतवणुकदारांचा विश्वास कमी होत गेला. अडाणीचा विकास सरकार मधे कोण बसलंय यावर अवलंबून आहे अस गुंतवणूकदारांना वाटत. अदानी समूहाला “ओव्हरलीवरेजड” म्हंटल जात #tata#adani
कर्ज आणि परतफेडण्याची ताकद आणि वेळ—
टाटा- १२१६ बिलियन
अदानी- ९३६ बिलियन
सध्याच्या कमाईवरून अदानिला १६.४ वर्ष लागतील कर्ज फेडायला पण टाटा समुह त्यांच कर्ज १.५ वर्षात फेडू शकत
टाटाचा कॅश फ्लो जास्त आहे तर अदानी समुह कैश फ्लो कमतरतेमुळे अडचणीत येऊ शकतो #tata#adani
म्यूचूअल फंड गुंतवणूक-
म्यूचूअल फंड हाऊस ची खीप किरकोळ रक्कम अदानी ग्रुप मधे आहे कारण अदानी शेअर्स खूप ओव्हर वैल्यूड आहेत
आणि टाटा ग्रुपच्या १७ कंपन्यात सगळ्या म्यूचूअल फंड हाऊसेस चा “असेट अंडर मैनेजमेंट” मधील ५% पैसा टाटा ग्रुप मधे गुंतवलेला आहे. #tata#adani
चॅरीटी-
अदानी-
गौतम अडाणीनी त्यांच्या वाढदिवशी ₹६०० बिलियन दान केलेलं आणि नंतर अदानी कुटुंबाने ₹१.३ बिलियन जेथे गौतम अदानी आणि कुटुंबाचा समूहात सर्वाधिक हिस्सेदारी आहे. #tata#adani
टाटा- टाटा सन्स ची ६६% हिस्सेदारी टाटा ट्रस्ट ला जाते. टाटा ट्रस्ट अनेक वेगवेगळया चॅरीटी मधे काम करते. टाटा कुटुंबाकडे खूप थोडी हिस्सेदारी आहे. गेली १५० वर्ष टाटा सन्स च २/३ उत्पन्न सामाजिक कार्यासाठी जातो. मागच्या १०० वर्षात टाटा समाजसेवेत एक नंबर ला आहेत. #tata#adani
भारतीय रेल्वे आणि भारतीय सशस्त्र सेनेनंतर सर्वात जास्त तीन क्रमांकावर टाटा समुह रोजगार देतो. ९३५००० लोक टाटा मधे काम करतात. पण अदानी समुह २३००० लोकांना रोजगार देतोय. यापेक्षा जास्त लोक तर टीसीएस च्या पुण्याच्या ऑफिस मधे आहेत. #tata#adani
शेवटचा फरक म्हणजे—
टाटा =उद्योगपती❤️
अदानी = व्यापारी💰
या थ्रेट मधे कोणती माहिती चुकीची असेल तर कमेंट मधे दुरुस्त करावी🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शेत विकून शिकलोय,
कर्ज काढून फीस भरलोय,
दोन चार पगारीने कर्ज तरी फिटू दे
घाई कशाला करते,
घेईन की ग घर!
२५ वर्ष कुटुंब सोडलोय,
जेमतेमीतून वर आलोय,
स्टेशन वरती रात्र काढलोय,
तू फ्लॅट आहे का विचारतेस?
थोडं दमान घे,
तुला शोभेल अस सुंदर, मी घेईल की घर! #म#लगीन#मराठी#हुंडा १/६
बेरोजगारीच्या काळात,
लेऑफ च्या ट्ट्रेण्ड मधे,
टिकलोय माझ्या नोकरीमध्ये,
थोड मला मोठ होऊ दे,
मी घेईल की राव घर.
तू शिकलेली आहेस,
तू समजुतदार आहेस,
तुलाबी तेवडाच पगार,
मलाबी तेवडाच,
मग तू घेतलंय का ग घर?
तरीबी मला घराची अट घालतेस,
तू नसेल घेतल तर असुदे, मी घेईल की घर! #म#मराठी २
माझे बाबा शेतकरी,
तुझे आहेत न ग नोकरदार
तरी भाड्याने राहता म्हणे,
विचार ना ग बाबाला,
२५ विशीत कसे घेतात ग घर?
तुला बी नौकरी,
मलाबी नौकरी,
तुज्याकडे आयफोन,
माझ्याकडे अँड्रॉइड,
मला सेविंग विचारतेस,
सांग न? तू किती रुपय जमवलेस?
दोघे मिळून घेऊ की घर, #म#मराठी ३