दि.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी चंद्रशेखर वेंकटरमण ( C.V.Raman) या भारतीय शास्रज्ञाने प्रकाशाचे विवरण व त्याचा परिणाम याचा शोध लावला.या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये आल्फेड नोबेल ( डायनामाईटचा बादशहा,स्विडन) पुरस्कार मिळाला.त्यांचा शोध ' रामण इफेक्ट' म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यांच्या कार्याची आठवण व प्रेरणा म्हणून भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.भारतातील काही विज्ञान विश्वरत्ने यांनी, भारतास जगातील वैज्ञानिक देशांच्या प्रगतिपुस्तकाच्या पंक्तीत नेऊन ठेवले आहे.१) डॉ हरगोविंद खुराणा२) डॉ सुब्रमन्यम चंद्रशेखर३) डॉ भाभा४)
विक्रम साराभाई५) डॉ जगदिशचंद्र बोस६) डॉ ए.पी.जे अब्दूल कलाम७) डॉ जयंत नारळीकर वरील विश्वरत्नांना भारताचे ७ वैज्ञानिक आश्चर्य म्हटले तरी चालेल ! वरील वैज्ञानिकांनी मानसिक विकासाला मनोविज्ञान व वैचारीक विकासासाठी, विचारांना वैज्ञानिक दृष्टीकोन हवा
आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार.
त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले.
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
सामाजिक भावना हा विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे. ही भावना नेहमी तीन प्रकारांनी प्रकट होते- शब्दांनी, अधूंनी, आणि कृतींनी. काव्य हे या भावनेचे पहिले सुंदर स्वरूप. पण काव्यातील शब्द कितीही सुंदर असले तरी शेवटी ते वाऱ्यावरच विरून जातात. अश्रू हे या भावनेचे दुसरे रमणीय रूप
पण माणसाच्या क्षुब्ध हृदयसागरातून बाहेर येणारे हे मोती शेवटी मातीमोलच ठरतात! डोळ्यांतल्या पाण्याने मनुष्य स्वतःच्या हृदयातली आगसुद्धा शांत करू शकत नाही. मग जगातला वणवा तो काय विझविणार? सभोवतालचे दुःख पाहून व्याकुळ झालेले माणसाचे मन हलके करण्यापलीकडे शब्द
आणि अश्रू यांच्यात सामर्थ्य असत नाही.
या भावनेचे तिसरे स्वरूप स्वरूपच मानवी प्रगतीला उपकारक होऊ शकते. या स्वरूपात ती तोंडाने किंवा डोळ्यांनी बोलत नाही. ती नेहमी हातानेच बोलते. स्वतःचे रक्त शिंपून ती इतरांचे जीवन फुलविते.