इंडस्ट्री 4.0 म्हणजेच औद्योगिक क्रांतीचे नवीन पर्व सुरू झाल्याची चर्चा आपल्याला सर्वत्र ऐकायला मिळते.
अठराव्या शतकापासून औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती याला आपण इंडस्ट्री 1.0 असे म्हणू शकतो.
त्याआधी उत्पादनामध्ये माणसाचा मुख्य स्त्रोत हा शेती होता.
शेतीशिवाय उत्पादनाचे विशेष अशी वेगळी साधने माणसाकडे उपलब्ध नव्हती.
यांत्रिकीकरण झाले नसल्यामुळे जनावरांचा आधार शेती कामासाठी घेतला जायचा.
परंतु अठराव्या शतकामध्ये वाफेच्या इंजिनचा शोध लागला आणि 1760 ते 1830 च्या दरम्यान औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली.
( इंडस्ट्री 1.0 : ब्रिटन )
वाढत्या लोकसंख्येमुळे शेती हे एकमेव उत्पादनाचे साधन उपजिविकेसाठी पुरणार नव्हते सो हळूहळू नवीन कारखाने उदयास येऊ लागले.
पूर्वी या कारखान्यांमध्ये मानसिक परिश्रम खूप लागायचे जसे की कोळशाने भरलेला गाडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हाताने ओढत नेणे त्याचप्रमाणे कारखान्यातील यंत्रे हाताने चालवणे या प्रकारची शारीरिक परिश्रमाची कामे कामगारांना करावी लागत असत.
परंतु वाफेच्या इंजिनच्या शोधामुळे कामगाराचे हे शारीरिक श्रम वाचायला सुरुवात झाली त्याचप्रमाणे उत्पादनाचा वेग वाढला आणि कारखानदारांना नफा मिळत असल्यामुळे कारखान्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागली.
या क्रांतीत हायड्रोलिक मिल्स म्हणजेच गहू प्रोसेसिंग करणाऱ्या मोठ्या चक्क्या हे प्रमुख केंद्र बनले.
त्याचप्रमाणे आयर्न आणि स्टील यासोबत बाकीही खूप कारखाने उदयास आले त्यामुळे ही क्रांती स्टीम इंजिनची क्रांती अशी ओळखली जाते. ( इंडस्ट्री 1.0 )
दुसऱ्या क्रांतीची सुरुवात अमेरिकेत झाली, दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात दुसऱ्या औद्योगिक क्रांतीचे बिगुल वाजले होते. 1870 नंतर रेल्वे अस्तित्वात आली त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या मालाची वाहतूक सोपी झाली आणि त्याचप्रमाणे वेगही खूप वाढला.
राइट बंधू, निकोल टेस्ला यासारखी मंडळी विज्ञान जगतात नवनवीन तंत्रज्ञानाची भर टाकत होते पण खऱ्या अर्थाने इंडस्ट्री 2.0 ची सुरुवात केली ती म्हणजे हेन्री फोर्ड यांनी.
1920 साली आपल्या कारखान्यात असेंबली लाईन चा वापर त्यांनी सुरू केला.
त्यामुळे पूर्वी 12 तासात कारखान्यातून बाहेर पडणारी कार आता 33 व्या मिनिटाला बाहेर पडू लागली.
मास प्रोडक्शनचा पाया याच तंत्रज्ञाने रचला गेला, हळूहळू असेंबली लाईन्सचा आणि मास प्रोडक्शनचा वापर जवळपास सगळ्या कारखान्यांमध्ये होऊ लागला.
अनेक वस्तू मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आल्या.
असेंबली लाईन चा जास्त वापर हा मुख्यत्वे करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुरू झाला आणि ही इंडस्ट्री खूप जोराने वाढू लागली त्यामुळे औद्योगीकरणाचा हे दुसरे पर्व मुख्यत्वे करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे आणि मास प्रोडक्शन पर्व असे मानले जाते.
( इंडस्ट्री 2.0 )
तिसरी क्रांती झाली ती म्हणजे कॉम्प्युटरच्या आगमनामुळे साधारणपणे 1950-60 च्या दशकांमध्ये कॉम्प्युटरच्या वापरामुळे अनेक कामे पटापट होऊ लागली.
उत्पादनाचा फक्त वेगच नाही वाढला तर कामाचा दर्जा ही खूप वाढला.
उत्पादनाच्या अनेक जुन्या पद्धती कालबाह्य होऊ लागल्या.
याचा परिणाम शिक्षण,आरोग्यसेवा, रिटेल, उत्पादन, वितरण, करमणूक,प्रवास अशा सगळ्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात झाला.
त्यामुळे जुन्या नोकऱ्या नष्ट होऊन नवीन नोकऱ्या आणि आधुनिक कारखाने उभे राहायला सुरुवात झाली.
यात मुख्यत्वे करून कॉम्प्युटर्स आणि त्यांचे पार्ट निर्मिती करणारे कारखाने, कॉम्प्युटरचा देखभालीची कारखाने, सेवा पुरवणारे कारखाने, गरजेनुसार सॉफ्टवेअर तयार करून देणाऱ्या कंपन्या आणि स्टार्टअप्स अस्तित्वात आले.
शिवाय टेलीकम्युनिकेशन ऑप्टिकल फायबर इत्यादी तंत्रज्ञानाचा विकास याच काळात झाला. थोडक्यात कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील ही क्रांती होती म्हणून ही तिसरी क्रांती ( इंडस्ट्री 3.0) इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर्स यांची मानली जाते.
आता आपण पाहू इंडस्ट्री 4.0.
सर्वप्रथम 2010 साली जर्मनी येथे चौथ्या क्रांतीच्या आगमनाची चाहूल लागली.
जर्मन फेडरल मिनिस्ट्रीच्या कामगारांनी कमीत कमी श्रमात अधिकाधिक उत्पादन करण्यात येऊ शकेल अशा तंत्रज्ञानाचा शोध सुरू केला होता.
उद्योगांमध्ये क्रांती आणणाऱ्या आणि उद्योगांच्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणाऱ्या अशा तंत्रज्ञानाचा शोध घेत होते.
त्यावेळी आर्टिफिशल इंटेलिजन्स हे अग्रगण्य होते.आर्टिफिशल इंटेलिजन्स हे अग्रगण्य होते.
त्याचप्रमाणे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा, ऑटोनॉमस रोबोट्स, क्लाऊड कम्प्युटिंग, अग्युमेंटेड रियालिटी आणि वर्चुअल रियालिटी, 3D प्रिंटिंग आणि 5g अशा एकूण आठ तंत्रज्ञांनी हा बदल करून आणला जाऊ शकतो याचा त्यांना अंदाज आला होता.
या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये 2010 च्या दशकापासून खूपच वेगाने प्रगती सुरू झाली.
त्यांनी या तंत्रज्ञानाच्या संशोधनात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली 2014 साली इंडस्ट्री 4.0 या कल्पनेने आणखीनच वेग पकडला.
औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या पर्वात यंत्र ही नुसता यंत्र न राहता माणसाच्या बरोबरीने काम करायला लागतील.
खरंतर ती मानवी हस्तक्षेपाशिवाय ही काम करायला लागतील.
कारखान्यांना ऑटोमेट करण्यासाठी किंवा पूर्णपणे डिजिटल करण्याकडे या सर्वांचा कल असेल.
ही सगळंही तंत्रज्ञान जवळपास पूर्णपणे स्वयंचलित असतील, ती एकमेकांशी संवाद साधत स्वतःच निर्णय घेतील, ती स्वतःच माहिती गोळा करतील आणि विश्लेषण ही स्वतःच करतील.
तर मित्रांनो आपण काही दिवसापासून चाटजीपीटी वापर करत आहोत,यातून तुम्हाला अंदाज आलाच असेल की थोड्याफार प्रमाणात का होईना म्यानुअली करण्यात येणारे काही प्रकारचे काम ऑटोमेटेड होऊ शकते आणि इंडस्ट्री 4.0 व्यापक प्रमाणात येणाऱ्या काळात आणखीन नवनवीन तंत्रज्ञानाचे अविष्कार आणू शकते.
जर हा थ्रेड हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
अशाच आणखीन थ्रेडस साठी @RohanMagdum7
या ट्विटर हँडल ला follow करा.
धन्यवाद…!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
असेंबली लाईन चा जास्त वापर हा मुख्यत्वे करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुरू झाला आणि ही इंडस्ट्री खूप जोराने वाढू लागली त्यामुळे औद्योगीकरणाचा हे दुसरे पर्व मुख्यत्वे करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे आणि मास प्रोडक्शन पर्व असे मानले जाते.
( इंडस्ट्री 2.0 )
तिसरी क्रांती झाली ती म्हणजे कॉम्प्युटरच्या आगमनामुळे साधारणपणे 1950-60 च्या दशकांमध्ये कॉम्प्युटरच्या वापरामुळे अनेक कामे पटापट होऊ लागली.
उत्पादनाचा फक्त वेगच नाही वाढला तर कामाचा दर्जा ही खूप वाढला.
उत्पादनाच्या अनेक जुन्या पद्धती कालबाह्य होऊ लागल्या.
याचा परिणाम शिक्षण,आरोग्यसेवा, रिटेल, उत्पादन, वितरण, करमणूक,प्रवास अशा सगळ्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात झाला.
त्यामुळे जुन्या नोकऱ्या नष्ट होऊन नवीन नोकऱ्या आणि आधुनिक कारखाने उभे राहायला सुरुवात झाली.
With so many companies using Applicant Tracking Systems (ATS) to filter resumes, it's important to format your resume in a way that will help it get through the system.
Avoid using graphics, images, or unusual fonts that might confuse the system or cause it to reject your resume.
2) Use standard headings for your sections, such as "Experience", "Education", and "Skills". This will make it easier for the ATS to scan and categorize your information.
तर आपण आजच्या थ्रेड मद्ये डेटाबेस म्हणजे काय?
डेटाबेस चे Type कोणते आहे ?
याबद्दल माहिती पाहूया.
Thread 🧵
आपण वेगवेगळ्या फाईल्स शोधून काढण्यासाठी त्या फाइल्स योग्य पद्धतीने मांडतो.
तेव्हा, अशा योग्य पद्धतीने मांडलेल्या फाइल्स मधून आपल्याला अचानक एकाधी फाईलची गरज पडल्यास ती आवश्यक असलेली फाईल लवकर सापडते कारण आपण ती योग्य पद्धतीने मांडलेल असतो.
अगदी त्याच प्रमाणे संगणक मध्ये विविध प्रकारच्या माहितीचे योग्य प्रकारे संकलन आणि जतन करून ठेवण्यासाठी डेटाबेस चा उपयोग केला जातो.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डेटाचे संकलन करणे आणि व्यवस्थापन करणे अवघड काम झाले आहे.