Aniruddha P Profile picture
Mar 24 13 tweets 5 min read
"पापाच्या म्होरं पुण्याई ठरतिया भारी !"

मी अजूनही त्यांचा मतदार नाही पण निस्सीम चाहता आहे. सगळं जग त्यांची चेष्टामस्करी करत असताना, हे काय फक्त सभेला गर्दी जमवतात म्हणत असूनही राजसाहेब ठाकरे आपलं म्हणणं आग्रहाने मांडत राहतात.

Continue.... 1/13 Image
परिणामांची पर्वा न करता. कठीण प्रसंगी त्यांची सोबत करणाऱ्या कार्यकर्त्याचं काळवंडलेलं काळीज लख्ख पुसून काढायची ताकद आहे त्यांच्या शब्दांमध्ये.
आज हेही सिद्ध झालं की त्यांच्या शब्दाला किंमत आहे, अल्टीमेटमला अर्थ आहे. माहिमचं अतिक्रमण हटलंच, सांगलीतलं हटवणं....,
2/13
सुरु असल्याचं दाखवतायंत प्रसारमाध्यमं. इकडे सोशल मीडियावर काही जण म्हणतायंत की ही मॅच फिक्स होती, पण खरं सांगू...

तसं असलंच तरीही काहीही फरक पडत नाही. कारण बारा तास उलटायच्या आत त्याचे रिझल्ट्स दिसलेसुद्धा.

माणसांना आशावादाचा उजेड हवा असतो हो !

3/13
राजकारणाच्या बजबजपुरीत एक देखणं फूल उमलताना बघून माझ्यातला तरुण मराठी पोरगा हरखतो. शक्यतांचं गार वारं सुटतं माझ्या गावात. वास्तवाच्या झळा काही काळ का होईना सुसह्य होतात.

फार भावनिक आहे हे सगळं, अशाने प्रश्न सुटत नसतात, प्रशासन चालवायचं म्हणजे कर्तबगारी लागते -
4/13
भावनिक आवाहनांनी फार फार तर पक्ष चालू शकतो. हे मलाही उमगतंच, पण...

सगळं काही इस्टंटली मिळवू पाहणाऱ्या दुनियेच्या रेट्यापुढे एक माणूस गेली सतरा वर्षं पाय घट्ट रोवून उभा आहे हे कोणी नाकारु शकतं काय ? ते त्यांचा हेका सोडत नाहीत. ही फार कौतुकाची बाब आहे.

5/13
"लाचार होऊन येईल जाईल त्याच्या खांद्यावर हात टाकत नाहीत. वाट्टेल त्याला शेजारी खुर्चीत बसवत नाहीत. लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचं आपण देणं लागतो ही त्यांच्या काळजातली जाणीव कधीही आटलेली दिसत नाही.

"कुणीही करत नाही ते राज ठाकरे नक्की करतात"

6/13
हे समीकरण झालंय गेल्या काही वर्षांतलं. सीएसएमटीवर झुंडीने घुसलेल्या, अमर जवान ज्योतीला लाथाडणाऱ्या औलादींना पहिलं उत्तर या माणसाने दिलं. रस्ता लांबचा असला तरी चालेल, चुकीचा असता नये हा वाजपेयींच्या काळातल्या राजकारणाचा आग्रह यांनी महाराष्ट्रात रुजवायला सुरुवात केली.
7/13
भरल्या ताटावरुन उठले पण तरीही घरातल्या गोष्टी चुकुनही चव्हाट्यावर आणल्या नाहीत.
लहान तोंडी फारच मोठा घास वाटेल कदाचित पुढे बोलणार आहे ते. त्यांनी चुकाही केल्याच. पण कोण चुकत नाही या जगात सांगा? सूर्यवंशी कुळाची राणी असूनही कैकयी चुकली, भगवंत रथाचा सारथी असूनही अर्जुन चुकला,
8/13
सर्वोत्कृष्ट असूनही आपला लाडका तेंडल्या किती वेळा शून्यावर आऊट झाला, दैवदत्त देणगी असूनही लताबाईंचेही सूर कधी ना कधी घडीभरच का होईना पण काकणभर जागचे हललेच असतील ना?
चुकांनतर जे करणं महत्त्वाचं असतं ते या माणसाने पुन्हा पुन्हा न थकता, न थांबता केलं म्हणून हा माणूस मला फार आवडतो
9/
त्यांची ध्येयधोरणं, त्यांचे पॉलिटिकल इंटरेस्ट, त्यांच्या भूमिका, त्यांचे ठोकताळे, त्यांच्या योजना, त्यांचे हितसंबंध या सगळ्याशी या घडीला तरी मला काहीही देणंघेणं नाही, फक्त इतकंच समाधान आहे की..
राज ठाकरे नावाचा एक मोठा माणूस, ज्याला महाराष्ट्राच्या राजकीय महायुद्धात लढताना
10/13
धार लावलेल्या तलवारींइतकंच महादेवाचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे हे उमगलं होतं त्याचे शब्द मी माझ्या कानांनी ऐकलेत, त्याचा चांगुलपणाचा हट्ट मी पाहिला आहे, त्याचा पापात भागीदार न होता, न डगमगता पुण्याईवर विसंबून लढत राहण्याचा आग्रह मी अनुभवला आहे.
म्हणून म्हटलं,
कुणीही कितीही..
11/13
कितीही हिणवा, हसा, चुका काढा, दुर्लक्ष करा, बाजूला ठेवायचा प्रयत्न करा, प्रश्न विचारुन भंडावून सोडा, जुने दाखले देऊन मागे ओढायचा प्रयत्न करा, स्क्रिप्टनुसार बोलतो म्हणा, काहीही करा.
उद्याच्याला काय होईल मलाही ठाऊक नाही पण आज एक नक्की की...
12/13
"पापाच्या म्होरं पुण्याई ठरतिया भारी !"

#कौस्तुभअरुण
© कौस्तुभ अरुण आठल्ये, रत्नागिरी.
२३ मार्च २०२३

13/13

#मनसे #राजठाकरे
@mnsadhikrut @RajThackeray @avinash_mns @MNSAmeyaKhopkar @1nitinsardesai @MeGajananKale @TUSHARKHARE14 @mnsreport9 @SandeepDadarMNS

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Aniruddha P

Aniruddha P Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(