Sanatani SDeshmukh Profile picture
Mar 28 32 tweets 5 min read Twitter logo Read on Twitter
कॉंग्रेसचे नेते सावरकरांच्या मागे एवढे हात धुऊन का लागलेले असतात? सर्वसामान्य नागरिकांना पडलेला हा प्रश्न असतो. सावरकर तर हयात नाहीत, ते ज्या हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते, त्या हिंदुमहासभेची राजकीय शक्ती नगण्य आहे.
#वीर_सावरकर
तरीसुद्धा सावरकरांविषयी अनुदार उद्गार काढण्याचे राहुल गांधी आणि त्यांचे साथीदार काही सोडत नाहीत. ‘माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे,’ असे राहुल गांधी म्हणतात. असे म्हणणारे राहुल गांधी एक तर महामूर्ख असले पाहिजेत किंवा खूप धोरणी असले पाहिजेत.
सावरकरांविषयी अनुदार उद्गार काढून मतदानाच्या टक्केवारीत काहीही वाढ होत नाही, हे राहुल गांधी यांना समजत नाही,असे समजण्याचे कारण नाही.
‘‘मी राहुल सावरकर नाही,मी राहुल गांधी आहे.’’ हे वाक्य दोन भारताचे दर्शन घडवते. एक भारत नेहरू-गांधींचा भारत आहे आणि दुसरा भारत सावरकरांचा भारत आहे.
नेहरू-गांधी ही विचारधारा आहे, सावरकर हीदेखील विचारधारा आहे. हा संघर्ष नेहरू-गांधी आणि सावरकर या तीन व्यक्तींतील नसून तो विचारधारेतील संघर्ष आहे.
त्याचे नेमके स्वरूप काय आहे, हे समजल्याशिवाय कधी राहुल गांधी, कधी कपिल सिब्बल, कधी मणिशंकर अय्यर, तर कधी अन्य कॉंग्रेसचे नेते सावरकरांचा एवढा द्वेष का करतात, हे समजणार नाही.
नेहरू-गांधी विचारधारेचे मानणे असे आहे की, भारत नावाचा देश 1947 साली अस्तित्वात आला. हा नवीन देश उदारमतवादी असला पाहिजे. येथे सर्व धर्माच्या लोकांना समान स्थान दिले पाहिजे. हा देश हिंदूंचा नाही, तर या देशात राहणार्‍या हिंदू , मुसलमान, ख्रिश्चन आदी सर्वांचा देश आहे.
या देशाची संस्कृती हिंदू संस्कृती नसून संमिश्र संस्कृती आहे. या देशाचे आदर्श अकबर, टिपू सुलतान यांच्याबरोबर शिवाजी, राणाप्रताप हेदेखील आहेत. मुसलमानी आक्रमक या देशात लुटीसाठी आले, शेवटी ते देशात राहिले, त्यांनी देश आपला मानला म्हणून आपणही त्यांना आपले मानले पाहिजे.
सावरकांचे म्हणणे याच्या उलटे आहे. हा देश अतिशय प्राचीन आहे. त्याची निर्मिती 1947 साली झाली नाही. हिंदू समाज राष्ट्रीय समाज आहे. हा देश हिंदूंचा आहे. म्हणून हे हिंदुराष्ट्र आहे. त्याची थोर प्राचीन परंपरा आणि संस्कृती आहे.
या मूळ संस्कृतीशी अन्य धर्मीयांनी जुळवून घ्यायला पाहिजे, स्वत:चे वेगळे अस्तित्व जपता कामा नये, या वेगळ्या अस्तित्वाच्या आधारे फुटीरतेच्या मागण्या करता कामा नयेत, यासाठी हिंदू समाजाने संघटित झाले पाहिजे.
हिंदू समाजाच्या संघटनेचा आधार आपली मातृभूमी असली पाहिजे. सिंधू नदीपासून ते दक्षिण सागरतीरापर्यंतची ही भूमी आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे. आणि ती प्राचीन काळापासून आहे. या दोन्ही विचारधारा एकमेकांना छेद देणार्‍या आहेत.
नेहरू-गांधी विचारधारेचे नेतृत्व महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. या विचारधारेत अंतर्गत असंख्य दोष आहेत, विसंगती आहेत, त्यामुळे त्याचे परिणाम देशावर फार घातक झालेले आहेत.
आपले राष्ट्रीयत्व कशात आहे, हेच नीट न समजल्यामुळे फुटीरतेची मागणी करणार्‍या मुस्लिम लीगला कोरा चेक देऊन सामावून घेण्याचा प्रयत्न झाला. ऐकायला गोड वाटणार्‍या भाषेत महात्मा गांधीजी म्हणत असत की, हिंदू मोठे भाऊ आहेत, मुसलमान लहान भाऊ आहेत.
मोठ्या भावाने उदारमनाने त्याच्या काही मागण्या मान्य केल्या पाहिजेत. हा लहान भाऊ गळा कापायला हातात सुरा घेऊन उभा आहे, हे महात्मा गांधीजींनी कधी पाहिलेच नाही.नेहरूंना ते दिसले नाही. 1947 साली लहान भावाने भारतमातेचाच गळा कापला.हा गांधी-नेहरू विचारधारेचा सर्वात मोठा दारुण पराभव आहे.
देशाचा गळा कापला जाणार, याची भविष्यवाणी सावरकरांनी केली होती. 1936 साली सिंध प्रांताला मुंबईपासून वेगळे करण्यात आले. त्याचे कारण सिंध प्रांत मुस्लिमबहुल करायचा होता आणि तो पाकिस्तानला नंतर जोडायचा होता. गांधींना ते समजले नाही, नेहरूंना समजण्याचा प्रश्न नव्हता.
1940 साली लाहोरला पाकिस्तानचा ठराव झाला. नेहरू म्हणाले, पाकिस्तानची मागणी अतिशय मूर्खपणाची आहे. 1947 साली इतिहासाने नेहरूंना महामूर्ख ठरविले. गांधी म्हणाले, ‘‘अगोदर माझ्या देहाचे दोन तुकडे होतील आणि नंतर देशाची फाळणी होईल.’’
देशाची फाळणी झाली आणि आठ-दहा लाख हिंदूंच्या देहाचे तुकडे झाले. गांधी-नेहरू विचारांचा हा आणखी एक दारुण पराभव.
पंडित नेहरू यांनी तिबेटचे उदक चीनच्या हातावर सोडले. चीनशी पंचशीलाचा करार केला. हे पंचशील भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहे
नेहरूंनी तो शब्द घेतला. सावरकर तेव्हा म्हणाले की, तिबेट गिळंकृत केल्यानंतर भारताची भूमी हडप करण्याची चीनची भूक वाढेल. भविष्यात भारताच्या भूमीवर चीनने आक्रमण केल्यास त्याचे आश्चर्य वाटू नये. सावरकरांची ही भविष्यवाणी 1954 ची आहे.
1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले. नेहरूंच्या उदारमतवादाचे, शांततेच्या तत्त्वज्ञानाचे थडगे बांधले. वाईट गोष्ट एवढीच झाली की, त्यात हजारो भारतीय सैनिक ठार झाले. नेहरूवादाचा हा आणखी एक दारुण पराभव आहे.
आसाममध्ये 1930 सालापासूनच बांगला मुसलमानांची घुसखोरी सुरू झाली. आज आसामच्या लोकसंख्येत जवळजवळ 30 टक्के मुसलमान आहेत. इतिहासाचा सिद्धांत असा आहे की, भारताच्या ज्या प्रदेशात मुसलमान बहुसंख्य होतात तो प्रदेश भारतात राहात नाही.
अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तानचा बहुतेक भाग याचे उदाहरण आहे. सावरकरांनी त्याविरुद्धही इशारा दिलेला होता. ही अशीच घुसखोरी चालू राहिल्यास आसामच्या संस्कृतीला धोका निर्माण होईल आणि उत्तरपूर्व अशांत होईल. आज त्याचा अनुभव आपण घेत आहोत.
नेहरू तेव्हा म्हणाले, ‘‘निसर्गाला पोकळी मंजूर नसते.जेथे मोकळी जमीन भरपूर आहे, तेथे दुसर्‍या भागातून लोक येणारच.’’ ही होती नेहरूंची देशाकडे बघण्याची दृष्टी. आजचा धगधगता पूर्वांचल हे नेहरू विचारांचे स्मारक आहे. इतिहास प्रत्येक ठिकाणी सावरकरांना द्रष्टा म्हणून शाबित करीत चाललेला आहे
आणि इतिहास प्रत्येक ठिकाणी गांधी-नेहरू यांना अपयशी आणि अपराधी ठरवीत चाललेला आहे. कॉंग्रेस चालवायची असेल, तर हा इतिहास चालवून चालणार नाही. त्यामुळे सावरकरांची बदनामी, हे कॉंग्रेसच्या दृष्टीने अस्तित्वरक्षणाचे टॉनिक झालेले आहे.
नेहरू-गांधी घराण्याचे वारशांना टिकविण्यासाठी सावरकरांना शिव्या देणे बंधनकारक झालेले आहे. त्यांचे पाय चाटण्याचे राजकारण करणारे राजकारणी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून बोलत राहणार. तो त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. सावरकरांची बदनामी झाली की, अनेक जण भावनिक होतात.
त्यांच्या भावनेला धक्का पोहोचतो. हे स्वाभाविक आहे. मग त्यांना सावरकरांचा त्याग, अंदमानातील 13 वर्षे, कुटुंबाची झालेली वाताहत असे सर्वकाही आठवू लागते. प्रश्न भावनिक बनण्याचा नाही, प्रश्न वैचारिक संघर्षाचा आहे.
वैचारिक संघर्षात डोकं थंड ठेवावं लागतं. प्रतिपक्षाच्या भात्यातील बाण निष्प्रभ करावे लागतात.त्यांचे अपयश खूप मोठे करून लोकांपुढे मांडावे लागते. ते काम आपण करीत राहिले पाहिजे. ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ ही नरेंद्र मोदी यांनी दिलेली घोषणा आहे..
राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेस राहिली पाहिजे, पण विचारधारा म्हणून कॉंग्रेस संपली पाहिजे. नेहरू यांच्या विचारधारेतून कॉंग्रेसला मुक्ती दिली पाहिजे. कॉंग्रेस ही राष्ट्रीय झाली पाहिजे.
तिला राष्ट्रीय व्हायचे असेल, तर स्वा. सावरकरांचा विचार तिला समजून घ्यावा लागेल आणि पचवून घ्यावा लागेल. तेवढे साामर्थ्य हिंदू जनतेने निर्माण केले पाहिजे.
सावरकरांचा विचार मांडताना सावरकर अभ्यासक उदय माहुलकर यांनी फार सुंदर वाक्य लिहिले आहे- ‘सावरकर हे राष्ट्रीय सुरक्षेचे राष्ट्रपिता आहेत!’
पाकिस्तानला निर्माण करून नेहरू कॉंग्रेसने एक शत्रू आपल्या दाराशी आणून उभा केला. त्याचे वार आपण गेली 70 वर्षे झेलत आहोत. राहुल गांधी आपल्या पणजोबांची परंपरा पुढे नेत आहेत. त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्यात काही अर्थ नाही.
त्यांची वैचारिक दिवाळखोरी जबरदस्तपणे सतत मांडत राहिली पाहिजे, हे काम चार-दोन लेखकांनी करून चालणार नाही, तर वाचक म्हणून माझी काय जबाबदारी आहे, हे समजून घेतले पाहिजे आणि निर्भय होऊन या वैचारिक लढ्यात उतरले पाहिजे.
राहुल गांधी चढ्या आवाजात म्हणतात की, ‘‘मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. खरं बोलल्याबद्दल मला माफी मागायला सांगतात, मेलो तरी माफी मागणार नाही.’’
राहुल गांधी यांनी मरू नये. जिवंत राहावे. चांगले शंभर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभावे. कारण नियतीची इच्छा अशी आहे की, त्यांनीच आपल्या हाताने नेहरू विचारांचे थडगे बांधावे. त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य आवश्यक आहे...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Sanatani SDeshmukh

Sanatani SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Mar 27
राहुल गांधी हे जवाहरलाल नेहरूंचे पणतू आहेत ज्यांनी पंचतारांकित हॉटेलप्रमाणे तुरुंगवास भोगला, जो ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या पक्षाचा सदस्य होते आणि ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याला पाठिंबा दिला होता.
#वीर_सावरकर
तसेच त्यांनी पक्ष आणि स्वतंत्र चळवळीत सामील होऊन त्यांच्या संपत्तीचा एक रुपयाही गमावला नाही.

जो भारतात राजासारखा जगला.

ज्यांनी 1947 मध्ये गांधीजींना पाठिंबा नसतानाही पंतप्रधानपदासाठी याचना केली.
पण सावरकरांनी इंग्रजांना नखशिखांत विरोध केला. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास लिहिणारे ते पहिले व्यक्ती आहेत..
Read 10 tweets
Mar 27
Who made the disqualification law? -Parliament

Who ratified it? - Supreme Court

Who tried relaxing this law? - UPA Govt

Who opposed that ordinance?- Rahul Gandhi
Who committed the crime?- Rahul Gandhi

Who filed the complaint? - An individual

Who failed to defend the case? -Rahul's lawyers
So, it is a case where Rahul's legal team failed to defend him in a criminal case filed by an individual in the courts of law & hence Rahul got convicted.
Read 5 tweets
Mar 27
भारत के प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू कि पत्नि
कमला नेहरू के मौत की सच्चाई....

टीवी चैनेलो पर सबसे ज्यादा कांग्रेसी कुत्ते भौकते है कि मोदी ने अपनी पत्नी को छोड़ दिया ...

अब इन दोगले कमिने कांग्रेसियो की भयावह सच्चाई जानिये ...
नेहरु की पत्नी कमला नेहरु को टीबी हो गया था ..
उस जमाने में टीबी का दहशत ठीक ऐसा ही था जैसा आज एड्स का है ..क्योकि तब टीबी का इलाज नही था और इन्सान तिल तिल तडप तडपकर पूरी तरह गलकर हड्डी का ढांचा बनकर मरता था ...
और कोई भी टीबी मरीज में पास भी नही जाता था क्योकि टीबी सांस से फैलती थी ...
लोग पहाड़ी इलाके में बने टीबी सेनिटोरियम में भर्ती कर देते थे ...
नेहरु ने अपनी पत्नी को युगोस्लाविया [आज चेक रिपब्लिक] के प्राग शहर में दुसरे इन्सान के साथ सेनिटोरियम में
भर्ती कर दिया ..
Read 10 tweets
Mar 27
इसे कहते हैं नाक का मास्टर स्ट्रोक!
"राहुल बहादुर है, माफी नहीं मांगेगा"

ये कहकर नाक ने राहुल गांधी को 8 साल के लिए राजनीति से बाहर कर दिया अब अपने परिवार की Entry करा देगी
क्या राहुल गाँधी कांग्रेस के अंदरूनी सर्जिकल strike का शिकार हुए हैं?
देखिये राहुल गाँधी एक राजनेता तो कतई नहीं हैं... जोकर है, जबरन उन्हें नेता बना कर लोगों के बीच ले जाया जाता है.. शुरू शुरू में लोग उनसे बहल जाते थे...इसलिए वोट मिल जाते थे....
आज भी ऐसे लाखों लोग हैं, जिन्हे लगता है कि राहुल गाँधी महात्मा गाँधी के पोते हैं..... आपको मज़ाक लग सकता है, लेकिन ऐसे लोग हैं।
Read 11 tweets
Mar 26
1. No appeal has been filed by Rahul Gandhi as yet. He has 30 days from the date of receipt of the certified copy of the order.

2. The Congress Party is not eligible to file an appeal as it is not the aggrieved party.
3. Rahul Gandhi needs to file an appeal against the order of conviction and an application for stay of conviction and regular bail which will enable him pray to the Speaker of the Lok Sabha for revival of his membership.
This needs to be done quickly before the Election Commission initiates action for by-election to fill in the vacant seat of Wayanad.

4. Kirit Panwala the advocate at Gujarat has said that he is working on filing the appeal and applications before the Sessions Court.
Read 4 tweets
Mar 26
स्वा. सावरकरांची दहशत ! कोणाला व किती वाटायची....

दिल्लीचे पालम विमानतळ!
विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ!
विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता.
भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता...
#वीर_सावरकर
त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त होते.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले...
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(