मुलींच्या शाळा सुरळीतपणे चालू लागल्यानंतर ज्योतिरावांच्या नजरेस दुसन्या ज्या अनेक गोष्टी आल्या, त्यापैकी अस्पृश्यांच्या शिक्षण प्रसारास प्राधान्य देऊन त्या गोष्टीकडे लक्ष पुरवायचे असे त्यांनी ठरविले व त्या दिशेने प्रयत्न करावयास त्यांनी सुरुवात केली.
आपल्या देशातील सहा, सात करोड लोक विद्येच्या अभावी हजारो वर्षांपासून आपली माणुसकी गमावून बसले असून, ते धार्मिक गुलागिरीच्या घोर नरकात पडले आहेत आणि - त्यामुळेच हिंद राष्ट्र लुळे बनले असून याचा सारखा हास होत आहे, ही गोष्ट जोतिरावांच्या नजरेस चांगली येऊन चुकली.
या वर्गात विद्येचा प्रसार झाल्याशिवाय त्यांची अस्पृश्यता दूर होणार नाही; आणि विद्येखेरीज ते आपली उन्नती करून घेऊन राष्ट्रातील वरिष्ठ वर्गात तादात्म्य पावणार नाहीत, असे त्यांना नेहमी वाटत असे.
एरव्ही हिंदुस्थानात व हिंदुधर्मांत असलेले अनेक पंथ, जाती व ऊच-नीचत्वाचे थोतांड वाढवून स्पृश्यास्पृश्यतेचे बंड माजविण्यात आले नसते, तर हिंदू तेवढा एक या भावनेने साऱ्या लोकांत एकी व प्रेम -नांदले असते.
आणि मग अशा वेळी हिंदू धर्माकडे व हिंदुस्थानकडे नुसत्या वाकड्या नजरेने पाहण्याची छाती तरी कोणास कधी झाली असती काय? हिंदुधर्मास जर जिवंत ठेवावयाचे व हिंदुराष्ट्रास जर स्वतंत्र करावयाचे तर
देशातील अस्पृश्य समाजात विद्यार्जनाची वाढ ही केलीच पाहिजे; असा त्यांनी पक्का निश्चय केला आणि इ. सन १८५१ साली त्यांनी पुणे मुक्कामी नानांच्या पेठेत एकद्राची अस्पृश्यांची पहिली शाळा घातली ही शाळा घातल्याने पुण्याच्या ब्राह्मणांत फारच खळबळ उडाली 11 स्त्रिया व
देशातील अस्पृश्य समाजात विद्यार्जनाची वाढ ही केलीच पाहिजे; असा त्यांनी पक्का निश्चय केला आणि इ. सन १८५१ साली त्यांनी पुणे मुक्कामी नानांच्या पेठेत एकद्राची अस्पृश्यांची पहिली शाळा घातली ही शाळा घातल्याने पुण्याच्या ब्राह्मणांत फारच खळबळ उडाली 11 स्त्रिया
व अतिशुद्ध हे उभय वर्ग ब्राह्मणांच्या वा मते अपवित्र ! त्यांना विद्या शिकविणे व त्यांनी ती शिकणे हे ब्राह्मणांच्या दृष्टीने अघोर पाप । शूद्रांना विद्या नसावी म्हणून चांगले मोडी अक्षर लिहिणाऱ्या सोनारप्रभू बगैरे जातीच्या लोकांचे पेशवाईच्या रावणी राज्यात हात तोडून टाकण्यात आले होते
आणि त्याच पेशवाईत विद्या शिकविल्याच्या आरोपा- वरून शेकडो शुद्रांच्या गळ्यास गळफांस देऊन फासावर लटकविण्यात आले होते. ज्या पेशवाईत ब्राह्मणांनी एवढी सैतानी सत्ता गाजविली, त्याच पेशवाईचे मढे तिरडीवर चढवून इंग्रजांनी मसणवटीत लावले नाही,
तोच फुल्यासारख्या एका कुणव्या माळ्याने महारमांगाच्या मुलांमुलीकरिता शाळा काढून ब्राह्मणी नीतीचा उघड घड धिःकार करावा हे पुण्यातील पेशव्यांच्या खुद भट्ट भाऊबंदांना कसे पाहवणार? हरप्रकारे विघ्ने आणून ही शाळा बंद पाडावी असे त्यांना वाटू लागले
परंतु ज्योतिराव स्वतः शिक्षकाचे काम करीत होते, त्यामुळे विरोधी ब्रह्मवृंदांचा काहीच उपाय चालेना. तेव्हा हा अधर्म व भ्रष्टाचार होत आहे असा ब्राह्मणांनी डंका पिटून हे धर्मावरचे संकट नाहीसे करण्याकरिता .
त्यांनी धर्माविषयी खरी आस्था बाळगणाऱ्या पण धर्मभोळ्या मराठामाळ्यांना व महारामांगाना जेव्हा चियविले, तेव्हा मात्र ज्योतिरावांना कोण त्रास झाला हे वाचकांना पुढे कळेलच. ज्योतिरावांच्या उपदेशाने जी काही अस्पृश्यांची थोडी मुले शाळेत येत,
त्यांपैकी वरीष्ठ वर्गाच्या धमकीने व त्रासाने बरेच अस्पृश्य लोक आपली मुले पुन्हा शाळेतून काढून घरी बसवीत. ज्योतिरावांनी मोठ्या सायासाने जी मुले आज शाळेत आणावीत तोच उद्या घरी बसत. असा जरी प्रकार होता, तरी ते कधी निराश मात्र झाले नाहीत.
शिक्षण प्रसाराचा उपदेश करण्याची कला ज्योतिरावांना चांगली साधलेली होती. त्यांनी महारवाड्यात व मांगवाड्यात स्वतः फिरून चिकाटीने मेहनत घेतली. त्यामुळे त्यांच्या शाळेत महार मांगांच्या मुलांची संख्या थोडी थोडी वाढू लागली
नंतर शिक्षकांची गरज भासू लागली म्हणून फुलेंनी नाईलाजाने एक ब्राह्मण शिक्षक ठेवला पण इतर ब्राह्मणांनी त्याचे कान भरून त्याला बाजू केले.
त्यामुळे पुन्हा शिक्षकाची कमतरता जाणवू लागली म्हणून फुलेंनी सावित्रीमाईला या मोहिमेवर राबवले.
सावित्रीबाई आता मुलींची आणि या शाळेवर शिकवू लागल्या
फुले एके रात्री विचार करत पडले असता बामनांनी त्यांना मारेकरी पाठवले असता
ज्योतिरावांची गंभीर चेहेरा पाहून मारेकरी अस्वस्थ झाले व जे आपल्याला भट बामन पासून वाचवू पाहत आहे आपण त्यांना मारायला आलो हा विचार करून ते फुलेंना शरण गेले.
आज लोकांत शिक्षणाविषयी गोडी झालेली असून परिस्थितीही बरीच अनुकूल आहे. पण अशाही परिस्थितीत मोठ्या कष्टाने स्थापन झालेल्या बहुतेक संस्था केवळ मदतीच्या अभावी जन्मताच नामशेष होतात आणि त्यांतून एकादी संस्था कशीबशी चाललीच तर चालकास कितीतरी त्रास व कष्ट सहन करावे लागतात.
ही स्थिती लक्षात ठेवून जर त्यावेळच्या प्रतिकूल व विकट परिस्थितीत आणि त्याही अस्पृश्यांच्या शाळांसारख्या संस्था १०-१२ वर्षेपर्यंत अखंड चालू ठेवण्यात ज्योतिरावांना किती कष्ट व सायास पडले असतील आणि त्यांना किती यातायाती सहन कराव्या लागल्या असतील, याचा विचार केला तर
ज्योतिरावांच्या अफाट दिर्घोद्योगाची नुसती कल्पनाही करता येत नाही,आणि ही शाळा चालवितांना त्यांना नुसती आर्थिक अडचणच सोसावी लागलीअसे नसून लोकांकडून होणारा आपला उपहास व अपमानही सहन करावा लागला.
जेथे अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ लोकांस खपत नसे, तेथे ज्योतिरावास या कामी मदत करणार तरी कोण ?
मदत तर राहू द्या, परंतु त्यांच्याशी कोणी प्रेमाचे दोन गोड शब्द देखील फारसे बोलेना. मग त्यांच्या कार्याचा गौरव तरी कोण करणार?
मुलींच्या शाळा चालविण्याच्या वेळी जे थोडे एतद्देशीय बडे लोक ज्योतिबांना मदत करीत होते ते लोकही यावेळी खवळलेल्या भटांच्या सामाजिक बहिष्काराच्या भितीने घरी स्वस्थ होते !
नाही म्हणावयास विद्येचे महत्त्व जाणणाऱ्या इंग्रज अधिकान्यांना मात्र ज्योतिरावांच्या या कार्याचे व चिकाटीचे मोठे कौतुक वाटे.
जातीअंतीच्या चळवळीत फुलेंचा हा सर्वात मोठा पाऊल होता आणि याच पावला वर पाऊल ठेवत पुढे बाबासाहेब अखंड आयुष्य चालत राहिले
आपण ज्यांना पाहिलं नाही त्यावर आपण विश्वास ठेवत नाही बाबासाहेबांनी अशा पुरुषास आपले गुरू मानले.
आणि देशाच्या शेवटच्या व्यक्तीला ज्ञानाचा दरवाजा उघडा केला.
सेनेच्या बंडखोरीपासून ते सेनेच्या नावासकट चिन्ह इतिहास जमा होईपर्यंत सगळ्यांना वाईट वाटलं सगळे भावनिक झाले पण मी एकटा का असेना मला मात्र आनंद झाला आहे.
ज्या माणसाने आमच्या उद्गारकर्त्याच्या मतांसाठी सतत अपमान केला त्याच्या पक्षाबद्दल आणि माणसासाठी का भावनिक व्हावं??
बाळ ठाकरे ची डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समाजा विषयी काही वक्तव्ये.
१) डॉ आंबेडकर हे निजामाचे हस्तक होते.
२) या संविधानने दिलेली लोकशाही मला कधीच मान्य नाही.
३)मराठ्यांनो मराठवाड्याचा महारवाडा करायचा आहे का?
४)आरक्षण व एट्रोसिटी कायदा रद्द झाला पाहिजे.
५) यांच्या घरात नाही पिठ व यांना कशाला हवं विद्यापीठ?
६) बौद्धांनी आमच्या नोकर्या पळवल्या आहेत.
७) नामांतर आंदोलनात आत्मदहन करणारा गौतम वाघमारे हा बेवडा होता.