आज दिनांक १ एप्रिल २०२३
उपक्रम क्रमांक १
जाती अंताच्या चळवळीचा समग्र प्रवास म. फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
तसा जातीभेद खुप अगोदर पासूनच आहे.जातीभेद करु नका माणसा सोबत माणसा सारख वागा, सांगणारे पण होऊन गेले पण हे सगळ होऊन जातीच्या आगीत होरपळन बंद झालच नव्हत.
जातीची नस शिक्षणात आहे हे जोतीबांनी ओळखल होत.म्हणुन त्यांनी शुद्र अतिशुद्रास शिक्षण द्यायला सुरूवात केली.
पिण्यासाठी पाण्याची स्वतःची विहीर उपलब्ध करुन देणे असेल किंवा आंतरजातीय विवाहाच संरक्षण करने असेल त्यासाठी जोतीबांनी नेहमीच प्रयत्न केले.
जातीभेदाच कारण असणाऱ्या भटशाहीवर थेट हल्ला करत होते.
१८७३ ला जोतीबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जातीच श्रेष्ठत्व नष्ट करण्यासाठीच त्यांनी स्थापना केली होती.
आधुनिक भारताच्या इतिहासात जातीअंताची सुरवात केली होती.
नंतर जोतीबाच निधन झालं पण त्यांची ती लढाई सुरुच होती.
नंतर याच लढाईची कमान बाबासाहेबांकडे आली. आणि सुरु झाल ते बाबासाहेब आंबेडकर पर्व, बाबासाहेबांनी सुरवातीच्या काळात जातीअंतासाठी खुप प्रयत्न केले. काळाराम मंदीर प्रवेश असेल किंवा मनुस्मृती दहन असेल. जातीअंतासाठी बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केलेले. आणि ते त्यात यशस्वी झाले.
पण काही काळानंतर बाबासाहेबांना हा विश्वास झाला की इथे जातीची उतरंड आहे.आणि या उतरंडीत प्रत्येक जात आपल्या खालच्या जातीवर अन्याय करते आणि आपण वरच्या जातीचे असल्याचा फायदा घेत असते. म्हणून बाबासाहेबांनी या उतरंडीला लाथाडत सरळ बौद्ध धम्मात प्रवेश घेतला. गुरू शिष्याची तत्वे ही