१. त्याच वेळेत (२०-३० मि चा फरक असेल) नेवून सोडणारी मेल एक्सप्रेस खूपच कमी किमतीत तुम्हाला पोचवते.
२. गोल फिरणारी खुर्ची आणि मोठी खिडकी पेक्षा ₹३५० मध्ये झोपून गावी यायचंय
मोजक्या १% श्रीमंत लोकांसाठी ट्रेन हवी आहे का, १/
👇🏼
सामान्य, SL,३A च्या डब्यात किड्या मुंग्यासारखी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी जे ₹१३००/२३०० तिकीट देऊ शकत नाहीत त्यांना आणखी काही मेल एक्सप्रेस गाड्या हव्यात? १% श्रीमंतासाठी #VandeBharat गाडीने लवकर पोचण्यासाठी ९०% लोकांसाठी असलेल्या मेल गाडीचा मार्ग व्यापणे चांगले?
२/👇🏼
#VandeBharatExpress मुळे कोण आनंदी व्हायला हव? तुम्ही? ज्यांना ₹५०० च्या वरचे तिकीट परवडत नाही पण सामान्य सुविधा हवी आहे आणि ती मिळत नाही. जिथे सामान्य लोकांना बेसिक सुविधा उपलब्ध नसताना. सोन्याची परत लावून झगमगाट दाखवून इवेंट साठी आणलेल्या सुविधा हव्यात का?
३/ 👇🏼
अजूनही देशात ८० कोटी जनता सरकारच्या रेशन वर जगते आहे #VandeBharatTrain वर नाही. तेव्हा विकास म्हणजे काय अस विचारल्यावर #वंदेभारत नाव घेऊन निर्बुद्धपणा करू नये. ८० कोटीमधील लोक सामान्य डब्यात किंवा स्लीपर मध्ये किड्या मुंग्यासारखं प्रवास करणार तेव्हा विकास कुठे हवाय ते ठरवा. ४/ 👇🏼
सोन्याचा लेप लावलेला हा सगळा विकास नावावर होत असेलेला अवाजवी खर्च कर्ज बेहिशेबी कर्ज काढून होत आहे हे लक्षात घ्या. कर्ज काढलेला हा पैसा कुठल्या सोयीसुविधेवर खर्च व्हायला हवा हे जनतेने समजून घ्या. झगमगाट आणि इवेंट म्हणजे विकास समजत असाल तर देव भल करो ह्या देशाच.🙏🏼🙏🏼🙏🏼
ह्या ट्वीट चा हेतू श्रीमंत vs गरीब नाही. मेल एक्सप्रेस गाड्याच्या स्लीपर क्लास, जनरल डब्बा, थ्री एसी यांची स्थिती खूप चिंताजनक होत आहे. किड्यामुंग्यासारखं लोक प्रवास करत आहेत. आणि इथे ९०% जनता प्रवास करते. याकडे अजूनही सरकारने लक्ष दिले नाही.👇🏼
वंदे भारत येवढे पैसे भरण्याची ऐपत होईपर्यंत या ९०% लोकांनी असाच किड्यामुंग्यांसारखा प्रवास करायचा का? रेल्वेच्या वेगाला व रेल्वेच्या गाड्या वाढवण्यावर सध्या मर्यादा येत आहेत हे मान्य आहे. पण वंदे भारत गाडी ने आपण नेमक काय साध्य केल? वेग तेवढाच मग फिरणारी खुर्ची आणि मोठी खिडकी?👇🏼
ह्या गाडीचा जेवढा बोलबाला होत आहे तेव्हा वंदे भारत गाडीने नेमका जनतेचा कोणता मोठा प्रश्न सुटला आहे? काही मोजक्या लोकांसाठी आरामदायक विना कितकिट सुविधा भेटेल. आणि त्यांना भेटावीपण. पैसे देत आहेत ते लोक. पण सरकार जेवढा बोलबाला करत आहे ह्या गाडीचा तेव्हा सरकारच लक्ष इकडच्या 👇🏼
किड्यामुंग्यांवर पण वेधल पाहिजे. तुम्ही वंदे भारत गाडीच येवढ कौतुक करताय पण फक्त मोजकीच जनता ती वापरणार आहे मग बाकी लोकांचं काय जे रोज किड्या मुंग्यांसारख प्रवास करत आहेत. आभासी विकासाच्या दुनियेत असणाऱ्या सरकारला ही परिस्तिथी दाखवलीच पाहिजे. 👇🏼
#VandeBharatExpress यासाठीच काढली का की काही श्रीमंत लोकांना तेवढ हा ☝🏻त्रास होऊ नये. त्यांना या किड्या मुंग्यांपासून दूर ठेवावं जेणेकरुन त्यांना तेवढं मनस्ताप होणार नाही आणि मग ती लोक विकास झाला विकास झाला म्हणून तुमचा प्रचार करतील. म्हणून हा थ्रेड त्या श्रीमंत आणि ह्या गरीब 👇🏼
लोकांसाठी आहे की आपले मूळ प्रश्न अजूनही तसेच आहेत. आभासी विकासाला हुरळून जाऊ नका. वंदे भारत दूरदृष्टी म्हणून आणलेली असेल तर तेवढ्या दूर पर्यंत जाईपर्यंत ह्या लोकांना मात्र असा त्रास सहन करत रहाव लागणार आहे जोपर्यंत हे लोक आर्थिक सक्षम नाही होणार तोपर्यंत. #VandeBharat चे ११ 👇🏼
११ इवेंट पंतप्रधान करत असतील तर एक दोन इवेंट जनरल डबा, स्लीपर क्लास आणि ३ एसी साठी पण करावे ही अपेक्षा. रेल्वे मंत्री जसे लक्जरी क्लास मध्ये जाऊन जनतेचा अभिप्राय घेतात तसाच एखादा इवेंट मेल एक्सप्रेस च्या ३एसी, स्लीपर क्लास आणि जनरल डब्ब्यात जाऊन अभिप्राय घेण्याचा करावा. तिथे👇🏼
रेल्वे मंत्र्यांना खरा अमृतकाळ दिसेल. तिथे त्यांना खरा भारत दिसेल.
छ. शिवाजी महाराजांना, राजकिय सोयीचे “राम” म्हणून प्लांट करण्यात येत आहे का?
सर्वच राजकिय पक्ष सोयीनुसार महाराजांचा वापर करत आले आहेत. मनसेने राजमुद्रा वापरली, शिवसेनेने छ.शिवाजी महाराजांच नाव वापरून पक्ष काढला, कुणी सोयीनुसार सनातनी म्हणतंय कुणी 1/ #ChatrapatiShivajiMaharaj
सोयीनुसार धर्मनिरपेक्ष म्हणतंय, कुणी काय तर कुणी काय..! कट्टर सनातनी vs धर्मनिरपेक्ष वगैरे वादात पडायचं नाहीय इथं . छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी होणारा वापर हि चिंतेची गोष्ट वाटते. पण आता भाजपकडूनही भारतातील मुस्लिमांवर दहशद ठेवण्यासाठी 2/ #ChatrapatiShivajiMaharaj
आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी “जय श्री राम” सोबत “जय शिवाजी” असा वापर होणार आहे का? राजकारणी पक्ष ज्या महापुरुषाच्या वापर त्यांच्या फायद्यासाठी करतात त्या महापुरुषाला कसल्या ना कसल्या वादात ढकलून देतात. मग त्या महापुरुषाच्या चारित्र्यावर सोयीनुसार
3/#ChatrapatiShivajiMaharaj
आधी वाटायच ७० वर्षात काहीच झाल नाही. #RocketBoys बघितल्यावर अक्कल व अंदाज आला. देशाचे खायचे वांदे होते तरीही विज्ञान, तंत्रज्ञान आणि शेतीमध्ये जी आधुनिकता आली आहे ती खूप लोकांच्या कष्टाने व नेत्याच्या दूरदृष्टीने. जेव्हा काहीच झाल नाही अस म्हणू तेव्हा सर्वांचा अपमान करतोय आपण.👇🏼
आज आयत्या पिटावर रेगोट्या मारुन सर्व संसाधने उपलब्ध असताना काही रस्ते आणि रेल्वेच्या पट्टया टाकून हे नेते विकास म्हणतात तो विकास करण्यासाठी काही नेत्यांनी देशाचा पाया घातला म्हणून शक्य झाल. तेव्हाची परिस्तिथी आणि आताची ह्यात जमिन-आभाळाएवढा फरक आहे.👇🏼
सध्या खायला मिळत म्हणून हगायची सोय करण्यासाठी पैसे खर्चू शकत हे सरकार. जेव्हा सोयीनुसार ७० वर्षात काहीच झाल नाही अस म्हणणं हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे ज्यांनी या देशाला घडवण्यात अपार कष्ट केले आणि आज हा सगळ्या क्षेत्रात खंबीर असलेला भारत आपल्याला सोपवला.👇🏼
मराठीची मागणी कशासाठी?
महाराष्ट्राच्या जनतेला हिंदी भाषा बोलता येते समजते यात हिंदी चित्रपटाचं खूप योगदान आहे. हिंदी चित्रपट बघूनच अनेकजन हिंदी शिकली. हिंदी भाषा येत असल्याने शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी #मराठी बोलण्याची तसदी कोण घेत नाही. कुठलाही सिनेमा पैसे देउन बघत असतो पैसे 👇🏼
दिल्यावर ती सेवा आपल्याला नीट समजेल अशा भाषेत मिळावी हा अधिकार आहे ग्राहकाचा. #मराठी ग्राहकाला मुद्दाम हिंदी डबिंग करुन गृहीत धरल जात आहे ह्याचा राग आहे आम्हाला. आम्हाला आमच्या मातृभाषेचा अभिमान आहे तेव्हा कुणी गृहीत धरत असेल आम्हाला तर आम्हितरी खपवून घेणार नाही. मराठीत 👇🏼
सेवा उपलब्ध झाली तर मराठीचा प्रचार आणि प्रसार होणार. #मराठी डब करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळणार. सगळ्या भाषेत डबिंग होते मग मराठीत होत नाही यामुळे असाही अर्थ निघतो की भाषा आणि ती बोलणारे लोक दुय्यम आहेत ह्यांना दुर्लक्ष केल तरी चालत. २२०० वर्ष इतिहास असणारी #मराठी सोडून का 👇🏼
देखणा, ६ फुट्या, तिची कटकट समजून घेणारा, क्लास १ अधिकारी तो नाही भेटला तर कसलाही सरकारी नोकर, लाखोचा उद्योगपती, यूएसए/कॅनडा किंवा युरोप चा एनआरआय तोही नाही भेटला तर एमडी डॉक्टर किंवा आयआयटी इंजीनियर हाही नाही भेटला तर कसलाही लाखभर पगारीचा इंजीनियर त्याच्या खाली जमणार नाही. 👇🏼
नौकरी असली तरी बापाची संपत्ती हवी, दोन चार प्लॉट असावेत, मेट्रोत फ्लैट किंवा रो हाऊस पाहिजेल, पगार जास्त आहे तर त्याची स्वतःची गुंतवणूक हवी, नसेल तर असा पैसे उधळणारा असेल म्हणून नकोय, कार तर पाहिजेच येवढ सगळं पटल्यावर तो माय-बापापासून लांब असावा, त्याचे माय बाप शिकेलेल हवे,👇🏼
जास्ती बहीण नसलेला, तिला स्वातंत्र्य देणारा, ती जे बोलेले त्याला हू हू म्हणणारा, तिला नौकरी करू देणारा, नौकरी करुन आल्यावर घरकाम न लावणारा, प्रत्येक सणाला गावी न नेणारा, वीकेंड ला बाहेर खाऊ घालणारा, दर वर्षी फोरेन ट्रिप ला नेणारा, तिचा कमाईचा हिशोब न मागणारा, संसाराची 👇🏼
येवढा जाळ करुन घ्यायचं कारण काय?
होय “ती” आजकाल नौकरी करतेय,
होय “ती” आजकाल पैसा कमवतेय,
पण म्हणून ती, किंवा
समाज आणि “ती” एखादा बेरोजगार बघून लग्न करेल का?
शेवटपर्यंत अख्या कुटुंबाची जबाबदारी ती एकटी पेलेल का?
संसाराला पैसा कमी पडला म्हणून समाजाच बोलणं ती खाईल का? १/👇🏼
एखादया घराची परिस्तिथी वाईट झाली तर समाज गड्यावरच नारकर्तेपणाचा शिक्का मारतो तसा समाजाचा रोष ती घेईल का?अजूनही लग्न जमवायचं असेल तर मुलाच कर्तृत्व बघितल जात? तिच सौदर्य सोडून तीच कर्तृत्व बघितल जाईल का? ती शिकलीय ना? तरीही तीच शिक्षण आणि नौकरी पोराला आधार म्हणून का बघितल जात? २👇🏼
तिच्या नौकरी आणि शिक्षणाला संसाराचा प्राथमिक आधार म्हणून ती लग्न करेल का? तिच्यापेक्षा जास्त कमावणारा आणि वेल सेटेल्ड चा हट्ट ती सोडून घराची प्राथमिक जबाबदारी ती घेईल का?
ती स्वावलंबी आहे ना? कमावती आहे ना?
मग “सेक्युर्ड फ्यूचर” च्या नावाने नवऱ्याच्या कर्तृत्वावर “इन्शुर्ड” ३/👇🏼