छ. शिवाजी महाराजांना, राजकिय सोयीचे “राम” म्हणून प्लांट करण्यात येत आहे का?
सर्वच राजकिय पक्ष सोयीनुसार महाराजांचा वापर करत आले आहेत. मनसेने राजमुद्रा वापरली, शिवसेनेने छ.शिवाजी महाराजांच नाव वापरून पक्ष काढला, कुणी सोयीनुसार सनातनी म्हणतंय कुणी
1/ #ChatrapatiShivajiMaharaj
सोयीनुसार धर्मनिरपेक्ष म्हणतंय, कुणी काय तर कुणी काय..! कट्टर सनातनी vs धर्मनिरपेक्ष वगैरे वादात पडायचं नाहीय इथं . छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी होणारा वापर हि चिंतेची गोष्ट वाटते. पण आता भाजपकडूनही भारतातील मुस्लिमांवर दहशद ठेवण्यासाठी
2/
#ChatrapatiShivajiMaharaj
आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी “जय श्री राम” सोबत “जय शिवाजी” असा वापर होणार आहे का? राजकारणी पक्ष ज्या महापुरुषाच्या वापर त्यांच्या फायद्यासाठी करतात त्या महापुरुषाला कसल्या ना कसल्या वादात ढकलून देतात. मग त्या महापुरुषाच्या चारित्र्यावर सोयीनुसार
3/#ChatrapatiShivajiMaharaj
बोलबाला होतो आणि मग होते ती फक्त अफाट बदनामी आणि इतिहासाची मोडतोड. याच उदाहरण म्हणजे सावरकर आणि प्रभू श्री राम. तेव्हा आपल्या महाराजांना आज हे पक्ष कोणत्या रुपात भारतभर फैलावत आहेत त्यावर मराठा आणि महाराष्ट्राची नजर असणे जरुरी आहे.
4/ #ChatrapatiShivajiMaharaj
भाजपच्या नेत्याच्या भडकाऊ भाषणाच्या एका एडिटेड वीडियोत छ. शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून आग निघताना बघितली. ही आग आधी प्रभु श्री राम व हनुमानांच्या डोळ्यातून निघायची. ही आग माथेफिरू मतदारांना उत्तेजित करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आहे का?
5/ #ChatrapatiShivajiMaharaj
“जय शिवाजी” घोषणेत जी ताकद आहे तिचा फक्त राजकारणासाठी वापर होणार आहे का? “जय शिवाजी” म्हंटल की महाराष्ट्रात आपसूक मराठा एकवटतो. याचाच फायदा ह्याना घ्यायचा आहे का? २०१४ आधी कधीही भाजपला शिवाजी महाराजांवर एवढ प्रेम दाखवताना या महाराष्ट्राने पाहिले नाही.
6/ #ChatrapatiShivajiMaharaj
२०१४ नंतरच हिंदी भय्या लोकही आता महाराजांचा जय जयकार जास्त प्रमाणात करू लागली आहेत? महाराजांची कीर्ती सर्वदूर आहे. महाराष्ट्रेतर लोक जयजयकार करू नयेत अस माझ मत नाही. शिवरायांना दुसरा राजकिय “राम” तर बनवला जात नाही ना?
7/ #ChatrapatiShivajiMaharaj
हिंदी भय्यांचे ट्विट बघून कळेल कि शिवाजी महाराज म्हणजे फक्त मुस्लिम द्वेष्टे आणि कट्टर सनातनी हिंदू राजा एवढंच ज्ञान त्यांना दिलय. महाराजांच चारित्र्य येवढ्यापुरतच मर्यादित आहे का? प्रभू रामाला जस त्यांनी मुस्लिम विरोधी हाणामाऱ्या आणि दंगा
8/ #ChatrapatiShivajiMaharaj
करण्यासाठी वापरल तसेच काही आता आपल्या शिवरायबद्दल होणार आहे का?. महाराजांच्या नावाने भय्या लोकांना आणि मराठी पोरांना कट्टरतेचे धडे दिले जात आहेत का?. आपल्या महाराजांचा राजकारणासाठी गैरवापर होणार आहे का? दहशद माजवण्यासाठी, दुसऱ्याला मारताना,
9/ #ChatrapatiShivajiMaharaj
द्वेष पसरवताना, मते मिळवण्यासाठी, गुंडागर्दी करत असताना जस “जय श्री राम” नारा देत असतात तसेच काही आता “जय शिवाजी” म्हणून केल जाणार आहे का? पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या नसल्या तरी समाजाच्या दृष्टीने ह्या वृत्ती गुंड प्रवृत्ती आहेत.
10/ #ChatrapatiShivajiMaharaj
महाराष्ट्रात जिथ “जय शिवाजी म्हंटल्यावर समोरच्या प्रत्येक धर्मातील स्त्री-पुरुषाला आदर वाटत होता तिथे आता दहशद किंवा भीती वाटू लागली तर?
11/ #ChatrapatiShivajiMaharaj
जशी निगेटिव्ह चर्चा आणि बातम्या "जय श्री राम" नारा देत दंगा करणाऱ्यांवर होतात तश्या आपल्या शिवभक्तांवर व्हायला लागल्या तर? माथ्यावर चंद्रकोर जरी असेल तरी महाराष्ट्राचा शिवभक्त जबाबदारीने वागतो. त्या जबाबदारीच भान हि भडकावलेली कार्यकर्ते ठेवतील का?
12/ #ChatrapatiShivajiMaharaj
जय श्री राम म्हणत फिरणाऱ्या ढोंगी नेत्यांवर बलात्काराचे आरोप आहेत त्यांना कार्यंकर्ते डोक्यावर नाचवतात. तसच काही माथेफिरू कार्यकर्ते, “जय शिवाजी” म्हणून बलात्कारी नेत्यांचे स्वागत करू लागला की आपल्या राजाचा अपमान होणार नाही का?
13/ #ChatrapatiShivajiMaharaj
जिथे रांझ्या पाटलांचा चौरंग केला त्या राजाच नाव बलात्काऱ्यांचं स्वागत करण्यासाठी होऊ लागले तर? एकदा राजकिय एजंड्यासाठी महापुरुषाच्या वापर चालू झाला की फक्त होते ती बदनामी..!! ती होऊ न देणे ही जबाबदारी ही त्या पक्षाने आणि समाजाने घ्यायला हवी.
14/ #ChatrapatiShivajiMaharaj
छ. शिवाजी महाराजांच्या खऱ्या चारित्र्याचं आणि इतिहासाचं योग्य रूप महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना कळलं पाहिजे. फक्त इतिहासाचे एक दोन पैलू वापरून मुस्लिमांविरोधी राजकारण करून धार्मिक वाद निर्माण करणे आणि धर्मांध माथेफिरुंची गॅंग उभी करणे
15/
#ChatrapatiShivajiMaharaj
हा उद्देश्य असेल तर तो छ. शिवाजी महाराजांच्या समाजातील प्रतिमेसाठी धोकादायक आहे. "मुघलांशी लढा आणि हिंदू राजा" याउपर महाराष्ट्रेतर हिंदी-उत्तर भारतीय जनतेला छ. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आणि चारित्र्यामध्ये फारसा रस नाही.
16/
#ChatrapatiShivajiMaharaj
महाराष्ट्राच्या जनतेत, इथल्या मराठ्यांमध्ये छ. शिवाजी महाराज नावाची जी आग आहे त्या आगीला नेमक्या कोणत्या कामासाठी वापरायचं आहे हे त्या त्या पक्षांनी ठरवावं किंवा महाराष्ट्राच्या जनतेनी ठरवावं कि हि आग इथल्या लोकांच्या चुली पेटवण्यासाठी आणि
17/
#ChatrapatiShivajiMaharaj
शांतीचा दिवा पेटवण्यासाठी करायची आहे कि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी समाजाला एकमेकांविरुद्ध पेटवण्यासाठी. बर शिवरायांचं नाव घेणाऱ्या पक्षांना छत्रपतींनीं रयतेसाठी जस राज्य बनवलं, शेतकऱ्यांसाठी जी धोरण आखली त्या इतिहासात काहीही रस नाही.
18/
#ChatrapatiShivajiMaharaj
इतिहासातील हे पैलू हे राजकारणी सांगणार नाहीत. ते पोरांना फक्त हेच सांगतील कि शिवराय मुस्लिमांविरुद्ध लढले. मुघलांशी लढा दिला हा इतिहास छाती ठोकून जरूर सांगावा पण आमच्या राजांच्या व्यक्तिमत्वाचे आणि चारित्र्याची अनेक पैलू आहेत.
19/
#ChatrapatiShivajiMaharaj
त्यानुसार कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागावे हि नम्र विनंती. तेव्हा कोणताही पक्ष छ. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्हाला पेटवत असेल तर त्यामागचा हेतू लक्षात घेऊन जबाबदारीने कार्यकर्ता म्हणून काम करावे.
20/
#ChatrapatiShivajiMaharaj
छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर तरुण पिढीला भडकावण्यासाठी नाही तर चारित्र्यसंपन्न तरुण पिढी घडवण्यासाठी व्हावा एवढीच अपेक्षा. सर्व शिवभक्तांना जय श्री राम आणि जय शिवराय !!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!! 🙏🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with सुक्टा बोंबिल

सुक्टा बोंबिल Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mahad3b

Apr 2
वंदे भारत कोणाला हवी आहे? स्वतःला प्रश्न विचारा!

१. त्याच वेळेत (२०-३० मि चा फरक असेल) नेवून सोडणारी मेल एक्सप्रेस खूपच कमी किमतीत तुम्हाला पोचवते.
२. गोल फिरणारी खुर्ची आणि मोठी खिडकी पेक्षा ₹३५० मध्ये झोपून गावी यायचंय

मोजक्या १% श्रीमंत लोकांसाठी ट्रेन हवी आहे का, १/
👇🏼
सामान्य, SL,३A च्या डब्यात किड्या मुंग्यासारखी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी जे ₹१३००/२३०० तिकीट देऊ शकत नाहीत त्यांना आणखी काही मेल एक्सप्रेस गाड्या हव्यात? १% श्रीमंतासाठी #VandeBharat गाडीने लवकर पोचण्यासाठी ९०% लोकांसाठी असलेल्या मेल गाडीचा मार्ग व्यापणे चांगले?
२/👇🏼
#VandeBharatExpress मुळे कोण आनंदी व्हायला हव? तुम्ही? ज्यांना ₹५०० च्या वरचे तिकीट परवडत नाही पण सामान्य सुविधा हवी आहे आणि ती मिळत नाही. जिथे सामान्य लोकांना बेसिक सुविधा उपलब्ध नसताना. सोन्याची परत लावून झगमगाट दाखवून इवेंट साठी आणलेल्या सुविधा हव्यात का?
३/ 👇🏼
Read 13 tweets
Mar 23
आधी वाटायच ७० वर्षात काहीच झाल नाही. #RocketBoys बघितल्यावर अक्कल व अंदाज आला. देशाचे खायचे वांदे होते तरीही विज्ञान, तंत्रज्ञान आणि शेतीमध्ये जी आधुनिकता आली आहे ती खूप लोकांच्या कष्टाने व नेत्याच्या दूरदृष्टीने. जेव्हा काहीच झाल नाही अस म्हणू तेव्हा सर्वांचा अपमान करतोय आपण.👇🏼
आज आयत्या पिटावर रेगोट्या मारुन सर्व संसाधने उपलब्ध असताना काही रस्ते आणि रेल्वेच्या पट्टया टाकून हे नेते विकास म्हणतात तो विकास करण्यासाठी काही नेत्यांनी देशाचा पाया घातला म्हणून शक्य झाल. तेव्हाची परिस्तिथी आणि आताची ह्यात जमिन-आभाळाएवढा फरक आहे.👇🏼
सध्या खायला मिळत म्हणून हगायची सोय करण्यासाठी पैसे खर्चू शकत हे सरकार. जेव्हा सोयीनुसार ७० वर्षात काहीच झाल नाही अस म्हणणं हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे ज्यांनी या देशाला घडवण्यात अपार कष्ट केले आणि आज हा सगळ्या क्षेत्रात खंबीर असलेला भारत आपल्याला सोपवला.👇🏼
Read 4 tweets
Mar 19
बाग्याच्या हिंदुत्वाबद्दल आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल कोण गफलत करीत असेल तर त्याला खालील अभंग फेकून मारा.

मंबाजी साठी एकच उपाय,
शिवरायांचे गुरु संत तुकोबराय!!❤️🙏🏼🙏🏼
थ्रेड- #तुकाराम_महाराज 👇🏼👇🏼
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥1॥
 निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥2॥
 तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनादऩन भेटे केवीं ॥3॥
👇🏼👇🏼 #तुकाराम_महाराज
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥1॥
 सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥2॥
 तुका ह्मणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥3॥

#तुकाराम_महाराज 👇🏼
Read 16 tweets
Mar 19
मराठीची मागणी कशासाठी?
महाराष्ट्राच्या जनतेला हिंदी भाषा बोलता येते समजते यात हिंदी चित्रपटाचं खूप योगदान आहे. हिंदी चित्रपट बघूनच अनेकजन हिंदी शिकली. हिंदी भाषा येत असल्याने शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी #मराठी बोलण्याची तसदी कोण घेत नाही. कुठलाही सिनेमा पैसे देउन बघत असतो पैसे 👇🏼
दिल्यावर ती सेवा आपल्याला नीट समजेल अशा भाषेत मिळावी हा अधिकार आहे ग्राहकाचा. #मराठी ग्राहकाला मुद्दाम हिंदी डबिंग करुन गृहीत धरल जात आहे ह्याचा राग आहे आम्हाला. आम्हाला आमच्या मातृभाषेचा अभिमान आहे तेव्हा कुणी गृहीत धरत असेल आम्हाला तर आम्हितरी खपवून घेणार नाही. मराठीत 👇🏼
सेवा उपलब्ध झाली तर मराठीचा प्रचार आणि प्रसार होणार. #मराठी डब करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळणार. सगळ्या भाषेत डबिंग होते मग मराठीत होत नाही यामुळे असाही अर्थ निघतो की भाषा आणि ती बोलणारे लोक दुय्यम आहेत ह्यांना दुर्लक्ष केल तरी चालत. २२०० वर्ष इतिहास असणारी #मराठी सोडून का 👇🏼
Read 5 tweets
Mar 18
देखणा, ६ फुट्या, तिची कटकट समजून घेणारा, क्लास १ अधिकारी तो नाही भेटला तर कसलाही सरकारी नोकर, लाखोचा उद्योगपती, यूएसए/कॅनडा किंवा युरोप चा एनआरआय तोही नाही भेटला तर एमडी डॉक्टर किंवा आयआयटी इंजीनियर हाही नाही भेटला तर कसलाही लाखभर पगारीचा इंजीनियर त्याच्या खाली जमणार नाही. 👇🏼
नौकरी असली तरी बापाची संपत्ती हवी, दोन चार प्लॉट असावेत, मेट्रोत फ्लैट किंवा रो हाऊस पाहिजेल, पगार जास्त आहे तर त्याची स्वतःची गुंतवणूक हवी, नसेल तर असा पैसे उधळणारा असेल म्हणून नकोय, कार तर पाहिजेच येवढ सगळं पटल्यावर तो माय-बापापासून लांब असावा, त्याचे माय बाप शिकेलेल हवे,👇🏼
जास्ती बहीण नसलेला, तिला स्वातंत्र्य देणारा, ती जे बोलेले त्याला हू हू म्हणणारा, तिला नौकरी करू देणारा, नौकरी करुन आल्यावर घरकाम न लावणारा, प्रत्येक सणाला गावी न नेणारा, वीकेंड ला बाहेर खाऊ घालणारा, दर वर्षी फोरेन ट्रिप ला नेणारा, तिचा कमाईचा हिशोब न मागणारा, संसाराची 👇🏼
Read 6 tweets
Mar 17
येवढा जाळ करुन घ्यायचं कारण काय?
होय “ती” आजकाल नौकरी करतेय,
होय “ती” आजकाल पैसा कमवतेय,
पण म्हणून ती, किंवा
समाज आणि “ती” एखादा बेरोजगार बघून लग्न करेल का?
शेवटपर्यंत अख्या कुटुंबाची जबाबदारी ती एकटी पेलेल का?
संसाराला पैसा कमी पडला म्हणून समाजाच बोलणं ती खाईल का? १/👇🏼
एखादया घराची परिस्तिथी वाईट झाली तर समाज गड्यावरच नारकर्तेपणाचा शिक्का मारतो तसा समाजाचा रोष ती घेईल का?अजूनही लग्न जमवायचं असेल तर मुलाच कर्तृत्व बघितल जात? तिच सौदर्य सोडून तीच कर्तृत्व बघितल जाईल का? ती शिकलीय ना? तरीही तीच शिक्षण आणि नौकरी पोराला आधार म्हणून का बघितल जात? २👇🏼
तिच्या नौकरी आणि शिक्षणाला संसाराचा प्राथमिक आधार म्हणून ती लग्न करेल का? तिच्यापेक्षा जास्त कमावणारा आणि वेल सेटेल्ड चा हट्ट ती सोडून घराची प्राथमिक जबाबदारी ती घेईल का?
ती स्वावलंबी आहे ना? कमावती आहे ना?
मग “सेक्युर्ड फ्यूचर” च्या नावाने नवऱ्याच्या कर्तृत्वावर “इन्शुर्ड” ३/👇🏼
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(