आठवी किंवा नवविला असेल मी नेमकं वर्ष आठवत नाही. रोज सकाळी उठून पाणी भरायला लागायचं आम्हा भावाना. एक दिवशी वडील बाहेर जाणार होते लवकर म्हणून वडिलांनी बजावून सांगितलं होतं की पूर्ण पाणी भरून ठेवा मगच काय तो धुडगूस घाला.नायतर जाऊन पडला तिकड खोपाड्या(जुनी विहीर आहे ) हिरित म्हंजे
तुम्हाला काय समजत नाय ..आधी पाणी भरायच आणि मगच पोहायला जायचं . आता वडील लवकर जणार हे आम्हाला माहीत होतं ..म्हणून आम्ही ते निघतात का नाही तोवर आपलं नाटक केलं ...उगाच जाऊन बोर वर एक दोन घागरी पाणी घेऊन आलो . सगळं पाणी खांध्याने भराव लगायच...आम्ही तिघेही वाटच बघत होतो
कधी एकदा वडील घराबाहेर पडतात...त्यात मी मोठा आणि बाकी दोघे लहान भाऊ . मी आणि लहान भाऊ अश्या बाबतीत अती हुशार ...मधला भाऊ भिऊन असायचा ...आम्ही मार खाऊन कठीण झालो होतो ..जसे पप्पा बाहेर पडले तसं लगेच आम्ही टॉवेल चड्या घेऊन विहिरीवर पोहचलो ... त्यात मधल्या भावाला पण उगाच
ओढून घेणं गेलो ...मस्त आता सगळं आभाळ आपलंच आहे आणि कितीही उंच भरारी मारावी तसं आम्ही पाण्यात जाऊन पडलो ...पण इकडे पापा भाड्याने गाडी सांगितली होती त्याच्याकडे जाऊन आले ...त्याच आवरायला थोडा वेळ होता ..शेवटी बाप बाप असतो ...वडील घरी येऊन बघतात तर आम्ही गायब ...बोर वर पण नाय
आमच्या वडिलांचा राग म्हंजे आख्या गावाला माहित होता....तिथल्या अमच्या शेजारी पाजारी यांना समजलं आता पोरांची काय धडगत नाय ...संगीता काकिनी ( एक शेजारी आमच्या ) हे ओळखलं ..त्या पण पाणी भरायला आल्या होत्या ..त्यांनी त्यांचा पोरगा सोमा ..जो आमच्याच वयाचा होता त्याला पटकन
विहिरीवर पाठवलं ...तो येऊन चोचऱ्या शब्दात सांगू लागला ...आले भाव यायला लागलेत..भैया निघा लवकल ... एकतर ते चोचर ...त्यात काय बोलतय धापा टाकत समजेना ...मी आणि लहान भावाला येवढं समजलं की कायतरी गडबड झाली आहे ...आम्ही पटकन विहिरीतून बाहेर आलो ...तोवर मागून आमचे वडील पोहचले होते
हातात ओली करंजाची फोक घेऊनच ...दोन्ही हातात दोन फोका...उघड्या अंगावर मला दोन आणि बारक्या भावाला दोन बसल्या ...आम्ही कसतरी निस्टलो. .सापडला तो आमचा मधला भाव...ज्याचा काहीच दोष नव्हता ....आम्ही घोड्यावर बसवून आणला होता त्याला ....तो समोर आला आणि वडिलांनी ...एका हाताने धरला आणि
ताशा वाजवतात तसं त्या फोकेने पाटीवर त्याच्या इतकं मारलं की बास...आहे असं सगळे कपडे घेतले आणि नुसत्या चडीवर घरात....मागे मागे वडील पळतच अलते...त्यांच्या लाडक्या पोराला आम्हा दोघांमुळे मार बसला होता ...मधल्या भावावर जरा जास्त जीव होता वडिलांचा कारण तो थोडा वीक होता आजारी ...
पडायचा जास्त ...मग काय आमची कातडी उन्हाळा लावायच्या तयारीने पापा आमचा मागे ....आम्ही तर घावतोय वि...पळत आलो कलशी ,घागर जे घावेल ते घेऊन आहे असं उघडेच जिथं पाण्याची बोर आहे तिथं ....तिथल्या सगळ्या उभा असलेल्या लोकांना समजलं काय घडलं असेल ..तिथं गेलो म्हणून वाचलो ...
कोणीतरी सोडवणार आम्हाला हे माहीतच होतं आम्हाला. .तितकं डोकं होतच आम्हला....जाऊन नंबर लावला आणि उभा राहिलो .. वडील आले ..एक एक फोकेणे लगावली लवणीत.... तोवर बायका होत्या त्यांनी सोडवलं ....एक एक घागर उघड्या अंगावरच पाणी भरलं...! ही असली तरहा आमची....वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं
की आमच्यामुळे मधल्या भावाला मार बसला ...आता ते किस्से आठवले की खूप हसायला येतं ..! #गोड_आठवणी #लहानपण ❤️
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कर ना स्वतःला माफ....असा काय गुन्हा केला आहेस तू की स्वतःला माफही करू शकत नाहीस ? बाकीच्यांना करतोस ना माफ मग स्वतःला का नाहीस करत ? प्रेम आहे ना तुझं तुझ्यावर मग झालं तर ..ज्याच्यावर प्रेम करतो आपण त्याला माफ करावच लागतं येड्या..! किती दिवस हे असं मनात दाबून ठेऊन जगणार आहेस..
कोणीतरी त्यांच्या फायद्यासाठी आरोप करेल मग तू प्रत्येक वेळेस स्वतःला शिक्षा देऊन मोकळा होतोस..मी म्हणतो काय गरज असते असं करायची ? लोक काही एक बोलतील तुला माहिती असतं ना की तू कोणती गोष्ट कोणत्या उद्देशाने केली ..चूक की बरोबर हे ही माहीत असतं ....मग कशाला इतका त्रास करून
घ्यायचा ... समज तुला स्वतःला वाटलं की खरच हे चुकीचं आहे तर परत ती चूक होणार नाही सांग मनाला आणि माफ करून सोडून दे तो विषय .. असं नसतं रे उगाच शून्यात जाऊन बसायचं...त्याने अजून संकटं वाढतच जातील आणि तू अजून खचशिल ... हे बघ काही झालं तर तू स्वतःला खचू द्यायचं नाहीस ..
सकाळी लवकर उठून रमेश तयारीला लागला. पुण्यात आयटी कंपनी मधे नवीनच नोकरी भेटली होती त्याला . घरातले सगळेच जरा काळजीत होते . नवीन शहर नवीन जागा . कायम सोबत राहिलेला काळजाचा तुकडा आता दूर जाणार होता .त्याच्या आईचे काळीज याच विचाराने चर्र करत होते . पोटाच्या खळग्याला भरण्यासाठी
कोणतीच कारणे देऊन चालत नाय . तसे खुश ही होते . आजी तर सकाळपासून कोपरा धरून बसली होती . डोळ्यातून आसवे चालूच होती ..खायला वगेरे सगळं करून झालं होतं .दुपारची १ ची गाडी आली की निघायचं बेत होता . रमेशच्या मनावरही थोडं दडपण होतंच. अकरा साडेअकरा वाजले असतील . सहज त्याची
आजी बोलली अर रमेश ते कॅलेंडर तर बघ आज कसला दिस हाय ..
होय बघतो म्हणून रमेशने कॅलेंडर बघितलं तर अमावस्या होती .
" आजे आज अमावस्या हाय बघ "
" आता र मग पोरा ..आज रहित करायला लागतय बघ जायचं .. अमावस्यच कुठं जतूयास नवीन ठिकाणी ... असं जायचं नसतं" आजी काळजीने बोलली .
ईथे लिहिलेला प्रत्येक शब्द म्हंजे लिहिणाऱ्या व्यक्तीची भावना असते का ? कदाचित अनेक लोकांची असेलही पण माझ्या बाबतीत मला वाटतं नाय . कधीतरी मी इथे प्रेम आणि कधी तर विरह याबद्दल लिहितो ...कधी जग संपवायला निघालेलो असतो ते कधी हे जग किती सुंदर आहे हे सांगत असतो...मग
यातली नेमकी माझ्या मनातील भावना कोणती ? हे फक्त मलाच माहीत ...असतं . मुळात इथे फक्त शब्द रूप असतं भावनेचं सत्यातील परिस्थिती वेगळी असते . शब्दात जर भावना मांडता आली असती तर जग किती सोपं आणि सुटसुटीत झालं असतं नाय ...पण तसं नाही होऊ शकत ..भावना समजते ती नजरेतून
तर कधी स्पर्शातून..तर अश्रू मधून ...त्यासाठी शब्दाची गरज असेलच असं नाही ...गरज असते ती समजून घेणाऱ्या व्यक्तीची ..! इथं मांडल्या गेलेल्या शब्दात किती गुंतून राहायचं हे ही समजायला हवं ...इथ मांडलेल्या शब्दातून तुम्ही जर त्या लिहिणाऱ्या व्यक्तीला जज करत असाल तर कुठेतरी
पुण्याला एक दिवसाचं काम होतं म्हणून सकाळी पहाटे निघालो . इकडून जाताना कॅब सारख्या बऱ्याच गाड्या असतात आणि बस पेक्षा लवकर पोहचवत असतात म्हणून तसा प्रत्येक वेळेस पुण्याला जायचं म्हटलं की कॅब नी निघायचं . सकाळी १०-१०.३० वाजेपर्यंत पुण्यात टच करतात . आजही आलो पुण्यातील सगळी
कामे उरकली . आज जरा काम जास्त असल्याकारणाने थोडा उशीर झाला . प्रत्येक वेळेस ३ वाजता माघारी फिरणार तिथं ६ वाजले ..थोडा थोडा म्हणता म्हणता बऱ्याच वेळ कश्यात गेला समजलं नाही . स्वारगेट ल आलो बस बघितली तर होती एक शेवटची ६.३० ल डायरेक्ट मला खानापुरला सोडेल अशी म्हणून मग
तिचं बस पकडली म्हटल चला डायरेक्ट घरी तर जातोय . मस्त हेडफोन लाऊन गाणी लावली आणि झोपून गेलो . कात्रज मद्ये एक कोणीतरी बाजूला येऊन बसल्याची चाहूल लागली झोप महत्वाची म्हणून मी लक्षच नाही दिलं . बसलं असेल कोणीतरी जाऊदे म्हटलं . थोड्या वेळानी कानावर आवाज पडला ...
समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की त्या नात्याला आपण दूर करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक नात्यात आपल्याला काहीतरी अपेक्षित असतेच पण जर ते अपेक्षित पूर्ण नाही झालं तर तर मग ते नातं संपलेलं असतं आपल्या साठी . यात चूक कोण ? समोरचा व्यक्ती की आपण की परिस्थिती? की वेळ ?
की अजून कोणी तिसरा ? काही एक समजत नाही .कधी कधी समोरचा व्यक्ती पाहिजे तितके प्रयत्न करूनही आपल्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत म्हणून वाईट होतो आपल्यासाठी. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की नातं तोडून टाकणारे आपण कधी हा विचार करतो का की त्याच्याही आपल्याकडून काहीतरी
अपेक्षा असतील . त्या अपेक्षा आपण पूर्ण केलाय का ? आपण स्वतःला न्यायाधीशाच्या भूमिकेत ठेऊन समोरच्याला गुन्हेगार म्हणून घोषित केलेलं असतं. कधी त्याची ही बाजू समजून घेतली तर नातं टिकेल. पण ते हवय कोणाला अपेक्षा पूर्ण न करू शकणारं नातं. कोणतही नातं तुटत असताना किंवा
मी, इस्ल्या(विशाल), ,आणि सोन्या विट्याहून सिनेमा बघून येत होतो . रात्रीचे साधारण ११.४५ वाजले असतील सिनेमा संपला आणि निघालो . तिघेच असल्याने एकच बाईक घेऊन गेलो होतो . इस्ल्याला लागल्या होत्या भुका " सोन्या गाडी थांबव आय*व्यां....पोटात कावळ वर्डायला लागल्यात " मधी बसलेला
इसल्या सोण्याला म्हणत होता. तोवर मी त्याला थांबवत " सोन्या गाडी थांबवू नको ह्याच्यात लै किडे हायती... घरातन ज्यून यी म्हटलं व्हतं तसच आलंय... ढाब्यावर खायची हौस हाय आयघालायला " . " शाप्या गाडी डुलत्या ऱ... हवा तर कमी न्हाय ना झाली ... " सोन्या मला थांबत म्हणाला ...
गाडी थांबली उतरलो आणि बघितल तर मागचं टायर पंक्चर...! " आता कशी आयघालायची ...झाली की पंचायत" ईसल्या डोक्याला हात लावून म्हंटला. " तामखडी पर्यंत ढकलत न्हावी लागल" सोन्या म्हंटला . " आलिया भोगासी असावे सादर .. ढकला आता काय" मी नाराज होत बोललो .. मस्त गप्पा मारत गाडी ढकलत चाललो होतो