आमची ओळख झाली ती एका लग्नात. ओळखीने ओळख वाढली ..काही दिवस गेले ..फोन वर msg mdhe बोलण चालू झालं होत ..हळू हळू आमची मैत्री घट्ट होत होती ..एक दिवस भेटायचं ठरवलं आम्ही ..ती ही खुश होती भेटायचं म्हंटल्यावर ..आमच्या एकमेकांच्या आवडी निवडी समजायला लागल्या होत्या आम्हाला .
तिलाही मी आवडत असेन असा माझा अंदाज होता. भेटण्याच्या दिवशी मी मस्त व्हाइट शर्ट, ब्ल्यू पँट घालून ready होऊन निघालो ..घरातले लोक या बाबतीत लै हुशार त्यातले त्यात भावंडं...त्यांनी चिडवायला सुरुवात केली ..आज इतकं नटून थटून ..भानगड काय हाय ...मी आपली काय नाय .. टोलवा टोलवी केली
आणि निघालो ..भेटायचं ठरलं होत त्या ठिकाणी मी दहा एक मिनिटे लवकरच गेलो ठरलेले वेळेपेक्षा ...तिच्या येण्याची वाट बघत होतो ... वेळेत येतील ती माणसे कसली ..जवळ जवळ पंधरा वीस मिनिटे उशीर झालं तरी ही येईना ... राग येत होतच सोबत काळजी होती ..काही प्रोब्लेम तर आला नसेल ना ..
आपली पहिलीच भेट आहे आण ही अशी उशिरा ...हा विचार चालूच होता तोवर ती समोरून आली ... मस्त पिवळा पंजाबी ड्रेस घातला होता ... छान दिसत होती ... झुमका...आणि ती छोटीशी टिकली लावली होती ...सगळं कसं एकदम बघत राहावं..असं ..तिला सोनचाफा आवडतो म्हणून सोनचाफा आणला होता मी ..
सोबत एक कॅडबरी सेलिब्रेशन...बरीच चॉकलेट घेऊन गेलो होतो ...एक झूमका पण घेऊन गेलेलो ...मन खूप आनंदात होत ..बागडत होतं इकडं तिकडं .. तिचाच चेहरा समोर यायचं ..आता तर तिचं समोर आली ...शब्द फुटेना एकही..काय बोलायचं ... अवघडल्यासारखं झालं होतं समद ..
तिनेच सुरुवात केली .." खूप उशीर झाला ना मला ..अरे सॉरी ट्रॅफिक मद्ये अडकले त्यामुळे "
माझं राग तर तिला पाहून कधीच गेला होता ..." नाही ..मी पण आत्ताच दहा मिनिटे झालं आलोय ..ये ना .. बसू इकडे गार्डन मधे बाकड्यावर.." आम्ही जाऊन बाकड्यावर बसलो ...मला तर काही बोलायचं काही
सुचत नव्हतं.. थोडीफार गप्पा झाल्यावर तिने माझा हात हातात घेतला आणि बोलू लागली ..मला खूप असं बांधून ठेवल्यागत झालं होतं... पण आता तिचा स्पर्श हवंहवंसं वाटत होतं...आता परत तिने बोलायला सुरुवात केली ..मधेच मी थांबवत तिला विचारलं .." तुझं कोणावर प्रेम आहे का ? "
तीने उत्तर दिले " हो आहे ना " तसा माझा चेहरा पडला ...माझा चेहरा पडलेला पाहून ती हसू लागली ...आणि म्हणाली " कोण आहे हे तर विचार .." मी म्हटलं आहे ना कोणीतरी .असू दे मला नाही विचारायचं . हे बघून हळूच जवळ येऊन ती हातात हात घेऊन म्हणाली " कोण असेल येड्या ..तुझ्यावरच आहे
माझं प्रेम ...प्रेम नसतं तर आली असती का अशी उत्सुकतेने भेटायला .. वेडा आहेस तू ..love you ...so much ..."
. मला शहारून आलं ..मी ही तिला लव्ह यू बोलो ...आणि मिठी मारनार तितक्यात ...कोणितरी मला गदगदा हलवल ...कानावर शब्द पडले .." उठ की भाड्या किती लोळतोय नुसता ...
वेळ बघ किती झाला... काम बिम हायत का नायत..." तसा मी ताडकन जागा झालो ...दोन मिनिट समजत नव्हतं .कोण होती ती ...आणि प्रपोज ..गार्डन ...अरे काहीच. नाही ...परत एक स्वप्न ...अरे .. नुसतं स्वप्नच भेंडी...काय नाय उठलो आणि लागलो रोजच्या कामाला...! स्वप्नच ते कुठं सत्यात उतरणार.. #स्वप्न
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तुझ्याबद्दल काय बोलू ... inspiration आहेस तू ..एकीकडून पूर्ण टीम गारद होत असताना एकट्याने एकटच भिडतो हा माणूस . कालच उदाहरण असो की इंडियन टीम मधे खेळताना असो कित्येक मॅचेस तू अश्या सहज काढून दिल्यात ...वर्ल्ड कप मधील पाकिस्तान विरुद्धची मॅच तर नेहमी लक्षात राहील अशी
कदाचीत कप नसेल नशिबात .. एक टीम म्हणून तुला कधी चांगली टीम लाभेल की नाही काय माहित ..पण तुझं आत्ताचा परफॉर्मन्स नक्कीच भारतासाठी फायदेशीर ठरेल ...वर्ल्ड कप मद्ये चांगली कामगिरी करशील यात काही शंका नाय . तुझी क्रेझ तर तू बॅटिंग करत असताना जेव्हा ४ करोड लोकं मॅच बघत असतात
तिथेच समजून जाते ...तू म्हंजे अशक्य आहेस ...जेव्हा करो या मरो असतं तेव्हा नेहमीच तू बेस्ट दिलं आहेस ..तुला रिटायर करायला चालले होते काही लोक ..तुझ्या मुलीला ट्रॉल केलं ...तुला काहीही बोलतात ..त्याने तुझ्या खेळावर परिणाम झालं असता...पण तू जितका खेळात निपुण आहेस तितकाच
सकाळी उठलो एक पहाटे स्वप्न पडलं होतं . तर घरच्यांना सांगावं म्हटलं . पहाटेची स्वप्न खरी होतात . उठून हॉल मद्ये आलो ..पापा बातम्या बघत बसले होते . पप्पांना म्हटलं मला एक स्वप्न पडलं होत ...पप्पा म्हटले कसलं ..लगीन बिगिन झालं का स्वप्नात ...मी नाय ओ पापा लगीन कुठलं
ते मागच्या वेळेस तुम्हाला सांगीतलं होतं बघा तसचं होतं . पापा रागाने म्हटले पुढे काही बोलू नको ...जा अंघोळ कर ..चहा ढोस आणि कामाला लाग...स्वप्न बघतूय . जाऊदे म्हटलं पप्पा नाहीत ऐकत भाऊ तरी ऐकेल ... भावाकडे गेलो म्हटलं अरे मला एक स्वप्न पडलं होत सेम मागच्या स्वप्नसारख
भाऊ ताडकन उठला आणि म्हंटला "म्होरं काय बोललास तर बघ ...अजिबात काय बुलू नकोस... आणि हो आज सगळं काम तुच कर..."
झालं बोंबालल सगळ ...कोणीच ऐकत नव्हतं . अत्याच घर जवळच आहे तर तिथे गेलो ..अत्याचे मालक म्हंजे मामा उभे होते घरासमोरच ...मामला म्हटलं " मामा एक स्वप्न पडलं "
कर ना स्वतःला माफ....असा काय गुन्हा केला आहेस तू की स्वतःला माफही करू शकत नाहीस ? बाकीच्यांना करतोस ना माफ मग स्वतःला का नाहीस करत ? प्रेम आहे ना तुझं तुझ्यावर मग झालं तर ..ज्याच्यावर प्रेम करतो आपण त्याला माफ करावच लागतं येड्या..! किती दिवस हे असं मनात दाबून ठेऊन जगणार आहेस..
कोणीतरी त्यांच्या फायद्यासाठी आरोप करेल मग तू प्रत्येक वेळेस स्वतःला शिक्षा देऊन मोकळा होतोस..मी म्हणतो काय गरज असते असं करायची ? लोक काही एक बोलतील तुला माहिती असतं ना की तू कोणती गोष्ट कोणत्या उद्देशाने केली ..चूक की बरोबर हे ही माहीत असतं ....मग कशाला इतका त्रास करून
घ्यायचा ... समज तुला स्वतःला वाटलं की खरच हे चुकीचं आहे तर परत ती चूक होणार नाही सांग मनाला आणि माफ करून सोडून दे तो विषय .. असं नसतं रे उगाच शून्यात जाऊन बसायचं...त्याने अजून संकटं वाढतच जातील आणि तू अजून खचशिल ... हे बघ काही झालं तर तू स्वतःला खचू द्यायचं नाहीस ..
आठवी किंवा नवविला असेल मी नेमकं वर्ष आठवत नाही. रोज सकाळी उठून पाणी भरायला लागायचं आम्हा भावाना. एक दिवशी वडील बाहेर जाणार होते लवकर म्हणून वडिलांनी बजावून सांगितलं होतं की पूर्ण पाणी भरून ठेवा मगच काय तो धुडगूस घाला.नायतर जाऊन पडला तिकड खोपाड्या(जुनी विहीर आहे ) हिरित म्हंजे
तुम्हाला काय समजत नाय ..आधी पाणी भरायच आणि मगच पोहायला जायचं . आता वडील लवकर जणार हे आम्हाला माहीत होतं ..म्हणून आम्ही ते निघतात का नाही तोवर आपलं नाटक केलं ...उगाच जाऊन बोर वर एक दोन घागरी पाणी घेऊन आलो . सगळं पाणी खांध्याने भराव लगायच...आम्ही तिघेही वाटच बघत होतो
कधी एकदा वडील घराबाहेर पडतात...त्यात मी मोठा आणि बाकी दोघे लहान भाऊ . मी आणि लहान भाऊ अश्या बाबतीत अती हुशार ...मधला भाऊ भिऊन असायचा ...आम्ही मार खाऊन कठीण झालो होतो ..जसे पप्पा बाहेर पडले तसं लगेच आम्ही टॉवेल चड्या घेऊन विहिरीवर पोहचलो ... त्यात मधल्या भावाला पण उगाच
सकाळी लवकर उठून रमेश तयारीला लागला. पुण्यात आयटी कंपनी मधे नवीनच नोकरी भेटली होती त्याला . घरातले सगळेच जरा काळजीत होते . नवीन शहर नवीन जागा . कायम सोबत राहिलेला काळजाचा तुकडा आता दूर जाणार होता .त्याच्या आईचे काळीज याच विचाराने चर्र करत होते . पोटाच्या खळग्याला भरण्यासाठी
कोणतीच कारणे देऊन चालत नाय . तसे खुश ही होते . आजी तर सकाळपासून कोपरा धरून बसली होती . डोळ्यातून आसवे चालूच होती ..खायला वगेरे सगळं करून झालं होतं .दुपारची १ ची गाडी आली की निघायचं बेत होता . रमेशच्या मनावरही थोडं दडपण होतंच. अकरा साडेअकरा वाजले असतील . सहज त्याची
आजी बोलली अर रमेश ते कॅलेंडर तर बघ आज कसला दिस हाय ..
होय बघतो म्हणून रमेशने कॅलेंडर बघितलं तर अमावस्या होती .
" आजे आज अमावस्या हाय बघ "
" आता र मग पोरा ..आज रहित करायला लागतय बघ जायचं .. अमावस्यच कुठं जतूयास नवीन ठिकाणी ... असं जायचं नसतं" आजी काळजीने बोलली .
ईथे लिहिलेला प्रत्येक शब्द म्हंजे लिहिणाऱ्या व्यक्तीची भावना असते का ? कदाचित अनेक लोकांची असेलही पण माझ्या बाबतीत मला वाटतं नाय . कधीतरी मी इथे प्रेम आणि कधी तर विरह याबद्दल लिहितो ...कधी जग संपवायला निघालेलो असतो ते कधी हे जग किती सुंदर आहे हे सांगत असतो...मग
यातली नेमकी माझ्या मनातील भावना कोणती ? हे फक्त मलाच माहीत ...असतं . मुळात इथे फक्त शब्द रूप असतं भावनेचं सत्यातील परिस्थिती वेगळी असते . शब्दात जर भावना मांडता आली असती तर जग किती सोपं आणि सुटसुटीत झालं असतं नाय ...पण तसं नाही होऊ शकत ..भावना समजते ती नजरेतून
तर कधी स्पर्शातून..तर अश्रू मधून ...त्यासाठी शब्दाची गरज असेलच असं नाही ...गरज असते ती समजून घेणाऱ्या व्यक्तीची ..! इथं मांडल्या गेलेल्या शब्दात किती गुंतून राहायचं हे ही समजायला हवं ...इथ मांडलेल्या शब्दातून तुम्ही जर त्या लिहिणाऱ्या व्यक्तीला जज करत असाल तर कुठेतरी