पुलवामा ४० जवान ठार केंद्राने विमाने नाकारली मोरबी पूल १३५ लोक ठार पूल कमजोर असल्याचे पत्र असताना बंद केला नाही, मणिपूर दंगल ९८ ठार, बालासोर रेल्वे अपघात २८८ ठार, या विषयात आमच्या संवेदना देखील मेल्या स्फोट हल्ल्यात पाहणीत पोशाख बदलला म्हणून गृहमंत्री
चाकूरकर यांचा राजीनामा घेतला, ताज हॉटेल पाहायला गेले आणि सोबत मुलगा रितेश नेला आणि विलासराव देशमुख राजीनामा देऊन घरी बसले, स्फोटाच्या कारणाने मिस्टर सफेद आर आर पाटील यांनी देखील राजीनामा दिला होता मुळात घटनांचे राजकारण होता कामा नये मात्र प्रश्न विचारायचे नाही असा कारभार देशात
चालूय, मोदींनी ठेवलेला मिडिया रेल्वे मंत्री बसून आहेत म्हणून त्यांचे उदात्तीकरण करतात मग अपघाताचे कारण ४८ घंटयात सापडले नाही यावर कुठलाही पत्रकार चुई करत नाही ज्यांना कोविड काळातल्या हजारो मृतदेहांची खंत नाही, ते रेल्वे अपघातात २८८ प्रवासी मृत्यूमुखी पडले म्हणून राजीनामा थोडेच
देणार आहेत? वर्तमान सत्तेत नैतिकतेने राजीनामा दिलाय का असा प्रश्न उपस्थित होतो. अपघातात शव अक्षरशः फेकले जात होते, २८८ पैकी केवळ ८८ लोकांची ओळख पटलेली आहे, एका हॉल मध्ये शवांचा खच पडलेला आहे, अपघात मानवी चुकांचा परिपाक नसतो त्याला कारणे कारणी पडलेले असतात मात्र संवेदना हा मानवी
कर्तव्याचा भाग असतो जो सरकार कडून सिद्ध झालेला नाही इटली मध्ये आरोग्य मंत्री केवळ एक रुग्ण दगावला म्हणून राजीनामा देतात, जपान मध्ये केवळ एका विध्यार्थ्यासाठी रेल्वे स्टेशन सुरु ठेवले जाते, हे राष्ट्रीय चारित्र्य आहे, आमचे राष्ट्रीय चारित्र्य काय याचे उत्तर भारतीय म्हणून आम्हा
जादूटोनाविरोधी कायदा असलेल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र धीरेंद्र समोर हातबंद आम्ही पाहिलेच आहेत मात्र त्यांच्याबद्दलच्या चर्चेने दोन टोक घेतले आहेत. हिंदुत्व म्हणून भाजपच्या बगलाला लागलेल्या भक्तांनी बागेश्वरचा जयजयकार करणे
म्हणजे त्यांनी तुकोबा नाकारणे नाही काय, तुकोबांच्या भूमीत जाऊन मोदी तुकाराम तुकाराम करणार आणि त्यांचा पक्ष तुकोबांचं प्रबोधन खोडून काढणार, कसला भंपकपणा आहे, अंगारा धुपारा, सुकून पाहणे, नवसे करणारे लोक तुकोबांचे वारस होऊच शकत नाहीत. मात्र आमची गफलत अशी आहे की आम्ही पूर्ण
काहीच नाहीत, हिंदू धर्मातल्या अनेक पंथात असमन्वय आहे, स्वामी समर्थवाले केवळ गुरुदेव म्हणतात ते पांडुरंगाला भंजतात असे नाही, 'ब्रम्हा-विष्णू- महेशा'च्या एकत्राने दत्त निर्मित असताना दत्ताचे भक्त पंढरपूरची वाट चालतातच असे नाही, महादेवाला मानणारे महादेव सोडून इतर देवतांचे पूजन
कसंय, गावच्या मुख्य रस्त्यावरून हायवे गेला अन ब्रिज बांधला तर विकास नेमका कुणाचा अन कसला झाला हे ८०, ९० च्या स्पीडने सांगन जरा कठीणच. गावोगावी रस्ते, मेट्रो, रेल्वे प्रकल्प, दिवसागणिक विकास कामांचे भूमिपूजन, त्यावर होणारा लाखांचा खर्च
कारण, भूमिपूजन करण्यासाठी अख्खं मंत्रीमंडळ हजर असत. त्यांच्यासाठी लोकांना करावी लागणारी गर्दी असं सगळ काही सध्या फोफावत आहे. कारण, गेल्या आठ वर्षापूर्वी एवढा काही बडेजाव केलेला दिसला नाही. पण, सध्या लोकार्पणाचे काहिही होवो ! भूमिपूजनं मात्र मोठ्या धुमधडाक्यात होत आहेत.
रस्ता झाला की, झाला विकास अशी सद्यस्थिती दिसते आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. बेरोजगारांच्या वाढत्या समस्येमुळे उपासमार कायम आहे. अनेकांच्या डोक्यावर छप्पर नाही. जगण्याच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला
पत्र क्रमांक १
राज ठाकरेंनी पत्र लिहले आणि अंधेरीत भाजपने माघार घेतली, काय जरब आणि वकूब आहे साहेबांचा.
पत्र क्रमांक २
ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून राज ठाकरे यांच्या पत्राचा दहावा झाला तरी साधा प्रतिसाद ही नाही.
किस्सा...
दिवाळीच्या अगोदर राज ठाकरे यांची एक मुलाखत भावेंनी घेतली, त्यातला 'सु सुबोध' काय होता, सुबोध भावे म्हटले डबिंगसाठी दिलेला आवाज ऐकून लोक खुश होतील आणि म्हणतील टायमिंग बादशहा राज ठाकरे म्हटले हेच करत रहा दोघेही निखळ हसताना ते सत्य स्वीकारत होते, सत्य हे कि राज ठाकरे
यांना राजकारण जमत नाही, हे कोण म्हटले स्वत राज ठाकरे. चला विषय समजून घेऊ...
राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांच्या करारी आवाजाचा वारस, साहेबांची वाणी आणि ब्रश घेऊन मार्मिक टोमणे मारायला सराईत झालेला हा पुतण्या, गेली दीड दशकापासून जगाला हेवा वाटावा असा घडवायला महाराष्ट्र मागत आहेत
गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
Preview.
रविवारी प्रकरण दाखल करून ठाकरेंना दोन दिवसात फ्लोवर टेस्ट बद्दल दम देणारे कोर्ट शिंदेना मात्र तारखावर तारखा बहाल का करते, यावर फारशी कुणाला तक्रार नाही, कारण सबब सर्वांनाच ठाऊक आहे. वरती मोदी नसते तर खाली फडणवीस परत आले नसते.
गेल्या पाच वर्षात सत्तातरांचे असे नमुने समोर आलेले आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. उध्दव ठाकरेंसाठी मोठा झटका आहे. ज्याला कोणाला पक्षांतर करायचं असेल त्याने सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावे.
मग ती एक व्यक्ती असो वा अनेक. शिवसेनेच निवडणुक चिन्ह उद्या निवडणुक आयोगाने गोठवल तरी त्याने काय फरक पडतो? काँग्रेस फुटली तेव्हा गाय वासरु निशाणी जाऊन इंदिराजींना हात ही निशाणी मिळाली आणि पक्षाच मुळ नाव पण गेल. पण त्याने काय फरक पडला ? १९८० च्या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने
संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏
'वारी' स्वरूप आणि परंपरा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सवात डॉ. देखणे आपले विचार मांडतात.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात आणि लोकाचारामध्ये पांडुरंगाचे स्थान मोठे आहे. पांडुरग हा येथील लोकजीवनाचा मोठा आधारस्तंभ असून तो लोकदेव असल्याचे डॉ. देखणे सांगतात साने गुरुजींनी ‘महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुका अध्यक्ष’ असे पांडुरंगाचे वर्णन केल्याचा संदर्भही त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे ज्ञानपीठ तर संत तुकाराम हे योगपीठ आहेत असे ते सांगतात.
परी ते मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धीच्या डोळा देखावे ॥
हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥
जे विचार मनाच्या कानाने ऐकले जातात, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले जातात, चित्ताने साठवले जातात