भारत आज इतक्या दयनीय अवस्थेत जाण्यामागे अनुभवी खेळाडूंचे 'Poor shot selection' हे तगडं कारण आहे. IPL चालु असल्यासारखे बॅट फिरवुन एकामागे एक परतले आहेत..
आधी रोहितने तो घाणेरडा शाॅट खेळुन सेट विकेट घालवली. कमिन्स, स्टार्क, बोलेंड या सगळ्यांना शांत करण्यात यशस्वी ठरला असताना नॅथन
लायनच्या पहिल्या ओव्हरलाच तो अनपेक्षित शाॅट खेळुन आऊट झाला. शुभमन गीलची विकेट वादग्रस्त ठरली. रोहितच्या मागे मागे सेट झालेला चेतेश्वर पुजारा पुन्हा त्याच्या अख्ख्या जिंदगीत न खेळलेला शाॅट खेळताना विकेट टाकुन निघुन गेला. आज विराट चांगला खेळत असताना त्याच्या आवडीचा कव्हर
ड्राईव्ह मारताना विकेट टाकुन गेला. जाडेजाला बाॅल समजायच्या आधी त्याची विकेट पडली. शेवटची आशा असणारा अजिंक्य रहाणे किपर अलेक्स कॅरीच्या हातात बाॅल मारून माघारी परतला.😢
'टेस्ट क्रिकेट' चे टेंपरामेंट अलग लेव्हलला आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारतीय संघात असणार्या सगळ्यांनी
आयपीएलमध्ये चांगला खेळ केला पण इकडे कामगिरी करू शकले नाहीत. बाॅलर्सकडुनही म्हणावी तशी कामगिरी दिसली नाही..
इकडे ऑस्ट्रेलियन टीम पाहिली तर त्या टिममधील तब्बल ८ खेळाडु आयपीएलमध्ये खेळायला नव्हते..
भारतीय संघाला आयपीएलमुळे नीट तयारी करायला वेळ मिळाला नाही
आणि त्याचा मोठा फटका आत्ता भारताला बसलाय..या WTC final championship मधुन भारतीय संघाला मोठा शिकवण मिळालीय की कोणत्या वेळी कशाला महत्त्व दिले पाहिजे..🙏👏
कालपर्यंत व्यावसायिक लीग खेळुन दुसर्या दिवशी WTC final खेळायला गेलेल्या बहाद्दरांनी येणारा ५०-५० एकदिवसीय चषकाचा आतापासूनच
'और यहापे आपके साथ ये छोटासा प्रॅंक हुआ है' 🫡
आज शेअर मार्केटमध्ये अनावधानाने का होईना गुंतवणूकदारांसोबत prank झालेला आहे.
विषय असा आहे की आज मार्केटमध्ये अचानक बातमी आली 'Urja Global' नावाच्या जवळपास 650 करोड बाजार मुल्य असणार्या small cap कंपनीने 'Tesla' मध्ये गुंतवणूक केलीय
आणि काय धुर्रळा झाला 🔥
सगळे गुंतवणूकदार या कंपनीच्या शेअरची खरेदी करायला तुटुन पडले आणि आज २०% upper circuit मध्ये शेअर लाॅक झाला😍.
पण मुख्य विषय असा आहे की भारतातील एका छोट्याश्या कंपनीने मुळची अमेरिकेची पण जगविख्यात असणार्या टेस्ला कंपनीत कशी काय गुंतवणूक केली असा प्रश्न
सर्वांना पडला आणि तिथुन खरी गंमत बाहेर आली. भारतीय बाजारमधील महागुरू विजय केडिया यांनी याचा तपास लावला असता त्यांना समजले की ही टेस्ला अमेरिकेतील नसुन दिल्ली मधील टेस्ला पाॅवर इंडिया कंपनी आहे..😄
"I was thrilled to read the news about a listed Indian company "tied up" with Tesla
वय वर्ष २५ ते ३५ एक भयंकर उलथापालथीचा कालावधी असतो. यामध्ये लोकांचे करिअर घडतात-बिघडतात, वाढणारे वय असल्याने आपसुकच एकेक जबाबदार्या अंगावर पडायला चालु होतात. आपल्यावर आणखी एका नवीन व्यक्तीची जबाबदारी येत असताना आपण तेव्हढे सक्षम होणे गरजेच आहे याची जाणीव होते. आईवडिलांचे वाढते वय
चिंतेचा विषय बनतो, वाईट वाटायला चालु होते की आपले आईवडील आता म्हातारपणाकडे झुकतं चालले आहेत. आपल्या सोबतची मित्रमंडळी त्यातले बरेच जण सेटल झालेले असतात, काही आणखी करिअर सेट करण्यासाठी झगडत असतात तर काही जणांची या अल्प वयातच जीवनयात्रा संपलेली असते..नैसर्गिकरीत्या किंवा स्वताच्या
हाताने..
लहान असताना अनेक मित्र सोबत असणारे आपण..मोठे होऊ तसे छोटा पण विश्वासु सहकार्यांचा ग्रुप बनवायला प्राधान्य देतो. डोक्याला ज्यादाची कटकट नको वाटते, आपल्याला जेव्हढं मनाला आणि शरीराला विश्रांती देता येईल तेव्हढं आपण देण्याचा प्रयत्न करतो. चार चौघात बसलो असलो तरी आपण आपल्याच
आपण नशीबवान आहोत की भारतात जन्मलो जिथे #संविधान श्रेष्ठ आहे ❤️
संविधानच नसलेल्या इस्त्राईल देशात गेले ३ महिने झाले सामान्य जनता रस्त्यावर उतरलीय. नेमकं काय झालय हे आपण या थ्रेडमध्ये पाहु
१)इस्त्राईल पंतप्रधान नेतान्याहू यांचा कारनामा
२)जन आंदोलन व परिणाम #वसुसेन#threadकर
याआधी आपणं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ(जे लोकशाहीचे ३ स्तंभ म्हणुन ओळखले जातात)यांचा एखादा देश स्थिर ठेवण्यामागे काय योगदान आहे याबद्दल छोटासा आढावा घेऊ म्हणजे पुढील प्रकरण तुम्हाला समजुन येईल.
कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ. हे लोकं
कायद्याचे पालन करतात.(इस्त्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू पंतप्रधान आहेत) हे जे कायदे आहेत ते कायदेमंडळात तयार करून मंजुर केले जातात.(इस्त्राईल कायदेमंडळाचे नाव 'Knesset' आहे) तर बनलेले कायदे योग्य-अयोग्य तपासण्याचे काम न्याय मंडळ करत असतं.
तर पंतप्रधान नेतान्याहू यांनी नेमका
'हिंडनबर्ग..हिंडनबर्ग..हिंडनबर्ग'
नाम तो सुना ही होगा 🧐
आत्ताच ज्यांच्या रिपोर्टने #अदाणी ग्रुपमध्ये हाहाकार उडाला होता त्या संस्थेच्या रडारवर काल #ट्विटर चा संस्थापक जॅक डाॅर्सी आलाय!
या थ्रेडमध्ये
१)हिंडनबर्गचा आरोप
२)ब्लाॅक कंपनीची माहिती
३)परिणाम
पाहु #threadकर#वसुसेन
तर विषय असा आहे की हिंडनबर्गने जॅक डाॅर्सीच्या 'ब्लाॅक'
1)या कंपनीवर जवळपास १ बिलियन डॉलर्सचा घोटाळा घातल्याचा आरोप केला आहे.
2)या कंपनीमध्ये असंख्य खोटी आणि बनावट खाती उघडण्यात आली असुन कंपनीने या कृत्याला कुठेही विरोध केलेला नाहीय.त्यांना या गोष्टीची माहिती होती तरी त्यांनी
हे होऊन दिलंय.
3)स्वताच्या कंपनीचा नफा वाढवुन दाखवलाय.जेणेकरून या कंपनीचा शेअर वाढेल आणि कंपनीला फायदा होईल.
4)कंपनीच्या पेमेंट ॲपवरून बर्याच अवैध्य कामांसाठी पैश्यांची देवाणघेवाण झालीय उदा. ड्रग्ज डिल्सचे पैसे, क्रिमिनल गोष्टींसाठीचे पेमेंट्स, एखाद्याचा खुनाच्या सुपारीचे पैसे😅
बाबांनो ते आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून या रे!
दरवेळीस सरकार शेवटची तारीख शेवटची वाॅर्निंग म्हणतय खर पण यावेळी सरकारने मनावर घेतलेलं दिसतय. 🧐 ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख असल्याने पटापट सगळ्यांनी लिंक करा नाहीतर १ एप्रिलपासुन तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय
होईल.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की
Central Board Of Direct Taxes( CBDT) ने ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन आधार लिंक करण्याची मुदत दिली होती. ती मुदत ३० जुन २०२२ पर्यंत वाढवली पण ५०० रूपये दंड आकारून!
आणि ३० जुन २०२२ च्या पुढे ५०० रूपये दंडाची रक्कम १००० रूपये करण्यात आलीय याचाच अर्थ
ज्या लोकांनी आणखी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेल नाहीय त्यांना आधी १००० रूपये दंडात्मक रक्कम भरावी लागेल. ती पण ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत आहे. जर तरीपण तुम्ही आधार पॅन लिंक केल नाहीच तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि तुम्हाला जर पॅन कार्ड चालु करायचे असेल तर त्यासाठी
#कार्यकर्ता
ते नेत्याच्या मुलाला/मुलीला तडफदार,धाडसी,कणखर,गरिबांचे कैवारी, एका हाकेला धावणारे नेतृत्व अस म्हणणं गरजेचचं आहे काय??
त्यांच्या मागे फिरणार्या गर्दीत एखांद उद्याच नेतृत्व नाही होऊ शकत का? आमदाराच्या बर्थडे ला केक घेऊन पळत जाणारी त्याच्या पोराच्या बर्थडेला पण पळत जातात
आणि सामाजिक माध्यमांवर त्यांनी दिलेल्या फक्त शुभेच्छा वाचायच्या!
एकापेक्षा एक असतात. अरे तो गडी बाहेरच्या देशात शिकुन आत्ताशी कुठ आपल्या मातीत आलाय त्याला एखाद्या चौकाच नाव तरी पाठ होऊद्या आधी 😂
अशी चाटायची प्रथा चालवणार्या कार्यकर्त्यांची कुठेच कमी नाहीय. या सगळ्यांमुळेच
नेत्याची ही पोरं कर्तृत्व नसताना सामान्य जनतेच्या बोकांडी बसवायचा प्रयत्न केला जातो. या पोरासोरांना आधी मतदारसंघाची रचना माहिती नाही, लोकसंख्या माहिती नाही, लोकांच्या गरजा पण माहिती नाहीत एव्हढचं काय तर सामान्य जनतेशी चर्चा करून माहिती नाही 😄
काय तर फक्त दोन चार कामं पदरात पाडुन