महाकाळ Profile picture
काळ मी..वैकुंठी ना पाताळी मी.. मोक्षाचा सार मी…शुद्ध क्रोध मी..अघोर मी..असा महाकाळ मी. MTech IITian + 💡💡💡
Apr 1, 2023 4 tweets 2 min read
शिकलीस म्हणून काय झालं
आहेस तर तू मुलगीच ना?
नोकरी करतेस म्हणून काय झालं
आहेस तर तू मुलगीच ना?

रात्रीचा अंधार तुझ्यासाठी धोकादायक,
तुझ्यामुळेच कापलं जाऊ शकतं
कुटुंबाचं नाक.
विसरू नकोस,
ना समाज बदललाय ना आम्ही,
आज ही आहात बापाच्या
खांद्यावरच्या ओझ्याप्रमाणे तुम्ही आता ही तुला रात्री बेरात्री बाहेर जाण्यापूर्वी दहावेळा करावा लागतो विचार,
बापाच्या चेहऱ्यावरचा उडतो रंग
आणि आईच्या चौकश्या हजार

मुलगा तरुण बापाचा सहारा
मुलगी तरुण तर बाप बिचारा

मुलगी जास्त शिकली तर चांगलं स्थळ कुठून येणार,
मुलगा जास्त शिकला तर हुंड्याने घर भरणार
Feb 23, 2023 6 tweets 2 min read
मुलं खूप हळुवार मनाची असतात. मुलांनी पुढे जावे, चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात जेणेकरून त्यांचे भविष्य सुधारावे, अशी प्रत्येक पालकाची, शिक्षकाची इच्छा असते. पण त्यासाठी मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणे, त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी रुजवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलाला काही चांगल्या सवयी शिकवा म्हणजे तो एक आदर्श नागरिक बनू शकेल.

प्रत्येक मुलाला कळायला हवं की आईवडिलांचा आदर कसा करायचा. मोठ्यांचा आदर कसा करायचा हे मुलांना शिकवा. ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा, सकाळी नमस्कार करा.
Feb 22, 2023 5 tweets 2 min read
ज्ञान ही माणसाची सर्वात मोठी आणि खरी संपत्ती आहे.

ज्ञानाच्या मदतीने व्यक्ती सर्व अडचणींवर मात करून यशाचा मार्ग शोधतो. पैसा सर्वत्र उपयोगी पडत नाही. ज्ञान ही माणसाची संपत्ती आहे, ज्याच्या जोरावर सर्वात मोठे युद्ध सहज जिंकता येते. ज्ञानी व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उंचावते. ज्ञान हीच माणसाची खरी संपत्ती आहे, जी तुम्ही कमावलेली असेल तर ती तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचा अखंड प्रवाह असतो, तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.
Feb 9, 2023 4 tweets 2 min read
आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. आपले कर्तव्य आहे वेळेवर आयकर भरणे, ज्यामुळे कर रूपाने भरलेल्या पैशांनी भांडवलदारांना सबसिडी आणि व्याजमुक्त केले जाईल. ज्याच्या लाभाने ते अरबपती बनू शकतील आणि करोडोंचा बंगला बनवू शकतील आणि समस्त भौतिक सुख सुविधांचा लाभ उठवू शकतील. आपण,मध्यमवर्गीयांनी दिलेल्या कररुपी पैशांनी एखाद्या गरीब परिवाराला मोफत राशन मिळू शकेल. विनाशुल्क त्याचा चांगल्या इस्पितळात औषधोपचार केला जाईल. ज्याचा फायदा एखादी अकर्मण्य व्यक्तीही उचलू शकतो.

कारण, जर त्याने कर्म केलं तर तो शिक्षण घेईल आणि शिक्षण घेतलं तर कामधंदा करेल,
Dec 2, 2022 5 tweets 2 min read
पुरुष...

तो आनंदी असो वा दुःखी,
त्याला कोणीही समजू शकत नाही.
तो प्रियजनांसाठी प्रत्येक क्षण जगतो.

आयुष्यातील प्रत्येक क्षण
इतरांसाठी समर्पित करतो.
लहानपणापासून तारुण्यापर्यंत
आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धडपडतो.

कधी अनाथ
होऊन कुटुंबाची धुरा सांभाळतो, तर कधी भाऊ आणि बहिणींसाठी स्वतःच्या छोट्याछोट्या स्वप्नांचा त्यागही करतो.
कधीकधी तो कौटुंबिक परंपरा आणि कुटुंबाच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचाही
त्याग करतो.
अवांछित विवाह करतो, पत्नी
कशीही असली तरी तिला आधार देतो,
पत्नी सुंदर, विनम्र असेल, तर आपल्या नशिबाची वाखाणणी करतो
Nov 17, 2022 5 tweets 2 min read
मी काल एक पोस्ट टाकली होती, "गरिबाला नाही माहीत कोणाचा धर्म धोक्यात आहे..."

खूप प्रतिक्रिया आल्या, DM आले. काही चांगल्या होत्या काही विचित्र होत्या. काहींनी धर्मद्रोही ही ठरवलं.😂😛
प्रत्येकाच्या मताचा मी नेहमीच सन्मान करतो.
त्याच पोस्ट ला संलग्न काही टिपण्णी करू इच्छितो. उदा. १
आपण भिकाऱ्याला काही दान करतो. अन्न, पैसे वा इतर काही. आपण त्याला देताना विचार करतो का तो हिंदू आहे का मुसलमान?

तो भिकारी तुम्हाला विचारतो का, तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम किंवा इतर कोणते धर्मीय?

ही आहे गरिबी. ही आहे खऱ्या गरजवंतांची गरज. त्याला नाही फरक पडत तुम्ही कोण...
Nov 11, 2022 11 tweets 4 min read
"आयुष्य" नावाचा हा एक छोटासा "प्रवास" आहे...

चला, एका कथेपासून सुरुवात करूया. एक म्हातारी बाई बसमध्ये बसली होती. पुढच्या स्टॉपवर, एक मजबूत, चिडखोर तरुण स्त्री बसमध्ये चढली आणि म्हातारीच्या शेजारी बसली. तिने स्वतःचा पूर्ण भार त्या वृद्ध स्त्रीवर टाकला. तरी वृद्ध स्त्री शांत होती. Image तरुणीने वृद्धेला विचारले की, "मी एवढा तुम्हाला त्रास देतेय तरी तुम्ही तक्रार का नाही करत आहात?"

वयोवृद्ध महिलेने उत्तर दिले: "मला एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर असभ्य वागण्याची किंवा वाद करण्याची गरज नाही, कारण माझा प्रवास खूप छोटा आहे, कारण मी पुढच्याच थांब्यावर उतरणार आहे." Image
Nov 4, 2022 4 tweets 2 min read
तारांकित हॉटेलमध्ये वेटर येऊन विचारतो, पाणी कोणतं घेणार? पॅकेज्ड वॉटर की नॉर्मल वॉटर?

लोकं मोठेपणा दाखवायला, पॅकेज्ड वॉटर सांगतात. हो की नाही?
दिखाव्याच्या हॉटेलमध्ये तुम्हाला ही दिखावा करणे भाग आहे का?
नॉर्मल वॉटर आपण का घेत नाही? तो काय गटारातलं पाणी देणार आहे तुम्हाला? हॉटेलमधील पाणी ही फिल्टर केलेलंच असतं की राव?
पण हॉटेलमध्ये घाण पाणी देतात म्हणून तुम्ही पॅकेज्ड वॉटर सांगता.

मग एक लॉजिक सांगा, तुम्ही जे हॉटेलमध्ये जेवता, ते जेवणही पॅकेज्ड वॉटर वापरून बनवलेलं असतं की हॉटेलमधील नॉर्मल वॉटर वापरून?
पण आपल्याला दिखावा करायचा असतो ना🤣😛😂
Nov 4, 2022 4 tweets 2 min read
आपण सगळ्यांना आपलं समजतो पण तुम्हाला कोण आपलं समजतो हे जाणणे गरजेचे आहे. आपल्यासोबत काही असेही आपले असतात, जे खरं तर आपले कधीच नसतात, पण त्यांच्या मतलबासाठी आपले असण्याचा दिखावा जरूर करतात, एकदा का त्यांचा मतलब निघाला, की ते आपोआप तुम्हाला त्यांचे रंग दाखवतात. म्हणून आयुष्यात प्रत्येकाला तेवढीच जागा द्या जेवढी ते तुम्हाला देतात. नाही तर आयुष्यात एक तर तुम्ही रडाल नाही तर ते तुम्हाला रडवतील...
आयुष्यात अश्या व्यक्तींना वर खेचण्याचा प्रयत्न करू नका, ज्यांना वरती यायचेच नाही. नाही तर एक काळ येईल, तेच तुम्हाला खाली खेचतील...
Nov 2, 2022 8 tweets 3 min read
जीवनशैलीतील फरक की पैशांचा माज...
एक काळ होता, आम्ही भावंडं ब्रेडच्या पहिल्या आणि शेवटच्या स्लाईससाठी भांडायचो. आज काल पाहतो, सगळे पहिला आणि शेवटचा स्लाईस फेकून देतात. हळू हळू तर ब्रेडच्या स्लाईस च्या कडा पण कापून फेकून द्यायला लागले. ब्रेडचा फक्त मऊ भाग खातात. Image आया मुलांना सांगतात"फर्स्ट स्लाईस फेकून द्यायचा हं, तो खायचा नसतो."
पण तीच लोकं तशाच कडक पावावर भाज्या टाकून सजवलेल्या पावाला "पिज्जा-पिज्जा" म्हणून आवडीने खातात आणि भरपूर पैसे ही देतात. तसाच ब्रेड करपवून सँडविच किंवा ब्रेड क्रंब्स नावाच्या डिशेस खातात हॉटेल मध्ये...😂😛 Image
Sep 5, 2022 12 tweets 2 min read
शिक्षकाचा पगार

पिकासो (Picasso) हा स्पेन या देशात जन्मलेला एक अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. त्यांनी काढलेली पेंटिंग्स अख्ख्या जगात कोट्यावधी आणि अब्जावधी रुपयांना विकल्या जात असत... एक दिवस रस्त्यानं जात असता एका महिलेची नजर पिकासोकडे गेली आणि योगायोगानं त्या महिलेनं त्याला ओळखलं. ती धांवतच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, "सर, मी आपली खूप चाहाती आहे. आपली पेंटिंग्ज मला प्रचंड आवडतात. आपण माझ्यासाठीही एक पेंटिंग तयार करून देऊ शकाल काय ?
Jul 31, 2022 38 tweets 6 min read
नाती निभावणे आणि टिकवणे ही देखील एक कला आहे. ज्याला हे समजले, त्याने संबंध सांभाळले. आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की जसे प्रत्येक गोष्टीचे काय करावे आणि करू नये तसेच नातेसंबंध देखील आहेत. त्यांना समजून घेणे आणि ओळखणे महत्त्वाचे आहे. संवाद ही नात्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कोणतीही अडचण आल्यावर, काही शंका आल्यास, परस्पर संवादातून मनाचे ओझे हलके करणे, त्रास वाटून घेणे चांगले. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे संबंध सुधारेल.
Jul 30, 2022 29 tweets 4 min read
नातं बिघडवणारा अबोला

मौन बाळगल्यानं, अबोला धरल्यानं काही दिवसांनी भांडण मिटते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. तरीपण जेव्हा जोडीदार एकमेकांशी अबोला धरतात, तेव्हा त्यांच्या नातेसंबंधात दरी निर्माण होत असते… वैवाहिक जीवनात भांडणतंटा, रुसवे-फुगवे हे असावेच, असा बहुधा ईश्‍वरी संकेत आहे. म्हणूनच पुरातन काळापासून लोक बोलतात की, भांडणतंटा झाल्याशिवाय संसारात मजा नाही. संसारात पडल्यावर भांड्याला भांडं लागणार नाही, हे असंभव. मात्र हे भांडण पराकोटीचं नसावं.
Jul 9, 2022 6 tweets 1 min read
"प्रत्येक ढगाला एक चंदेरी किनार असते"

ह्या म्हणी चा अर्थ काय आणि ह्याचा आपण आपल्या आयुष्यात कसा वापर करू शकतो.

आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल किंवा कोणत्याही तणावपूर्ण, आव्हानात्मक परिस्थितीतुन तुम्ही जात असाल, लक्षात ठेवा, प्रत्येक परिस्थितीत एक संधी लपलेली असते. संधी: काही शिकण्याची
संधी: वाढ करण्याची
संधी: स्वतःची उत्तम आवृत्ती बनवण्याची.
पण हा वृत्तीचा, दृष्टीचा खेळ आहे की
तुम्ही संधीवर लक्ष केंद्रित करत आहात कि समस्यांवर, तणावावर लक्ष केंद्रित करत आहात, तक्रार करत आहात.
May 16, 2022 17 tweets 3 min read
धर्मांधांच्या मेंदूतील बिघाड...!!!

सर्व धर्मातील धर्मांधांमध्ये खोटारडेपणा, हिंसकपणा, दहशतवादी वृत्ती, आणि सगळे कायदे पायदळी तुडविणे ही लक्षणे दिसतात. कारण त्यांच्या मेंदूत मोठा बिघाड झालेला असतो. धर्माचा जयजयकार करत हिंसा करणारे लोक असोत नाहीतर आपल्या राजकीय पक्षाचा उदोउदो करत दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे असो यांच्या मेंदूत गंभीर दोष आढळतात.
Apr 23, 2022 8 tweets 2 min read
एका ट्रेनमध्ये दोन मुलं खूप मस्ती करत होती. कधी ते एकमेकांशी भांडत, तर कधी सीटच्या वरती उडी मारत. शेजारीच बसलेले त्यांचे वडील आपल्याच विचारात हरवले होते. मुलांनी त्याच्याकडे बघितलं की तो स्नेहपूर्ण स्मितहास्य द्यायचा आणि मग मुलं पुन्हा आपल्या खोडकरपणात मग्न व्हायची. आणि वडील त्यांच्याकडे प्रेमाने बघत राहायचे. ट्रेनमधील सहप्रवासी मुलांच्या खोडकरपणाने नाराज आणि वडिलांच्या वृत्तीने नाराज झाले. सगळ्यांना आराम करायचा होता. मुलांच्या खोड्या पाहून एका प्रवाशाला स्वत:ला थांबवता आले नाही आणि तो वडिलांना म्हणाला - "कसले बाप आहात तुम्ही?
Apr 22, 2022 4 tweets 1 min read
"घाणा परिवार" मुख्यमंत्र्यांना मारूती स्तोत्र बोलण्यासाठी धमक्या देऊन धार्मिक संकट महाराष्ट्रात आणण्याचा आणि दंगल माजवण्याचं आणि स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचं काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडतूस" घाणा परिवाराच्या" धमक्यांना भीक न घालून एका संयमी नेतृत्वाचे उदाहरण दिले आहे. मुख्यमंत्रीपद हे संविधानिक आहे आणि मुख्यमंत्र्यास जात-धर्म नसतो. तो संपूर्ण राज्याचा पालक असतो. विरोधकांच्या धमक्यांना बळी न पडता राज्यकारभार व्यवस्थित चालवणे, हे मुख्यमंत्र्याचे काम आहे. राज्यातील सर्व धर्मियांचे पालन पोषण करणे, हे मुख्यमंत्र्याचं काम आहे.
Apr 22, 2022 6 tweets 1 min read
आयटी सेल चा नवीन उपक्रम...

जर मशीद ही खाजगी मालमत्ता असेल तर मौलवींना सरकारी पगार का? मंदिर ही सरकारी मालमत्ता आहे मग पुजारींना सरकारी पगार का नाही?

मशीद मौलवींना वेतन शासनाकडून नाही, तर वक्फ बोर्डाकडून दिले जाते. मंदिर हे सरकारी मालमत्ता आणि मशीद खाजगी, हा एक खूप मोठा गैरसमज पसरवला जात आहे. लोकांना खोट्या गोष्टींनी ब्रेनवॉश करायचे आहेत.

अधिक अभ्यागत (भाविक) आणि देणगी असलेली जुनी हिंदू मंदिरे सरकारच्या अखत्यारीत येतात. तसेच सरकार या मंदिरांच्या विकासासाठी अनुदान देते.
Jan 31, 2022 5 tweets 1 min read
हिमाचल प्रदेशात डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि पेट्रोल पंपांवर मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तर मध्यप्रदेशात ज्याचे उत्पन्न १ कोटीच्या वर आहे, त्याला घरातच बार उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. हेच ते राज्य जेथे संत मंडळींना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आलाय. गोव्यात नाक्यावर दारू मिळते. तेथे तर बीफवरही बंदी नाही. गोव्यात खुलेआम दारू बंद करावी. हिमाचल आणि मध्यप्रदेशातही परवानगी देऊ नये, अशी मागणी होत नाही. महाराष्ट्रात फक्त वाईनला तेही सुपरमार्केटमध्ये आणि १००० चौ. फुटांपेक्षा मोठ्या किराणा दुकानात विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Jan 31, 2022 12 tweets 3 min read
वाइन आणि दारूमधील फरक आणि कोकणातील शेतकऱ्यांची फळावरील अर्थव्यवस्था...

डीस्टील्ड अल्कोहोल म्हणजे दारू , ज्यामध्ये पोषणमूल्य अजिबात नसते !

वाईन किण्वन क्रियेने ( फरमेन्टेशन ) बनते , ज्यामध्ये फळाची पोषण मूल्य व औषधी गुण टिकून रहातात , कारण शीत प्रक्रिया ( कोल्ड प्रोसेस ) डीस्टील्ड अल्कोहोलचे दारूचे( हॉट प्रोसेस)
शरीरावर होणारे परिणाम हॉट असतात. जास्त प्यायल्यावर माणूस बेभान होऊन अडचणीचे वागू शकतो .

फरमेंटेड अल्कोहोलचे, वाईनचे (कोल्ड प्रोसेस ) शरीरावर होणारे परिणाम कोल्ड असतात . जास्त प्यायली तरी माणूस सहसा अडचणीचे वागत नाही .
Dec 22, 2021 4 tweets 1 min read
सोमवारी रात्री
बायको : आज तुम्ही पिऊन आलात ना ?

नवरा : हो त्याच काय झालं फॉरेन क्लाएंटला कंपनी द्यावी लागते.

.

मंगळवारी रात्री
बायको : आज परत पिऊन आलात ?

नवरा : अरे आज एका मित्राची एंगेजमेंट पार्टी म्हणुन..... बुधवारी रात्री
बायको : आज पण तुम्ही पिऊन आला ?

नवरा : अगं, आज एका मित्राचं ब्रेकअप झालं बिचार्याच मन नाही दुखवू वाटलं !

.

गुरूवारी रात्री
बायको :
आज ही ,
आता आज आणखी कोणाचा ब्रेकअप झाला ?

नवरा :
ब्रेकअप नाही, ऑफिसात कामाचा लोड फार होता. डोकं फार भणभण करायला म्हणून. ....