Mohin Mujawar Profile picture
#महाराष्ट्रप्रेमी #sportsman #mumbaipolice
Aug 13, 2021 6 tweets 4 min read
एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून हे लिहताना खरंच खूप दुःख होतंय परंतु आज ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकांवरून काही लोकं आपली वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत परंतु भारतात क्रिकेट वगळता अन्य खेळांना कवडीची किंमत दिली जात नाही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना साधा बनियान आणि हाफपॅन्ट साठी देखील स्पॉन्सर मिळत नाही काहींना अगदी प्रवास खर्चाचे ( एस. टी. बस ) पैसे जमवायला सराव सोडून ४ दिवस कुठं तरी मजुरी करावी लागते तर तीन-चारशे रुपयांची शूज वर्ष-वर्ष भेटत नाहीत ग्रामीण भागात तर खेळांचा विषयच काही वेगळा असतो यात्रा-उरूस मध्ये हजारो रुपये खर्च करून
May 24, 2021 6 tweets 6 min read
" माझ्या तीर्थरूप आईस अर्पण...!
दिवस सर्वोच्च स्वप्नपूर्तीचा दि.23/5/21 रोजी सकाळी 06:30 वाजता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट ( सागरमाथा) वरती पोचलो आणि तीन वर्षापूर्वी पाहिलेल स्वप्न पुर्ण झाले. खरतर हे स्वप्न माझ्यासाठी वेदनादायक होत ,आहे आणि राहील. माझ्या आईचं तीन वर्षापूर्वी अल्पश्या आजाराने निधन झाले त्यावेळी मला माझ्या आईचं आजारपण ओळखता आले नाही ज्याच शल्य माझ्या मनात आयुष्भर राहील. माझ्या आईच्या निधना नंतर मी कोणताही विधी केला नाही फक्तं मनोमन एक संकल्प केला. की मी अस स्वप्न पाहीन की जे पुर्ण करताना माझ्या शरीराला इतक्या वेदना होतील
Oct 11, 2020 12 tweets 5 min read
गोड्डा , झारखंड मधील एक छोट गाव, बांगलादेश सीमेवर, देशातल्या लाखो खेड्यापैकी एक.

मग विशेष काय ?

अदानी समूहाचा इथ वीजनिर्मिती प्रकल्प सुरु होणारे.त्याची क्षमता आहे १.६ गिगा वॅट ,त्यासाठी दरवर्षी अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलिया मध्ये असलेल्या कोळश्याच्या खाणीतून दरवर्षी ६ दशलक्ष टन कोळश्याची आयात होणार आहे.

भारताची आयात कोळश्यावर अवलंबून न राहण्याची नीती असताना आणि कोळश्याच्या खाणी असलेल्या प्रदेशात हा प्रकल्प असताना तोही बंदरापासून ७०० किलोमीटर लांब असताना या प्रकल्पात मात्र आयात कोळशाने वीजनिर्मिती होणार आहे आणि हि वीज बांगलादेश विकत घेणार आहे.
जुलै २०१५
Oct 9, 2020 7 tweets 4 min read
दैनंदिन जीवनात अनेक बातम्या ऐकायला मिळतात पण एक बातमी कानावर पडली की अंतःकरण सुन्न होऊन जातं आपल्याच एखाद्या भगिनींवर बलात्कार झाला हे ऐकून झालेली मनाची अवस्था एखाद्या नपुंसकासारखी असते. हाथरस घटने नंतर घडलेल्या सर्व घटना क्रमाचा आज एकांतात बसून विचार करत असताना मन तीळ तीळ जळत होतं त्या भगिनींचा विचार आणि तो घडलेला प्रसंग यांची कल्पना करत असताना एक चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आपल्या बहिणीलाच काय आपल्याला जरी बाजूला सरक म्हणलं की तळपायाची आग मस्तकाला जाते मग चार मानवरूपी जनावरांनी एक दुबळ्या महिलेवर केलेला भ्याड हल्ला किती भयावह असेल आई-बापाचं स्वाभिमान
Sep 6, 2020 9 tweets 4 min read
#जीडीपी_म्हणजे_काय_थोडक्यात

समजा तुमच्या घरात शंभर माणसं आहेत आणि तुमच्या घराचं वार्षिक उत्पन्न पण शंभर रुपयेच आहे. तर तुमच्या घराचा GDP त्याला इंग्रजीतून (Gross Domestic Product) म्हणतात तो शंभर रुपये असतो. आता गोष्ट ईथंच थांबत नाही तर इथून चालु होते. घराचं वार्षिक उत्पन्न जर शंभर रुपये असेल, तर सरासरी दरडोई उत्पन्न (Per Capita Income) एक रुपया होते. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाला दरवर्षी एक रुपया खर्चायला मिळतो. म्हणजे समसमान वाटणी केली तर मिळायला हवा. पण तसं असतं का? तर नसतं.
घराचा कारभारी शंभर रुपयातलं 70 रुपये स्वतःवर आणि स्वतःच्या मुलाबाळावर
Aug 19, 2020 7 tweets 4 min read
खरंच जर देशाचं आणि राज्याचं भविष्य बदलायचं असेल तर अशा लोकांना एक वेळ साथ द्या ही पोस्ट वाचतांना डोळे पाणावले आणि समोर ही ताई उभी राहिली काही तरी करता आलं तर नक्की करूया या ताई साठी " स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि Image प्रयत्न आवश्यक आहेत......हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार.कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. अभ्यासात भयंकर हुशार....दहावीत 98 टक्के तर बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आलेली.डॉक्टर व्हायची इच्छा.... पण परिस्थिती आडवी आली.आई वडील शेतकरी,
Aug 2, 2020 20 tweets 7 min read
आ. श्री. कपिल पाटील , विधान परिषद सदस्य यांची ही पोस्ट मनाला विचार करायला भाग पडणारी आहे. कृपया पूर्ण वाचा
" कोविडग्रस्त हिंदू प्रेतांवर अंतिम संस्कार करायला कुटुंबातले धजत नव्हते, तेव्हा मुंबईतल्या प्रसिद्ध बडा कब्रस्थान मधले मुसलमान पुढे आले. एक नाही, दोन नाही 300 पेक्षा जास्त हिंदू प्रेतांवर त्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी शेवटचे संस्कार केले. अगदी हिंदू पद्धतीने. गळ्यात तुळशीची माळ घालून. व्यवस्थित तिरडी बांधून. चिता रचून. छिद्र असलेल्या मडक्यातून पाण्याची धार वाहत, प्रदक्षिणा घालत. नंतर पालिकेच्या प्रोटोकॉल नुसार विद्युत वाहिनीवर. भडाग्नी दिला.
Jul 28, 2020 8 tweets 5 min read
#वेब_सीरिज

लॉकडाउनच्या काळात चित्रपट व्यवसाय ठप्प असल्यामुळे व टीव्ही चॅनल वर चालणाऱ्या अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे लोकांनी ॲमेझॉन प्राईम नेटफ्लेक्स युट्युब टेलिग्राम अशा अनेक माध्यमातून अनेक वेब सिरीज बघितल्या परंतु आज गुगलवर टॉप-10 वेब सिरीज सर्च केल्यानंतर येणाऱ्या उत्तरही अतिशय भयावह आहे. कारण ब्रेथ, असुर, ब्रेथ- इन टू द शाडोज, मिर्झापूर, रंगबाज, अपहरण या कथा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर निर्माण केल्या आहेत. हे सर्वकाही पाहिल्यानंतर एखादा सर्वसामान्य माणूस एखाद्या गुन्ह्याला अगदी सहजपणे परावृत्त होऊ शकतो. मग हे सर्व का
Jul 15, 2020 8 tweets 6 min read
" काही दिवसांपूर्वी #Technical_Write_Off करण्यावरून खूप गदारोळ झाला होता, आणि असं सांगितलं जात होतं की #Technical_Write_Off म्हणजे कर्जमाफी नाही, केलेल्या कर्जाची वसुली सुरूच राहते. या पार्श्वभूमीवर मी State Bank of India ला माहिती अधिकारात 2012-13 ते 2019-20 या 8 वर्षांत दरवर्षी 100 कोटींच्या वर थकीत कर्ज असलेल्या आणि #Technical_Write_Off केलेल्या #Loan_Accounts ची नावं मागितली होती आणि या प्रत्येक लोनची #Technical_Write_Off केल्या नंतरच्या प्रत्येक वर्षात किती वसुली झाली याची माहिती मागितली, जी स्टेट बँकेने ही माहिती एकत्रित उपलब्ध
Jul 9, 2020 12 tweets 7 min read
सारथी म्हणजे काय हे माहीत नसलं तर समजून घ्या

मला वाटतं की मराठा समाजातील बऱ्याच तरुणांना सारथी काय आहे हे समजले नाही त्यासाठीच मी सारथी विषयी काही माहिती संकलित करुन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे....नक्कीच अपेक्षा करतो की तुम्ही ही माहिती वाचून ,समजून प्रत्येक मराठा तरुण पर्यंत पोहचवण्यासाठी मदत कराल.

#१.सारथी काय आहे ?
सारथी अर्थात #छत्रपती_शाहू_महाराज_संशोधन_प्रशिक्षण_व_मानव_विकास_संस्था
ही संस्था #पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.
#२.सारथी स्थापन करण्याचा उद्देश काय ?
सारथी ची
Jul 6, 2020 10 tweets 3 min read
#खाकीचा_बळी

बिकरू, जिल्हा-कानपुर, उत्तरप्रदेश येथील शिवली पोलीस स्टेशन हद्दीतील खुविख्यात गुन्हेगार विकास दुबे याला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या पोलीस पथकावर विकास दुबे टोळीने अंधाधुंद गोळीबार केली. त्यात एक उपअधीक्षक , एक पोलीस निरीक्षक , दोन उपनिरीक्षक आणि चार कर्मचारी शहीद झाले आणि सात पोलीस कर्मचारी जखमी अवस्थेत आहेत. तर काही पोलीस बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. विकास दुबे टोळीचे तीन गुन्हेगार मारले गेले. विकास दुबे पोलिसांची हत्यारे घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. माझ्या पोलीस बांधवांची निर्दयी हत्या करणाऱ्या विकास दुबेच्या नावावर
Jul 1, 2020 5 tweets 2 min read
हा माझा भाचा कु. महोम्मदअवैस फैय्याजअहमद जमादार मागील वर्षी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कोणते पात्र करणार म्हणून बाईंनी अनेक फोटो दाखवल्यावर याने मात्र एक वारकरी बांधवांचे फोटो हाथात घेऊन मी हे करतो असे म्हणून " विठ्ठल विठ्ठल " या गाण्याची निवड केली. बाई विचारात पडल्या जातीने मुस्लिम असलेल्या या लेकराने एका वारकरी पात्राची निवड केली आता याचे पालक काय म्हणतील, परवानगी देतील किंवा नाही आणि तयारी कशी करून घेता येईल पण पालकांनी अतिशय उत्साह आणि आनंदाने तयारी करून घेतली आणि आमच्या पाठयाने पारितोषिक देखील पटकावले. मस्जिद पासून हाकेच्या अंतरावर घर असणाऱ्या
Jun 25, 2020 11 tweets 10 min read
इतिहासाची मढी उकरून त्यावर मतांच्या पोळ्या भाजायला गेलात तर फक्त तुमच्या मतलबाचे आणि सोयीचे सांगाडे बाहेर पडणार नाहीत, तर तुमचेच वाभाडे निघतील...
खिलजीच्या सैन्याला फितूर होऊन देवगिरीचा अभेद्य किल्ला शत्रूच्या हातात अलगद देणारा आणि देवगिरीचं साम्राज्य पराभूत व्हायला कोण कारणीभूत होत ? #हेमाद्री_पंडित ? सांगा कसा पुसणार हा इतिहास ?
राणा प्रतापाचा सेनापती होता #हकीमखान सुरी नावाचा पश्तून पठाण आणि अकबराचा सेनापती होता #राजा_मानसिंग. अकबर जिंकला तर मानसिंग पण जिंकतो आणि राणा प्रताप जिंकला तर हकीमखान पण जिंकतो. सांगा कसा पुसणार इतिहास ?
इथिओपियाचा हबशी
Jun 7, 2020 8 tweets 8 min read
फोटो मध्ये डोक्यावर भगवी टोपी कपाळावर भगवा टिळा लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्ध अभिषेक घालणारी व्यक्ती जातीने मुसलमान आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी निभावत आहेत. काही लोकांनी आजच्या #शिवराज्याभिषेक_दिनाला धार्मिक नाव आणि रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यांना मुळात महाराज समजलेच नसतील कदाचित महाराज एका जाती किंवा धर्मा पुरता मर्यादित कधीच नव्हते आणि आजही नाहीत. स्वतःला धर्म रक्षकांच्या उपमा देऊन मिरवणाऱ्यानी आपल्या नैतीकतेचा आणि गलिच्छ मानसिकतेचा विचार तरी करावा. तुम्ही लाख धर्माचे
May 30, 2020 9 tweets 5 min read
मुंबई म्हणजे फक्त सात बेटांचे शहर नसून मराठी माणसाची अस्मिता आहे मुंबई म्हणजे आपला अभिमान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असलेला महाराष्ट्र देशाला त्याच्या एकूण उत्पन्नाच्या ३५% कर देतो. म्हणूनच मुंबईला आर्थिक राजधानी म्हणलं जातं परंतु सध्या कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला असताना मुंबई त्याची परिस्थिती चिंताजनक होणे सहाजिकच आहे. मुंबईची तुलना केल्या जाणाऱ्या अहमदाबाद शहराची आणि मुंबईची काही महत्वपूर्ण आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे.
● अहमदाबाद लोकसंख्या :- ५५ लाख
● मुंबई लोकसंख्या :- २ कोटी
(अहमदाबाद पेक्षा चौपट)
May 28, 2020 13 tweets 7 min read
#फडणवीस_थोडक्यात
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस साहेब हे आजचा बहुचर्चित नावांपैकी एक व्यक्तिमत्व ऐन पंचविशीत नागपूर सारख्या मोठ्या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दाखल झालेले फडणवीस २०१४ साली राज्याचे मुख्यमंत्री झाले तर २०१९ साली विधानसभा विरोधी पक्षनेते झाले. या सर्व प्रवासात त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना सर्वच गोष्टी ह्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळत गेल्या राजकारणाचा कौटुंबिक वारसा असल्यामुळे त्यांना फारसं कष्ट करावं लागलं नाही. नागपुर महापालिकेतील अभ्यासू , शांत आणि संयमी नगरसेवक ते कट्टर
May 27, 2020 11 tweets 6 min read
#२८०००_कोटी_आणि_विरोधीपक्ष

विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्र सरकारने राज्य सरकारला २८००० कोटींचे पॅकेज दिले व त्याचा संख्यात्मक तपशील ही खलील प्रमाणे दिला.
४५९२ कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत १७२६ कोटी रूपये दिले. जनधन योजनेच्या माध्यमातून १९५८ कोटी रूपये दिले. विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ११६ कोटी रूपये दिले. उज्वला गॅस योजनेत ७३ लाख १६ हजार सिलेंडर
६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रूपये दिले. बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण १००१ कोटी रूपये दिले.
May 14, 2020 7 tweets 5 min read
आत्मनिर्भर भारत कशाला म्हणतात?

ब्रिटिशानी लुटून भिकारी बनवलेल्या भारताला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध सरकारी उद्योग, प्रकल्पांची पायाभरणी करणे त्याला म्हणतात आत्मनिर्भर भारत!
अन्न धान्याचा तुटवडा पडलेला असताना हरित क्रांती घडवून आणणे आणि अतिरिक्त अन्नधान्य उत्पादन करून स्वतःलाही आणि जगालाही खाऊ घालणे हे असते आत्मनिर्भर भारत!

चीन युद्धातला मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर जगाचे कान पोखरण अनुचाचणीने ठणकावून सोडने आणि बांगलादेश वेगळा करून जागतिक महासत्तेला आव्हान देणे हे असते आत्मनिर्भर भारत!

कॉम्प्युटर वापरून हे काय करतील असे बोलणारे जग आणि
May 14, 2020 12 tweets 5 min read
"हे मराठी माणसा, परप्रांतीय चाललाय म्हणून आनंदउसत्व साजरा करू नकोस"

मराठी माणसा, आज जो परप्रांतीय पायी *चाललाय तो मजुर आहे ! व्यापारी नव्हे*.
तुला नेहमी सांगितलं जातंय की परप्रांतीयांनी तुझे धंदे आणि नोकऱ्या काबीज केल्या आणि तुम्ही काय करताय ? पण हे अर्ध सत्य आणि अर्ध खोटं आहे.
ज्याने तुझे खरे धंदे हिसकवले तो *परप्रांतीय व्यापारी इथेच आहे*. किराणावाला , इस्त्रीवाला चक्कीवाला, रिक्षा चालवणारा सगळे इथेच आहेत. पण परप्रांतीय म्हणजे फक्त युपी बिहारी नाहीत हा ? *गुजराती, शेट्टी, राजस्थानी* ही असतात. मग त्यांची बाजरपेठ , सोन्याची दुकानं, किराणा मालाची
May 4, 2020 10 tweets 4 min read
प्रेम - स्वप्न आणि सत्य....!
(मोईन अली)

सोनेरी आयुष्याची स्वप्ने पाहत सुरू झालेला प्रवास अखेर थांबला " चला दादर स्थानक शेवटचा स्टॉप आहे उतारा " कंडक्टरच्या कर्कश आवाजाने डोळे उघडले ती अजूनही माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपली होती अनेक दिवसांच्या प्रयत्नातून ही सकाळ उजाडली होती. तितक्यात अचानक तिचा फोन वाजला उचलतात समोरून आवाज आला " कविता कुठं हायस तु आबा ईचारत हाईत पोरगी दिसली नाय म्हणून " कविताच्या आईचा फोन होता इतकं ऐकताच तीने बोलायला सुरुवात केली " आई मला माफ कर मी ते घर आणि गाव सोडून मोहन सोबत आलीय आता पुन्हा कधी परत येईल का नाही
May 3, 2020 13 tweets 4 min read
प्रेम - स्वप्न आणि सत्य....!
( मोईन अली )
" पिलू मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही रे... काहीही करू पण लग्न करू पुढे होईल ते होईल... "
हो पण तू नंतर काही तरी वेगळं बोलू नकोस म्हणजे झालं असा प्रश्न विचारताच ती मला पटकन मिठी मारून " तुला विश्वास नाही का माझ्यावर " म्हणून रडू लागली. मी ही भावनेच्या ओघात तिच्या प्रेमाच्या सागरात बुडून गेलो होतो. तिच्या पलीकडे मला दुसरं काहीही दिसत आणि सुचत न्हवता म्हणून मी नियोजन करायला सुरुवात केली. काहीही झालं तरी एकदाच पळून जाऊ आणि लग्न करून आपल्या संसाराची सुरवात करू या विचाराने डोक्यात धुमाकूळ घातला