Discover and read the best of Twitter Threads about #काल्पनिक_कथा

Most recents (4)

गुलाब.

✍️✍️✍️✍️
माझं नुकतंच तारुण्यात आगमन झालं होतं. आजूबाजूच्या मित्र,मैत्रिणी प्रेमात पडलेले पण आमचा नंबर मात्र अजूनही ह्यात लागला नव्हता. त्याचं कारण जिला पाहून माझ्या हृदयाची गिटार वाजेल असं मला कोणी आजवर भेटलंच नव्हतं. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा मी तिला पहिल्यांदा 👇👇👇👇
पाहिलं. नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर मी सकाळी ७:३० च्या ठोक्याला हजर झालो होतो. मित्र मंडळी जमली होती. गप्पा, मज्जा, मस्ती,किस्से अगदी रंगवून सुरू होते. जिथे इतर मुलं, मुली कॉलेजला जायला उशीर होऊ नये म्हणून धावपळ करत होते. तिथे हा आमचा नेहमीचा निवांतपणा रोजच सुरू असायचा.
आणि सगळ्यांची सगळी धावपळ संपली की मग आम्ही नेहमीप्रमाणे सगळ्यात उशिरा वर्गात प्रवेश करायचो. त्यादिवशीही सगळं सुरळीत चाललं होतं गप्पा रंगल्या होत्या. सगळे गुंग होते. इतक्यात कोणीतरी ओरडलं कॅन्टीनमध्ये राडा झाला रे चला लवकर! कोणाचीतरी भांडण झाली असणार म्हणून आम्ही जीवाच्या आकांताने
Read 30 tweets
✍️✍️
एव्हाना रोज रोज हाताला सॅनिटायझर लावून लावून थकायला झालं होतं. तोंडाला मास्क लावून गरम श्वास घेऊनही कंटाळा आला होता. दिवसभर लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, आजूबाजूचं रोजचं जग आणि मनातली घुसमट घेऊन मी जगत होतो. नाविन्यपूर्ण असं काही नव्हतं. जणू वेड्यासारखे झटकेच येत होते मला.👇👇👇👇
मनातली सल बोलून दाखवावी असं जवळ कोणी नव्हतं. ज्यांना सांगावं ते मित्र मस्करी करायचे. बरं हे सगळं मनात साठवून साठवून आत्मविश्वास कमी होत होता. का जगतोय आपण? कशासाठी जगतोय? हे अनेकप्रश्न मनाला सतावत होते. अशा जगण्याचा कंटाळा आला होता. फायनली ठरवलं उद्या शनिवार आहे.
उद्या तिच्या सोबत बाहेर पडूयात. हो हो तीच ती जिचा माझा जवळपास एक वर्ष संपर्क नव्हता. ना फोन, ना मेसेज, ना भेट, ना तिचा आवाज ऐकला! तरीही भेटण्याची ओढ किंचितशीही कमी झाली नव्हती. घाबरत घाबरतच मी तिला मेसेज केला. उद्या भेटुयात का? त्यावर क्षणाचाही विलंब न करता तिकडून हो उत्तर आलं.
Read 23 tweets
✍️✍️
चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी ऑफिसला जात होतो. गाडी चालवत होतो.एक महिला माझ्याविरुद्ध दिशेने गाडी घेऊन येत होती. ती माझ्याकडे खुप कुतूहलाने पाहत हसत होती. कोणीतरी अनोळखी महिला माझ्याकडे का पाहतेय? चेहऱ्यावर काही लागलयं का? म्हणून आरशात पाहत होतो इतक्यात समोरून👇👇👇👇
एक गाडी आली आणि मला जोरदार धडक दिली. मला भानावर यायला अगदी १० मिनिटे लागली. लोक धावले त्यांनी माझी मदत केली. सगळं स्थिरसावर व्हायला मला वेळ लागला. पण या सगळ्या गडबडीत त्या महिलेचा चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता. मी ऑफिस मध्ये पोहचलो. जखमांवर मलम लावायला सुरुवात केली.
तशा जळजळत असलेल्या जखमा थंड होऊ लागल्या. डोळे बंद करून खिडकीतून बाहेर दिसत असलेला हिरवागार निसर्ग मी न्याहाळत होतो. इतक्यात वीज चमकावी तशी अगदी त्याच गतीने ती महिला मला पुन्हा आठवली. आता बंद डोळ्यानेच तिचा चेहरा मला स्पष्टपणे दिसत होता आणि मला धक्काच बसला.
Read 27 tweets
✍️✍️
नियतीने मागच्या जन्मी न जुळू दिलेल्या नात्याची रेशीमगाठ पुन्हा जुळवण्यासाठी नियती या जन्मात एक संधी देते. असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच माझ्याही आयुष्यात आला

ते साल असावं २०१३. मला नोकरीमुळे ऑफिसमधून बाहेर जावं लागतं असायचं. याच प्रवासात काय घडलं? वाचा हा धागा👇👇👇
एक दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर मला कळालं की उद्या मला ताम्हिणी घाटाखाली असलेल्या विळे बागाड एमआयडीसी मध्ये जायचं आहे. हे अंतर ऑफिसपासून १०० किलोमीटर. अडवळणी घाटरस्ता त्यामुळे प्रवासाला किमान अडीच तास लागणार हे मी गृहीत पकडलं होतं. दुसरा दिवस उजाडला ड्रायव्हर मला घ्यायला घरी आला.
आम्ही निघालो वाटेतचं माझा एक सहकारी होता. त्यालाही सोबत घेतलं. प्रवास सुरु झाला. ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गाने नटलेल्या आणि हिरवाईने भरून पावलेल्या निर्मनुष्य रस्त्याचा प्रवास. प्रवास सुरु होता तसं डोक्यात नेहमीप्रमाणे विचारचक्र सुरू झालं होतं.
आम्ही कामाच्या ठिकाणी पोहचलो.
Read 27 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!