Discover and read the best of Twitter Threads about #कोकण

Most recents (7)

Mar 18th 2023
सह्याद्रीच्या कुशीत वळण घेत लालपरीने विसावा घेतला. थोडी दमलेली दिसली. जेवण झालं व पुन्हा नव्या जोमाने धावू लागली. कोकणचा #प्रवास भलताच वळणदार. #कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध! आजूबाजूला मागे पडणाऱ्या घरात डोकावून पाहता आलं असतं तर? विश्वाचे आर्त समजले असते!
#लालपरी ImageImage
#प्रवासी गाड्या ज्या जेवणाच्या अड्ड्यांवर थांबतात तिथे जेवण चांगलेच मिळते! कारण इथल्या जेवणाला अनोळखी लोकांच्या गप्पांची जोड असते. कोणी दिवसभर या हाटेलात बसला/ बसली तर काही वर्षे पुरेल इतके साहित्य, विषय आणि पात्रे मिळतील. आज अस्खलित #सातारी बोली ऐकायला मिळाली! 🤗
#प्रवास #अनुभव
#सह्याद्री.. महाराष्ट्रासारख्या राकट देशाला शोभून दिसणारी आणि स्वतः देखील साक्षात कालीमातेसारखी रौद्र सह्याद्री पर्वतरांग! त्यांच्या घनदाट जंगलात वसलेल्या संसारातून प्रवास करणारी ही #लालपरी!

सह्याद्रीला पाहून एकच वाक्य मनात येते, "असो हिमालय तुमचा, अमुचा केवळ माझा सह्यकडा!" ImageImageImageImage
Read 9 tweets
Nov 29th 2022
कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे : रेवस ते तेरेखोल या जवळपास ७०० किमी लांब किनारपट्टीवर शंभर सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यापैकी अनेक किनारे पर्यटकांच्या यादीत हक्काचं स्थान कमावलेले आहेत तर काही थोडे आडबाजूला दुर्लक्षित आहेत.कोणता किनारा जास्त चांगला हे ठरवणं खरंच खूप कठीण आहे.
आणि प्रत्येक समुद्र रसिकाला विचारलं तर प्रत्येकाचं मतही वेगळं असणारच. त्यामुळे कोणतेही रँकिंग करणं म्हणजे वादाला आमंत्रण देणं. तरीही कोकण प्रवासात चुकवू नयेत असे सगळ्यात भारी 50 किनारे कोणते..?? तर चला दाखवतो..
आवास बीच - मुंबईपासून फार दूर नसलेल्या या गावातील समुद्रावर फेरफटका मारण्याचा अनुभव निराळाच. इथं जवळच सासवणेला करमरकर शिल्प संग्रहालयही पाहता येते. Image
Read 52 tweets
Nov 28th 2022
केळशीचा याकूब बाबा दर्गा - कोकणातील एक महत्त्वाचे मुस्लिम पीराचे स्थान म्हणजे केळशीच्या जवळ उटंबर टेकडीवर असलेला याकूतबाबा दर्गा. सिंध मधील हैदराबादहून हे बाबा १६१८ साली बाणकोट बंदराशी बोटीने येऊन पोहोचले असं सांगितलं जाते.
त्यांच्याबरोबरच सोबत सोलीस खान नावाचा एक युवकही आला होता. स्थानिक होडीवाल्याने नदी पार करायला बाबांना नकार दिला तेव्हा दुसऱ्या एका माणसाने बाबांचे होडीभाडे भरले आणि पुढे त्याचा प्रचंड उत्कर्ष झाला अशी आख्यायिका सांगितली जाते.
हा ३८६ वर्षे जुना दर्गा हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्लाह दर्गा या नावाने ओळखला जातो. दरवर्षी ६ डिसेंबरच्या दिवशी इथं उरूस भरतो ज्याला मुस्लिमांबरोबरच हिंदू व इतर धर्मांचे भाविकही येत असतात.
Read 6 tweets
Nov 28th 2022
राजवाडीचा सोमेश्वर - कोकणात असंख्य शिवालये आहेत. रामेश्वर, सोमेश्वर, सप्तेश्वर या नावाची शिवमंदिरे अनेक ठिकाणी आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे, आसमंत वेगळा, स्थापत्याचे बारकावे वेगळे. वैशिष्ट्य वेगळे. मुंबई गोवा महामार्गावर आरवली जवळ आपण शास्त्री नदी पार करतो.
तिथं गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथून संगमेश्वराच्या दिशेने निघाले की काही अंतरावर अजून एक ठिकाणी एक प्राचीन भग्न शिवमंदिर आणि गरम पाण्याचे कुंड आहे. तिथून पुढं राजवाडीजवळ डावीकडे वळून सोमेश्वराच्या दिशेने गाडीरस्ता जवळजवळ पाव किलोमीटर आत जातो.
तिथं पायऱ्या उतरून अजून पाव किलोमीटर पुढं गेले की पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेले आणि लाकडी कोरीवकामाने सजलेले सोमेश्वर शिवमंदिर आपल्याला दिसते. वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही.
Read 15 tweets
Nov 27th 2022
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वैभव :
सागर किनारे - आचरा , कुणकेश्वर , केळूस , खवणे , गिर्ये , चिवला , तारकर्ली , तोंडवली , देवबाग , निवती , पडवणे , पुरळकोठार , भोगवे , मिठमुंबरी , मुणगे , मोचेमोड , रेडी , वायरीबांध , विजयदुर्ग , वेळागर , शिरोडा , सागरतीर्थ , सागरेश्वर. Image
ऐतिहासिक गड किल्ले - किनारीकोट – निवती , यशवंतगड , राजकोट , सर्जेकोट.

गिरिदुर्ग – पारगड , भगवंतगट , भरतगड , भैरवगड , मनोहरगड व मनसंतोषगड (शिवापूर ), रांगणागड (नारुर), रामगड , वेताळगड , शिवगड., सदानंदगड , सोनगड ,सिद्धगड , हनुमंतगड.
जलदुर्ग – देवगड , पद्मगड , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग (मालवण)

भुईकोट – आवरकिल्ला उर्फ आवडकोट , कुडाळकोट , कोटकामते , बलिपत्तन उर्फ खारेपाटण , नांदोशी गढीकोट , बांदाकोट , वेंगुर्लाकोट (डच वखार), सावंतवाडीकोट.

वनदुर्ग – नारायणगड , महादेवगड.
Read 16 tweets
Jul 29th 2020
#महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या #दहावी च्या परीक्षेत ९५.३० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @mataonline @harshdudhe_MT @aparanjape #म @mandarchakradeo
गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ, परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,७५,१०३  विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १५,०१,१०५  विद्यार्थी उत्तीर्ण
विभागीय निकालात #कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के लागला. पुण्यासह #नगर#सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या #पुणे विभागाचा निकाल ९७.३४ टक्के.
Read 4 tweets
Jul 16th 2020
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या #बारावी च्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @mataonline @EducationMT @harshdudhe_MT @MarathiRT #म @aparanjape @Girbane @anubandhmarathi @ksinamdar
#पुणे विभागाचा निकाल ९२.५० टक्के

पुणे जिल्हा -९२.२४ टक्के

#नगर जिल्हा - ९१.९७ टक्के

#सोलापूर जिल्हा - ९३.७४ टक्के

#म @vijayholamMT
यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला
- निकालात मुलींचीच बाजी
- मुलींचा निकाल ९३.८८टक्के
- मुलांचा निकाल ८८.०४ टक्के
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!