Discover and read the best of Twitter Threads about #जय_शिवराय

Most recents (23)

२०१४ मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रायगडावर गेले होते तेव्हा त्यांनी काही काळ "भरत मुद्रा" मध्ये ध्यान केले होते. गुरुशिष्य परंपरेत गुरु देशाटनासाठी निघताना प्रमुख शिष्य भरत मुद्रेत बसून गुरूंच्या संकल्पानुसार गुरुकुलाचे व्यवस्थापन करण्याचे वचन देत असत.
#जय_शिवराय 🙏🚩🙏
महाराजांच्या मान अपमानाच्या नाट्यात स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांची जुनी प्रकरणं उकरून काढली तर कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. महाराजांचा मान वागण्यातून असावा तोंडपाटीलकी करून नाही आणि हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होतं...
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द...
आम्ही जातो, आमचा काळ झाला,
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...!!!
Read 4 tweets
#Thread भाग -१ पेशवे-सर्वश्रेष्ठ कपटपटु
पेशवे म्हटले की सामन्यात: आपल्याला अटकेपार झेंडे, पानिपत, बाजीराव मस्तानी, चिमाजी अप्पा, बारभाई कारस्थान, ध चा म,
काका मला वाचवा अशा खुप गोष्टी आठवतात.
पण यापलीकडेही पेशव्यांची लुप्त ओळख ही सर्वश्रेष्ठ कपटपटु उर्फ कटकारस्थानी पेशवे होय.
२) सध्या पेशव्यांच्या वैचारिक वारसदारीचं बांडगुळ फोफावत चाललं आहे. कारण उत्तर पेशवाईमधे जेवढे हाफ डझनभर बाजीरावांचे असले नसलेले पराक्रम आपल्या सोयीनुसार लिहण्याचा जो सपाटा चालला त्याने सामन्य रयत किंवा इतिहासात रुची ठेवणारे,
३) असे सर्वजन भ्रमित झाले. या पेशवाई हितसंबंधी कलम कसाईंनी पेशव्यांचे असे काही पराक्रम लिहुन ठेवले की त्यांच्या पराक्रमाच्या तेजापुढे, कुंतीपुत्र भीम अर्जुन, राम लक्ष्मण, अंगद, मारुती, अशा सर्व थोर वीरांच्या तेजस्वी तलवारीच-धनुष्याच, गदेचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहीलं नसणार..
Read 22 tweets
#Thread 🧵

सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याचा श्रीगणेशा केला. व एकाच वेळी दक्षिणेतील शाह्यांशी आणि मोगलांशी तसेच युरोपमधून आलेल्या इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या सर्वांशी…

१/८
…एकाच आघाडीवर संघर्ष केला, आणि त्यांना त्यात यशही येत गेले.

वेगवेगळ्या साम्राज्यांच्या आणि मुसलमानी शाह्यांच्या सत्तांतरामुळे महाराष्ट्रात जो राजकीय अस्थिरपणा आला होता त्याला योग्य वळणावर नेण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली.

२/८
याच गोष्टीमुळे इतर राजांच्या तुलनेत महाराजांचे वेगळेपण दिसून येते.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराजाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांचा वारसा चालवत मोगलांशी विश्रांती न घेता सलग ९ वर्षे अविरत लढा दिला.

३/८
Read 8 tweets
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवरायांनी "दंडाराजपुरी" हिंदवी स्वराज्यात दाखल केले.

🚩३१ जुलै १६५७🚩
मुघलांनी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला "कल्याणी किल्ला" जिंकून घेतला.
🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ३१ जुलै १६५७ रोजी निळोपंत रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्याबरोबर आरमार व फौज देऊन जंजिरा काबीज करण्यासाठी पाठवले.

🚩३१ जुलै १६५८🚩
औरंगजेब मुघल सम्राटच्या तख्तावर बसला.
🚩३१ जुलै १६७७🚩
दक्षिण दिग्विजय मोहीम
छत्रपती श्री शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती" ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम" ला शिवशंकराचे दर्शन घेतले

🚩३१ जुलै १६८१🚩
औरंगजेबाने अजमिरहून आजमशहास शहजादा अकबर याच्यावर रवाना केले.
Read 17 tweets
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩३० जुलै १६७७🚩
"दक्षिण दीग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले.
🚩३० जुलै १६८२🚩
कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"मोगल बादशहा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी (किमॉश) खाली उतरली आणि शपथ घेतली की, छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याशिवाय किंवा राज्यांतून हाकलून
दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही. अशी प्रतिज्ञा केली आहे. औरंगजेब बादशहाला दक्षिणेत येऊन एक ते दीड वर्ष झाले. प्रचंड सेनादल, भक्कम दारुगोळा, कसलेले सेनानी, अमाप पैसा पणाला लावणाऱ्या औरंगजेब बादशहाला डोक्यावरचे "किमॉश " खाली टाकावयास लावून बोडके व्हावे लागले.
Read 11 tweets
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही, ह्या वादावर अजून एक वाद म्हणून आता , छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या भेटीचा तपशील मागत कोकाटेंनी वाद निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत+
सातारा शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना, अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे.
या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.👇

esakal.com/satara/satara-…
आता थोडेसे त्या शिल्पा बद्दल. सातारा शहरातील ,
ह्या शिल्पाचे अनावरण , महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या हस्ते २६ एप्रिल १९९० साली झाले होते.
आणि योगायोग असा की , आज कोकाटे जे बोलले आहेत ते छापून आणण्याचे काम सुध्धा
Read 34 tweets
🚩#आजचे_शिवकालीन_ऐतिहासीक_दिनविशेष🚩
२१ सप्टेंबर १६६५ "#छत्रपती_शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले.
२१ सप्टेबर १६८४
औरंगजेबाने " छत्रपति शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन Image
खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले.
२१ सप्टेंबर १६८७
औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही.

संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड"
लेखक सुरज बबन थोरात "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र"

🚩🙏 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🙏🚩
Read 3 tweets
छत्रपती शिवाजी महाराजांची व कवी भूषण यांची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे महाराजांना समजले,त्यांनी म्हटलं, आपण कवी आहात? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का?
कवी भुषणांनी म्हटलं हे राजन,
इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर ।।
रावण सदंभपर। रघुकुलराज है ।।
पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर ।।
जो सहसबाहपर। रामद्विजराज है ।।
दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर ।।
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है ।।
तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर ।।
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है ।।

#शेर_शिवराज_है।।

#मराठी_अर्थ:
इंद्र जसा जंभासुरावर,
जमीनीवरचे वादळ जसे आकाशावर,
रावणाच्या लंकेवर जसा रघुकुळाचा
राजा प्रभूरामचंद्र चालून गेले होते,
वारा जसा पाण्याने भरलेल्या ढगांवर,
शंकर जसा रतीचा पती मदनावर,
सहत्र क्षत्रियांवर जसा परशुराम चालून गेले होते,
आकाशातली विज जशी लाकडी बुंध्यावर,
चित्ता जसा हरणांच्या कळपावर,
सिंह(मृगराज) जसा हत्तीवर,
प्रकाशाचा किरण जसा अंधार कापतो,
Read 8 tweets
।। शिवरायांचे आठवावे रूप ।।

आपण शिवरायांना पाहिले नाही, पण विविध चित्राच्या माध्यमातुन महाराजांना पाहतो.
त्यांना मानतो, त्यांची मनोभावे भक्ती, पूजा करतो.
पण ज्यांनी डोळ्यादेखत महाराजांना पाहिलंय त्यांच्या तोंडून आज आपण ऐकू की आपले महाराज कसे दिसायचे?

१/६
फ्रेंच प्रवासी जीन दे थिवनोट म्हणतो,

- शिवरायांची उंची कमी आहे.
- नजर चपळ आहे.
- महाराज दिवसातून एकदाच जेवायचे.
- आरोग्य चांगले आहे.
- आणि जेव्हा सुरत १६६४ मध्ये बदसुरत केली तेव्हा ते ३५ वर्षांचे होते.

२/६
पोर्तुगीज इतिहासकार कॉस्मे दे गार्ड म्हणतो,

- महाराज त्यांच्या कृती मध्ये चपळ होते.
- स्पष्ट आणि गोऱ्या चेहेऱ्यामुळे निसर्गाने त्यांना परिपूर्णता दिली आहे.
- गडद मोठे डोळे अगदी सुर्याकिरणाप्रमाणे भासत.
- ह्याखेरीज त्यांची वागणूक स्पष्ट आणि चतुर होती

३/६
Read 6 tweets
🚩#Thread: Shrimant Thorle Bajirao: The Expansionist Peshwa🚩

I pay my humble tributes to one of India’s greatest cavalry generals, a man who fought 41 battles and is reputed to have lost none, on his 320th Birth Anniversary.

🚩🚩🚩🚩🚩

(1/18)
The death of Chhatrapati Shahu Maharaj’s first #Peshwa & Bajirao’s father, Balaji Vishwanath left the #Chhatrapati in doubt. Several of his advisors advised him not to handover the premiership to Bajirao.

From a very young age, #Bajirao used to accompany...

(2/18)
...his father on expeditions & diplomatic missions. Hence, Chhatrapati Shahu Maharaj was convinced that Bajirao was the right person to overthrow the Nizam.

On 17th April, 1720, a 19-year-old Bajirao became the Peshwa of the #MarathaEmpire.

(3/18)
Read 23 tweets
शके १५८८ पराभव संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध द्वितीया #राजश्री_शिवाजी_राजे आगरिया जाऊन औरंगजेबाची भेट घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादशी आगरियातून पेटारियात बैसोन पळाले. यावरी #राजश्री_संभाजी_राजेसह वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस रायगडास आले.
#जेधे_शकावली.🚩 Image
ही ३५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.
मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले
नव्हते. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाला शाहजहानलाही ते जमले नव्हते. पण छत्रपति शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले. आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला.
ती तारीख होती –
🚩१७ ऑगस्ट १६६६ 🚩

🚩#जय_जिजाऊ #जय_शिवराय 🙏🏻 🚩
Read 3 tweets
आणि अखेर.....

गेल्या २४ तासात २ युद्ध १ चकमक संपून भयाण शांतता पसरली होती.
काल रात्री ( अर्थात १६६० ची गोष्ट ) अंदाजे ९.४५ च्या दरम्यान २ पालखी किल्ले पन्हाळगडावरून निघाल्या.

१/१०
एक शिवरायांच्या रुपात शिवाकशीद काकांची.
दुसरी खुद्द छ्त्रपती श्री शिवरायांची.
शिवाकशीद काकांची आणि जौहरची भेट झाली आणि शिवा काशीद काकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. सोबत मावळे असल्याने चकमक झालीच असणार.
ठरलेला बेत फसला!

२/१०
पुढे खुद्द महाराजांची पालखी घेऊन बांदलसैनिक बेभान पळत होते. दगडं, काटे, झुडपे कशाचीही पर्वा न करता फक्त धावपळ करीत होते कारण स्वराज्याचे राजे सुखरूप पोहोचले पाहिजे. वेढ्यातून वाचले पाहिजेत इतकेच ध्येय पुढ्यात ठेऊन नुसती धावपीठ.

३/१०
Read 10 tweets
म्हणून एका बाळंतिणीला पोरासकट ह्या बुरुजाखाली पुरला.........

#Thread #धागा

स्वराज्याचा विस्तार होत होता. एक एक किल्ले, प्रांत स्वराज्यात सामील होऊ लागले होते. अश्याचवेळी बाजीप्रभूकाका आणि बांदलसेना ही स्वराज्यसेवेत रुजू झाली होती.

१/१७
महाराजांनी बाजीप्रभूंवर पडीक असलेला जासलोड गड बांधून घेण्याची जबाबदारी दिली होती. तीन वर्षात गड बांधून, सजून तयार झाला होता. गडाला भक्कम तटबंदी, देवीचे मंदिर, किल्लेदाराचा वाडा, सदर, पागा, इमारती बांधल्या होत्या.

२/१७
गड बांधून झल्याची खबर राजगडावर पोहोचली आणि महाराजांना गडाची पाहणी करण्यासाठी आमंत्रण धाडले होते. अगदी अतुरतेने गडावरील मंडळी महाराजांची वाट पाहत होते. सदरेवर राजांसाठी खास बैठक तयार होती. दारात रांगोळ्या काढल्या होत्या.

३/१७
Read 17 tweets
।। अपिरिचित इतिहास ।।

#शिवकालीन_दगडी_पूल

जावळीचं खोरं म्हटलं की आठवतो,
१. तो दिमाखात उभा असलेला किल्ले प्रतापगड.
२. शिवप्रताप
३. आई भवानी आणि
४. तिच्यासाठी फाडलेला तो ३२ दातांचा बोकड

#Thread #धागा

१/८
जावळीच्या खोऱ्यामुळे होणारा मुसळधार पाऊस आणि कोयना नदीच्या जोरदार वाहणाऱ्या प्रवाहामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येण्या जाण्यासाठी नेहमी अडचण असायची.
ज्यामुळे गावाचा संपर्क तुटायचा, माहिती मिळणे कठीण व्हायचे आणि म्हणून या भागातून प्रवास करणं फार कठीण व्हायचं.

२/८
संपर्क तुटूनये म्हणून शिवरायांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आणि पार्वतीपूर/पार गावाजवळ दगडी चिऱ्यांचा पूल उभारला.
शिवरायांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो.

३/८
Read 9 tweets
आत्मनिर्भर आणि छ्त्रपती श्री शिवाजी महाराज!

कोरोना नंतर मध्यंतरी एक शब्द बराच गाजला, #आत्मनिर्भर
तर आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी, स्वयंसिद्धता, स्वदेशी.
एखादा राज्यकर्ता स्वदेशी वस्तूंबद्दल जागरूक असेल तरच देशाची आर्थिक स्तिथी मजबूत असते.

#Thread #धागा

१/१५
शिवकाळात ह्याच आत्मनिर्भरतेचा उपयोग महाराजांनी कसा केला होता ह्याबद्दल आज जाणून घेऊया.
दोन वेळेचं जेवण मिळावं म्हणून आपण मेहनत घेतो आणि त्याच जेवणाला चव देणारा पदार्थ म्हणजे #मीठ

होय, विषय आहे मिठाचा!
शिवस्वराज्यातील मिठाचा!

२/१५
शिवकाळात, मीठ हे कोकण किनारपट्टीवर तयार होऊन, घाटाघाटातून देशावर विक्रीसाठी जात असे.
मिठाचे व्यापारी उत्तरेतून दक्षिणेत मिठाच्या व्यापराकरिता येत असत.
कुलाबा, ठाणे, पेन, पनवेल नागोठणे, रेवदंडा आणि ठाणे शहरातील मिठबंदर प्रसिद्ध होती.

३/१५
Read 15 tweets
सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी आदिलशाही, निजामशाही,मुघल सल्तनत,सिद्दी जौहर, कुतुबशाही,इंग्रज,पोर्तुगिज, डच व जुलमी राजवटींच्या विरुद्ध लढा उभारुन रयतेचं राज्य निर्माण करून लोकशाहीची बीजे या मातीत रोवणाऱ्या,इथली जमीन नांगरुन अन् माणसांच्या मनात स्वराज्य पेरणाऱ्या,
#शिवराज्याभिषेक Image
स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून ती एक नवनिर्मितीचा ऊर्जास्रोत आहे हे कृतीतून दाखवून देणारा, गरिबांच रक्तपिऊन मदमस्त झालेल्या धर्मसत्तेला राजदंडाचा धाकनिर्माण करणारे, अठरापगड जाती बारा बलुतेदार अठरा अलुतेदारांना क्षत्रिय बनवून हाती शस्त्र व लढण्याची स्फूर्ती देणारे
#शिवराज्याभिषेक Image
कुळवाडीभूषण बहुजनप्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना यांना मानाचा मुजरा 🙌🏻

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

#जागर_शिवकिर्तीचा
#शिवराय_असे_शक्तीदाता
🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩
||♦|| #जय_शिवराय ||♦||

#शिवराज्याभिषेक Image
Read 4 tweets
।। श्रीशिवराजाभिषेक२०२० ।। #Thread

१. बुंदेलखंडहून छत्रसाल येऊन म्हणतात राजे मला तुमच्या स्वराज्यसेवेत घ्या.
२. कवी भूषण जे तिकवापूर हुन स्वराज्यात येऊन महाराजांची भेट घेतात आणि स्वराज्याचे होऊन बसतात.
३. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांवर बहुमोल विश्लेषणाची उधळण केली आहे.

१/२५
४. ५०० कोसांवरच्या तंजावरहुन जयरामकवी सारखा बारा भाषांचा बृहस्पती राजेंच्या दर्शनासाठी येतो आणि दर्शन घेऊन शिवरायांचे चरित्र विविध भाषेत गुंफण्याचा संकल्प करतो. त्यास आरंभ ही करतो.
महाराजांच्या चरित्रातून त्या कवींना किती स्फूर्ती मिळाली!

२/२५
महाराजांच्या योग्यतेचा साक्षात्कार महाराष्ट्रपुरता मर्यादित न्हवता तर महाराष्ट्राबाहेर उत्तरेत आणि दक्षिणेत ही पसरलेली आहे ह्याचा भरघोस पुरावे म्हणजे वरील ४ उदाहरण. महाराज कर्तबगारांच्या, कलावंतांच्या, विद्वानांच्या, कृषीमुनींच्या मनात किती बिंबली होती हे लक्षात येतं.

३/२५
Read 27 tweets
"छत्रपती संभाजी महाराज

शंभुराजांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा तो औरंगजेब "सिवाच्या पोराला" पाहायला सिंहासन सोडून खाली उतरला. अत्याचाराने माराने घायाळ झालेले शरीर, पण....मान ताठच, नजर हि तशीच....त्या नजरेकडे पाहत औरंगजेब विचार करू लागला....
तो हाच का संभा??ज्याने ह्या आलमगीराला नऊ वर्षे रानोमाळ हिंडवल....
एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन फिरतो तद्वतच ह्याने मला फिरवलं.....

माझे नामांकित सरदार ज्यांच्या शौर्यावर मी अनेक लढाया जिंकल्या, त्यांनाच ह्याने आस्मान दाखवलं??
माझी कैक लाखांची सेना लांबून एखाद्याने पहिली तर छातीत धडकीच भरावी एवढं अफाट मनुष्यबळ.... पण ह्या संभाजीने पार वाट लावली त्यांची,

तो हाच का संभाजी?? वाटलं होत संभा म्हणजे शिवाजीच्या पोटाला आलेला तख्तनशील वारीस, संभाजी म्हणजे व्यसनी, दुराचारी, संभाजी म्हणजे बदफैली,
Read 40 tweets
किल्ले रायगडावरील गंगासागर तलाव!

इ.स. १६७२ मधल्या श्रावण महिन्यातील सोमवार होता तो. उषःकाल चा समय. दाट धुक्यामुळें पाच-सहा हातावरचा माणूस ही दिसत न्हवता.

#धागा

१/२५
राजप्रसादातील दुसऱ्या महालातील मुदपाकखान्यातुन जात्याची घरघर ऐकू येत होती. प्रमुख स्वयंपाकीन बाईंनी राजघराण्याच्या आजच्या न्याहारीचा आणि भोजनाचा बेत शिवराज्ञी सोयराबाईसाहेबांकडून काल रात्रीच विचारून घेतला होता.

२/२५
दूरवरून कोळिंब तलावातून आणलेल्या पाण्याचे हंडे, राजमहालालगतच्या दगडी हौदात रिते केले जात होते तसेच स्वयंपाकघरातील झोळमठात ओतले जात होते. राजप्रसादासाठी नित्यनेमाने लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था तशी दूरच पडत होती.

३/२५
Read 25 tweets
चांडाळणी तू पळण्यात कसूर केलीस!!!

०३ एप्रिल १६८० ची प्रातःकाळ होती

ऐन उमेदीतील तो तरणाबांड; धिप्पाड शरीरयष्टी, तेजस्वी आरक्त सूर्यबिंबासी तुलना करणारे ज्यांचे मुखकमल होते असा तो वीर आपल्या लाडक्या सांडणीवर स्वार होऊन आपल्या ५ अंगरक्षकासह किल्ले पन्हाळगडावरून गडउतार झाला.
ती छोटीशी टोळी मालकापूरच्या वाटेला लागली. त्या वीराच्या सांडणीबरोबर आपले घोडे दौडविताना त्या ५ अंगरक्षकांची तारांबळ उडत होती.
एक प्रहराभरात तो वीर आपल्या अनुयायांसह मलकापूर मागे टाकून आंबाघाटाच्या माथ्यावर पोहोचला.
त्या सांडणीस बांधून पायउतार होऊन दूरवर दिसणाऱ्या मावळतीकडील कोकणावर त्या वीराने आपली नजर स्थिरावत जवळच्या शिलाखंडावर बैठक घेतली. बाकीचे ५ जनही आपल्या घोड्यावरून उतरून त्या वीराच्या मागे जाऊन कमरेवरील समशेरीला धरून पुढील आदेशाची वाट पाहत उभे राहिले.
Read 20 tweets
#कोरोना_जिहाद
सर्व राष्ट्रवासीयांना एकसंध व शिस्तबद्ध करून,एक मजबुत आणि बलाढ्य राष्ट्र घडविण्यासाठी #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघाची स्थापना डॉ.हेडगेवारांनी 1925मध्ये केली,
आणि,
या #तबलीगी_जमात ची स्थापना #मौलाना_साद चे पणजोबा मौलाना इलियास कंधालवी यांनी1927साली केली.

संपुर्ण धागा👇
एकीकडे, गेली साडे नऊ दशकं,म्हणजेच 95वर्षे,#RSS ने अनेक संकटाना,विरोधांना आणि विरोधकांना तोंड देत आपलं राष्ट्रकार्य अविरतपणे म्हणजेच एखाद्या #नंदादीपा प्रमाणे नेहमीच तेवत ठेवलं आहे,आणि ते या सृष्टीप्रलयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत चालूच राहिल,असा माझा स्वयंसेवक म्हणून विश्वास आहे 🙏
पण,काही लोक जे नेहमीच #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ,#सनातन_प्रभात, #श्रीराम_सेना आणि इतर #हिंदुत्ववादी संघटनांना,आतंकवादी/दहशतवादी असं बिनदिक्कत संबोधत असतात,आणि जेंव्हा राष्ट्रावर कोणतंही असमानी,कुदरती, किंवा हे #कोरोनावायरस सारखं मानव निर्मित संकट आलं की हे लोकं निवांत लपून बसतात..
Read 9 tweets
#कोरोना_जिहाद
संपुर्ण जगावर #coronavirus चं महासंकट घोंगावत आहेच,मागच्या महिन्यापासून जो तो #कोरोना वरचं घसा कोरडा करतोय,तरी सुद्धा दिल्लीत #सुन्नी_समाजाचं #तबलीगी_जमात हे संमेलन भरवलं गेलं,कारण अल्लाहच्या बंद्यांना काहीही होणार नाही कारण, #चायना त्यांचा मित्र आहे
संपुर्ण धागा👇
#चीन आणि #ISI चं मिळून हे षडयंत्र आहेच,
जसं चीन ने सगळ्यांसमोर #वुहानला पुढे करून संपुर्ण चीन वर #आंतरराष्ट्रीय_मेहरबानी करवून घेतली, आणि #युरोप#अमेरिकेला गप्प घरात बसवलं व जगाच्या 30% अर्थकारणाचे मालक झाले,..
नेहमी #हिंदी_चिनी_भाई_भाई म्हणत काटा काढणारे हे नालायक कम्युनिस्ट,त्यांचा पारंपरिक दुश्मन #हिंदुस्थान अजुन स्थिर आहे,हे त्यांना बघवलं नाही,म्हणून त्यांचा पारंपरिक मित्र असलेल्या #पाकिस्तानाचा वझीर #ISI ला त्यांनी ही #तबलीगी_जमात ची जबाबदारी #गजवाह_ए_हिंद म्हणून सोपवली असणार.. !
Read 8 tweets
जेव्हा अल्ला हु अकबरचे नारे लागतात तेव्हा #आतंकवाद माजतो.
आणि जेव्हा #हर_हर_महादेव जयघोष होतो तेव्हा त्याच आतंकवादाचा कोथळा बाहेर पडतो.

१/४ पूर्ण धागा 👇
सिद्ध झालंय बरं!
इतिहास साक्षी आहे. आम्ही अफजलला जित्ता नाही सोडला. शाहिस्त्याच्या जीवावरचं संकट बोटावर निभावलं आणि औरंग्याचं थदगही इथेच बांधलं.

२/४
पाणी पिणाऱ्या तुमच्या घोड्यांनाही तळ्यात #संताजी_धनाजी काका दिसायचे. इतका आमचा दरारा आहे!
संविधानाने आमचे हात बांधलेयत अन्यथा #शिवचरित्र आम्हाला जिहाद सहन करायची परवानगी देत नाही.

३/४
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!