Discover and read the best of Twitter Threads about #झुंड_पे_बोल

Most recents (3)

झुंडला ९०० स्क्रीन्स संपूर्ण देशात मिळाल्या आहेत. त्यात २०० स्क्रीन्स मुंबईत आहेत. पावनखिंडला पहिल्या आठवड्यात २५०० स्क्रीन्स एकट्या महाराष्ट्रात मिळालेल्या होत्या. ४५०० स्क्रीन्स वर गंगूबाई चालू आहे. इथेच फरक संपत नाही.
शोज ची संख्या हा कळीचा मुद्दा आहे. ९०० स्क्रीन्समधे ६५% शो हे मोर्निंग शोज आहेत. त्याला सरासरी १ ते १.५ % पब्लिक असतं. म्हणजे ९०० स्क्रीन्समधे फक्त ३५% शोज हे दिवसाच्या टायमिंगला आहेत.
अशाप्रकारे नागराज अण्णाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बघुया पुढं काय होतं ते.

#झुंड_पे_बोल
#करदे_झुंड_टॅक्सफ्री
#TaxFreeJhund
#Jhundthemovie
Read 3 tweets
झुंड... या चित्रपटातील प्रमुख पात्र आहे भिंत! एक अशी भिंत जी लोकांना विभागते. त्या भिंतीला असलेला एक लोखंडी दरवाजा आणि तिथे असलेलं एक कुलूप हा या कहाणीचा आत्मा आहे... बाकी कथा, पात्र, अभिनय ही सगळी माध्यमं आहेत! ImageImage
ही भिंत प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नागराजने अशी एक वेगळी भिंत दाखवली आहे आणि त्या प्रत्येक भिंतीच्या दरवाजावर लावलेलं कुलूप त्याला तोडायचं आहे आणि शेवटी ती भिंतच उध्वस्त करायची आहे जी समाजाला कोणत्याही दोन गोष्टीत विभागाते!
फोटो:
सोसायटीच्या भिंतीच्या बाजुला ही झोपडपट्टी आहे. हा लहान मुलगा रोज दिसतो, त्याचं नाव 'शेरू' आहे... काहीतरी लिहीत बसलेला असतो. पाठीमागे 'स्मार्ट सिटी' असं लिहीलेला दगड आहे!
Read 4 tweets
झुंड- विद्रोही आहे का?

तुमच्या घरात येणारी घरकामवाली स्त्री, जीने एक सुट्टी घेतली तर तुम्ही ५० रुपये पगारातून कापून घेता, ती बाई ८-१० हजारात शहरात स्वतःचे कुटुंब कसे चालवत असेल? आपल्या घरी तर ती बाथरूम वापरत नाही, मग ७-८ तास ती स्वतःची लघवी, मासिक पाळीचा स्त्राव धरून ठेवत काम
कशी करत असेल? भल्या पहाटे थंडी-पावसात तुमच्या घरी दूध, पेपर टाकणारी पोरे महिन्याला ३-४ हजार रुपये कमावून स्वतःच्या घरावर कोणता सोन्याचा कळस चढवत असतील? २००-३०० रुपयांच्या पार्लरच्या कामासाठी भली मोठी बॅग सोबत घेवून तुमच्या घरी येणारे अर्बन कंपनीचे ब्युटिशिअन दिवसात किती कॉल करत
असतील आणि किती कमावत असतील?अमेझॉन, स्विगी, डंझो वगैरेसाठी मोठाल्या बॅग पाठीला लावून दिवसाला २००-३०० रुपयांसाठी उसासे टाकत जिने चढणारे डिलीव्हरी बॉय कुठल्या करीयर ग्रोथची स्वप्ने पाहत असतील? ओला, सुका कचरा गोळा करणारे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन उकिरड्यावर, डंपिंग ग्राउंडवर कचरा
Read 10 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!