Discover and read the best of Twitter Threads about #तुकाराम

Most recents (4)

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायलं
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायच

पायावर ठेवलेलं डोकं
काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
#पुस्तकवारी 1/1 Image
रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं जरा
होत नाही

#पुस्तकवारी #वारी #तुकाराम 2/2
कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधी कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगाचं
एकटेपण
#पुस्तकवारी 3/3
Read 4 tweets
I decided to write thread on Bhakti poetry on #worldpoetryday2021 but couldn't find the perfect translation of the poems written by Saint Tukaram. Finally I found the perfect translation of his selective poems by Shri. Dilip Chitre.
#हिन्दू_नववर्ष #तुकाराम #तुकाराम_गाथा Image
So I'll start posting translation of the beautiful poems of Saint Tukaram on this auspicious day of #गुढीपाडवा Bahinabai Sioorkar, the younger contemporary of Saint Tukaram , has used perfect metaphor of a temple to describe the Varkari tradition of Bhakti.
She says that , Saint Dnyaneshwar laid its foundation , Namdeo built its walls , Eknath gave it a central pillar & Tukaram became its crown. Follow this thread & read his poems & you'll get to know why he is called as Crown of Varkari Sampraday..
Read 182 tweets
परवा साधकांचे मायबाप जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन दिवस होता अर्थात तुकाराम बीज. ह्या पवित्र दिवशी सुद्धा अनेक पुरोगामी लोकांकडून तुकाराम महाराजांचं नाव पुढे करून ब्राह्मणांना शिव्या देण्याचे काम झाले. हे पुरोगामी स्वतःला एकीकडे जातपात न मानणारे
१/
दाखवातात आणि दुसरीकडे ब्राम्हणांना शिव्या देण्याशिवाय दुसरं काही काम करत नाहीत.
अहो जे तुकाराम महाराज 'विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।' असं सांगतात किंवा जे तुकाराम महाराज 'वर्ण अभिमान विसरली याति। एक एका लोटांगणे जाती।।' हे बोलतात ते तुकाराम महाराज
२/
एखाद्या विशिष्ट जातीला शिव्या कशा देतील.!बर हे लोक आपल्या म्हणण्याला आधार म्हणून गाथेतील काही अर्धवट अभंगांचे पद दाखवतात. ह्या सगळ्या लोकांना आधी माझा हा प्रश्न आहे की बाबांनो तुमची अध्यात्मिक पातळी काय आहे? कारण तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे काही गाण्याचं किंवा कवितांचं
३/
Read 29 tweets
संत तुकाराम महाराज~
संतांचे धन्य दिवस !
आजी दर्शन संतांचें ।
नांदे तया घरी दैवत पंढरीचें ॥
धन्य पुण्यरूप कैसा जाला सौसारू ।
देव आणि भक्त दुजा नाहीं विचारू ॥
धन्य पूर्वपुण्य वाढवलें निरूतें ।
संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते ॥
तुका म्हणे , धन्य !
आम्हां जोडिली जोडी ।
संतांचे चरण आतां जीवेंन सोडी ।
मराठी भाषांतर-या अभंगातून तुकोबांनी संतांचा महिमा असा वर्णिला आहे की , संत समाजाचे गुरू आहेत . ते समाजाला सुविचार सांगून योग्य मार्गदर्शन करतात . ते त्यावर सुसंस्कार करतात ,
त्यामुळे समाजातील अपप्रवृत्ती नाहीशा होतात आणि समाजमनाला सत्प्रवृत्तींकडे वळवण्याची प्रेरणा मिळते . समाजाचा उद्धार होतो . खरे तर देश संतांच्याच घरी राहतो ; त्यामुळे संत नि देव वेगवेगळे आहेत ,
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!