Discover and read the best of Twitter Threads about #धागा

Most recents (24)

मी साधारण ९ वर्षा चा असेन. एकदा माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राचे निधन झाले. त्या वेळी माझ्या वडिलांनी मला जबरदस्तीने त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी स्मशानभूमीत नेले. मी तर त्यांच्या मित्राला ओळखत देखील नव्हतो.
#म #मराठी #धागा #रिम
ज्या वेळी मी स्मशानभूमीत गेलो त्या वेळी सर्व कार्य चालू असताना एका कोपऱ्यात उभा राहिलो व होणारे विधी पहात राहिलो. तेवढ्यात एक जण माझ्या कडे आला व म्हणाला बाळा कायम सुखी राहण्याचा प्रयत्न कर, आनंदात आयुष्य जगून घे. माझ्याकडे बघ.
@MarathiPattern @MarathiRT @rt_marathi @Marhathi
माझ्याकडे सर्व साधने असताना सुद्धा मी आयुष्याचा उपभोग घेऊ शकलो नाही. एवढे बोलून माझ्या डोक्यावरून हात फिरवून तो निघून गेला.
थोड्यावेळाने माझ्या वडिलांनी मला पार्थिवाला नमस्कार करण्यास बोलविले. मी नमस्कार करताना पार्थिवाच्या चेहेऱ्याकडे बघितले व हादरलोच.
@kahipnapl13 @realkunal7
Read 6 tweets
#धागा

#आयुर्वेद च का?

Mayo Clinic वर प्रकाशित झालेल्या वैद्यकीय संशोधनानुसार; दोन वर्षे वयापेक्षा कमी असलेल्या बालकांना अँटिबायोटिक्स दिली गेल्यास पुढे जाऊन त्यांना त्वचाविकार, स्थौल्य, ADHD, पचनसंस्थेचे विकार, दमा इत्यादी त्रास होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. +
जितक्या जास्त वेळा अँटिबायोटिक्स दिले जातील तितके गंभीर परिणाम त्या मुलांवरती पुढे जाऊन दिसू शकतात. Milk and Cookie Disease हा शब्ददेखील बालरोगतज्ज्ञांमध्ये आता रूढ झालेला आहे. दुध + बिस्किटे/ कुकीज देण्याच्या पाश्चात्य पद्धतीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. +
तज्ज्ञांच्या मतानुसार या दोन्ही गोष्टी प्रदीर्घ काळाकरता एकत्रितपणे सेवन केल्यावर त्याचे शरीरावरती अत्यंत हानीकारक असे परिणाम दिसून येतात.

गेली काही वर्षे आमच्यासारखे वैद्य सातत्याने वरील दोन्ही गोष्टींबाबत कंठशोष करून सांगत आहेत; की पुढच्या पिढ्यांची आयुष्य नासवू नका! +
Read 7 tweets
#पर्यावरण = #धर्मवाद❌ 👈#धागा

कोरोनाने कितीही भयंकर परिस्थिती निर्माण केली असली तरी सकारात्मक बाब होती ती पर्यावरण शुद्धी ची!!माझं नाही पर्यावरण अभ्यासकांचा अस म्हणणं आहे की प्रदूषण कमी झालं टाळे बंदी मुळे.

#म #रिम #मराठी @rt_marathi @MaadhavPatill 👇+
पण धर्मवादाच्या नावावर का असेना देशातील महान युवावर्गाने पुन्हा होती तशी परिस्थिती निर्माण करण्याचा वसा घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक.
फटाक्यातून निघणार धूर कार्बन डायऑक्साइड सोडतो,त्यात सध्या मास्क घालत असल्यामुळे ऑक्सिजन चा पुरवठा पण थोडा कमी प्रमाणात होतोय शरीराला.👇+
पण परमज्ञानी लोकांना बकरी ईद आठवते.प्राणी हत्या ही चुकीचीच पण धर्मवाद्यांना सांगू इच्छितो प्राणी हत्या हिंदू धर्मात पण केली जाते,जरा मेहनत घ्या आणि संशोधन करा यावरही.दुसरा वाईट करतोय म्हणून आपण चांगलं नाही करायचं,आपण त्याहून दुप्पटीने वाईट करायचं हे थोडं गंभीर आजाराचं लक्षण.
👇+
Read 7 tweets
माझ्या आईला त्याबद्दल काय वाटेल?

#धागा #Thread

हा फोटो आहे स्पेन चा इवान फर्नांडीज केनिया च्या हाबेल मुताई ला स्पर्धा जिंकण्यासाठीची रेष ओलांडण्यास मदत करतानाचा. Image
झाले असे की,
२०१२ साली स्पेनच्या नावरा येथे क्रॉस कंट्री रेस मॅरेथॉन आयोजित केली गेली होती. त्यात अनेक देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धक आले होते. इवान फर्नांडिज अनाया हा स्पेनचा धावपटू यात सहभागी झाला होता. Image
शर्यत अखेरच्या टप्प्यात असताना केनियाचा हाबेल मुताई शर्यत जिंकण्यापासून शेवटच्या ओळीपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो चिन्हात गोंधळून गेला आणि त्याला वाटले त्याने शर्यत पूर्ण केली. स्पॅनिश स्पर्धक इवान फर्नांडिज त्याच्या मागे होता. Image
Read 7 tweets
भारतात Tesla येणार का??? या चर्चेतून सुरु केलेली ही #धाग्यांची मालिका आज ३ऱ्या धाग्यानं समाप्त करतो.
जर वाटलंच तर नंतर कधीतरी SpaceX वर एक धागा टाकेल. थ्रेड च्या शेवटी मागील दोन्ही part देत आहे आणी याचं धाग्यात Boring, Hyperloop, SpaceX, Tesla, solar city बद्दल समजावं(१/n)#धागा
म्हणून Youtube लिंक देतोय १-२min च्या असतीलConcept समजायला सोप्प हॊईल✌️
आजच्या शेवटच्या धाग्यात आपण थोडक्यात भारतीय EVs ची परिस्थिती आणी Tesla ला भारतात यायला एवढा वेळ का लागला ते #कटू सत्य व इतर कॉंट्रोव्हर्सी आणि मतं बघू🤘.
@TUSHARKHARE14 @faijalkhantroll
*२०१५चा मोदींचा USA दौरा माहिती असेल त्याचं वेळी त्यांनी TESLA ला भेट देऊन MUSK ला plant open करण्यासाठी भारतात यायचं आमंत्रण दिल होत नंतर गडकरीजीनी देखील भेट देऊन tesla चा एक plant भारतात open करण्यासाठी विनंती केलीं होती त्यासाठी सरकार त्याला सर्व काही देऊ इच्छित होती.+
Read 23 tweets
काल मी ELON Musk बद्दल थोडक्यात माहिती दिलीय त्याची लिंक इकडे लास्ट ला देतोय. आपण आज भारतात चर्चेचा विषय ठरलेली Teslaच्या स्थापनेबद्दल आणी Models बद्दल माहिती घेऊ.
#स्थापना-
बहुतेक लोकांना वाटतं की Teslaची स्थापना ही ELONने केलीय पण तसं नाहीये.झालं असं,
(१/n)
#धागा #रिम
जगातील नावाजलेल्या General Motorsने २००३ ला स्वतःचे EVsच उत्पादनच बंद केल.याचा फायदा घेत मार्टिन एबेरहार्ड आणी मार्क टार्पेनिंग या दोन्ही नी १जुलै २००३ला TESLA ची स्थापना केली.
दोघांनी बघितलं जर Higher efficiencyबॅटरी आणली तर High परफॉर्मन्स आणि low mileageच जे गणित बिघडत होत.+
ते दुरुस्त होईल.आता यात Muskची entryझाली ती २००४ला कारण त्याला माहिती होत भविष्य हे EVsच आहे Green Carच आहे.स्टार्टला Musk SpaceXच्या कामा मुळे Teslaत इतका Activeनव्हता पण teslaच्या 1stमॉडेल च्या Product designवर तो काम करतं होता. सुरवातीपासून Teslaत त्याने काही प्रमाणात carbon+
Read 26 tweets
🚘🚎 ELON MUSK🚀🛸
काही दिवसांपूर्वी @AUThackerayयांच ट्विट वाचलं व सगळ्या देशात चर्चा सुरु झाली Teslaमहाराष्ट्रात येणार की काय 🤗.
१९व्या शतकातील महान वैज्ञानिक निकोलस Tesla यांच्या नावाने सुरु झालेली ही E-Carकंपनी आणि तिचा संस्थापक Elon Muskही दोन्ही नावे आता(१/n)
#धागा #रिम
आता जगाला जवळपास परीचीत झाली असतील.ह्या धाग्यातूनELON MUSKआणि त्याच्या वेगवेगळ्या कंपनीबाबत जाणून घेऊ.
थ्रेड मोठाय कारण ह्यो माणूसच मोठ्ठाय😎

#Elon Musk कोण आहेत.

यशस्वी उद्योजक,संशोधक,इंजिनीयर,इन्व्हेस्टर🙆‍♂️असलेल्या Elonचा जन्म हा southआफ्रिकेतील प्रिटोरिया इथ २८जुन१९७१ला झाला+
वयाच्या १0व्या वर्षी प्रोगॅमींग मध्ये इंटरेस्ट आला म्हणून स्वतः शिकून नंतर १२व्या वर्षी "ब्लास्टर"नावाचा game codeबनवला🤯.
बरं नुसताच बनवला नाही तर ५00$ला तो एका गेमिंग कंपनी ला विकला(संशोधक+उद्योजक)😎
पुढं तो कॅनडात १९८९ ला १७वय असताना आला.तिथं Queens Univ.ला २वर्ष शिकला.+
Read 26 tweets
👩‍⚖️ राष्ट्रीय महिला आयोग 👩‍⚖️
सध्याच्या NCW च्या अध्यक्षा रेखाशर्मा यांच्या मुळे राष्ट्रीय महिला आयोग खूप चर्चेत आलाय.
याला कारणही तशी आहे,देशात घडणाऱ्या हाथरस प्रकरणात त्यांनी दाखवलेली तत्परता असो(१/n)
{#धागा थोडा मोठा हाय पण मत वाचा शेवटी आणि तुमचीही दया मतं. मतं लोकशाही टिकवता} ImageImage
की काल परवा लव जिहादवरून MHचे कट्टर secularअसणाऱ्या राज्यपाल महोदयांची भेट असो{तसही लव जिहाद ही termभारतीय कायद्यात नाही हे अमितशहा यांच्या होममिनिस्ट्री ने आधीच संसदेत क्लिअर केलंय}असो आता आपण इकडे राष्ट्रीय महिला आयोग काय असतो त्याची स्थापना,कर्तव्य व इतर माहिती जाणून घेऊ.(२/n) ImageImage
#स्थापना
"राष्ट्रीय महिला आयोगAct१९९०"नुसार भारत सरकारने३१जानेवारी१९९२मध्ये वैधानिक असलेल्या"राष्ट्रीय महिला आयोगाची"स्थापना केली.वैधानिक म्हणजे काय तर जेव्हा एखादी संस्था ही घटनेत नमूद नसते पण एखाद्या विशिष्ट कार्यासाठी तिची स्थापना विशेष कायद्याअंतर्गत केली जाते अशी संस्था(३/n)
Read 22 tweets
🔥 कलम ३७०🔥
स्वातंत्र्योत्तर भारतात काही ठराविक ऐतिहासिक असे निर्णय घेतले गेले. ते योग्य होते की अयोग्य होते याचं उत्तर येणारा काळ देत गेला.
जवळपास १ वर्षापूर्वी असाच एक निर्णय तत्कालीन भाजपा gov ने घेतला.अमित शहा यांचा हा फोटो तेव्हा खूप viral झाला होता.(१/n)
#धागा👇
भारतीय संविधानातील हा एक ऐतिहासिक व खूप काळापासून वादग्रस्त असलेला हा कलम३७० ५ऑगस्ट२०१९ला रद्द केला.
घटनेच्या भाग२१मध्ये JKबाबत तात्पुरत्या तरतुदींच्या आत हा१७ऑक्टो.१९४९ला टाकला.
या कलमाला त्या वेळी बाबासाहेबांनी विरोध दर्शवल्याने त्याचा मसुदा गोपालस्वामी अय्यंगार यांनी केला(२/n)
मुळात क३७० हे अस्थायी होत.म्हणजे काय रं लका,🤨
तर क३७०(३)नुसार prez ला JK च्या संविधान सभेच्या सल्लामसलतीने/मंजुरीने क३७०रद्द करायचा अधिकार होता आणि गमंत 🤭अशी आहे JK ची संविधान सभा ही JK ची घटना बनवून २६जाने.१९५७लाच रद्द झाली होती😯(3/n)
Read 18 tweets
आजच्या थ्रेडमध्ये #Airtel ने #oneweb सोबत केलेल्या ऐतिहासिक डीलबद्दल जाणुन घेऊया..ज्यामध्ये ही डील नक्की काय आहे, #Satellite_internet,one web बद्दल सविस्तर माहिती,Airtel च भविष्य,#jio,#brexit,satellite internetमध्ये गुंतलेली नावे,#sharemarket..हे जाणुया..#म #धागा @dreamzunite
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची‌ ऐतिहासिक ४५%‌‌ भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी‌ चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
Read 14 tweets
आज माजी मुख्यमंत्री फडणवीस फेसबुक लाइव्ह वर येऊन जीएसटी बद्दल बहुमुल्य विचार मांडत होते.
काही देशद्रोही लोक त्याला बुद्धिभेद म्हणतील. मात्र मामुंच्या लक्षात न आलेली काही तथ्य सांगण आवश्यक आहे.
जीएसटी तीन प्रकारचा असतोय.👇

#जीएसटी #उचललेला #धागा #म
राज्यात व्यवहार झाला तर एसजीएसटी आणि सीजीएसटी , दोन्ही निम्मे निम्मे.म्हणजे, टक्केवारी ५+५=१०
दोन राज्यात असलेल्या लोकांत व्यवहार झाला तर आयजीएसटी, एकच कर. टक्केवारी १०
केंद्रशासित प्रदेशात व्यवहार झाला तर युजीएसटी, एकच कर, टक्केवारी १०. ( १० टक्के उदाहरण म्हणून दिलेला आहे ).👇
हा सगळा कर जीएसटी च्या पोर्टलवर चलन तयार करून भरायचा असतो.तिथे निम्म्या वाटण्या फक्त चलनात असतात , प्रत्यक्षात पैसे बँकेच्या एकाच खात्यात वळते होतात.
राज्याच्या जीएसटी पोर्टलवर पूर्वी विक्रीकर विभागाच्या पोर्टलवर भरले जाणारे कर जे आजही अस्तित्वात आहे 👇
Read 6 tweets
#Tanishq च्या जाहिरातीवरील माझ्या चार ओळींची पोस्ट बारकाईने न वाचता घाईत अर्थ लावून मित्र यादीतील एक गृहस्थ माझ्यावर नाराज झाले. तेव्हा त्यांच्या आकलनासाठी जो विस्तार करावा लागला तोच इथे सर्वांसाठी देत आहे.
#म #रिम #धागा #उचललेला #आवडलेला👇+
स्वत: विणलेल्या जाळीत न अडकणारा कोळी..

जात धर्म भाषा व देश या अस्मिता असतात व त्याच्या अभिमानाच्या ज्या बाळबोध जाणीवा असतात त्या पोसणारा उच्चभ्रू वर्ग स्वत: त्या बाळबोध अभिमानात अडकलेला नसतो. भिंतीवर जी कोळीष्टके असतात. ते जाळे विणणारा एक किटक असतो. त्याला कोळीच म्हणतात.
+👇
त्या जाळ्यात तो स्वत: कधीही अडकत नाही. हे कसे शक्य होते ? ती जाळी ज्या तंतूंपासून बनते तो तंतू हा कोळी त्याच्या शरीरातून सोडत असतो. त्यातील एक धागा चिकट असतो. दुसरे आवर्तन घेताना तो धागा कोरडा असतो. अशा दोन कोरड्या धाग्यांना जोडणारा एक चिकट धागा असे त्याचे काम चालते.
👇+
Read 7 tweets
#Thread #धागा #UrbanNaxals

#एल्गार_परिषदेच्या माध्यमातून हिंसा भडकवल्याबद्दल एनआयएच्या ताब्यात असलेले स्वयंघोषीत बुद्धीजिवी गौतम नौलखा यांचे पाकिस्तान गुप्तहेर संघटनेशी संबंध असल्याचे त्यांच्या विरूद्ध फाईल केलेल्या चार्जशीट मधे नमूद करण्यात आले आहे !
++
indiatoday.in/india/story/ni…
एनआयएच्या अटकेत असलेल्या ह्याच गौतम नौलखांच्या जामिनासाठी काहीच दिवसांपूर्वी #शरद_पवारांसारख्या राजकारण्यापासून #राजदीप_सरदेसाई सारख्या पत्रकारापर्यंत सर्वांनी तांडव माजवलेले होते !

तर मग चला मित्रांनो, हा गौतम नौलखा आपल्या देशासाठी किती भयानक आहे हे जाणून घेऊ !
++
२०११ साली अमेरीकेच्या एका वकीलांनी चक्क न्यायालयात #प्रतिज्ञापत्र सादर केले ज्यामधे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की गौतम नौलखाचे संबंध पाकिस्तानी गुप्तहेर संघटना #आयएसआय सोबत आहेत जे #गुलाम_नबी_फाई ने प्रस्थापित करून दिलेले होते !
आता हा गुलाम नबी फाई कोण हे जाणून घेऊ.
++
Read 16 tweets
हेदवी आणि वेळणेश्वर किनारा...

काही ठिकाणं अशी असतात.. तिथं गेलं की काळाच्या उदरात दाबून ठेवलेल्या आठवणींच्या जखमा ठसठसू लागतात. त्या जखमेवरील वाळत आलेली विसराळूपणाची खपली निघून जाते..मग वाहती जखम त्याच आठवणींच्या रक्ताने माखून जीव नकोसा करते. #म #धागा 👇 Image
हेदवी आणि वेळणेश्वर किनारा.. अतीव सूंदर.. स्वच्छ..तुलनेने कमी गर्दीचा किनारा.. नजर टिकेपर्यंत खोलवर पहुडलेला अरबी. त्यावरून येणारी वाऱ्याची प्रत्येक शाखा नसानसात शिरून नसा टच्च फुगवून टाकते.👇
इथं जवळच गणेश मंदिर आहे.. भाविक मनोभावे प्रार्थना करताना पहाणे हा माझा आवडता छंद. तो अशा दूरवरच्या प्रार्थनास्थळी हमखास उफाळून येतो. नमस्कार करताना भक्तांच्या चेहऱ्यावरील निरागसता पिता यायला हवी. मनःशांती मिळते त्याने. मंदिराच्या सभा मंडपात बसून हे करायचं असतं.👇
Read 7 tweets
कट्टरता..

ती जीवनात असो की खेळात त्यामुळे जी नामुष्की येते ती सध्या #CSK चे पंखे अनुभवत असणार.. खेळ कोणताही असो तो खेळणारे आणि त्यांचे चाहते यांच्या अंगी एक खिलाडूवृत्ती असावी लागते..तिचा अभाव असला की खेळ खेळणारे देव होतात आणि त्यांचे चाहते भक्त. #म #धागा 👇 Image
वास्तविक कोणी कोणाचा भक्त व्हावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न.. पण माझ्यासाठी जो देव आहे तो इतरांसाठीही देवच असायला हवा ही कट्टरता आत्मघातकी असते.. CSK च्या भक्तांकडे बघून ती कट्टरता उतू जात असल्याची सल अखंड भारताने गेले दशकभर अनुभवली.👇
इतर संघांवर, त्यांच्या मालकांवर आणि खेळाडूंवर नको नको ते आरोप करताना आपला संघ दोनेक वर्ष या IPL नामक कुंभमेळ्यास का मुकला होता? हा नैतिक प्रश्न ते स्वतःस कधीही विचारताना दिसत नाहीत..कारण त्यांच्या नैतिकतेच्या व्याख्येत ते बसत नाही. 👇
Read 7 tweets
हल्लीच्या सरकारचे अभिनंदन करावे असा योग्य क्वचितच येतो.. डॉक्टर, नर्सेससह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणारं विधेयक संसदेत संमत केलं त्याबद्दल संसदेचे धन्यवाद मानायला हवेत.
संसदेमध्ये साथरोग (सुधारणा) विधेयक, २०२० मंजूर झालं आहे. #म #धागा👇 Image
यानुसार साथीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नियम अधिक सक्षम आणि कठोर करण्यात आले आहेत.

नवीन बदलांमुळे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना हानी पोहचवणे, जखमी करणे किंवा जिवाला धोका निर्माण करणाऱ्या तसेच👇
त्यांना कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपत्तीला, कागदपत्रांना नुकसान पोहचवणाऱ्यांना शिक्षा आणि दंड करण्याचा नियम बनवण्यात आला आहे.या अंतर्गत सर्वाधिक पाच लाखांपर्यंतचा दंड आणि सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.👇
Read 5 tweets
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥

आमचा #FarmBills ला विरोध का आहे?
खरं वास्तविक पंजाब आणि हरियाणातील शेतकरी जून महिन्यापासून या अध्यादेशाविरोधात आवाज उठवत आहेत. तरीही हा फक्त राजकीय विरोध आहे असं चित्र रंगवलं जात आहे. तो किती तकलादू आहे दिसतंच आहे.#म #धागा 👇 Image
केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्री हरसिमरत कौर बादल आणि खुद्द RSS संबंधित विविध संघटनांनी या कायद्या विरोधात आवाज उठवला.. त्यामुळे यात राजकीय विरोधासाठी विरोध हा मुद्दाच येत नाही.

हे बिल सरकार आणि मिडलमन यांचा कृषी बाजारातील हस्तक्षेप कमी करेल आणि मुक्त मार्केट पद्धती 👇
अवलंबेल अस म्हणल जातं.. ते योग्य ही आहे. ती पुरोगामी मागणी ही होतीच. APMC मधील काही राजकारणाची चीड शेतकऱ्यांना होतीच त्यांना APMC रिफॉर्म हवे होतेच. पण सध्याच्या कायद्याच्या तरतुदीमुळे त्यामागच्या इंटेन्शन विषयी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.👇
Read 15 tweets
'पाणी हेच जीवन!!' असं असेल तर आपलं जगणं सध्या धोक्यात आहे.

'पाणी' या शब्दाचे आपणास गांभीर्य आहे का? असल्यास ते वाचवणे किंवा समन्यायी वाटप यासाठी आपण काय प्रयत्न करतो? एका अभ्यासानुसार 2025 नंतर जवळपास निम्म्याहून जास्त जग तहानलेल्या अवस्थेत असेल.आपण कुठाय यात? #म #धागा 👇 Image
ज्यावेळी पाणी मुबलक असते तेंव्हा या विचारांची आपल्यास गरज नसते... आणि पाणी टंचाई किंवा दुष्काळ पडला की टँकरने पाणीपुरवठा, रोजगार हमीची कामे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या वीज बिलात सवलत, चारा छावण्या असल्या ठोकळ उपाययोजना करतो.. 👇
खरंतर या उपाययोजना नसतातच.. वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचाराची कुरणे असतात ही.. म्हणूनच म्हणल जातं.. 'दुष्काळ आवडे सर्वांना.'

या असल्या उचपतींनी दुष्काळ मात्र हटत नाही. फक्त जागा बदलतो. कधी मराठवाडा, कधी विदर्भ, कधी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर कधी खानदेश. 👇
Read 12 tweets
गेले १५ दिवस झाले महाराष्ट्रात #राष्ट्रपती_राजवट लागु करा अशी काही लोक मागणी करत आहेत.आजच्या थ्रेडमध्ये राष्ट्रपती राजवटीबद्दल माहिती जाणून घेऊ.सोप्या शब्दात कलम,घोषणेचा आधार व देशात कितीवेळा,कुठे जास्त कुठे कमी लागु केली इ #म #मराठी #धागा #महाराष्ट्र #PresidentRuleInMaharashtra Image
एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास 'कलम ३५६' चा वापर केला जातो.राज्यशासन घटनात्मक तरतूदींनुसार चालत नाही याची खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हातात घेते यालाच 'राष्ट्रपती राजवट' किंवा 'राज्य आणीबाणी' किंवा 'घटनात्मक आणीबाणी' असे म्हटले जाते. #म #रिम Image
*कलम ३५६ लागु करण्यासाठी दोन आधार घेतले जातात.
१)कलम ३५६:-
जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना धरून चालत नाही अस जाणवलं तर ते राजवटीची घोषणा करतात.अशी घोषणा ते संबंधित राज्याच्या राज्यपालांकडुन तसा अहवाल प्राप्त झाला किंवा नाही झाला तरी करू शकतात. #कोशियारी Image
Read 13 tweets
शेतीविषयी प्रश्नांचा दुसरा एक आयाम आहे..

यंदाच्या जून महिन्यात शेतीसाठी काही आवश्यक औषधांना बंदी यादीत टाकलं गेलं.. त्यावर प्रतिक्रिया द्यायला 45 दिवसांचा अवधी दिला होता.. पण, भारतीय व्यवस्थेची कार्यक्षमता आणि धोरण गोंधळ पाहता पुढे #म #धागा 👇
नक्की काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येणे कठीण.

ज्या 27 औषधांना बंदी घातली आहे त्यासाठी दोन महत्वाची कारणे आहेत.. त्या औषधांची पर्यावरणीय घातकता आणि भारतीय शेतीची सेंद्रियतेकडे वाटचाल. आज वाटलं म्हणून उद्या लगेच सेंद्रिय भारत घडला असं होऊ शकत नाही.. भारतासारख्या खंडप्राय देशात 👇
त्या आघाडीवर किमान पाव शतक प्रबोधन आणि इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी काम करावं लागेल. ते न करता.. जे उपलब्ध आहे ते ही बंद करायचे.. आणि घातकतेच्या दृष्टीने सौम्य असा दुसरा पर्यायही उपलब्ध करून द्यायचा नाही? यात कोणते शहाणपण?

बाकी मुद्द्यांचा परामर्श पुढील काही दिवसांत घेतला जाईल.. 👇
Read 13 tweets
यंदाच्या जून महिन्यात कृषी क्षेत्राशी निगडित अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने अध्यादेश बजावले होते.. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात ते अध्यादेश कायद्यात रूपांतर करण्याची घाई सरकारला आहे. काय आहेत ते तीन होणारे कायदे? शेतकरी का संतप्त झालेत त्यावर? #म #धागा 👇
त्यातील एक प्रस्तावित कायदा लोकसभेत पारित करून घेतला गेला आहे. त्यानुसार या कायद्यांनी किमान आधारभूत किंमत (MSP) ही व्यवस्था मोडीत निघेल अशी रास्त भीती बळीराजास आहे..ती अनाठायी म्हणता येणार नाही.👇
★Farmers Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Bill

हे कायदे निर्माण झाल्यास काही महत्वाचे बदल संभवतात..

◆ सर्वात अगोदर आत्ताची नोटिफाईड मंडई व्यवस्था मोडीत निघेल.. म्हणजे शेतमाल कुठूनही विकता येऊ शकेल.ज्या मंडई खाजगी व्यापारी सुद्धा बनवू शकतील. 👇
Read 11 tweets
जिओ और जिने दो..

जगासाठी यंदाचं वर्ष मृतकाय असेलही.. पण मुकेशसाठी नाही. कारण त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ली. (RIL) ने मिळवलेली गुंतवणूक.
जानेवारी 2020 मध्ये सरकारी मालकीच्या 83 PSU चं मिळून मार्केट कॅपिटलायझेशन (m-cap) होतं ₹ 19.3 लाख कोटी . #म #धागा 👇
आणि अंबानींच्या RIL चं m-cap त्यावेळी होतं.. ₹ 9.6 लाख कोटी. कालच्या मंगळवारी सरकारी कंपन्यांचं मिळून भाग भांडवल होतं.. ₹ 15.16 लाख कोटी आणि RIL चं भाग भांडवल होतं..₹ 15.30 लाख कोटी. सरकारची सर्वात मोठी फर्म SBI चं m-cap आहे ₹1.79 लाख कोटी. 👇
गेल्या सहा एक महिन्यात RIL ने कशाप्रकारे गुंतवणूक मिळवली.. कंपनीची स्थिती स्टॉक मार्केट मध्ये कशी मजबूत होत गेली आपण पाहिलेलं आहे. जवळपास $ 33 बिलियन एवढा इक्विटी कॅपिटल उभं केलं गेलं..त्याने कंपनीचं एकूण कॅपिटल हे $207 बिलियन एवढं काल नोंदलं गेलं.👇
Read 5 tweets
#कांदानिर्यातबंदी

'या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?'

लोकमान्य आज हयात असते तर ज्वाजल्या डोळ्यांनी हा सवाल करते झाले असते.
यंदाच्या जून महिन्यात सरकारने कायद्यात बदल करून कांदा आणि बटाटा यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते.. #म #धागा 👇 Image
का? तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यात हा कायदा आडकाठी आणत होता.. त्यावेळी आम्हीच कसे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणत ऐतिहासिक वगैरे पाऊल म्हणत सरकार आणि भक्तांनी कल्लोळ माजवला होता.. ते पाऊल जर ऐतिहासिक असेल तर आज कांदा निर्यातबंदी हे पाऊल मागास आणि त्यांच्या बुद्धीप्रमाणे 👇
बुरसटलेले म्हणावे लागेल.

2014 ला काँग्रेसने अशी निर्यातबंदी घातली तेंव्हा ते नालायक आहे असे आरोळी भाजप ठोकता झाला.. कानफाट्या नाव पडलेल्या काँग्रेसला ते नाकारताही आले नाही ही शोकांतिका आहे.

मुळात बाजारदरात कृत्रिम हस्तक्षेप करण्याची सरकारला गरज काय? 👇
Read 11 tweets
काल मी #राज्यपाल पद,त्याची निवड,कालावधी व विशेषाधिकार ह्याबाबत थ्रेड लिहिला होता..आज मी राज्यपाल ज्या ठिकाणी राहतात त्या '#राजभवन' ची थोडक्यात पण उपयुक्त माहिती द्यायचा प्रयत्न केलाय ज्यामध्ये तिथे कसे जायचे,काय काय पाहायला भेटेल इ..
आवडल्यास नक्की शेअर करा!! #म #मराठी #धागा ImageImage
राजभवनाची सर्व विस्तृत माहिती तुम्हाला वेबसाईट वर मिळुनच जाईल(rajbhavan-maharashtra.gov.in) पण मी वाचकांमध्ये जिज्ञासा व उत्सुकता वाढवण्यासाठी थोडीफार माहिती देतोय🙏.मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे. Image
राजभवन अंदाजे 50 एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे. Image
Read 13 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!