Discover and read the best of Twitter Threads about #निर्मिती

Most recents (8)

फौजदारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Procedure)
थ्रेड-३
#निर्मिती
थ्रेड क्र.२ मध्ये आपण फौजदारी प्रक्रिया संहितेचा थोडक्यात इतिहास व कायद्याच्या कक्षा पाहिल्या होत्या.

आज आपण कलम २ मधील काही महत्त्वाच्या तरतुदी पाहणार आहोत.
कायद्याच्या कलम २ मध्ये काही महत्त्वाच्या शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत, त्यापैकी

'दखलपात्र गुन्हा (Cognizable offence) ही महत्त्वाची संज्ञा दिली आहे - याचा अर्थ CrPC च्या अनुसूची १ नुसार अथवा ईतर कोणत्याही कायद्यातील तरतूदी नुसार, पोलीस अधिकारी गुन्ह्यातील संशयितास..
वॉरंट शिवाय अटक करू शकतात
उदा. चोरी, खून, बलात्कार इ.

अदखलपात्र गुन्हा (Non Cognizable offence)- कायद्यात याचा अर्थ दिला नसला तरी, दखलपात्र गुन्हे सोडून सर्व गुन्ह्यांचा यात समावेश होतो.

या गुन्ह्यात, न्यायाधीशांच्या आदेशाशिवाय अटक करण्याची परवानगी पोलिसांना नसते
Read 8 tweets
पर्यावरण संदर्भात भारत सरकार कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊन उद्योगपतींच्या फायद्यासाठी EIA च्या कायद्यामध्ये बदल करत आहे. त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कृपया सर्वांनी वाचा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी @Nirmiti4Change सोबत प्रयत्न करा...🙏🏻
EIA - Environmental Impact Assessment (पर्यावरणीय प्रभाव अभ्यास)

१५ मार्च २०२० ला सरकारने EIA कायद्यात बदल करण्यासंदर्भात माहिती जाहीर केली. लोकांची मते जाणून न घेणे आणि कोरोनाचा गैरफायदा घेऊन उद्योगपतींच्या फायद्याचे कायदे बनवणे हा मुख्य हेतू.
त्यासाठी सरकारने अंतिम मुदत ३० जून दिली होती. पण कोर्टाने ही मुदत वाढवून 11 ऑगस्ट केली आहे. तर हा EIA काय आहे आणि कायद्यातील कोणते बदल पर्यावरणासाठी घातक आहेत ते जाणून घेऊया...👇🏻
Read 21 tweets
पर्यावरण व्यवस्थापन (Environment management)
भाग २

पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
(Objectives) : (१) पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे. (२) पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेषा तयार करणे. (३) पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त (Pollution Free) ठेवणे.
(४) मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे. (५) नाश होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे. (६) पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली बनवणे. प्रदूषण नियंत्रणाद्वारे पर्यावरणाच्या गुणवत्तेचे रक्षण करणे. (७) व्यवस्थापनासाठी उपायांचे समीक्षण करणे व त्यात सुधारणा करणे.
(८) व्यवस्थापनासाठी नियोजित केलेल्या उपायांच्या परिणामांची तपासणी करणे. (९) पर्यावरण शिक्षण देण्याची व्यवस्था करणे आणि जन-जागृती निर्माण करणे. (१०) संसाधनांचा बहुउद्देशीय वापर करून पारिस्थितिकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न करणे. (११) जैवविविधतेचे परिरक्षण करणे.
Read 5 tweets
" काही दिवसांपूर्वी #Technical_Write_Off करण्यावरून खूप गदारोळ झाला होता, आणि असं सांगितलं जात होतं की #Technical_Write_Off म्हणजे कर्जमाफी नाही, केलेल्या कर्जाची वसुली सुरूच राहते. या पार्श्वभूमीवर मी State Bank of India ला माहिती अधिकारात 2012-13 ते 2019-20 या 8
वर्षांत दरवर्षी 100 कोटींच्या वर थकीत कर्ज असलेल्या आणि #Technical_Write_Off केलेल्या #Loan_Accounts ची नावं मागितली होती आणि या प्रत्येक लोनची #Technical_Write_Off केल्या नंतरच्या प्रत्येक वर्षात किती वसुली झाली याची माहिती मागितली, जी स्टेट बँकेने ही माहिती एकत्रित उपलब्ध
नसल्यामुळे ती गोळा करण्यासाठी बँकेचे रिसोर्सेस मोठ्या प्रमाणावर वळवावे लागतील असे कारण सांगून नाकारली , मी State Bank चा #Share_Holder असल्याने मी आज झालेल्या State Bank च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी #Share_Holder म्हणून हीच माहीती 22 जून ला मागितली, 2
Read 8 tweets
#गोबेल्सनीती

लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणं व्हायची. देशात सर्वकाही कसं चांगलं आहे (सब चंगा सी), अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची.
👇
हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. 1936 मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती.
👇
त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचं नियंत्रण हवं, असं या प्रचार मंत्रालयाला वाटायचं.
👇
Read 7 tweets
#गोबेल्सनीती

1934 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर जोसेफ गोबेल्सला Ministry of Enlightenment and Propagandaचा कारभार देण्यात आला. प्रचार हा अदृश्य आणि सर्वत्र असावा, असं त्याला वाटायचं. त्यामुळे माध्यमं, साहित्य, कला यांच्यावर कठोर निर्बंध लादली जायची.
👇
हलके फुलके मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा नाझी विचारांचा प्रचार करणारं साहित्य, चित्रपटांना परवानगी दिली जायी. आर्यन वंश हा सर्वांत शुद्ध आहे आणि ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, या संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला जायचा. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती.
👇
प्रत्येक बातमीला नाझी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावरच ती छापली जायची. 1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वर्तमानपत्रांपैकी 69 टक्के वर्तमानपत्रं ही नाझींच्याच मालकीची होती. त्याच सुमारास जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला.
👇
Read 6 tweets
#गोबेल्सनीती

'सामान्य माणूस विचारवंत नसतो'

1934 मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जर्मनीमध्ये सर्वत्र रंगबेरंगी पोस्टर्स लावले जायचे. सर्व राजकीय पक्ष आपले पोस्टर्स रंगीत बनवून त्यावर खूप साऱ्या घोषणा आणि पक्षाचे विचार लिहीत.
👇
याच निवडणुकीत नाझी पक्षाने मात्र काळ्या पार्श्वभूमीवर हिटलरचा चेहरा आणि नाव असलेलं पोस्टर प्रसिद्ध केलं. त्या पोस्टरवर पक्षाचं नाव किंवा कोणतीही घोषणा नव्हती. हे पोस्टर आपल्या स्पष्ट आणि ठळक दिसण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलं.
👇
'सामान्य माणूस हा विश्लेषक किंवा विचारवंत नसतो म्हणून त्याच्यापर्यंत अगदी मोजक्या शब्दात आपला संदेश पोहोचला पाहिजे,' हा हिटलरचा विचार ध्यानात घेऊनच प्रचार विभागाने हे पोस्टर बनवलं होतं.
👇
Read 5 tweets
#गोबेल्सनीती

जोसेफ गोबेल्स याच्या आत्महत्येला साधारण ७५ वर्षे लोटली आहेत. तरीही 'गोबेल्सनीती' हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता भूलथापा देत असेल तर तो गोबेल्सचे प्रचारतंत्र वापरतोय असं विरोधक म्हणतात. कोण होता जोसेफ गोबेल्स?
👇
"एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. एखाद्या गोष्टीचा प्रचार करताना ती गोष्ट सोपी आणि काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी." अॅडॉल्फ हिटलरचं हे प्रचाराचं सूत्र प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स.
👇
गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी, एका प्रचारतंत्राचा जनक, नाझी पक्षाचा प्रचारक, संपादक, प्रचारमंत्री, युद्धमंत्री आणि शरणागती जाहीर करणारा जर्मनीचा एका दिवसाचा चान्सलर अशी आहे. 'गोबेल्सनीती'मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला.
👇
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!