Discover and read the best of Twitter Threads about #पुलदेशपांडे

Most recents (3)

ज्यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा व साहित्याचा इतिहास पुर्ण होवू शकत नाही असे हरहुन्नरी कलंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.🙏 पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार .@LetsReadIndia @PABKTweets @pustakanibarach @PRAVIew 👇
निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. होय पुलंवर महाराष्ट्राचं कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली.प्रख्यात मराठी लेखक, व्यंगचित्रकार, विनोदकार, वक्ते, संगीतकार आणि पटकथा-लेखक यांनी मराठी आणि भारतीय साहित्याच्या जगात कायम👇
टिकणारा वारसा सोडला आहे. या महान लेखकामुळे आज महाराष्ट्राच्या साहित्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भाषेवरील त्यांचे विशेष प्रभुत्व होत. त्यांची अनेक नाटकं प्रसिद्ध होती,मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे 👇
Read 6 tweets
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार,नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक
पद्मभूषण पु.ल.देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..! 💐💐🙏🏻
सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. त्यांनी लिहिलेली पुस्तके आपले आजही मनोरंजन करतात. पु.ल.देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही मराठी
माणसाच्या मनावर कायम आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.
Read 4 tweets
'मी आणि पु. ल.'

एका छोट्या गावातून दहावी पास करून मी सांगली ला 11वी ला ऍडमिशन घेतलं. नवीन लोक , नवीन वातावरण , जमवून घेणं अवघड जायचं .
पहिल्यांदाच घरापासून बाहेर राहिल्यामुळं नोकिया चा बटनाचा मोबाईल भेटला होता .घरी संपर्क करण्यासाठी कमी आणि मन रमवण्यासाठी त्याचा खरा उपयोग !
👇
त्या मोबाईल मध्ये 'मरणादारी' नावाची एक ऑडिओ कथा होती . गावठी भाषा , गावातली सगळी व्यक्तिचित्रण , कथाकाराची आवाजफेक यामुळं ती कथा खूप आवडायची. वाचनाची आवड आधी पासूनच होती पण कथा ऐकायला मजा यायची. पण बऱ्याचदा तेच तेच ऐकून कंटाळलो आणि मी इतर कोणत्या कथा सापडतात का हे बघू लागलो .
👇
Youtube बद्दल एवढं माहिती नव्हतं. गूगल ला मात्र मला एक website भेटली ज्यावर बरीच कथाकथन होती .तेव्हा पहिल्यांदाच मी पुलंच साहित्य अनुभवलं ! आणि तेव्हा मानगुटीवर चढलेली भूत अजून उतरलेली नाहीत . न उतरणारी च भुतं ही !
👇
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!