Discover and read the best of Twitter Threads about #पुस्तकआणिबरचकाही

Most recents (24)

#पुस्तकआणिबरचकाही
वसंत शंकर कानेटकर (२० मार्च १९२२ – ३० जानेवारी २००१) लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत.प्राध्यापक असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. मनोहर आणि सत्यकथा यांसारख्या नियतकालिकांमधून लिहिलेल्या 👇 Image
लघुकथा प्रसिद्ध झाल्या.  १९५० ते १९५७ याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. कालबाह्य रूढी-परंपरा आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या एका मनस्वी, कलासक्त, संपन्न व्यक्तिमत्त्वाची 👇 Image
ही शोकांतिका. प्रेमा, तुझा रंग कसा?, ही एक हलकी-फुलकी विनोदी, खेळकर सुखात्मिका होती. कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले.हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले.👇 Image
Read 9 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
एडगर राइज बरोज ( १ सप्टेंबर १८७५ - १९ मार्च १९५९ ) टारझन हे नाव न ऐकलेलं क्वचितच कोणीतरी असेल. एका इंग्लिश उमरावाचा मुलगा आई वडिलांचे छत्र हरवून आफ्रिकेच्या निबिड अरण्य एप्सच्या टोळी सोबत वाढतो. डोळ्याचं पातं लावताना लावतो तोच वेलींच्या आधारे  एका झाडावरून 👇
दुसऱ्या झाडावर तिथून तिसऱ्या झाडावर असा लिहिलया प्रवास करू शकतो. अंगावर फक्त एक व्याघ्राजीन, कमरेला लटकणारा धारदार सुरा, मानेवर रुळणारे केस आणि पिळदार शरीरयष्टी. एडगर राइज बरोज ने टारझन या पात्राची पहिली कथा लिहिली १९१२ मधे. बघता बघता टारझन इतका लोकप्रिय झाला की बरोजने 👇
टारझनवर २६  कादंबऱ्या लिहिल्या. हॉलीवुड निर्मात्यांच या हिरो वर गेल्या शंभर वर्षांपासून सिनेमे बनवनं सुरुच आहे. टारझन वर कॉमिक्स व ॲनिमेशन फिल्म सुद्धा बनल्या. मंगळ सफारी करणारा जॉन कार्टर हा दुसरा मानसपुत्र विज्ञान कथा चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. 👇
Read 4 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
रिचर्ड फ्रान्सिस बर्टन(१९ मार्च १८२१-२० ऑक्टोबर १८९०) प्रसिद्ध इंग्लिश समन्वेषक, चतुरस्त्र  विद्यावंत, बहुभाषाविद, अरेबियन नाइट्सचा श्रेष्ठ इंग्रजी भाषांतरकार तसेच बहुप्रसू लेखक. "माणसाला जे योग्य वाटते ते मनसोक्त करणे म्हणजे पुरुषार्थ" असे सांगणारा बर्टन. 👇 Image
एकोणिसाव्या शतकात एवढं अद्भुत विलक्षण आणि नाट्यपूर्ण जीवन जगलेला दुसरा कुणी झालाच नाही. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे. 👇 Image
ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पत्करून  हिंदुस्थानात आले. येथील त्याच्या वास्तव्यात त्याने अरबी, फार्सी, हिंदी (हिंदुस्थानी), मराठी वगैरे भाषा आणि अनेक बोली आत्मसात केल्या. (आयुष्याच्या अखेरीस त्यांना २५ भाषा व १५ बोली अवगत होत्या, असे म्हटले जाते). कराचीत असताना त्यांनी 👇 Image
Read 8 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
सई परांजपे ( १९ मार्च १९३८ ) मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.सई परांजपे हे नाव त्यांच्या 👇
बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. 👇
पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्‍त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.कथा, चष्मेबद्दूर अशा हलक्या 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
मालती बेडेकर (१८ मार्च १९०५ - ७ मे २००१) विख्यात मराठी कांदबरीलेखिका. अलंकार मंजूषा (१९३१) आणि काशीनाथ नरसिंह केळकर यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (१९३२) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. तथापि कळ्यांचे निःश्वास (१९३३) 👇
हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत 👇
कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पुढे अनेक वर्षानी साखरपुडा या मराठी चित्रपटासाठी 👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
विष्णुशास्त्री चिपळूणकर : (२० मे १८५०–१७ मार्च १८८२). ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार.त्यांचे वडील कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक  ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला पुढे ते या मासिकाचे संपादक👇
झाले. निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि 👇
त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस  ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे 👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
रा. ना. दांडेकर ( १७ मार्च १९०९ - ११ डिसेंबर २००१ ) मराठी, संस्कृत व इंग्लिश या भाषांमधून विपुल लेखन करून आपल्या विद्वत्तेची वारंवार प्रचिती आणून दिली आहे. या सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल, असा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेली वैदिक ग्रंथांची, लेखांची सूची (वैदिक 👇
बिब्लिओग्रफी - पाच भागांमध्ये) फ्रेंच विद्वान लुई रनू यांनी १९४५ पर्यंतच्या वैदिक अध्ययनाची एक सूची छापली होती. त्यानंतरच्या काळात संस्कृत, भारतविद्या यांच्यावर विपुल लेखन झाले.१९४५ पासून १९९० पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत निरनिराळ्या कालखंडांसाठी बिब्लिओग्रफी-सूची 👇
छापली आहे. सुरुवातीला कोणत्या नियतकालिकातून लेख, परीक्षणे घेतली आहेत, त्यांची सूची आहे. नंतर विषयवार विभागणी करून (सुमारे १९० वर्ग) पुस्तके व लेख यांची अकारविल्हे यादी दिली आहे. अभ्यासकाला ही सूची त्याच्या मार्गदर्शकाइतकीच मार्गदर्शक ठरते. त्यांची ग्रंथसंपदा मोजकी असली, तरी 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.
     ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले.
 ‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी 👇
‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, ‘क्षणाचं वैधव्य’  या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्‍या आहेत.
     ‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
कुमुदिनी रांगणेकर ( २५ मार्च १९०६ - १६ मार्च १९९९ ) कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार. ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. 👇 Image
त्यांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.‘अनियमित जग’ ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. ‘प्रीतीचा शोध’, ‘फुललेली कळी’, ‘शकुनी मोहर’, ‘हरपलेलं गवसलं’, 👇 Image
‘क्षणाचं वैधव्य’  या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्‍या आहेत. ‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ , ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’, ‘एकेरी गाठ’ , ‘कल्पना’ , ‘बेसूर संगीत’, ‘विरलेले वस्त्र’ , ‘परतदान’, ‘माळावरील 👇 Image
Read 6 tweets
खाकी फाइल्स - नीरज कुमार अनुवाद रोहन टिल्लू

पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेल्या नीरज कुमार ह्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील नऊ प्रकरणाचा शोध कसा घेतला हे सविस्तरपणे सांगीतले आहे.
@LetsReadIndia @PABKTweets @booksnama @pustakaayan
#पुस्तकआणिबरचकाही 👇
योगायोग या पहिल्याच प्रकरणात लाॅटरी घोटाळा इतका अवाढव्य असू शकतो.. हे वाचतांना थक्क होतो. गोव्यातील एक आमदार उघड आव्हान देतो, माझ्या बंगल्यावर रेव्ह पार्टी करतोय, हिम्मत असेल तर धाड टाकून दाखवा..एक आमदार जो पोलिसांना वाॅन्टेड असतांना सत्तधिशांच्या आशिर्वादाने राजरोस वावरतो...👇
एका डायरीच्य शेवटी लिहिलेल्या इ मेल चा शोध घेतांना दिल्लीत रोखलेले बाॅम्बस्फोट. तसेच दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी कसा वापर झाला हे व राजकारणातील गुन्हेगारी वृत्ती कोणतीही भिडभाड न बाळगता व्यक्त झाली आहे. त्यांच्या वरिष्ठांबद्दल किंवा सहकाऱ्यांशी 👇
Read 4 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
सुधीर मोघे ( ८ फेब्रुवारी १९३९ - १५ मार्च २०१४ ) कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते,
     ‘शब्दांना नसते दु:ख     शब्दांना सुखही नसते
     ते वाहतात जे ओझे      ते तुमचे माझे असते’ 👇
या शब्दांतून सहज त्याचा प्रत्यय येतो.
  कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली. 👇
‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या दूरदर्शनवरील मालिकांना त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारतें’ या हिंदी मालिकांनाही संगीत दिले. त्यांनी व्यावसायिक माहितीपटांची केलेली निर्मितीही त्यांच्यातील सर्जनशीलतेची ग्वाही देते. 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
अरुण कांबळे ( १४ मार्च १९५३ - २० डिसेंबर २००९ ) दलित साहित्य अखिल भारतीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर नेण्याचे काम करणे हीच जीवननिष्ठा, असे मानणारे ते धडाडीचे लेखक आणि कवी आहेत. मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही उच्च न्यायालयांनी संशोधन ग्रंथ म्हणून मान्यता 👇
दिलेल्या ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’  (१९८२) या ग्रंथांच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. या ग्रंथाचे भाषांतर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत करण्यात आले. ‘जनता पत्रातील लेख’, ‘धर्मांतराची भीमगर्जना’, ‘चीवर’, ‘युगप्रवर्तक डॉ.आंबेडकर’, ' चळवळीचे दिवस' 👇
‘वाद-संवाद’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’, तसेच ‘मुद्रा’ हे त्यांचे कविता संग्रहही लक्ष्यवेधी ठरले. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू तसेच जर्मन व फ्रेंच या भाषांमध्ये भाषांतरित झाल्या. 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇
लिहायला सुरुवात केली.काही वेळा नापास होत कसेतरी शिक्षण पूर्ण करुन ते नौकरीला लागले. ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर👇
अभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा👇
Read 8 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
विंदा करंदीकर (२३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, 👇
गांभीर्य आणि मिस्किलपणा, आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून 👇
घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न 👇
Read 8 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव विष्णु मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा 👇
मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला.हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला .अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे 👇
मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली हे त्यांनी स्पष्ट केले. शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे हे पहिले भारतीय संपादक होत.मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
रविंद्र पिंगे ( १३ मार्च १९२६ - १७ ऑक्टोबर २००८ )   १९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. 👇
चपखल लेखशीर्षके; अचूक व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे खास वैशिष्ट्य होय. मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘देवाघरचा पाऊस’ , ‘दिवे लक्ष्मण दिवे’, 👇
‘अत्तर आणि गुलाबपाणी’  हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’, ‘आनंदव्रत’, ‘दुसरी पौर्णिमा’ ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ , ‘पिंपळपान’ , ‘हिरवीगार पानं’ ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’व ‘सुखाचं फूल’ 👇
Read 6 tweets
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड
भाग १ - १६३० - १७०७
भाग २ - १७०७ - १७१८
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही 👇
आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड सत्तेचा मराठा सुप्रीमसी कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईच्या रुपात अस्तंगत झाली. 👇
या मराठा कालखंडाचा उदयास्त या दोन भागातील पुस्तकात अगदी सुलभतेने बारीकसारीक तपशिलांसह मांडला आहे.
पहिल्या भागात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड असुन दुसऱ्या भागात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू राजांची मोगलांच्या कैदेतून सुटकेपासुन 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
कविता विश्वनाथ नरवणे ( १२ मार्च १९३३ - २८ ऑगस्ट २०२० ) प्राध्यापिका म्हणून काम करीत असतांना लेखनाची सुरुवात केली. अनेक दिवाळी अंकात काय प्रसिद्ध झाल्या होत्या. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले. 👇
कथासंग्रह, कादंबरी, नाटके अशी त्यांची पस्तीसहुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली. ओघवती भाषा व नेमके विश्लेषण ही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या एका कथासंग्रहाचे जाने अन्जाने या नावाने हिंदीत भाषांतर झाले. सोळा भाषांतील म्हणी व वाक्प्रचार या 👇
संबंधी त्यांनी केलेले संशोधन महत्वपूर्ण आहे. या कोशाचे प्रकाशन  तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या हस्ते झाले होते. नेपोलियन या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.
Read 4 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
हरि नारायण आपटे (८ मार्च १८६४ — ३ मार्च १९१९). मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार. मधली स्थिति (१८८८) ही त्यांची पहिली कादंबरी सामाजिक आहे. रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन  ह्या कादंबरीच्या धर्तीवर ती रचिलेली आहे. ह्या कादंबरीखेरीजही त्यांनी सामाजिक कादंबऱ्या 👇
लिहिल्या आहेत. त्यांतील काही पुस्तकरूपाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाल्या. स्वत्वशून्य होऊन पराभूत मनोवृत्तीने जगणाऱ्या तत्कालीन समाजाचे चित्र त्यांच्या काही कादंबर्‍यांतून दिसते.पण लक्ष्यांत कोण घेतो ?, मी, यशवंतराव खरे आणि गणपतराव ह्या त्यांच्या विशेष महत्त्वाच्या सामाजिक👇
कादंबऱ्या होत. पण लक्ष्यांत कोण घेतो ? ही आत्मकथनपद्धतीने लिहिलेली मराठीतील पहिली कादंबरी. म्हैसूरचा वाघ  ही त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी.त्यानंतर गड आला पण सिंह गेला, चंद्रगुप्त, रूपनगरची राजकन्या , वज्राघात , सूर्योदय, केवळ स्वराज्यासाठी , सूर्यग्रहण (अपूर्ण), 👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
चिंतामण त्र्यंबक खानोलकर: (८ मार्च १९३०–२७ एप्रिल १९७६). प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. ‘आरती प्रभु’ ह्या नावाने कवितालेखन.खानोलकर मूलतः कवी आहेत. त्यांचे कविव्यक्तिमत्त्वच त्यांच्या लेखनात आढळणाऱ्या एकसंघतेच्या मुळाशी आहे. शब्दांचे अर्थ व 👇
ध्वनी यांच्या समग्र भावाशयांचा समर्थ उपयोग कवितेप्रमाणेच ते इतर लेखनातही करून घेतात. कोकणातील जीवसृष्टी व निसर्ग यांच्या परस्परानुप्रवेशी एकसंध दर्शनातून ते प्रादेशिक जीवनाचा उभा छेद सादर करतात. त्यांचे कवितासंग्रह : जोगवा, दिवेलागण , नक्षत्रांचे देणे  👇
कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी , अजगर , कोंडुरा, त्रिशंकू शिवाय नाटके : एक शून्य बाजीराव , सगेसोयरे , अवध्य , कालाय तस्मै नमः असून कथासंग्रह : सनई , गणुराया आणि चानी , राखी पाखरू  प्रसिद्ध आहेत.ह्यांशिवाय बालगीते (गोपाळ गाणी,), ललितनिबंध (वारा वाहे रुणझुणा,) व व्यक्तिचित्रे👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
स्नेहलता दसनुरकर ( ७ मार्च १९१८ - ३ जुलै २००३ ) स्नेहलता यांचे पहिले पुस्तक ‘राणी दुर्गावती’ (चरित्र) १९४५ साली प्रकाशित झाले. त्यांचे ५३ कथासंग्रह, ३ कादंबर्‍या, १ लघुचरित्र, ३ ललित लेख अशी एकूण ६० पुस्तके प्रकाशित असून त्यात ग्रामीण जीवन व सामाजिक प्रश्न 👇
यांवरील ४९० कथा व ८१ लेखांचा समावेश आहे. त्यांचे लेखन ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘माहेर’, ‘मेनका’, ‘वसंत’, ‘वाङ्मयशोभा’, ‘लोकसत्ता’ इत्यादी मासिक-साप्ताहिकांच्या दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले आहे.स्नेहलता यांच्या काही कथांचे हिंदी, गुजराती, तेलगू भाषांत अनुवाद झाले आहेत. १९५२ साली 👇
प्रसाद कथा स्पर्धेत त्यांना पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या ‘व्रजदीप’ या कथेवर ‘शापित’ हा मराठी चित्रपट तयार झाला. त्या चित्रपटाच्या कथेस महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘अवंतिका’ या कथेवर आधारित दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली, 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभाकर ताम्हणे ( २९ ऑक्टोबर १९३१ - ७ मार्च २००० ) हे कथा,पटकथा लेखक,नाटककार होते.गरवारे काॅलेज मध्ये मराठीचे प्राध्यापक होते. आपली प्राध्यापकी सांभाळून त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्या विनोदी शैलीतील कथालेखनाने.👇
अशीच एक रात्र येते हे त्यांचं फ्लॅशबॅक तंत्रातील नाटक चांगलेच गाजले. याचे हिंदी,  गुजराती, पंजाबी आणि कोकणी भाषेत भाषांतरही झाले. त्यांनी चित्रपटासाठी कथा पटकथा लेखन केले. एक धागा सुखाचा, मधुचंद्र, रात्र वादळी काळोखाची हे मराठी चित्रपट गाजले. तसेच त्यांच्या कथेवर राज कपूर ने 👇
काढलेला "बिवी ओ बिवी" हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला. अनामिक नाते, छक्के पंजे, एक कळी उमलताना, घडीभर ची वस्ती, हुंडा पाहिजे, जीवन चक्र, लाइफ मेंबर, हिम फुलाच्या देशात, हा स्वर्ग सात पावलांचा, माझ्या बायकोचा नवरा, मध्यरात्री चांदण्यात, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. 👇
Read 4 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
गोविंद शंकर बापट ( ८ फेब्रुवारी १८४४ - ६ मार्च १९०५ ) भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडीत. शिक्षक म्हणून कार्यरत असताना विविध विषयांवर बरेच लेखन केले.' नौका नयनाचा इतिहास' हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ. त्यानंतर 'नेपोलियन बोनापार्ट चे चरित्र', 👇
'पाल आणि वर्जिनिया', ' हरी आणि त्रंबक', 'एलिझाबेथ अथवा सायबेरिया देशातील हद्दपार झालेले कुटुंब', 'दशरथी रामचरित्रामृत' हे ग्रंथ त्यांच्या नावावर आहेतच. या व्यतिरिक्त संस्कृत ग्रंथार्थ संग्रह या नावाखाली अनेक कथापुराणांचे पुस्तक त्यांनी लिहिले. 👇
विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषेतील काही पुस्तके त्यांनी लिहिली. व्युत्पत्तीप्रदीप हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. हा ग्रंथ त्यांनी सिद्धांतकौमुदी, अमरकोश, वरुरची प्रकाश इत्यादीच्या मदतीने तयार केला होता. यात काही ठिकाणी व्युत्पत्ती 👇
Read 4 tweets
#पुस्तकआणिबरचकाही
वसंत नरहर फेणे ( २८ एप्रिल १९२८ - ६ मार्च २०१८ ) माणसाच्या मनाचा व मानवी संबंधांचा खोलवर जाऊन वेध घेणार्‍या त्यांच्या कथा ‘दीपावली’, ‘सत्यकथा’, ‘किस्त्रीम’, ‘केसरी’, ‘प्रतिष्ठान’, ‘मराठवाडा’ इत्यादी अंकांतून प्रसिद्ध झाल्या. ‘निर्वासित नाती’मध्ये ‘नाती’ हे 👇
एकच सूत्र खेळवले असले, तरी इतर कथांमधूनही रक्ताची नाती, प्रीती-मैत्री, नीती, मूल्य, जन्मभू आणि ‘स्व’शी असलेली नाती ते प्रकाशझोतात आणतात. कधी त्या नात्यांमधली समृद्धी दिसते तर कधी त्यातले वैफल्य. ‘मी पुरुष-पूर्ण पुरुष’ हे नाटक, ‘वैताग वानोळा’ विनोदी लेख, ‘साम्यवाद ः एक अभ्यास’👇
हा अनुवाद असे प्रकार त्यांनी हाताळले असले, तरी कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ते ओळखले जातात.
  ‘काना आणि मात्रा’ , ‘पाण्यातली लेणी’, ‘सावल्यांची लिपी’ , ‘निर्वासित नाती’, ‘पिता-पुत्र’ , ‘नरजन्म’ , ‘ज्याचा-त्याचा कु्रस’, ‘मुळे आणि पाळे’ , ‘शतकान्तिका’ , ‘मावळतीचे मृद्गंध’ 👇
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!