Discover and read the best of Twitter Threads about #पुस्तकप्रेमी

Most recents (4)

📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सार वाटायला लागतात.
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
Read 7 tweets
जेमतेम चाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेले श्रीनिवास रामानुजन म्हणजे एक अजब रसायन

गणिताच्या क्लिष्ट जगात वावरणारा अतिशय सोपा माणूस
#Ramanujan #पुस्तकप्रेमी 👇👇👇
अनेक अडचणींवर मात करत रामानुजन इंग्लंडमधल्या केंब्रिजसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये गेले.तिथे गेल्यानंतर त्यांच्या संशोधनाला आणखी धार आली.
त्यांची कारकीर्द बहरत असतानाच आधी महायुद्ध आणि नंतर आजारपणामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसली.
#Ramanujan 👇👇👇
इंग्लंडच्या त्या थंडगार हॉस्पिटलमध्ये, अर्धपोटी आणि २४ तास एकट्याने राहत असताना त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण सुदैवाने ते वाचले.
इंग्लंडच्या डॉक्टरना रामानुजनच्या आजाराचं नीट निदान झालं नाही, असंही म्हणतात.
#Ramanujan 👇👇👇
Read 12 tweets
#PP43

पुस्तक परिचय:

पुस्तक - प्रतिपश्चंद्र
लेखक - डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या - 440
किंमत रुपये - 390₹
पुस्तक बांधणी व पृष्ठ दर्जा - उत्तम Image
पुस्तक समीक्षण:
कादंबरी ची सुरुवात 2016 मध्ये म्हणजेच 21व्या शतकात होते आणि पुढे आपण 14 व्या आणि 16 व्या शतकांची सफर ह्या कादंबरीतून करतो. या तीनही शतकांचा मेळ उत्तम रीतीने लेखकाने साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे
पण त्या आधीची भारताची परिस्थिती यातून आपल्याला दिसते. बहामनी आक्रमणानंतर विजयनगरचे साम्राज्य लयाला गेले, परंतु त्या आधी विजयनगर ची अफाट संपत्ती एका रात्रीत गायब झाली होती. ती नक्की कुठे गेली? कोणालाच माहीत नाही. खूप शोध घेऊन ही तिचा काही पत्ता लागला नाही.
Read 7 tweets
#GandhiJayanti च्या दिवशी सुट चालू होती म्हणून अधाश्या सारखे पुस्तक विकत घेतले,७ दिवसांत पुस्तक वाचल्यास परत करता येईल म्हणून पहिल्यांदा हेच पुस्तक वाचायला घेतले.

विषय : गांधीवधानंतर ब्राम्हणांची झालेली कत्तल आणि जाळलेली घरे

सुरुवात पुण्यातून होते..
👇👇👇

#मराठी #हिंदसागर
3 ब्राम्हण मित्र जे गांधीवधानंतर पुण्यात जाळपोळ-दंगे चालू झाल्यावर खाण्याची-राहण्याची आबाळ होत असल्याने आपल्या सातारा जवळ असणाऱ्या गावी निघतात.
ते ज्या एस.टी त बसतात त्यातील ड्राइवर ला ते ब्राम्हण असल्याचे समजल्यावर रस्त्याने जाताना गावाच्या जवळ जाळपोळ चालू होते
👇👇👇
म्हणून त्यांना रस्त्याने उतरवतात त्यांना त्यामुळे लवकर पोचता येत नाही, रात्र दुसऱ्या गावात काढावी लागते.निरनिराळ्या येणाऱ्या बातम्या त्यांचे मन अजूनही विचलित करतात. राहण्या-खाण्याची अजून तऱ्हा होते, या परिस्थितीत त्यांचा घराच्या दिशेने प्रवास चालू असतो.
👇👇👇
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!