Discover and read the best of Twitter Threads about #बाजारु_विचारवंत

Most recents (6)

#Thread : एकता

गेल्या काही दिवसांपासून ‘मराठ्यांच्या राज्याचा अखेर’- ह्या विषयावरचे समकालीन संदर्भ चाळताना यशवंतराव होळकर यांची काही महत्त्वाची पत्रे वाचनात आली.

त्यावेळची आणि आजची परिस्थिती काही वेगळी नाही. म्हणूनंच प्रत्येकाने यशवंतरावांचे विचार आत्मसात करणे गरजेचं आहे.

१/१४
महादजींच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तकपुत्र दौलतराव ह्यांच्या हाती सत्ता आली.

दौलतराव महत्वाकांक्षी होते. तुकोजी होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास (काशीराव) हाताशी धरुन सगळी सत्ता स्वतःकडे घ्यायची होती.

रावबाजी तर पहिल्यापासून दौलतरावाच्या अमलाखाली होते.

२/१४
पण नाना फडणवीस आणि मल्हारराव होळकर ह्यांना हे मान्य नव्हतं. मल्हारराव कर्तृत्ववान होते.

पेशवे-शिंदे-होळकर ह्यांच्यात रावबाजी-दौलतराव-काशीराव आणि नाना-मल्हारराव असे गट निर्माण झालेले.

नानाच्या भितीमुळे बाजीरावाने दौलतरावास पुण्यात ठेवून घेतलेलं.

३/१४
Read 14 tweets
#Thread:जगद्गुरु तुकाराम महाराज आणि पेशवे

ब्राह्मण-ब्राह्मणेतर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आजपर्यंत अनेक दंतकथा निर्माण केल्या गेल्या.

B-ग्रेडी #बाजारु_विचारवंत तर सांगतात पेशवाईत तुकाराम महाराजांचं नाव घेण्यावर बंदी होती.

बघूयात तुकोबांचे पणतू ह्याबद्दल काय सांगतात ते.

१/३
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पणतू खंडेरावबाबा यांनी श्रीमंत नानासाहेब पेशवा ह्यांना एक पत्र लिहीलेलं.

ह्या पत्रात खंडोबा गोसावी तुकाराम महाराजांच्या फाल्गुन मासातील उत्सवासाठी मदत मागत आहेत व थोरल्या राऊस्वामींनी आणि अप्पास्वामींनी केलेल्या सांभाळाचा देखील उल्लेख करत आहेत.

२/३
यावरुन हे स्पष्ट होतं की छत्रपतींचे पेशवे तुकाराम महाराजांचा किती आदर करत होते.

B-ग्रेड्यांनी आता एक नवीन दंतकथा तयार करावी. त्यांचं पितळ उघडं करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत!

अजून एक, तुकाराम महाराजांचे पणतू अभिमानाने पत्राची सुरुवात ‘श्रीरामचंद्र प्रसन्न’ ह्याने करतात.

३/३
Read 3 tweets
प्रति भावी आमदार सचिन सावंत,

रायगडावर शिवछत्रपतींनी बांधलेली मशीद सापडली का? नाही ना🤷🏻‍♂️असो, प्रयत्न थांबवू नका.

बरं आज मी, भाजप चा एक ‘लहान’ कार्यकर्ता तुम्हाला काही गोष्टींची आठवण करवून देऊ इच्छितो.

आप बस Chronology समझीये👇🏼

१/४
🔸१९४८ मधे ब्राह्मणांची आणि १९८४ मधे शिखांची कत्तल घडवून आणून समाजात जो द्वेष पसरवला गेला, तो विसरलात का?

🔸१९७५ साली देशात आपातकाल लावून जो लोकशाही चा खून केला गेला, संस्थांचे अधिकार काढून घेतले गेले, तेव्हा ‘विश्वासार्हता’ कुठे गेलेली?

🔸असंख्य घोटाळे केलेल्या...
२/४
...CONग्रेसच्या पदाधिकाऱ्याला ‘विश्वासाबद्दल’ बोलणं शोभत का🤷🏻‍♂️

🔸१९८५ साली शाह बानो खटल्यामधे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून, Bofors चा घोटाळा करुन, BoP Crisis होई पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावून, देशाचं सोनं विकून भारताची आर्थिक आणि सामाजिक अधोगती झाली नाही का🤷🏻‍♂️

३/४
Read 4 tweets
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर...

नेहमी ‘हिंदुपदपादशाही’ यातील ‘हुतात्मा छत्रपति’ चा SS वापरुन सावरकरांवर ताशेरे ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न #बाजारु_विचारवंत यांच्याकडून केला जातो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदुपदपादशाही’ १९२८ साली लिहीलं.

१/१०
१९२८ साली छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर किती संशोधन झालं होतं या कडे दुर्लक्ष करुन सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतले विचारवंत आणि इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार याबद्दल काय म्हणतात ते नक्की वाचा👇🏼

संदर्भ - छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ

२/१०
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९२८ मध्ये जेव्हा ‘हिंदुपदपादशाही’ लिहीलं त्यावेळेला बखरींपलिकडे काही साधनं उपलब्ध नव्हती.

सावरकरांनाही बखरींच्या द्वारे प्रस्तृत झालेले शंभूचरित्र ज्ञात होते.

आणि बखरकार आणि धर्मवीर शंभूराजे याबद्दल आपल्याला सत्य माहीतंच आहे.

३/१०
Read 10 tweets
#Thread: Renaissance State

इतिहासाचं विकृतीकरण काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. अनेक महापुरुषांच्या इतिहासाचं विकृतीकरण गेले अनेक दशकं सुरु आहे.

@girishkuber यांच्या या👇🏼 पुस्तकावरुन पुन्हा एक जूना वाद पेटला आहे.

आज कुबेर यांनी मांडलेल्या काही प्रमुख मुद्यांचं खंडण करतोय.

१/२०
🔸 बखरकार/इतिहासकार/कादंबरीकार आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.

बखरकारांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कधी कळलेच नाही. काहींनी मुद्दामून त्यांना बदनाम केलं.

दोन बखरकारांनी शंभूराजेंची बदनामी केली - कृष्णाजी अनंत सभासद (ब्राह्मण) आणि मल्हार रामराव चिटणीस (चं.का.प्रभू).

२/२०
इथे या दोघांची जात नमूद का केलीये ते पुढे कळेलंच.

मल्हार रामराव चिटणीसाचे लिखाण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केलेले आहे हे तर सर्वश्रुत आहे.

सभासद आणि चिटणीस बखरीमध्ये शंभूराजेंच्या केलेल्या नालस्तीबद्दल डॅा.जयसिंगराव पवारांचं मत👇🏼

३/२०
Read 20 tweets
हैंदव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही ‘मनुस्मृतिच्या कायद्याची अम्मलबजावणी होती’ - satyashodhak.com

हा विकृत इतिहास अनेक B-ग्रेडी बाजारु विचारवंत पसरवत असतात.

पण सत्य काय आहे? शंभूराजेंची हत्या कोणी आणि का केली हे जाणून घेऊयात ‘मआसिर-ए-आलमगिरी’ मधून.

१/४
मआसिर-ए-आलमगिरी औरंगजेबाच्या शेवटच्या सचिव व लाडका शिष्य (इनायतुल्लाह खान कश्मीरी) याच्या सांगण्यावरुन मुहम्मद साकी मुस्तैद खान ने १७१० मध्ये पूर्ण केला.

मआसिर-ए-आलमगिरी च्या ३२व्या अध्यायात पृ.१९४ ते १९६ वर धर्मवीर शंभूराजे आणि कविकलश यांच्या अमानूष हत्येचा उल्लेख आहे.

२/४
धर्मवीर शंभूराजे आणि छंदोगामत्य कविकलश यांना कशा प्रकारे हाल करुन आणि कोणाच्या सांगण्यावरुन मारलं गेले हे साफ नमूद केलेलं आहे.

एवढंच नाही तर ‘का मारलं गेलं’ हे पण नमूद केलेलं आहे.

आता समकालीन मआसिर-ए-आलमगिरी वर विश्वास ठेवायचा का विकृत इतिहासावर, हे ज्याने-त्याने ठरवावे.

३/४
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!